Marathi books - Black Hole CH-36 डायरी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Quote of the day -

In life we all have an unspeakable secret, an irreversible regret, an unreachable dream and an unforgettable love.

---Diego Marchi


जाकोबने तिथे बाजुला ठेवलेला ओव्हरकोट आपल्या अंगावर चढविला आणि तो तिथून निघून जाण्यास तयार झाला. स्टेला अजुनही तिथेच उभी होती. त्या दोघांत एक प्रकारची विचित्र शांतता होती. वातावरणात एक विचित्र तणाव जाणवत होता.

'' ओके.. तर मी निघतो'' जाकोब कसाबसा म्हणाला.

त्यांची एकमेकांच्या नजरेला नजर भिडविण्याची हिम्मत होत नव्हती. तरी पण एक क्षण का होईना त्यांनी एकमेकांकडे पहाले. जास्त वेळ ते एकमेकांच्या नजरेला नजर देवू शकले नाहीत. स्टेलाने पटकन मान खाली घातली तर जाकोब निघण्याच्या निमीत्ताने दरवाजाकडे वळला. एका क्षणाचाही विलंब न लावता लांब लांब पावले टाकीत जाकोब तिथून निघून गेला. जावे की न जावे या दूविधेत स्टेला त्याच्या मागे दरवाजापर्यंत जावू लागली पण मधूनच ती परत आत निघून आली.

जाकोब जाता तिच्याकडे जाता वळून पाहत म्हणाला, '' बाय.''

तिने वळून दरवाजाकडे बघितले. तर तो गेलेला होता. स्टेला परत दाराजवळ गेली आणि तिने दार ओढून घेतलं. दार बंद करुन ती आत सुझान आणि डॅनियलकडे जायला लागली तेवढ्यात तिचं लक्ष सोफ्याकडे गेलं. सोफ्यावर काहीतरी पडलेलं होतं.

कदाचित जाकोब विसरला असेल...

ती सोफ्याजवळ गेली तर ती जाकोबची डायरी होती. जाकोब बहुदा ती विसरला असावा. ती डायरी उचलून घाईघाईने ती दार उघडून बाहेर पडली.

कदाचित जाकोब अजुनही गेला नसावा...

बाहेर आल्यानंतर ती आजुबाजुला कुठे जाकोब दिसतो का ते बघायला लागली. तो कुठेच दिसत नव्हता. ती अजुन समोर समोरच्या फाटकापर्यंत गेली आणि बाहेर बघायला लागली. पण जाकोब काही दिसत नव्हता. शेवटी तो सापडत नाही हे पाहून ती आपल्या घरात परत यायला लागली.

घरात परत येता येता ती सहजच जाकोबची डायरी उघडून चाळायला लागली. चालता चालता ती एकदम थांबली. डायरीतला मजकुर वाचून तिला एकावर एक आश्चर्याचे धक्के बसत होते. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारल्या जात होते आणि चेहऱ्यावर भिती, काळजी, चिंता आणि आश्चर्याचे भाव कधी एकत्र तर कधी आलटून पालटून उमटत होते. ती डायरी वाचता वाचता घरात शिरली. घरात हॉलमध्ये आल्यावर तिच्या लक्षात आले की तीच्या पायातली शक्ती संपून एकदम तिचे पाय अगदी क्षीण झाले आहेत. ती मटकन सोफ्यावर बसली.

आधीचा एक एक प्रसंग तिच्या डोळ्या समोरुन जायला लागला -


....तिला आठवलं. एकदा कॉफी हाऊसमध्ये ते दोघं एकमेकांसमोर बसले होते आणि जाकोब त्यांच्या दोघांसाठी कॉफी तयार करीत होता. त्याने त्याच्या स्वत:च्या कपात दोन चमचे साखर टाकली होती तर तिच्या कपात साखर न टाकता तो कप तिच्या जवळ दिला होता.

'' मी साखर घेत नाही हे तुला कसं काय माहित?'' तिने विचारले होते.

'' मला अशा अजुन बऱ्याच गोष्टी माहीत आहेत'' जाकोब गुढेपणे गालातल्या गालात हसत म्हणाला होता.

'' तुला गिब्सनने सांगितले असेल कधीतरी'' ती म्हणाली होती.

आणि जाकोब नुसता गुढपणे हसला होता.....


स्टेला सोफ्यावर बसुन अजुन जाकोबची डायरी चाळायला लागली. तेवढ्यात सुझान तिथे आली. तिने स्टेलाकडे निरखून बघितले. स्टेलाला अजुन दुसरा एक प्रसंग आठवला -


.....स्टेला जेव्हा त्या धोकादायक ब्लॅकहोलमध्ये उडी मारणार होती तेव्हा कशी अचानक जाकोबने तिच्यावर झेप मारली होती आणि तिला पकडून मागे खेचले होते.....


स्टेला अजुनही त्या डायरीची पानं चाळीत होती. तिच्या चेहऱ्यावर अजुनही कधी आश्चर्याचे, कधी भितीचे तर कधी काळजीचे भाव दिसत होते. तिथे उभी राहून सुझान हा सगळा प्रकार पाहत होती.

'' स्टेला ... काय झालं?... कुणाची डायरी आहे ती?'' सुझानने न राहवून विचारले.

स्टेलाने काहीच उत्तर दिले नाही. ती अजुनही डायरी वाचण्यातच गुंग होती. अचानक तिने डायरी बंद केली, निश्चयाने ती उठून उभी राहाली आणि घाईघाईने घराच्या बाहेर पडली. डायरी तिच्या सोबतच होती.

सुझान आश्चर्याने तिला घराच्या बाहेर जातांना पाहत होती. स्टेलाच्या मनात काय चाललं होतं ते सुझानला काही कळत नव्हतं.


क्रमश:...


Quote of the day -

In life we all have an unspeakable secret, an irreversible regret, an unreachable dream and an unforgettable love.

---Diego Marchi


Marathi, Mrathi, Marthi, Marati, Marti, Mrthi, Marathi Novels, Marathi books, Marathi sahitya, Marathi literature, Marathi web, Marathi font, Marathi blog, Marathi chittha, Maza blog, Mazi Marathi

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. kahani vegle valan ghet aahe!!!

    ReplyDelete
  2. Sunil Sir,
    Maza tar gondhal udato aahe vachatana..tumche imagination farach chan aahe.

    ReplyDelete
  3. till nw was superb....pudhach vachyach ahe....nakkich avdel....as usual...:)

    ReplyDelete