सायकल - विनोदी कथाकथन भाग 2/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सायकलच्या वेगवेगळया ट्रिक्स शिकायला मला जास्त वेळ लागला नाही. घंटी वाजवून इशारे करणे, कट मारणे. कट मारणे हा प्रकार तर मी मोठया शिताफीनं शिकलो. सायकलची चेन कशी बसवायची येवढेच नाही तर कशी पाडायची हे पण मी शिकलो. म्हणजे आयत्या वेळी एखाद्या घरासमोर घुटमळायला प्रॉब्लेम नको. एकदा असाच मी सायकल दांडयावरून चालवितांना अचानक पडलो. असा रपकन् आपटलो की विचारता सोय नाही. उठून उभा राहून कुणालाही टक्कर न मारता कसा आपटलो हे मी शोधू लागलो. तोपर्यंत दोन तीन बघे जमा झाले होते. त्यातला एकजण म्हणाला चेन निघाली

वस्तूतः दांडयावरून सायकल चालविता चालविता सायकची चेन निघाली होती. त्यामुळे मी पडलो होतो. पण त्याने चेन निघाली म्हणताच काही न समजून गोंधळलेल्या स्थीतीत पटकण मी आपली पँटची चेन चेक करून घेतली. न जाणो घरून निघता निघता उघडी राहीली असेल.



एक दिवस मी आणि माझा मित्र राजा डबलसीट जात होतो. पोरांना डबलसीट नेण्याच्या पलीकडे अजून मी गेलो नव्हतो. समोरून एक सायकलवाला चेंडू दाबल्यागत इशारे करून एका मोटारसायकलवाल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

अपेक्षेप्रमाणे मागच्या राजाने विचारले, ''अरे , काय सांगतोय तो?''

''अरे, काही नाही हेडलाईट सुरू आहे म्हणून सांगतोय .'' मी म्हटले.

''लेकांना फुकट वीज वापरायची सवयच काय करणार'' राजाने टोला हाणला. मी आपला गपचूप सायकल चालवीत होतो. तेवढयात समोरून एक दुसरी मोटारसायकल आली. राजानं त्याच्या हाताचं मधलं बोट हालवून त्या मोटारसायकल वाल्याला काहीतरी विचित्र इशारा केला. राजा अचानक असे काही करेल याची मला अपेक्षा नव्हती.

मी राजाला ''गप बस मार खाऊ घालतोस की काय ?'' म्हणून सायकल जोरानी चालवायला लागलो.

राजा मागे फिरूनफिरून त्या मोटारसायकल वाल्याला इशारा करीतच होता. तो मोटारसायकलवाला राजाकडेच काय टारगट कार्टी आहेत या अविर्भावाने पाहात होता. मी त्याला मोटारसायकल वळवून आमच्या मागे येतांना बघितले.

मी मनातल्या मनात प्र्रार्थना केली, ''देवा, आता तूच वाचव रे बाबा कुठून दुर्बुध्दी झाली या राजाला मागे बसविले''.

तरी राजाचं आपलं मधलं बोट हलवून इशारे करणं सुरूच होतं. त्या मोटारसायकल वाल्याने आमच्या सायकलच्या समोर गाडी थांबविली. मला सायकलला ब्रेक लावण्यावाचून पर्यायच नव्हता. त्याने मोटरसायकलवरून उतरून सरळ राजाची कॉलर पकडली आणी एक झणझणीत त्याच्या कानशिलात लगावली.

''अंकल , ऐका तर'' राजा बिचारा कळवळून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

पण त्या गाडीवाल्याने अजून एक त्याच्या कानशिलात लगावली आणि मग म्हटला, '' हं, आता बोल''

''अहो केव्हापासून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तुमच्या गाडीचे साईड स्ट/न्ड वरती आहे म्हणून'' राजा बिचारा रडकुंडीला येऊन पुन्हा मधलं बोट हलवून बोलला.

क्रमशः ...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments: