Valuable thoughts -
My opinions may have changed, but not the fact that I'm right.
--- Ashleigh Brilliant
आपल्याला कुणी ऐकूही शकत नाही आणि पाहूही शकत नाही हे पाहून जाकोब हताश झाला होता. तो स्टॆलाच्या समोर जावून उभा राहाला आणि काकूळतेने तिला बोलू लागला -
'' माझे संशोधन जिथपर्यंत डॉ. स्टिव्हन हॉल्स संशोधन करता करता पोहोचले होते आणि जिथून पुढे ते संशोधन नेवू शकले नव्हते, तिथपर्यंत पोहोचले होते''
स्टेलाने जाकोबच्या डोळ्यात पाहाले. तिला तिच्या नवऱ्याबद्दल अभिमान वाटत होता.
'' फक्त कृत्रिम जग तयार करनं पुरेसं नव्हतं... तर अजुन बऱ्याच गोष्टी करणं आवश्यक होतं. '' जाकोब पुढे म्हणाला.
'' जसं?'' स्टेलाने विचारले.
'' जसं की... जसे त्यांनी कृत्रिम जग तयार केली होती... तशीच अशी काही खरोखरची विश्वं सुध्दा अस्तित्वात असली पाहिजेत''
'' हो ... हे तू मला पुर्वी एकदा सांगितलं होतं'' स्टॆला म्हणाली.
'' म्हणूनच तर ... त्या खरोखरच्या जगात प्रवेश करण्याचा आणि तिथून परत येण्याचा काहीतरी रस्ता अस्तित्वात असला पाहीजे... तो रस्ता शोधनेही या संशोधनाचा एक भाग म्हणून तेवढाच महत्वाचा आहे ... जर तो रस्ता शोधल्या गेला नाही तर डॉ. स्टिव्हन हॉल्स यांनी केलेल्या संशोधनाला काही अर्थच उरत नाही... नव्हे त्या शिवाय ते संशोधन अपूर्ण आहे '' जाकोब म्हणाला.
आता तो म्हातारा माणूस त्यांच्याजवळ येवून त्यांच्यात सामिल झाला.
'' माय डियर... या जगात काहीही अपूर्ण नाही आहे... प्रत्येक गोष्टीला तिचा आपला अंत निर्धारीत केलेला आहे'' तो म्हातारा माणूस म्हणाला.
जाकोब त्या म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष करीत स्टेलाकडे एकटक पाहत म्हणाला,
'' पण आता आपण आपले संशोधन कसे पुढे चालवायचे''
'' हो ना... आता सध्या तर आपण साधी एखादी वस्तूही पकडू शकत नाही आहे'' स्टेला म्हणाली.
'' माझ्या मित्रा... आता तू जिथेही आहेस... इथे सगळे नियम भिन्न आहेत... हे संपूर्णपणे एक वेगळे जग आहे'' तो म्हातारा म्हणाला.
'' ते काहीही असो ... एक गोष्ट मात्र नक्की आहे ... की ते संशोधन पूर्ण करण्यास आपल्याला पुन्हा परत आपल्या जगात गेले पाहिजे'' जाकोब निर्धाराने म्हणाला.
तो म्हातारा आता गुढ भाषेत बोलायला लागला -
'' कुणी एक ज्ञात धूंडण्या अज्ञात निघाला
धुंडाळील अज्ञात जरी करुन जिवाचे रान परी
सांगे जगी कैसा जर स्वत:च तू अज्ञात जाहला ''
'' परत जाणार? ... माय डियर... दुर्दैवाने परत आधीच्या जगात जाणं मला नाही वाटत शक्य आहे'' तो म्हातारा पुढे म्हणाला.
आता मात्र जाकोबच्याने राहवले गेले नाही; त्याने वळून त्या म्हाताऱ्याच्या डोळ्याला डोळे भिडवून उभा राहत रागाने विचारले,
'' का नाही शक्य होणार?''
'' कारण असं कधी ना आधी झालं आहे ना कधी भविष्यात होणार आहे...'' त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले.
जाकोबने काळजीपुर्वक आणि उत्सुकतापुर्वक त्या म्हाताऱ्याचे एक टक पाहत निरिक्षण करीत विचारले,
'' बाय द वे... तुम्ही कोण आहात?... आणि तुम्ही आमच्या मागे का लागला आहात?... कृपा करुन आम्हाला आमच्या परिस्थीतीवर सोडून द्या '' जाकोब चिडून म्हणाला.
'' मी डॉ. स्टिव्हन हॉल्स आहे'' तो म्हातारा गुढतेने म्हणाला.
क्रमश:...
Valuable thoughts -
My opinions may have changed, but not the fact that I'm right.
--- Ashleigh Brilliant
Marathi entertainment, Marathi literature, Marathi sahitya, Marathi cinema, Marathi songs, Marathi books, Marathi novels, Marathi pustak, Marathi pustake, Marathi wangmay, Marathi vangmay,
No comments:
Post a Comment