Ch-6: दहशत ( Marathi Novel - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याचा एक साथीदार कॅफेमधे बसलेले होते. त्यांच्यात काहीतरी गहन चर्चा चाललेली होती. त्यांच्या हावभावांवरुन तरी वाटत होते की ते एवढ्यात झालेल्या दोन खुनांबद्दलच चर्चा करीत असावेत. मधे मधे ते दोघेही कॉफीचे छोटे छोटे घोट घेत होते. अचानक कॅफेमध्ये ठेवलेल्या टिव्हीवर सुरु असलेल्या बातम्यांनी त्यांचे लक्ष आकर्षीत केले.

टीव्ही न्यूज रिडर सांगत होता - खुन्याने मारलेल्या अजुन एका ईसमाची बॉडी आज पोलिसांना सापडली. ज्या तऱ्हने आणि जेवढ्या बर्बरतेने पहिला खुन झाला होता त्याच बर्बरतेने किंबहूना जास्त .. याही इसमाला खुन्याने मारले होते. यावरुन कुणीही याच निष्कर्शाप्रत पोहोचेल की या शहरात एक खुला सिरीयल किलर फिरतो आहे... आमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्हीही बॉडीज अशा खोलीत सापडल्या की ज्या आतून बंद केलेल्या होत्या. पोलिसांना याबाबत विचारल्यास त्यांनी या प्रकरणावर काहीही सांगण्यास नकार दिला आहे. आजुबाजुचे लोक अजुनही धक्यातून सावरलेले नाहीत. आणि शहरात तर सगळीकडे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. काही लोकांच्या माहितीनुसार ज्यांचा खुन झालेला आहे त्या दोघांच्याही नावावर गंभीर क्रिमीनल गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे असा एक निश्कर्ष काढला जावू शकतो की तो खुनी अशाच गुन्हेगार लोकांना मारु इच्छीतो.

'' जर खुन्याला मिडीया अटेंशन पाहिजे होते तर तो त्याच्या उद्देशात सफल झालेला आहे'' डिटेक्टीव्ह सॅम आपल्या साथीदाराला म्हणाला. पण त्याच्या समोर बसलेला अधिकारी काहीच बोलला नाही कारण अजूनही तो बातम्या एकण्यात गुंग होता.

शहरात सगळीकडे दशहत पसरली होती . एक सिरीयल किलर शहरात मोकळा फिरतो आहे. पुलिस अजूनही त्याला पकडण्यात यशस्वी झाले नव्हते. तो अजून किती जणांना मारणार ? ...त्याचे पुढचे सावज कोण - कोण असणार ? आणि तो लोकांना का मारतो आहे ? काही कारण की विनाकारण ? उत्तरं कुणाजवळच नव्हती .

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

  1. Khup Chhan Aahre But Not Like that Mrugjal, I read whole Novel Mrugjal & Its my Life's First Novel which I read in two days. Very Nice & It binded me till the last chapter. I am very attract with Priya.

    Yours
    Santosh K.

    ReplyDelete