कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Ch-36: प्रपोज (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


अजूनही अँजेनी जेवणाच्या टेबलसमोर बसलेली होती. टेबलवर लावलेल्या मेणबत्या शेवटी विझून गेल्या होत्या. टेबलवर फक्त शिल्लक राहिलं होतं इकडे तिकडे पसरलेलं मेण. तिच्या हृदयाचीसुध्दा अवस्था काहीशी त्या मेणासारखीच होती. जळून जळून थिजल्यासारखी. टेबलवर जेवण जसंच्या तसं ठेवलेलं होतं. वाट पाहून पाहून कंटाळल्यानंतर ती खुर्चीवरून उठली. तेवढ्यात घड्याळाचा गजर वाजला. बारा ठोके. तिला ते तिच्या हृदयावर कुणीतर घणाघण घाव घातल्यासारखे वाटले. रात्रीचे बारा वाजले होते.

तो बरोबर आठ वाजता इथून निघाला होता...

म्हणजे बरोबर चार तास झाले होते...

तो कदाचित कॉटेजजवळ आला असेल...

ती खिडकीजवळ जाऊन खिडकीतून डोकावून बाहेर बघू लागली. कॉटेजकडे येणारा रस्ता एकदम शांत होता. एकदम निर्मनुष्य. ना कुणाची चाहूल ना कोणत्या वाहनाचे दिवे. ती बराच वेळ त्या रस्त्याकडे डोळे लावून बसली. अचानक तिला दोन दिवे रस्त्यावर पुढे येतांना दिसले. ते तिच्याकडेच येत होते. तिचा चेहरा आनंदाने उजळला.

तोच असावा...

नक्कीच जॉन असावा...

ती दूर रस्त्यावर समोर समोर सरकत्या गाडीच्या दिव्यांकडे पहायला लागली. जसे जसे गाडीचे दिवे जवळ जवळ यायला लागले तिच्या हृदयात उचंबळून यायला लागले.

जॉनबद्दल आपण उगीच शंका घेतली...

तिला अपराध्यासारखे वाटायला लागले होते. गाडी आता समोरच्या फाट्याजवळ आली होती.

गाडी एक वळण घेईल आणि मग आपल्या कॉटेजकडे यायला लागेल. वळणाच्या नंतर रस्ता समोर पुढे कुठेतरी जात असावा...

पण हे काय?...

गाडी वळणावर कॉटेजकडे न वळता सरळ समोर निघून गेली...

पुन्हा निराशा तिच्या चेहऱ्यावर पसरली. आपल्या मनाची विषण्णता घालविण्यासाठी ती आता खोलीत येरझारा घालायला लागली. अधून मधून ती खिडकीतून बाहेर डोकावत होती. समोरचा रस्ता पुन्हा पूर्ववत रिता दिसायला लागला होता. येरझारा मारता मारता पुन्हा तिने एकदा भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिले. साडे बारा वाजून गेले होते. अजून जॉनचा पत्ता नव्हता. तिला आता एकांताची भीती वाटायला लागली होती. तिने पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर बघितले. तिची आशा पुन्हा बळावू लागली. पुन्हा गाडीचे दोन दिवे तिला रस्त्यावरून सरकतांना दिसले.

आता नक्की तोच असावा...

ती पुन्हा खिडकीजवळ उभी राहून त्या दिव्यांकडे एकटक बघायला लागली.

ही गाडी जॉनची असूही शकते आणि नसूही शकते...

पण आशा किती खूळी असते...

अचानक वळणाजवळ आल्यानंतर गाडीचे दिवे दिसेनासे झाले.

काय झाले?..

गाडी तिथे थांबली की काय?...

की गाडी येत आहे हा नुसता आपल्याला झालेला भास होता?...

ती खिडकीतून बाजूला होऊन पुन्हा खोलीत येरझारा मारू लागली. अचानक तिला खाली गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. ती खिडकीकडे धावली. तिने बाहेर डोकावून बघितले. जॉन गाडीतून उतरत होता. तिच्या जिवात जीव आला. ती दरवाज्याकडे धावत गेली. दरवाजा उघडून जॉनकडे जवळ जवळ धावतच गेली. समोरून जॉनसुध्दा धावत येत होता. ती धावतच जॉनच्या मिठीत शिरली.

" किती वेळ लावलास ? ..." ती जॉनच्या छातीवर हलकेच गुद्दे मारत म्हणाली.

" किती घाबरले होते मी ... मला वाटलं तू मला आता इथेच सोडून जाणार" त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

" वेडी आहेस ... असे कधी होणे शक्य आहे का ?" तो तिच्या खांद्यावर हात टाकून तिला कॉटेजमध्ये आणत म्हणाला.

दोघेही एकमेकांच्या कंबरेत हात घालून पायऱ्या चढू लागले.

" आता सांग ... कुठे गेला होतास?" तिने विचारले.

" सांगतो ... सांगतो ... जरा धीर धरशील" तो म्हणाला.

एव्हाना दोघेही कॉटेजमध्ये शिरले होते. अँजेनीने आत येताच समोरचे दार लावून घेतले. आणि तो काय सांगतो या उत्सुकतेने ती त्याच्या मागे मागे घोटाळू लागली. तो सरळ आत जाऊन जेवणाच्या टेबलजवळ गेला. ती पण त्याच्या मागे मागे त्याच्यासोबत गेली. त्याने पुन्हा जेवणाच्या टेबलवर मेणबत्या लावल्या. घरातले सगळे लाईट घालविले. अँजेनी गोंधळून फक्त त्याच्या मागे मागे फिरत होती. त्याने तिच्या खांद्याला धरून तिला त्याच्या समोर खुर्चीवर बसविले.

" बस बस ... तुला सांगतो मी कुठे गेलो होतो ते" तो तिला म्हणाला.

तोसुध्दा तिच्या समोर बसला. थोडा वेळ दोघंही स्तब्धच होती. मग जॉनने तिच्या डोळ्यात बघत तिचे मुलायम हात आपल्या हातात घेतले. मेणबत्यांच्या उजेडात तिची कांती अजूनच उजळून दिसत होती. जॉनचा आल्या आल्या हा चाललेला प्रकार पाहून तिने गोंधळून त्याच्याकडे बघितले.

" अँजेनी तू माझ्याशी लग्न करशील का?" त्याने तिच्या डोळ्यात रोखून पाहत तिला प्रपोज केले.

अँजेनीला एकदम गहिवरून आले.

पण स्वत:ला सावरून ती म्हणाली, " इज धीस सम काईंंड ऑफ जोक?"

" नाही नाही ... मी सिरीयस आहे" तो म्हणाला.

" हे बघ जॉन आधीच तू इतका वेळ नव्हतास तर मला हुरहूर वाटत होती... कमीत कमी अशा वेळी तरी अशा फालतू गमती करू नकोस" ती त्याला म्हणाली

" नाही अँजी ... मी गंमत करीत नाहीये" तो तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करू लागला.

जॉनने तिला प्रथमच 'अँजी' अशा प्रेमळ नावाने हाक मारली होती. ती त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवीत त्याच्या डोळ्यातले भाव समजण्याचा प्रयत्न करू लागली.

" तुला खरं नाही वाटत नं ..."

त्याने त्याच्या कोटाच्या खिशातून एक लाल डबी काढीत म्हटले,

" हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे..."

" काय आहे?" तिने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

त्याने डबी उघडून तिच्यासमोर धरीत म्हटले,

" एंंगेजमेंट रिंग ... ऑफ कोर्स इफ यू अॅग्री.."

त्याने पुन्हा तिला एकदा विचारले, " विल यू मॅरी मी प्लीज"

अँजेनीच्या डोळ्यात अश्रू तरळले.

" याच्यासाठी गेला होतास का तू शहरात?" तिने दाटल्या गळ्याने विचारले.

त्याने तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत होकारार्थी मान हलविली.

ती खुर्चीवरून उठून उभी राहिली. तोही त्याच्या खुर्चीवरून उठला. ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली.

" यस आय विल" तिच्या दाटल्या गळ्यातून शब्द फुटले.

त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा पसरल्या. तो अत्यानंदाने तिला उचलून तिचे चुंबनं घेवू लागला. त्याने मग हळूच तिला खाली उतरवून डबीतली अंगठी काढून हातात घेतली आणि हळूच तिच्या अनामिकेत सरकवली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-35: चार तासांचा अवधी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



रात्र झाली होती. दोघांनी मिळून स्वयंपाक केला. जेवणाच्या टेबलवर सगळे पदार्थ सजवून ठेवले. जॉनने खोलीत अंधार करून टेबलवर कॅन्डल्स लावून पेटविल्या. दोघं जण जेवणाच्या टेबलवर मेणबत्यांच्या अंधूक प्रकाशात समोरासमोर एकमेकांना प्रेमाने न्याहाळत बसले. जेवणाचे पदार्थ तसेच पडून होते. त्यांना भूक तहानेचे भान होतेच कुठें! त्यांची भूक तहान हरविली होती. अचानक तिला जाणवले की जॉनचा चेहरा पुन्हा काळजीत पडून विचारमग्न झाला आहे.

" हॅलो" तिने चुटकी वाजवून त्याला विचारातून बाहेर आणले.

" काय विचार करतोस?" तिने विचारले.

" इथून जर गाडीने शहरात जायचे असेल तर किती वेळ लागेल?" त्याने विचाराच्या तंद्रीतून बाहेर येत विचारले.

" लागतील दोन एक तास. का? का विचारतोस?" तिने त्याला विचारले.

" प्लीज तू मला चार तासांचा अवधी देशील?"

" कशाला?" तिने विचारले.

" एक अर्जंंट काम निघालं आहे. दोन तास जाण्यासाठी आणि दोन तास येण्यासाठी. बस चार तासात मी जाऊन आलोच." तो तिच्याकडे बघत म्हणाला.

तिचा चेहरा पडल्यासारखा झाला.

" प्लीज " तो तिची विनवणी करीत म्हणाला.

" जाणे आवश्यक आहे का?" ती र्नव्हस होत त्याला म्हणाली.

" हो, फार आवश्यक आहे" तो तिला म्हणाला.

" पण असं काय काम आहे?" तिने विचारले.

" ते मी तुला आत्ता सांगू शकत नाही. तिकडून आल्यावर नक्की सांगेन" तो तिचा मूड व्यवस्थित करण्यासाठी खुर्चीवरून उठत हसत म्हणाला.

ती काही बोलण्याच्या आधीच तो घाईघाईने बाहेरसुध्दा गेला. 'ठक..ठक' पायऱ्या उतरण्याचा आवाज येऊ लागला. ती उठून खिडकीजवळ गेली. खिडकीतून ती त्याला गाडीपर्यंंत जात असलेला पाहत राहिली. गाडीजवळ जावून त्याने वळून वर खिडकीकडे बघितले.

" तू काळजी करू नकोस. बरोबर चार तासात मी परत येईन" खालून मोठयाने सांगत तो गाडीत बसला.

'खाट' गाडीचे दार त्याने जोरात ओढून घेतले. तिचे हृदय धडधडू लागले. त्याने गाडी सुरू करून गाडीच्या खिडकीतून तिला 'बाय' केले आणि तो निघून गेला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा म्लानता दिसायला लागली. चार तासांसाठी का होईना तो तिला हुरहूर लावून गेला होता.

तो कशासाठी गेला असेल?...

तो नक्की परत येईल ना?...

की सानीसारखा तोसुध्दा आपल्याला अर्ध्या वाटेतच सोडून जाईल?...

तिचं विचारचक्र सुरू झालं होतं.

... to be contd...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-34: फिशींग (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


खळखळत्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला टुमदार कॉटेजेसचा समूह होता. त्या कॉटेजेसच्या पलिकडे उत्तुंग डोंगर आपल्या कुशीत हिरव्यागार झाडांच्या मखमलीला घेऊन ऐटीत उभे होते. वर आकाशात त्या डोंगराच्या शिखराशी शिवाशिवीचा खेळ खेळणारे शुभ्र ढग. आणि ते संपूर्ण वातावरण खळखळत्या प्रवाहाच्या मंजुळ आवाजाने भरून गेले होते. त्यातच मधे मधे बाजूच्या उंच झाडांत लपलले पक्षी साद घालीत होते.

प्रवाहाच्या पाण्यात पाय सोडून जॉन आणि अँजेनी एका खडकावर बसले होते. दोघांच्याही हातात एक एक मासे पकडण्यासाठी पाण्यात सोडलेला गळ होता. दोघंही आनंदी दिसत होते. अँजेनीला जॉनची गंमत करण्याचा मूड झाला. तिने त्याला एक कोडं विचारलं.

" एकदा नंबर बारा बार मध्ये गेला आणि त्याने बारटेंन्डरला व्हिस्की मागतली. पण बार टेन्डरने त्याला तिथून हाकलून लावले... काय कारण असेल हाकलण्याचे?"

अँजेनीने गळ एकदा हलवून बघितला आणि मग प्रश्नार्थक मुद्रेने जॉनकडे बघितले.

" आता हे नंबर्स केव्हापासनं बारमध्ये जायला लागले? " जॉनने तिची छेड काढीत म्हटले.

" सांगना..." अँजेनी त्याच्याकडे लाडात येऊन पाहत म्हणाली.

" मला वाटते ही हत्ती आणि मुंगीच्या जोक्ससारखी भानगड दिसते" जॉन हसून म्हणाला.

" मग सांग की ... बार टेन्डरने नंबर बाराला का हाकलून लावले? " अँजेनी तकादा लावत म्हणाली.

" नाही बुवा ...मला तर काही सांगता येत नाही...का हाकलून लावले... तूच सांग? " जॉनने आपली हार कबूल करीत म्हटले.

" इतक्या लवकर हरलास ..." अँजेनीने त्याला चिडविण्याच्या सुरात म्हटले.

" नाही ... मला तर काही सुचत नाही आहे... हरलो ... मी हरलो... आता तर सांगशील का हाकलून लावले?" जॉन उत्तर ऐकण्याच्या उत्सुकतेने म्हणाला.

" अरे ... कारण नंबर बारा हा अंडरएज होता... अठरा वर्षापेक्षा कमी" अँजेनी हसत म्हणाली.

" असं होय... अरे ... खरंच की..." जॉन सुध्दा हसायला लागला.

" आता अजून एक सांग..." अँजेनी पाण्यातला गळ हलवून बघत म्हणाली.

" हं...बोल " जॉनने तिला उत्साह दाखवित म्हटले.

" नंबर एट नंबर थ्री ला काय म्हणेल? " अँजेनीने विचारले.

" आता हे नंबरर्स एकमेकांना बोलायला सुध्दा लागले?" जॉनने पुन्हा तिची छेड काढीत म्हटले.

" बोलायचं काय ... काही वेळाने ते एकमेकांवर प्रेम सुध्दा करू लागतील...आपल्यासारखं" अँजेनी त्याला टिच्चून प्रतिउत्तर देत म्हणाली.

" शक्य आहे...म्हणूनच कदाचित 99, 66, 63, 69 हे कोडवर्ड पडले असतील" जॉन एक डोळा मारत म्हणाला.

अँजेनीने लाजेनं मान खाली घेतली.

थोड्या वेळाने मान वर करीत ती त्याच्याकडे लाजेने पाहत म्हणाली,

"चांगलाच बदमाश आहेस ..."

जॉन नुसता तिच्या डोळ्याला डोळे भिडवून गालातल्या गालात अर्थपूर्ण हसला.

" सांगना... नंबर एट नंबर थ्री ला काय म्हणेल?" अँजेनी त्याच्या छातीवर खोटं खोटं मारून लाडात येत म्हणाली.

" नाही बुवा ... हे सुध्दा मी हारलो... तूच सांग" जॉन लाडे लाडे म्हणाला.

" अरे ...नंबर एट नंबर थ्रीला म्हणेल ...वील यू शट अप यूवर माऊथ प्लीज"

" अरे वा छानच आहे" जॉनने आपला गळ हलवून बघत म्हटले.

" बर अजून एक ... नंबर एटने नंबर सिक्स ला नंबर नाईन कडे बोट दाखवून समजाविले ... काय समजाविले असेल?" अँजेनीने विचारले.

" बघ तुझे नंबर एक एक स्टेप पुढे जात आहेत... प्रथम बार मध्ये गेले ... नंतर बोलायला लागले ... अन आता एकमेकांना समजावयाला लागले... आता पुढची स्टेप ..."

जॉन पुढे काही बोलण्याच्या आधी अँजेनीने गमतीने एक मुक्का त्याच्यावर उगारला.

" हं सांगतो .. सांगतो..." जॉन तिला भ्यायल्यासारखं दाखवित म्हणाला, " ... काय समजावले असेल... काय समजावले असेल... हं तो म्हणाला असेल हा काय नेहमी उलटा उभा राहतोस ... बघ तो नंबर नाईन किती शहाणा आहे... कसा सरळ उभा राहतो..." जॉनने गमतीने म्हटले.

" अरे वा... यू आर राईट..." अँजेनी आश्चर्याने म्हणाली

" काय ! मी बरोबर आहे ! " जॉन आश्चर्याने आणि अविश्वासाने उदगारला.

" यस ...यू आर अब्सल्यूटली राईट...आधी कधी तू एकले असशील हे" अँजेनीने शंका काढली.

" अगं नाही ... खरचं नाही ... मी आपला सहजच अंदाज बांधला " जॉन म्हणाला.

थोडा वेळ दोघंही शांत होते.

मग जॉन म्हणाला " आता मी एक विचारतो"

अँजेनीने डोळ्यानेच होकार दिला.

" नंबर शून्य नंबर एट ला काय म्हणाला असेल?" जॉन ने विचारले.

शून्य ... शून्याचा उल्लेख एकून अँजेनीच्या चेहऱ्यावर एक उदासी पसरली. तिच्या चेहऱ्यावरचे ते अवखळ हास्य तो अल्लडपणा अचानक मावळला. जॉनच्या लक्षात आले की त्याने शून्याचा उल्लेख करायला नको होता.

" आय अॅम सॉरी..." तो तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला.

ती काही न बोलता पाण्यातला गळ हलवू लागली.

" आय अॅम सॉरी ... अगं माझ्या लक्षातच नाही आलं" तो पुन्हा म्हणाला.

" इट्स ऑलराईट ..." ती स्वत:ला सावरत म्हणाली " तूच सांग... मला नाही जमत"

" काय?" जॉनने विचारले.

" अरे शून्य नंबर एट ला काय म्हणाला ते सांग" ती पुन्हा अवखळ होण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

जॉन काहीच बोलला नाही.

" सांग ना" ती त्याचा चेहरा आपल्याकडे करत म्हणाली.

जॉन तिच्याकडे बघून हसत म्हणाला " हरलीस ...इतक्या लवकर "

" हो ... सांग ना " ती उत्सुकतेने म्हणाली.

" शून्य नंबर एट ला काय म्हणाला ... नाईस बेल्ट" जॉन हसत म्हणाला.

" अरे वा...नाईस "

तीसुध्दा त्याच्यासोबत हसायला लागली.

बराच वेळ पुन्हा शांततेत गेला. दोघंही आपाआपले गळ हलवून बघण्यात मग्न होते.

" तुला मासे बनविता येतात का?" अँजेनीने जॉनच्या जवळ सरकत विचारले.

आपला जड लागलेला गळ ओढून पाहत जॉन म्हणाला " नाही"

" मग आपण मासे का पकडत आहोत?" अँजेनीने विचारले.

" अरे ... कशाला म्हणजे खाण्यासाठी" जॉन तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला.

" मग याचा काही एक उपयोग होणार नाही" अँजेनी म्हणाली

" म्हणजे? "

" मलासुध्दा मासे बनविता येत नाहीत"

" काय? " तो आश्चर्याने म्हणाला.

" हं, तुला कच्चे खायचे असतील तर काही हरकत नाही " ती गमतीने म्हणाली.

" तुलासुध्दा बनविता येत नाहीत? काही हरकत नाही आपण बनवून तर बघूया... ट्राय करायला काय हरकत आहे? " त्याने सुचविले.

" अन् जर नाही जमले तर"

" जसे बनतील तसे खावू. कमीत कमी कच्चे खायची तर वेळ येणार नाही " तो हसत म्हणाला.

तेवढ्यात अँजेनीला जाणवले की तिचा गळ जड लागतो आहे. तिने गळ हलवून बघितला. बहुतेक तिच्या गळाला मासा लागला होता. तिने गळ गुंडाळाण्यास सुरवात केली. एक तपकीरी शेड असलेला पांढरा मासा तडफडत गळासोबत तिच्या जवळ जवळ येऊ लागला. तिने हळूच त्याला गळातून काढून बाजूला खडकावर ठेवलेल्या वेताच्या टोपलीत टाकले आणि ती पुन्हा गळ पाण्यात सोडायला लागली. तेवढ्यात फुलपाखरासारखे काहीतरी तिच्या नाकाला लागून तिला पाण्यात पडलेले जाणवले. तिने नाकाला हात लावून पुसलं आणि मग त्याच हाताने आपल्या डोळ्यावरचे केस बाजूला करीत गळ पाण्यात सोडण्यात ती मग्न झाली.

जॉन अचानक तिच्याकडे बघून जोरजोराने हसायला लागला.

तिने जॉनकडे बघत विचारले, " काय झालं ?"

" तुझा मासा कुठाय ? " त्याने विचारले.

तिने मागे ठेवलेल्या टोपलीत बघितले तर तिथे मासा नव्हता.

" कुठाय? " ती इकडे तिकडे बघायला लागली.

" खरंच कुठाय?" ती गालातल्या गालात हसत म्हणाली.

तिला गंमत वाटत होती.

" गेला तो पाण्यात उडी मारून तुझ्या नाकावर टीच्चू देऊन" तो पुन्हा जोरजोराने हसत म्हणाला.

" अच्छा तो मासा होता होय" ती लक्षात येऊन नाकाला हात लावत म्हणाली आणि तीसुध्दा त्याच्या सोबत जोरजोराने हसायला लागली.


क्रमश: ...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-33: सुगावा (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


कमांड2 फॅशन स्ट्रीटवर गर्दीतून रस्ता काढीत समोर चालला होता. त्याला जाण्याची घाई होती पण रस्त्यात मधे येणाऱ्या माणसांमुळे त्याला वेगाने चालता येत नव्हते. तो लोकांना जवळ जवळ बाजूला ढकलूनच मार्गक्रमण करीत होता. त्याच गर्दीत दुसरीकडे उभे असलेल्या डिटेक्टीव्ह अॅलेक्सने कमांड2च्या शंकास्पद हालचालींना हेरले. तो सावधतेने एखादा चित्ता जसा आपल्या बेसावध सावजाला हेरतो त्याप्रमाणे कमांड2चा पाठलाग करायला लागला. कमांड2चे आपले घाईघाईने गर्दीतून रस्ता काढीत समोर जाणे चालूच होते. तो डिटेक्टीव्ह अॅलक्सच्या हालचालींबाबत अगदीच अनभिज्ञ दिसत होता.

एकदाचा कमांड2 गर्दीतून बाहेर आला. गर्दीतून बाहेर येताच थांबून त्याने इकडे तिकडे आपली नजर फिरविली. डिटेक्टीव्ह अॅलेक्स त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून जवळच्याच एका दुकानात घुसला. काही भीती नाही याची खात्री होताच कमांड2 बाजूच्या एका अंधाऱ्या बोळात घुसला. डिटेक्टीव्ह अॅलेक्ससुध्दा त्याच्या मागे त्या अंधाऱ्या बोळात घुसला.

एका इमारतीच्या आडोश्याला उभे राहून डिटेक्टीव्ह अॅलेक्सने रस्त्याच्या पलिकडे कमांड2ला एका बंगल्याच्या आवारात सावधतेने जातांना बघितले. डिटेक्टीव्ह अॅलेक्सने सभोवार नजर फिरवून आपण कुणाच्या दृष्टीक्षेपात तर नाही आहोत ना याची खात्री केली. मग पुन्हा कमांड2 गेला होता त्या बंगल्याकडे बघितले. तो आतापर्यंंत त्या बंगल्याच्या अंधाऱ्या विश्वात गुडूप झाला होता.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-32: व्हॅकेशन (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉनची कार जशी भरधाव वेगाने धावत होती तसे त्याचे विचारसुध्दा भरधाव वेगाने धावत होते. त्याच्या शेजारी उजवीकडे अँजेनी बसलेली होती. जॉन गाडी ड्राईव्ह करीत होता. ती जरी जॉनच्या शेजारी बसली होती तरी तिला एकटेपणाची जाणीव होत होती. कारण जॉन जरी भौतिकरित्या कारमध्ये बसलेला होता तरीही मानसिकरित्या तो दुसरीकडे कुठेतरी होता. हळूहळू गाडीने मुख्य शहराचा भाग मागे सोडला. आता फक्त तुरळक घरेच खिडकीतून रस्त्याच्या बाजूला दिसत होती. हळू हळू तीही नाहीशी झाली. काही वेळाने गाडी चारही बाजूने हिरव्या कुरणाने , हिरव्या झाडांनी , हिरव्या आच्छादलेल्या डोंगरांनी वेढलेल्या स्वर्गतुल्य प्रदेशातून धावू लागली. रस्त्याच्या दोनही बाजूने डोळ्यांना सुखावेल अशी नुसती हिरवळ वेढून होती. अँजेनीने जॉनकडे बघितले. तो अजूनही आपल्याच विचारात मग्न होता.

" तू बसला आहेस माझ्या शेजारी खरा पण तू अजूनही त्या खुनाच्या केसमध्ये अडकलेला दिसतोस." अँजेनी त्याच्याकडे बघून म्हणाली.

अँजेनीच्या बोलण्याने तो भानावर आला.

" हो,... नाही , तसं नाही " तो गोंधळून म्हणाला.

" मला कळतंय. तुझ्या बॉसने तुझ्या बाबतीत जे केलं ते काही बरोबर केलं नाही. पण काही वेळा आपला इलाज नसतो बघ नंं; माझ्या बाबतीत तरी नियतीनं कुठं बरोबर केलं आहे " तिला सानीची आठवण येऊन ती बोलली.

त्याला काय बोलावे काही कळेना. गाडी चालविता चालविता त्याने फक्त तिच्याकडे एक प्रेमळ दृष्टीक्षेप टाकला.

तेवढ्यात आसमंतात पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला.

" इथे कुठेतरी धबधबा वाहत असावा असं दिसतंया" तो विषय बदलण्याच्या उद्देशाने म्हणाला.

" तो बघ तिकडे. किती सुंदर! " दु:खाच्या छटेतून बाहेर येत अँजेनी उत्साहाने म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावर एखाद्या छोट्या निरागस गोंडस मुलाचे भाव तरळत होते.

स्वच्छ शुभ्र खळखळणारे पाणी खडकांच्या खडबडीतून धावत सुटले होते.

" वाव, किती सुंदर!" तिने निर्देश केलेल्या दृष्याकडे बघून जॉनच्या तोंडून निघाले.

" किती साम्य आहे माणसाच्या जीवनात आणि त्या पाण्यात " ती पुन्हा आपल्या पूर्वीच्या दु:खद छटेत प्रवेश करीत म्हणाली.

" कसे काय?" जॉनने विचारले.

जॉनला उगीच अपराध्यासारखे वाटू लागले. आपण विचारात गढून गेलो नसतो तर ती तिच्या दु:खाच्या गर्तेत ओढली गेली नसती. तिला त्या दु:खाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तो तिच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करू लागला.

" बघ ना. ते पाणी एकदा वरून पावसाच्या स्वरूपात पडले की त्याची जीवनयात्रा सुरू होते मग त्या यात्रेला शेवट नाही. ते पाणी शेवटी समुद्राला जावून मिळेपर्यंंत त्याने थांबायचं म्हटलं तरी थांबण्याचं त्याच्या हाती नसतं " अँजेनी भावूक होऊन बोलत होती.

" ते तिकडे बघ, हरणं कशी टणाटण उड्या मारत धावताहेत" जॉन अचानक एकीकडे निर्देश करीत म्हणाला.

जॉनच्या बाजूने खिडकीतून स्प्रींग बग्जचा एक मोठाच्या मोठा थवा गाडीच्या चाहूलीने उड्या मारीत सैरावरा धावायला लागलेला दिसत होता.

" किती गोड! किती गोंडस!" अँजेनीच्या तोंडून निघाले.

तिचे डोळे आनंदाने चमकायला लागले होते.

एव्हाना गाडी पुढे गेली होती आणि तो थवा मागे पडला होता. ती गाडीतून परत परत वळून त्या हरणांच्या कळपाकडे ती दिसेनाशी होईपर्यंंत पाहत होती.

" आपलं कॉटेजसुध्दा पुढे कुठेतरी याच प्रवाहाच्या काठावर असावं" जॉन म्हणाला.

" काय तिथेसुध्दा हा प्रवाह आहे ! " तिने आनंदाने विचारले.

" हो असं तो सांगत तर होता" जॉन म्हणाला.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-31: पॉलीटीक्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉन ड्रॉइंग रूममध्ये बसून हळू हळू व्हिस्कीचे घोट घेत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तो डिस्टर्ब होता. तेवढ्यात त्याची डोअर बेल वाजली. तो व्हिस्कीचा ग्लास टीपॉयवर ठेवून उठला. समोर जाऊन त्याने दार उघडले. दारात त्याच्या समोर अँजेनी उभी होती.

" मी किती वेळपासून तुझा मोबाईल ट्राय करीत आहे. तुझा मोबाईल बंद आहे की काय?" अँजेनी दारातून आत येत म्हणाली.

" प्रेसवाल्यांचे फोनवर फोन येत आहेत... म्हणून बंद करून ठेवला आहे" जॉन समोरचे दार बंद करीत म्हणाला.

अँजेनीने ड्रॉइंग रूममध्ये आल्यावर टीपॉयवर ठेवलेला व्हिस्कीचा ग्लास बघितला आणि मग जॉनच्या चेहऱ्याकडे निरखून बघू लागली.

" काय झालं? अपसेट दिसतोस" अँजेनीने त्याला विचारले.

" बस... सांगतो" त्याने स्वत: एका खुर्चीवर बसत आणि अँजेनीला समोरच्या खुर्चीकडे बसण्याचा इशारा करीत म्हटले.

तिने समोरची खुर्ची त्याच्या बाजूला ओढली आणि ती अगदी जवळ त्याच्या शेजारी बसली. त्याने व्हिस्कीचा ग्लास पुन्हा उचलला आणि ओठाला लावला.

" असं कुढत राहण्यापेक्षा आपले प्रॉब्लेम्स कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायला पाहिजेत" अँजेनी त्याचा हात हातात घेत म्हणाली.

त्याने त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला.

" काय डिपार्टमेंटमध्ये काही प्रॉब्लेम झाला?" अँजेनीने त्याचा हात थोपटत विचारले.

" सांगतो... सगळं सांगतो" व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवत तो म्हणाला.

जॉनने एक दीर्र्घ उसासा टाकला आणि तिला सांगायला लागला...


जॉन त्याच्या बॉसच्या, म्हणजे शहर पोलीस शाखा प्रमुखाच्या समोर बसलेला होता.

" सर, त्या बिल्डींगच्या खाली सापडलेल्या मृतदेहाची शहानिशा करून आम्ही ही काही माहिती मिळविलेली आहे" जॉन आपल्या समोरच्या फाईलमधले कागद चाळत म्हणाला.

" हं " बॉसने नुसता हूंकार भरला.

जॉनच्या बॉसने त्याच्या तोंडातल्या सिगारचा एक मोठा झुरका घेतला.

" त्या मृतदेहाच्या खिशात एक बंदूक सापडली... आतापर्यंंत झालेले तिन्हीही खून त्याच बंदुकीचा वापर करून झालेले आहेत."

बॉसने तोंडातल्या सिगारची राख समोर टेबलवर ठेवलेल्या अॅश ट्रेमध्ये झटकून टाकत म्हटले,

" म्हणजे आपण ज्या खुन्याचा शोध घेत होतो, तो आयताच, मेलेला का असेना आपल्याला सापडला."

" सर, मला वाटते तसा निष्कर्ष काढणे म्हणजे जरा घाईचे होईल " जॉन म्हणाला.

" हे बघ जॉन, आता पोलिसांच्या गळ्यापर्यंंत पाणी आलेलं आहे. आता ही शब्दांशी खेळण्याची वेळ नव्हे. सध्या तरी परिस्थिती निवळण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे आणि आपला निष्कर्ष चुकीचा असावा असं तुला का वाटतं? " बॉसने जॉनच्या डोळ्यात रोखून पाहत विचारले.

"तशा पुष्कळ गोष्टी आहेत." जॉनने फाईलची काही पानं उलटवित म्हटलं.

" उदाहरणार्थ? " बॉसने सिगार विझवत सरळ बसत त्याला विचारले.

" नंबर एक - खऱ्या खुन्याने कुणाला तरी मारून त्याच्या खिशात आपली बंदूक टाकली असू शकते. आणि हे सगळं तो त्याच्यावरचं केंद्रित असलेलं लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी करू शकतो.

नंबर दोन - जेव्हा आम्ही त्या मेलेल्या इसमाच्या घरात धाड टाकली तेव्हा त्याच्या कॉम्प्यूटरमधली हार्डडिस्क गायब होती. याच्यामागे बरीच कारणं असू शकतात. खुनी हा एकटा नसून अजून बरेचजण त्याला सामील असू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे खुनी कुणीतरी दुसराच असून तो हे सगळं आपल्यावरचं लक्ष हटविण्यासाठी करू शकतो किंवा ती एक साधी चोरीसुध्दा असू शकते"

जॉन बॉसची प्रतिक्रिया आजमवण्यासाठी थांबला.

" हं, अजून काही" बॉसनं त्याला अजून काही बोलायचे आहे का हे सूचित करीत म्हटले.

" नंबर तीन - या वेळेस खुनाची माहिती खुन्याने न देता कुणीतरी त्रयस्थ इसमाने दिली होती कारण जिथून फोन आला होता तिथून खुन्याला खुनाच्या वेळेपर्यंंत खुनाच्या जागी पोहचणंं जवळ जवळ अशक्य होतं. हा आताचा अपवाद वगळता यापूर्वी खून झाला तिथूनच खुन्याने फोन केले होते. कुणीतरी त्यांच्या टोळीतला माणूस फुटला असावा किंवा कुणाला तरी ही माहिती कळली जो आपली ओळख लपवू इच्छितो"

जॉनने उरलेलं सगळं जवळ जवळ एका श्वासात सांगितलं आणि तो त्याच्या बॉसच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला.

जॉनचा बॉस त्याच्या खुर्चीवरून हळूच उठला. खिडकीच्या बाहेर पाहत त्याने नवीन सिगार शिलगावली. मग सिगारचे झुरके घेत त्याने जॉनच्या भोवती खोलीत एक चक्कर मारली.

" झालं तुझं ?" बॉस त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.

जॉनने नुसती मान हलविली.

" हे बघ जॉन, तुला माहित आहेच या घटनेमुळे आपल्या पोलिसांची प्रतिमा किती मलीन झाली आहे आणि तू जे सांगतो आहेस या सगळ्या शक्यता आहेत. त्यांचा आपल्याजवळ अजून असा ठोस पुरावा नाहीये "

जॉनचा बॉस खोलीत हळू हळू चकरा मारत बोलत होता.

" पण सर.." जॉनने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.

त्याला अडवीत जॉनचा बॉस म्हणाला,

" मला वाटतं या केसवर काम करून आणि सारख्या दडपणामुळे तू शारिरीकरित्या आणि मानसिकरित्याही थकला आहेस आणि थकलं की असं होतं पुष्कळ वेळा. माणसाचा गोंधळ उडतो आणि मग तो भलतेसे निष्कर्ष काढायला लागतो."

" नाही सर, तसं काही नाही ." जॉनने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

" हे बघ, मी काय म्हणतो ते नीट ऐक " जॉनचा बॉस करड्या आवाजात म्हणाला.

" आता एक प्रेस कॉन्फरंस घ्यावी लागेल. त्यात एकाच वेळी केसची संपूर्ण माहिती देऊन आपल्या पोलीस डिपार्टमेंटची उरली सुरली लाज राखावी लागेल आणि मग ..... आणि मग तू एका महिन्याच्या सुट्टीवर जा... मी तुझी सुट्टी आताच सँक्शन करतो ... मग तू तुझी मैत्रिण अँजेनीला घेऊन एखाद्या हिलस्टेशनला जा. तू काळजी करू नकोस. मी सगळी व्यवस्था करतो"

जॉनने एकदम चमकून त्याच्या बॉसकडे पाहिले. आपल्या बॉसला आपल्याबद्दल आणि अँजेनीबद्दल कसे कळले? त्याच्या नजरेत अजूनही आश्चर्य आणि अविश्वास तरळत होता.

" आय अॅम सॉरी... इट्स यूवर पर्सनल मॅटर... बट इटस् माय प्रोफेशनल वे ऑफ वकीर्ंंग .... मला सगळ्यांवर बारीक नजर ठेवावी लागते"

जॉन काही बोलण्याच्या आधीच त्याच्या बॉसने खुर्चीच्या मागे टांगलेला त्याचा ओव्हरकोट उचलला आणि दरवाज्याकडे जायला लागला.

दरवाज्याजवळ थांबून जॉनकडे वळून बघत तो म्हणाला , " उद्या सकाळी दहा वाजता मी प्रेस कॉन्फरंस बोलावली आहे. काय बोलायचे ते मी बोलतो. यू जस्ट बी देअर."

जॉनच्या उत्तराची वाट न पाहता त्याचा बॉस टाक टाक बुटांचा आवाज करीत तिथून निघून गेला. जॉन गोंधळून कधी त्याच्या बॉसच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे तर कधी त्याच्या हातातल्या फाईलमधल्या कागदांकडे बघत उभा राहिला.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-30: प्रेस कॉन्फरन्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


मोकळ्या मैदानात एका उंच जागी एक टेबल ठेवलेले होते. टेबलवर वेगवेगळ्या टि व्ही चॅनल्सची नावं असलेले मायक्रोफोन ठेवलेले होते. टेबलच्या समोर मोकळ्या जागेत काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तिथे प्रेसवाल्यांनी गर्दी केलेली होती. काही प्रेसवाले खुर्चीवर बसून प्रेसकॉन्फरन्समध्ये शहराचे पोलीस शाखाप्रमुख येण्याची वाट पाहत होते. काही वार्ताहर छोटे छोटे समूह करून काहीतरी चर्चा करीत होते. चर्चा तीच. सध्या शहरात सुरू असलेल्या खुनांची.

" पुष्कळ दिवसांपासून त्याच त्याच बातम्या. एक मरगळ आली होती. ह्या खुनांमुळे ती मरगळ दूर झाल्यासारखी वाटते." एकजण म्हणाला.

" म्हणजे तुला असं तर नाही ना म्हणायचं की हे खून होत आहेत ते चांगलंच होत आहे" दुसरा खोचकपणे म्हणाला.

" अरे तसं नाही" पहिला गोंधळून म्हणाला.

" अरे म्हणजे तसंच आहे. पण उघड उघड कबुलही करू शकत नाही" दुसरा हसून म्हणाला.

मग दोघेही हसायला लागले.

" साला, काय करणार आपलं कामच तसं आहे. दुसऱ्यांच्या जिवावर आपल्याला बातम्या बनवाव्या लागतात" तिसरा एकजण म्हणाला.

" हो ना. आणि बातम्या नसतील तर आपलं पोट कसं भरणार?"

" अरे जेव्हा मी नवीन नवीन या क्षेत्रात आलो तेव्हा रोज सकाळी देवाला प्रार्थना करायचो ... की देवा, आज तरी एखादी बातमी मिळू दे"

" म्हणजे थोडक्यात देवा आज तरी एखादा अॅक्सीडेंट , खून"

" किंवा काहीतरी खरमरीत घडू दे"

पहिल्याने तिसऱ्याची टाळी घेत त्याचं वाक्य पूर्ण केलं.

दुसरीकडे टी व्ही चॅनल्सवाले आपाआपले कॅमेरे घेऊन तयार होते. त्यांच्यातही चर्चा सुरू होती.

" अरे रोज किती वाईट वाइट घडतं या जगात" एकजण म्हणाला.

" ते तरी बरं... आपल्याला हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघावं लागत नाही" दुसरा म्हणाला.

" उघड्या डोळ्यांनी नाही तर कसे बघतो आपण ?" दुसऱ्याने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले.

" अरे म्हणजे या कॅमेराची झापड असते की आपल्या डोळ्यांवर"

दोघे जण खळखळून हसू लागले.

आता प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त शहर पोलीस शाखाप्रमुखांच्या येण्याची वाट होती. तेवढ्यात टेबलच्या पलिकडच्या बाजूला थोडी हालचाल झाली. इकडे टेबलच्या अलिकडे बसलेल्या प्रेसच्या लोकांमध्ये कुजबूज आणि चहलपहल सुरू झाली. प्रेसच्या लोकांना शहर पोलीस शाखाप्रमुख येतांना दिसले होते. आपल्या बॉसच्या मागे जॉन आपल्या जड पावलांनी चालत होता. शेवटी टेबलच्या त्या बाजूला शहर पोलीस शाखाप्रमुख आणि जॉन असे दोघेजण उभे राहिले . टेबलाच्या या बाजूला प्रेसवाल्यांची झुंबड उडाली होती. कितीतरी दिवसांपासून चिघळत असलेल्या सिरियल किलरच्या केसबद्दल प्रश्न विचारण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती.

प्रेसवाल्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

" खुनी कोण आहे?"

" त्याला जिवंत का पकडू शकले नाही?"

" खुनी शोधण्यासाठी इतका वेळ का लागला ?"

शहर पोलीस प्रमुखाने एक नजर पूर्ण प्रेसवाल्यांवर फिरविली.

" वन बाय वन" शहर पोलीस प्रमुख आपल्या करड्या स्वरात म्हणाला.

" यस यू" मग शहर पोलीस प्रमुखाने एका गरीब दिसणाऱ्या प्रेसवाल्याला इशारा केला.

" सर, कशावरून जो माणूस बिल्डींगवरून पडून मेलेला सापडला तोच खुनी आहे?" एका टीव्ही चॅनलवाल्याने प्रश्न विचारला.

" आतापर्यंत झालेल्या खुनाच्या तिन्ही डेड बॉडीत ज्या बंदुकीच्या गोळ्या सापडल्या होत्या त्या त्याच्याच बंदुकीतून झाडल्या गेलेल्या होत्या. हे आमच्या टेक्नीकल टीमने सिध्द केलं आहे आणि खुन्याच्या कोटाच्या खिशात एक चाकू सापडला त्या खिशाच्या कापडावर तिन्ही मृतकांच्या रक्ताचे डाग सापडलेले आहेत." शहर पोलीस प्रमुखाने सविस्तर माहिती पुरविली.

" पोलीस त्या खुन्याला जिवंत का पकडू शकले नाहीत?... जर जिवंत पकडू शकले असते तर अजून काही माहिती मिळाली असती. जसे खुनाचा उद्देश वगैरे" दुसऱ्या एका प्रेसवाल्याने पटकन आपले तोंड घुसवून प्रश्न विचारला.

" खुनाच्या बाबतीत माहिती मिळताच आम्ही तडकाफडकी घटनास्थळी पोहोचलो... जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा खून झालेला होता पण खुनी बिल्डींगमधून बाहेर पडला नव्हता... मग आम्ही इमारतीला चारही बाजूने घेरले. त्यामुळे खुन्याला तिथून निसटण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते आणि त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही" शहर पोलीस प्रमुखाने विस्ताराने सांगितले.

जॉनने आपल्या बॉसकडे आश्चर्याने बघितले. बॉस खोटं बोलत आहे याचे नाही तर तो किती सफाईनं खोटं बोलतो आहे याचं जॉनला आश्चर्य वाटत होतं.

" काय ? खुन्याने आत्महत्या केली? पण काही लोकांच म्हणणं आहे की तो वरून पडला असावा" एका जणाने प्रतिप्रश्न केला.

" टेरेसला साडेतीन फूट उंच भिंत असतांना तो तिथून पडला असे म्हणणे चुकीचे ठरेल" शहर पोलीस प्रमुखाने आपला तर्क लढवित उत्तर दिले.

" खुनाबद्दल पोलिसांना कुणी माहिती दिली होती?" एका वर्तमानपत्राच्या रिपोर्टरने विचारले.

" आता या सगळ्या गोष्टी सांगणं जरा कठीण आहे. आमचे तळागाळात हेर आणि खबरी विखुरलेले असतात. त्यांच्याच एकाने आम्हाला ही माहिती पुरविली. काही जण आपलं नाव गुप्त ठेवू इच्छितात. तर काही जणांची त्यांचं नाव जाहिर करण्याला परवानगी असते. काहीही असो शेवटी खुनी, मृत का होईना पकडला गेला हे महत्वाचे. त्यामुळे कदाचित अजून कितीतरी होवू घातलेले खून टळले आणि या गोष्टीचे श्रेय मी आमच्या सक्षम पोलीस डिपार्टमेंटच्या अथक परिश्रमाला देतो. त्यांना त्यांच्या मजबूत नेटवर्कमुळे माहिती मिळाली. नुसती माहितीच नाही तर ते तिथे वेळेवर पोहोचले आणि खुन्याला तिथून निसटण्याचे सर्व मार्ग बंद झाले" शहर पोलीस प्रमुख आता तिथून निसटण्याचा प्रयत्न करीत समारोपाचे शब्द बोलले.

ते तिथून निघण्यासाठी वळणार येवढ्यात अजून एकाने प्रश्न विचारला,

" सर, त्या खुन्याचा उद्देश काय असावा?"

" सिरीयल किलर म्हणजे एक प्रकारचे माथेफिरूच. नाही का? त्यांना खून करण्यासाठी उद्देश वगैरे कशाची गरज लागत नाही. आता ते डोक्यानेच वेडे म्हटल्यावर त्यांचा उद्देश काय असावा हे सांगणे तसे कठीणच." गालातल्या गालात हसत पोलीस शाखाप्रमुख म्हणाले. ते पाहून बरेच इतर आजूबाजूचे पत्रकार ज्याने प्रश्न विचारला त्याच्याकडे कुत्सीतपणे पाहून हसू लागले.

बिचारा प्रश्न विचारणारा गोरा मोरा झाला.

आता शहर पोलीस प्रमुख टोलवाटोलवीची उत्तरे देवू लागले.

" सर , खुन्याच्या घरातील काम्प्यूटरची हार्डडिस्क कुणीतरी पळविली हे खरं आहे का?" एकाजणाने शहर पोलीस प्रमुखाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत विचारले.

शहर पोलीस प्रमुख त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत म्हणाले,

" मला वाटते मी सर्व प्रकरणावरून पूर्णत: पडदा हटेल अशा प्रकारे यथायोग्य माहिती आपल्याला पुरविली आहे आणि तुमच्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास ही माहिती पुरेशी आहे.... थँक यू"

शहर पोलीस प्रमुख जे एकदाचे पाठ फिरवून निघाले ते तिथून बाहेर जाईपर्यंत थांबलेच नाहीत. त्यांच्या मागे खाली मान घालून जॉन मुकाट्याने चालत होता.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-29: बॉसचा पुन्हा फोन ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



कमांड2 ने आपला तळ हलविला होता. तो आपल्या नव्या अड्ड्याच्या तळघरात कॉम्प्यूटरच्या समोर बसला होता. त्याचा चेहरा अजूनही प्रफुल्लित दिसत होता.

कमांड1ला मारल्यानंतरचा आपला पुढचा मार्ग मोकळा झाला...

तो विचार करीत होता. तो कॉम्प्यूटरवर मेल चेक करीत होता खरा पण त्याच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र सुरू होतं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईलवर नंबर बघितला. पण मोबाईलच्या डिस्प्लेवर काहीच नंबर आला नव्हता.

कुणाचा फोन असावा?...

पोलीस तर नसावेत?...

त्याने मोबाईलचे एक बटन दाबून मोबाईल कानाला लावला,

" हॅलो " उध्दटपणे तो म्हणाला.

तिकडून काहीच आवाज येत नव्हता. फक्त कशाची तरी घरघर ऐकु येत होती.

" हॅलो... कोण बोलतय? " त्याचा आवाज आता नरमला होता.

" बॉस, मी बॉस बोलतोय" तिकडून आवाज आला.

" बॉस? यस बॉस " कमांड2 स्वत:ला नार्मल ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

" कमांड1चं कळलं मला" बॉस म्हणाला.

" हो सर, फार वाईट झालं " कमांड2 अंदाज घेत म्हणाला.

" कोणी मारलं त्याला? " बॉसने विचारले.

" मारलं ? मला तर वाटलं की तो वरून खाली पडला असावा " कमांड2 निरागसपणे म्हणाला.

" वाटलं ? म्हणजे ? तू नव्हतास का त्याच्यासोबत ? " बॉसने आश्चर्याने विचारले.

" नाही सर, मी नव्हतो. तुम्ही दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधी आणि ते सुध्दा धोकादायक वेळेत तो जात होता म्हणून मी गेलो नाही त्याच्यासोबत. तो म्हणत होता एकदा मला आजमावून बघायचं आहे की बॉसचं भविष्य कितपत बरोबर येतं ते " कमांड2 सांगत होता.

" मग बघितलं? बघायला जिवंत असावं लागतं. मूर्ख! फुकट आपला जीव गमावून बसला. विषाची परीक्षा घ्यायला गेला होता मूर्ख " बॉस रागाने बोलत होता.

" मग पोलिसांना कोणी सांगितलं? अन इतक्या लवकर कसे काय पोलीस तिथे हजर झाले? " बॉसने पुढे विचारले.

" बॉस त्यानंच सांगितलं असावं त्याने मागच्या वेळेससुध्दा पोलिसांना सांगायची फार घाई केली होती " कमांड2 म्हणाला.

थोडा वेळ तिकडून काहीच आवाज आला नाही. फक्त घरघर कशाची तरी घरघर.

" तू आपला तळ हलविलास ते बरं केलंस " बॉस म्हणाला.

" हो सर, मला कल्पना होती की कमांड1ची ओळख पटल्यावर पोलीस त्याच्या घरी धाड घालतील म्हणून "

" आता तरी याच्यावरून धडा घे आणि पुढे असा मूर्खपणा करू नकोस. अजून आपलं बरंच काम बाकी आहे " बॉस समज देत म्हणाला.

" हो सर " कमांड2 अदबीने म्हणाला

तिकडून फोन कट झाला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-28: धाड ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


पोलिसांची गाडी कमांड1च्या घरासमोर येऊन थांबली. गाडी थांबताच गाडीतून पोलिसांची एक तुकडी उतरली. त्या तुकडीने धावतच कमांड1च्या कंपाऊंडच्या आत जावून घराला गराडा घातला. जॉन आपल्या वॉकी टॉकीवरून सगळ्यांशी संपर्क साधून होता. मधेच तो त्यांना आदेश देत होता. सगळ्याजणांनी आपाआपली पोजीशन घेतलेली आहे याची खात्री होताच जॉन आणि सॅम हळू हळू कमांड1च्या घराच्या मुख्य दरवाज्याकडे जायला लागले. दरवाजा उघडाच होता.

म्हणजे नक्की कुणीतरी आत असलं पाहिजे....

ते दोघेजण एकमेकांना गार्ड करीत घरात शिरले. त्यांची तल्लख नजर चहूवार फिरत होती. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. त्याने वॉकी टॉकीवरून आदेश देत अजून दोन जणांना घरात बोलाविले. दोन जण आत येताच चौघेहीजण घरात इकडे तिकडे विखरून सगळ्या खोल्या शोधू लागले. कुठेच कुणीही दिसत नव्हते. जॉन बेडरूमच्या बाजूला असलेल्या जिन्याजवळ गेला. जिन्याने वर जाण्याचा विचार करीत असतांनाच त्याचं लक्ष जिन्याच्या खाली गेलं. तिथे त्याला जिन्याखालून तळघरात जाणारा रस्ता दिसला.

" सॅम, जरा इकडे ये. बघ इथे एक रस्ता आहे." जॉनने सॅमला बोलावले.

" आणि तुम्ही घरातले हाताचे ठसे गोळा करा. याचा संबंध कुणा कुणाशी होता ते तरी आपल्याला कळेल" जॉनने जिन्याने खाली जाता जाता फिंगरप्रिन्टस एक्सपर्टला आदेश दिला.

जॉनने जिन्याखालचा तळघराचा दरवाजा उघडून तिरपा करून आत डोकावून बघितले. आत गडद अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते.

जॉनने हळूच सॅमला 'टॉर्च' आणण्यासाठी खुणावले.

सॅमने जिन्याखालून हळूच निघून मग धावत जाऊन टॉर्च आणला. टॉर्च सुरू करून त्याने जॉनच्या हातात दिला. जॉन एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन कानोसा घेत तळघरात जायला लागला. त्याच्या मागे मागे सॅम बंदूक घेऊन त्याला गार्ड करीत आत जाऊ लागला. जॉन टार्चचा झोत तळघरात इकडे तिकडे फिरवायला लागला. आत कुणीच नव्हते. तळघरात विशेष सामान नव्हते. लपण्यासाठीसुध्दा काही आडोसा दिसत नव्हता. शेवटी त्यांचे लक्ष तळघरात मध्यभागी ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर गेले.

" इतक्या अडचणीच्या जागी कॉम्प्यूटर? " जॉन आश्चर्याने म्हणाला.

" काहीतरी गोलमाल दिसतो " सॅमने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दोघंही कॉम्प्यूटर जवळ येऊन त्याला निरखून पाहू लागले.

" जरा ते स्वीच ऑन कर बरं " जॉनने सॅमला कॉम्प्यूटरचे पावर स्वीच ऑन करायला सांगितले.

सॅमने पावर स्वीच ऑन केले आणि जॉनने काम्प्यूटर ऑन केले. दोघेजण काम्प्यूटर सुरू होण्याची वाट पाहत मॉनिटरच्या स्क्रीनकडे बघायला लागले. आधी काळ्या मॉनिटरवर वर डाव्या कोपऱ्यात काही पांढरी अक्षरे आली. कॉम्पूटरच्या मेमरी टेस्टचा रिझल्ट मॉनिटरवर आला.

आणि अचानक कॉम्प्यूटरवर मेसेज आला-

' नो बूट डिस्क फाऊंड'

" आता या काम्प्यूटरला काय झालं? " सॅम म्हणाला.

तोपर्यंत जॉनचे अजून दोन साथीदार तिथे आले.

" काय झाल? " हॅरीने विचारले.

" हॅरी, बघ बरं हा काम्प्यूटर का सुरू होत नाही?" जॉनने हॅरीला कॉम्प्यूटर तपासायला सांगितले.

हॅरी कॉम्प्यूटर टेक्नीशियन होता. त्याने पुन्हा कॉम्प्यूटरचे बटन बंद चालू करून बघितले. पुन्हा मॉनिटरच्या काळ्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात पांढरी अक्षरं दिसू लागली. मग मेमरी टेस्ट झाली. आणि शेवटी तोच मेसेज-

' नो बूट डिस्क फाऊंड'

हॅरीने कॉम्प्यूटरचा स्वीच ऑफ केला आणि त्याच्या खिशातला स्क्रू ड्रायव्हर काढून तो सी.पी.यू. उघडू लागला.

" काय झालं? " सॅमने हॅरीला आतूरतेने विचारलं.

" सर, कॉम्प्यूटर उघडल्याशिवाय काही कळणार नाही " हॅरी म्हणाला.

हॅरीने जेव्हा सी.पी.यू.चे कॅबिनेट उघडून बघितले, तो आश्चर्याने आतल्या हार्डवेअरकडे बघायला लागला.

" काय प्रॉब्लेम झाला ? " जॉनने हॅरीला विचारलं.

" सर यातली तर हार्डडिस्कच गायब झालेली दिसते " हॅरी आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.

" काय? हार्डडिस्क गायब झाली? " जॉन आणि सॅमच्या तोंडून एकदम निघाले.

" कुणी नेली असावी?" सॅमने जसे स्वत:लाच विचारले.

" याचा अर्थ त्या हार्ड डिस्कमध्ये काहीतही महत्वाची माहिती स्टोअर केलेली असावी" जॉनने डोळे बारीक करून सॅमला आपला तर्क सांगितला.

जॉनने एकदा पुन्हा तळघरात टॉर्चच्या प्रकाशात एक चक्कर मारून पाहणी केली.

" बरं, त्या फिंगरप्रींट टेक्नीशीयनला इकडे बोलवा. कदाचित या कॉम्प्यूटरच्या आत ज्याने कुणी हार्डडिस्क काढली त्याच्या बोटंाचे ठसे उमटले असतील " जॉनने सॅमला निर्देश दिला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-27: खुनाचा तपास ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


... घाईघाईने जॉन लिफ्टमधून बाहेर पडला. ऐनवेळी आलेल्या फोनने तो अजूनही वैतागलेला दिसत होता.

पण काय करणार ही ड्यूटीच अशी होती...

कोणत्या क्षणी कुठे जायला लागणार काही सांगता येत नव्हते...

बिचाऱ्या अँजेनीला काय वाटले असेल?..

तो विचार करीतच तडक उटीन हॉपरच्या फ्लॅटमध्ये घुसला. तो यायच्या आधीच सॅम त्याच्या टीमला घेऊन तिथे हजर झाला होता. तो सरळ फ्लॅटच्या बेडरूममध्ये गेला. त्याच्या मागे मागे सॅमसुध्दा बेडरूममध्ये गेला. समोर बेडवर भीतीने तोंड उघडलेल्या आणि डोळे मोठे केलेल्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात उटीनाचा मृत देह पडला होता. आणि समोर भिंतीवर उटीनाच्या रक्ताने खुन्याने एक मोठा शून्य काढला होता.

त्या शून्याच्या आत लिहिले होते " जर शून्य नसता तर ? ".

जॉन तो संदेश पुन्हा पुन्हा वाचू लागला.

खुन्याला काय म्हणायचे होते?... खरंच काही मतितार्थ त्या संदेशात दडला होता का?...

तो विचार करू लागला.

" खुनाची माहिती कुणी दिली?" जॉनने सॅमला विचारले.

" सर फोनवर कुणीतरी अज्ञात इसम होता. त्याने नाव नाही सांगितले. आम्ही कॉलसुध्दा ट्रेस करून बघितला तो याच एरियातल्या एका पब्लीक बूथचा होता " सॅमने माहिती पुरविली.

सॅम आपल्या कामात नेहमीच प्रॉम्प्ट होता.

" खून होऊन जास्त वेळ झालेला दिसत नाही " जॉनने आपला अंदाज वर्तवला.

" हो सर, आम्ही आलो तेव्हा रक्त वाहतच होतं म्हणून आम्ही जवळपास सगळीकडे शोध घेतला" सॅम सांगत होता.

" काही सापडले? " जॉनने पुढे विचारले.

" या दोघांना तर काही सापडले नाही " सॅम खोलीतल्या दोघांकडे निर्देश करीत म्हणाला.

" अजून तिघेजण बघायला गेले आहेत ते अजून परत आले नाहीत" सॅमने पुढे सांगितले.

जॉनने तिथे उपस्थित सगळ्यांना बजावले,

" हे बघा, हा ओळीने तिसरा खून. अजून आपल्या हाती काहीच लागत नाही आहे. जर असंच चालत राहिल तर कसं व्हायचं? काहीही करा या वेळी खुनी सापडलाच पाहिजे."

तेवढ्यात धावतच दम लागलेल्या स्थितीत त्यांचे दोन साथीदार फ्लॅटमध्ये दाखल झाले.

सगळे जण आशेने त्यांच्याकडे बघायला लागले.

" सर, बिल्डींगच्या मागे खाली जमिनीवर एक डेड बॉडी पडलेली आहे " एकाने मोठ मोठे श्वास घेत सांगितले.

" सर, कुणीतरी वरून पडलेला दिसतो.... मला वाटते तोच खुनी असावा " दुसरा म्हणाला.

" सॅम, तू इथेच थांबून इन्व्हेस्टीगेशन कंटीन्यू कर... मी यांच्या सोबत खाली जाऊन येतो " जॉन त्या दोघांसमवेत फ्लॅटच्या बाहेर निघत सॅमला म्हणाला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-26: ऋषी ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


... हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नदीच्या काठावर असलेल्या गुहेत अजूनही तो ऋषी ध्यानमग्न अवस्थेत होता. अचानक त्याने आपले डोळे उघडले. त्याचे डोळे एखाद्या ज्वालेप्रमाणे आग ओकीत होते. हळू हळू त्याच्या डोळ्यातली लाली नाहीशी होऊन आपसूकच ते पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या सर्व मर्यादा ओलांडून मुक्त विचरण करू लागल्या.

एका जंगलात एक पर्णकुटी होती. पर्णकुटीसमोर अंगणात तिघेजण बसलेले होते. ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांनी त्यांच्यासमोर छोट्या छोट्या काड्यांचे छोटे छोटे ढीग केले होते. एका ढिगातल्या काड्या काढून दुसऱ्या ढिगात टाकायच्या किंवा एका ढिगातल्या काड्या काढून त्याचा दुसरा एक छोटा ढीग बनवायचा. असे करीत असतांनाच ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या चर्चेवरून तरी असे जाणवत होते की ते काहीतरी त्यांच्या अडचणीबाबत बोलत असावेत. तेवढ्यात त्यांच्यामागून तो ऋषी आला. त्याची चाहूल लागताच ते तिघेही मागे वळून त्याच्याकडे बघू लागले.

ऋषीने आपली नजर तिघांवरून फिरवीली.

" मला माहित आहे तुम्ही कुठे अडला आहात " ऋषी गूढपणे त्यांना म्हणाला.

तिघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याच्या छटा पसरल्या.

आपण कुठे अडलो आहोत हे या ऋषीला कसे कळले?...

ते काही बोलणार त्याच्या आधीच तो ऋषी पुन्हा मार्गक्रमण करीत त्यांच्या जवळून पुढे निघून गेला. ते त्या ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघू लागले.

ऋषी एकदम थबकला आणि त्यांच्याकडे वळून म्हणाला, " काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या विवंचनेतून लवकरच सोडवीन "

तो ऋषी पुन्हा वळून आपले मार्गक्रमण करू लागला. ते तिघेही आ वासून आश्चर्याने त्या ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती नाहीशी होईपर्यंंत पाहत राहिले ...

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-25: वेळेचा घात? ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


घाईघाईने सर्व सोपस्कार आटोपून धावतच कमांड1 फ्लॅटच्या दरवाज्यातून लिफ्टजवळ आला. थोड्या वेळापूर्वीच त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज बिल्डींगच्या खाली येऊन मग बंद झाल्यासारखा वाटला होता. त्याने लिफ्टच्या डिस्प्लेवर पाहिले. लिफ्ट वर येत होती. तो घाबरून गेला.

म्हणजे पोलीस बिल्डींगमध्ये तर नव्हते आले?..

आणि कदाचित पोलीसच वर येत असावेत ...

त्याच्या पोटात एकदम भीतीचा गोळा उठला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याने अशा घाबरलेल्या अवस्थेतही पटकन निर्णय घेतला आणि तो पायऱ्यांनी वर धावायला लागला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की पायऱ्यांवर धावतांना त्याच्या बुटांचा आवाज होतोय. त्याने पायातले बूट काढून तिथेच टाकून दिले आणि मग तो अनवाणी पायानेच वर जोरात धावायला लागला. धावता धावता तो खाली काय होत असेल याचा कानोसाही घेत होता. शेवटी तो बिल्डींगच्या टेरेसवर येऊन पोहोचला. टेरेसवर त्याने इकडे तिकडे बघितले. वरती टिमटिमत्या चांदण्यांनी भरलेले आकाश आणि आजूबाजूला टिमटिमत्या लाइटस्ने भरलेले शहर. धावत आल्यामुळे त्याला दम लागला होता आणि घाम आला होता. वर थंड हवा वाहत होती. घामेजल्या अंगाला ती अजूनच थंड वाटत होती. त्याला हायसं वाटलं. पण त्याला थांबायला वेळ नव्हता. बिल्डींगच्या समोरच्या बाजूला येऊन त्याने खाली डोकावून बघितले. बिल्डींगच्या अगदी समोर पोलिसांची व्हॅन उभी होती. व्हॅनजवळ तीन सशस्त्र पोलीस उभे होते. त्याला एक कळत नव्हतं की-

खुनाची माहिती पोलिसांना कळली तरी कशी?...

असंही होवू शकतं की ते दुसऱ्याच एखाद्या अपराधाच्या संदर्भात इथे आले असावेत ...

दुसऱ्या अपराधासाठी जर ते इथे आले असतील आणि आपण जर पकडले गेलो तर तो एक भयंकर योगायोगच म्हणावा लागेल...

तशी त्याला खात्री होती की बॉसने दिलेल्या वेळात कधीही दगाफटका होणार नाही. आत्तापर्यंंत तरी तसा त्याचा अनुभव होता.

आता इथून निसटायचे कसे?...

तो विचार करू लागला.

एक गोष्ट मात्र पक्की होती की बिल्डींगच्या समोरच्या बाजूने निसटनं शक्य नव्हतं....

दुसरा काहीतरी पर्याय शोधण्यासाठी तो इकडे तिकडे बघायला लागला. बिल्डींगच्या दोन्हीही बाजूने निसटणं शक्य नव्हतं. एक तर उतरायला काही नव्हतं आणि कसंबसं उतरलं तरी त्या पोलिसांच्या समोरूनच जाणं हा एकमेव पर्याय होता. मग कमांड1 हळू हळू बिल्डींगच्या मागच्या बाजूने जाऊन तेथील पाहणी करू लागला. त्याने मागील बाजूस डोकावून खाली बघितले. मागच्या बाजूने उतरण्यासाठी पाईप होते. ते बघून त्याला थोडं हायसं वाटलं. पण मागच्या बाजूने दुसऱ्या एका बिल्डींगवर लावलेल्या सोडीयम लँपचा उजेड पडत होता. त्यामुळं उतरतांना कुणाच्या तरी नजरेत येणं शक्य होतं. तो अजून काही पर्याय शोधण्यासाठी विचार करू लागला. त्याच्याजवळ जास्त वेळ नव्हता.

जर चुकून पोलीस इथे टेरेसवर आले तर...

तर तो आयताच त्यांच्या हातात सापडणार होता....

त्याने बिल्डींगच्या मागच्या बाजूची एकदा व्यवस्थित पाहणी करण्याचे ठरविले. त्यासाठी तो मागच्या बाजूला असलेल्या कठड्यावर चढला. पाईप वरपासून जमिनीपर्यंत गेले होते. कदाचित ड्रेनेज पाईप असले पाहिजेत. पाईपवर जागोजागी खिळे लावलेले असल्यामुळे उतरतांना पकडण्यासाठी सोईचे होते. अचानक त्याच्या लक्षात आले की त्याच्या मागे टेरेसवर काहीतरी हालचाल झाली आहे. तो वळून पाहीपर्यंंत एक काळी आकृती त्याच्यावर झेपावली आणि तिने आपला पूर्ण जोर लावून कमांड1ला टेरेसवरून खाली ढकलले. या अचानक झालेल्या हल्यामुळे कमांड1 गोंधळून गेला. त्याला सावरण्यासाठीसुध्दा वेळ मिळाला नाही. तो बिल्डींगवरून खाली कोसळू लागला. पडतांना त्याचा चेहरा वरती टेरेसकडेच होता. ती काळी आकृती टेरेसवरून वाकून त्याला खाली पडतांना पाहत होती. मागच्या बिल्डींगवरून येणाऱ्या सोडीयम लाईटच्या प्रकाशात त्याला त्या काळ्या आकृतीचा चेहरा दिसला. तो त्या चेहऱ्याकडे डोळे फाडून पाहू लागला. इकडे खाली पडून मरणाची भीती आणि समोरचा चेहरा पाहून त्याच्या भीतीत आणि आश्चर्यात अजूनच भर पडली होती.

तो चेहरा कमांड2चा होता...

त्याचा विश्वासच बसत नव्हता....

त्याने पुन्हा शाश्वती करून घेतली.

हो तो चेहरा, त्याचा मित्र ज्याच्यावर त्याने अतिशय विश्वास ठेवला होता त्या कमांड2चाच होता...

पण त्याने असे का करावे?...

तो त्या प्रश्नावर विचार करून काही निष्कर्षापर्यंंत पोहोचण्याच्या आतच धाडकन खाली जमिनीवर लावलेल्या फरशीवर आदळला. जवळपास 15/16 मजले वरून पडून त्याच्या डोक्याची शकलं शकलं झाली होती आणि पडल्याबरोबर त्याचा जीव गेला होता. इकडे वर त्याला पडतांना पाहणाऱ्या कमांड2च्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य तरळले होते .

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-24: मिस उटीन हॉपर ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


बेडरूममध्ये मंद मंद उजेड होता. बेडवर कुणीतरी झोपलेले दिसत होते. एक काळी आकृती हळू हळू बेडरूममध्ये शिरली. प्रथम बेडरूममध्ये इकडे तिकडे नजर फिरवीत ती आकृती दरवाजाच्या बाजूला भिंतीवर काहीतरी शोधायला लागली. कदाचित लाईटचे बटन शोधत असावी. भिंतीवर चाचपडल्यानंतर त्या आकृतीला एका जागी बरीचशी इलेक्ट्रीकची बटनं सापडली. ती आकृती एक एक बटन दाबून बघत होती. शेवटी एक बटन दाबल्यावर बेडरूममध्ये लख्ख प्रकाश झाला. आकृतीचे शरीरसुध्दा उजेडाने न्हावून निघाले. एक आनंदाची पुसटशी भावना त्या आकृतीच्या चेहऱ्यावर उमटली. लाईटचे बटन सापडल्याचा आनंद.

वास्तविक पाहता लाईटचे बटन सापडणे ही ती आकृती जे कार्य करण्यासाठी आली होती त्याच्या तुलनेत एक किरकोळ गोष्ट...

पण माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो...

आनंद मानायाचा एकही प्रसंग तो सोडायला तयार नसतो...

हं, त्याच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात...

चांगल्या कृत्यातच त्याला आनंद मिळतो...

पण पुन्हा त्याची चांगल्याची परिभाषा आपाआपली...

त्याचं चांगलं काम हे दुसऱ्यांच्या दृष्टीने वाईटही असू शकतं..

ती बेडरूममधली आकृती म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून कमांड1 होता. बेडरूममध्ये उजेड होताच बेडवर झोपलेली स्त्री दचकून खडबडून जागी झाली. कदाचित ती गाढ झोपेत नसावीच मुळी. समोर हातात पिस्तूल घेतलेल्या कमांड1ला पाहून ती घाबरून गेली. ती भीतीने थरथर कापायला लागली. ती आता एक मोठी किंकाळी फोडणार एवढ्यात कमांड1ने त्याच्या हातातील पिस्तूलाचा ट्रीगर दाबला. पिस्तूलाला सायलेंसर लावलेले असणार कारण 'धप्प' असा आवाज झाला आणि समोरची स्त्री बेडवर अचेतन होऊन पडली. तिचे किंकाळण्यासाठीचे तोंड उघडे ते उघडेच राहिले.

आता मात्र त्याचा चेहरा आनंदाने अगदी उजळून निघाला.

" मिस उटीन हॉपर ... आय अॅम सॉरी. मरणे हे तुझ्या नशीबात विधीनेच लिहिलेले होते... मी कोण?...मी फक्त विधीच्या हातातलं एक खेळणं." कमांड1 स्वत:शीच बोलत होता.

चट्दिशी कमांड1ने त्याच्या कोटाच्या उजव्या खिशातून एक धारदार चाकू काढला आणि खचाखच तिच्या निश्चल पडलेल्या शरीरावर चाकूचे वार केले. जेव्हा तो चाकू पूर्णपणे उटीनाच्या गरम ताज्या रक्ताने माखला तेव्हाच तो थांबला. मग तो पुढे जाऊन समोरच्या भिंतीवर त्या रक्ताने लिहायला लागला. भिंतीवर एक मोठे शून्य काढून तो पुढचे लिहिणार एवढ्यात दूर कुठेतरी पोलिसांच्या जीपचा सायरनचा आवाज त्याला यायला लागला. कमांड1ने खिडकीतून बाहेर पाहिले. आवाज अजूनही दूरवर होता. त्याने घाईघाईने पुन्हा चाकू उटीनाच्या रक्ताने माखला आणि भिंतीवर पुढचे लिहायला लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-23: हॅपी बर्थ डे ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


अँजेनी गाढ झोपेत होती. झोपेत तिचा निष्पाप सुंदर चेहरा अजूनच खुलून दिसत होता. झोपेतच तिने कूस बदलली. कूस बदलतांना झालेल्या तिच्या रेखीव शरीराच्या हालचाली टिपण्यासारख्या होत्या. तेवढ्यात तिच्या फ्लॅटच्या दाराची बेल वाजली. तिने पुन्हा कूस बदलली. पुन्हा दाराची बेल वाजली. आता तिला जाग आली होती. तिने डोळे चोळत खिडकीच्या बाहेर बघितले. काळा कुट्ट अंधार आणि शहरातील ताऱ्यांप्रमाणे टिमटिमणारे लाइट्स दिसत होते. तिने आळस देत घड्याळाकडे बघितले. घड्याळात बारा वाजायला एकदोन मिनिटं कमी होती. पुन्हा दाराची बेल वाजली. रात्रीचे बारा वाजत आले होते. एवढ्या रात्री कोण आले असावे?..

ती आपले केस आवरीत बेडवरून खाली उतरली. आपले कपडे व्यवस्थित करीत आणि कोण आले असावे असा विचार करीत ती समोरच्या दाराकडे जाऊ लागली. तिने दाराच्या होलमधून बघितले. व्हरांड्यात अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. तिने दाराची चेन लावून कडी उघडली आणि दार तिरपे करून फटीतून बाहेर बघू लागली. बाहेर जॉन उभा होता.

एवढ्या रात्री कशासाठी आला असावा हा ?...

" जॉन! एवढ्या रात्री? " ती दार उघडत म्हणाली.

जॉन गालातल्या गालात हसतच आत आला. त्याचे दोन्ही हात मागे होते. कदाचित तो काहीतरी लपवित असावा. त्याने आत येताच फुलाचा एक मोठा गुच्छ त्याच्या पाठीमागून काढला आणि तिच्या समोर धरीत दुसऱ्या हाताने तिला उचलत म्हणाला,

" हॅपी बर्थ डे टू यू...

हॅपी बर्थ डे टू यू अँजेनी...

हॅपी बर्थ डे टू यू"

अँजेनीने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितले. बरोबर बारा वाजून एक मिनट झाले होते आणि घड्याळात तारीख होती 16 ऑगष्ट; तिचा वाढदिवस ! अँजेनीच्या डोळ्यात अश्रू तरळले.

" तुला कसे कळले? " ती त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली.

" मॅडम हे विसरू नका की आमच्याकडे तुमचे सगळे रेकॉर्डस् आहेत. " जॉन हसत म्हणाला.

" ओ जॉन थँक यू" ती जॉनच्या गालाचे चुंबन घेत म्हणाली.

जॉनने तिला घट्ट मिठीत घेत खाली उतरविले. मग दोघांनी एकमेकांच्या ओठांचे एक आवेशयुक्त चुंबन घेतले.

" झोपली होतीस? " जॉनने तिला विचारले.

" हो " ती म्हणाली.

" हे आपलं तुझं बरं. तिकडे आमची झोप उडविलीस आणि तू मात्र इकडे गाढ झोपा काढत जा " जॉन गमतीने म्हणाला.

" मी? " ती हसत म्हणाली.

" हो ना. अर्धी झोप तू उडविलीस आणि अर्धी झोप त्या खुन्याने " जॉन म्हणाला.

जॉन खळखळून हसला आणि अँजेनी नुसती गालातल्या गालात हसली. प्रयत्नपुर्वक कदाचित खोटे खोटे. खुन्याचा उल्लेख जरी झाला तरी तिला सानीची आठवण यायची.

एव्हाना दोघं एकमेकांच्या कंबरेत हात घालून बेडरूममध्ये आले होते.

" काय, काही घेतोस? चहा कॉफी? " तिने विचारले.

" हो घेईन की. पण चहा कॉफी नको. "

" मग ? " तिने विचारले.

बेडवर बसत त्याने तिच्या ओठाचे एक करकचून चुंबन घेतले. मग दोघं एकमेकांना अलिंगनात घेऊन बेडवर लोळू लागले. अचानक अँजेनीला काय वाटले कुणास ठाऊक ती जॉनचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन न्याहाळू लागली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

" काय झालं?" जॉनने तिच्या पाठीवरून हात फिरवीत विचारले.

ती काहीच बोलली नाही.

" सानीची आठवण येत आहे? " जॉनने तिचे चेहऱ्यावर आलेले केस नीट करीत विचारले.

" खरंच तू कोण , कुठला, कसा माझ्या आयुष्यात येतास आणि माझं उध्वस्त होणारं आयुष्य सांभाळून घेतोस. सगळं कसं विधीलिखित असल्यासारखं " ती पाणावलेल्या डोळ्याने बोलत होती.

जॉनने आवेगाने तिला घट्ट मिठीत धरले.

" तू काळजी करू नकोस. हळू हळू सगळं व्यवस्थित होईल" तो तिच्या पाठीवर हात फिरवीत तिला धीर देत म्हणाला.

अँजेनी जॉनच्या छातीवर आपलं डोकं ठेवून त्याच्या छातीवरच्या केसांशी खेळत त्याच्याकडे एकटक पाहू लागली. जॉनसुध्दा तिच्याकडे एकटक बघायला लागला. त्यांच्या नजरा जणू एकमेकांत गुंतून खिळल्या होत्या; त्या हटायला तयार नव्हत्या. जॉनचा हात जो आत्तापर्यंत तिच्या पाठीवरून फिरत होता आणि तिच्या केसांशी खेळत होता, हळू हळू तिच्या मुलायम अंगाशी खेळायला लागला. तिनेसुध्दा त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. जॉनने तिला छातीवरून त्याच्या मजबूत हातांनी वर ओढून घेतले. ती त्याच्या शर्टची बटणं काढायला लागली. जॉनसुध्दा तिचे कपडे काढायला लागला. थोड्याच वेळात दोघंही एकमेकांसमोर निर्वस्त्र अवस्थेत होती. जॉन तिच्या नितळ कांतीकडे आणि तिच्या निर्वस्त्र शरीराकडे डोळे फाडून बघत होता. तो तिच्यात एकरूप होण्यास आतुर होऊन हळू हळू तिच्यावर झुकू लागला. तेवढ्यात बाजूला ठेवलेला जॉनच्या मोबाईलची बेल वाजली. दोघंही एकदम जसेच्या तसे एखाद्या पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. जॉनने आपला हात लांबवून मोबाईल घेतला. मोबाईलच्या डिस्प्लेवर बघितले. फोन सॅमचा होता. त्याने फोनचे बटण दाबून तो फोन बंद केला आणि बाजूला ठेवला. पुन्हा दोघंही मूड बनविण्याचा प्रयत्न करू लागले. मोबाईल पुन्हा वाजयला लागला. चिडून त्याने बटन दाबून फोन कानाला लावला.

" हं सॅम, काय काम काढलंस एवढ्या रात्री? " जॉन जरा नाराजीनेच म्हणाला.

" सर, तिसरा खून झालेला आहे " तिकडून सॅमचा आवाज आला.

" काय? " जॉन एकदम ताडकन उठत म्हणाला.

जॉन आपले कपडे शोधू लागला.

" आम्ही सध्या रस्त्यातच आहोत, कुणीतरी फोन करून पोलीस स्टेशनवर माहिती दिली आहे" सॅमचा आवाज आला.

" कुठला पत्ता सांगितला?" जॉनने कपडे घालण्याचा प्रयत्न करीत विचारले.

एव्हाना अँजेनी उठून आपले कपडे घालायला लागली होती.

" साऊथ एव्हेन्यू, प्रिन्स अपार्टमेंटस् 1004 ... उटीना हॉपर" तिकडून आवाज आला.

" काय? यावेळेससुध्दा एक स्त्रीच! ठीक आहे यू प्रोसीड विथ द टीम. मी लवकरच तुम्हाला जॉईन होतो" जॉनने आपले कपडे घालत फोन बंद केला.

... to be contd...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-22: डिटेक्टीव्ह ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


रात्रीच्या गर्द अंधारात वसाहतीपासून दूर एका निर्जन, निर्मनुष्य ठिकाणी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून ओवरकोट घातलेली एक आकृती बाहेर आली. आपल्या गाडीच्या शेजारी अंगाला झोंबणाऱ्या थंडीत ती आकृती गाडीच्या बाजूला उभी राहिली. बेचैन होऊन ती इकडे तिकडे बघत येरझारा घालत होती. मधून मधून आपल्या घड्याळाकडेसुध्दा पाहत होती. स्पष्ट होते की ती कुणाची तरी वाट पाहत होती. तेवढ्यात समोर अंधारात दोन दिवे तिला तिच्या दिशेने येतांना दिसले. तिचे येरझारा घालणे थांबले. एक गाडी जवळ आली. त्या गाडीच्या हेडलाईटस्चा प्रकाश त्या आकृतीच्या चेहऱ्यावर पडला. ती आकृती म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून जॉन होता. ती गाडी त्याच्या गाडीच्या शेजारी येऊन उभी राहिली. जॉन त्या गाडीजवळ गेला. त्या गाडीतून एक काळा कोट आणि काळी हॅट घातलेली एक उंचपुरी व्यक्ती उतरली.

उतरताच तिने जॉनशी हस्तांदोलन केले " हाय जॉन"

" हाय अलेक्स" जॉनने त्याचा हात आपल्या हातात घेत म्हटले.

" बोल काय म्हणतोस? इतक्या निर्जन जागी, इतक्या रात्री तू मला कशाला बोलावलेस?" अलेक्सने विचारले.

" गोष्टच तशी आहे. तुला माहित असेलच की डिपार्टमेंटचाच एक आमचा साथीदार खुन्याला फितुर झाला आहे अशी आम्हाला शंका आहे. आता अशी परिस्थिती झाली आहे की मी कोणत्याही माझ्या सहकाऱ्यावर जरासुध्दा विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे मी तुला इथे इतक्या रात्री बोलावले आहे" जॉन म्हणाला.

" अच्छा तर त्या कल्प्रीटला शोधायचे आहे" अलेक्स म्हणाला.

" मला माहित आहे की या कामासाठी तुझ्यापेक्षा दुसरा कोणी सक्षम डिटेक्टीव असूच शकत नाही" जॉन त्याची स्तुती करीत म्हणाला.

" एकदा का काम तू माझ्यावर सोपविलेस की ते माझे झाले. तू काही काळजी करू नकोस. लवकरात लवकर मी त्याचा शोध लावीन" अलेक्स विश्वासाने म्हणाला.

" या खुन्यापर्यंत पोहोचायला आम्हाला दुसरा तरी काही मार्ग दिसत नाही. बघूया अशा तऱ्हेने काही फायदा होतो का ते" जॉन म्हणाला.

" म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठायचा म्हण ना!" अलेक्स गमतीने म्हणाला.

" स्वर्ग कसला... नर्क म्हण" जॉन ने दुरूस्ती केली.

" हो नर्कच म्हणावं लागेल" अलेक्स म्हणाला.

... to be contd...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-21: जॉनच्या बॉसची व्हीजीट ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


ऑफिसमध्ये अजून कुणीच आलं नव्हतं. जॉन सकाळी सकाळी एकटाच येऊन टेबलसमोर आपल्या खुर्चीवर बसला. तो थकल्यासारखा वाटत होता. त्याने मग एक फाईल काढून तो ती चाळायला लागला. त्याचं त्या फाईलमध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं. तरी तो एकाग्र होण्याचा प्रयत्न करीत ती फाईल चाळत होता. थोड्या वेळाने एक एक करीत ऑफिसचा दुसरा स्टाफ यायला लागला.

आता ऑफीसमध्ये चहलपहल आणि कुजबूज त्याला ऐकायला येत होती. तेवढ्यात जॉनजवळ एक मेसेंजर आला.

" सर, बॉस आले आहेत..." मेसेंजरने जॉनला निरोप दिला.

" बॉस ?..."

" सर ... शहर पोलीस शाखाप्रमुख"

" काय? इतक्या सकाळी सकाळी?" जॉन आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाला.

शहर पोलीस शाखाप्रमुख आला म्हणजे काहीतरी नक्कीच गंभीर असणार...

विचार करीतच जॉन त्यांना रिसीव्ह करण्यासाठी बाहेर गेला. शहर पोलीस शाखाप्रमुख जॉनला रस्त्यातच भेटले.

" गुड मॉर्निंग सर" जॉनने अभिवादन केले.

" जॉन आय निड टू टॉक टू यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट" शहर पोलीस शाखाप्रमुख न थांबता सिरीयस मूडमध्ये म्हणाले.

जॉन तसाच वळून त्यांच्या मागे यायला लागला. दोघेजण येऊन जॉनच्या कॅबिनमध्ये बसले.

" काय ? खुनाचा काही थांगपत्ता लागला का?"

बसल्या बसल्या शहर पोलीस शाखाप्रमुखांनी जॉनला प्रश्न केला.

" नाही सर, अजून काहीच माहिती हाती लागत नाही. अन त्यातच भर म्हणजे ...तुम्हाला माहित आहेच. आपलाच कुणीतरी माणूस त्या खुन्याला फितूर झाला आहे" जॉन म्हणाला.

" अजून किती खून व्हायची वाट पाहवी लागणार आहे आपल्याला?"

शहर पोलीस शाखाप्रमुखांनी तिरसट प्रश्न विचारला.

" सर, मला वाटते तुम्हाला आत्तापर्यंंत केलेल्या तपासाबद्दल थोडक्यात माहिती देतो...म्हणजे तुम्हाला आम्ही करीत असलेल्या तपासाबद्दल कल्पना येईल... "

जॉनने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या बॉसला त्यांनी या केसवर आत्तापर्यंंतच्या केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती देवू लागला

" जसे मी तुम्हाला आधी सांगितले होते...पहिल्या खुनाच्या वेळी आम्हाला एक 'झीरो' असं लिहिलेला टी शर्ट घातलेला माणूस लिफ्टमध्ये चढतांना दिसला होता... तसाच टी शर्ट घातलेला एक माणूस मला जिथे अँजेनीला अॅडमीट केले होते त्या हॉस्पिटलमध्येसुध्दा आढळला होता...दोघंही आमच्या तावडीतून थोडक्यात सुटले होते... म्हणून मग आम्ही दोघांचीही स्केचेस काढून सर्व मिडीयाद्वारे लोकांत जारी केली... त्या दोघांनाही आम्ही पकडलं सुध्दा पण शेवटी असं कळलं की त्या दोघांचाही या खुनांशी कसलाही संबंध नाही.... इन फॅक्ट तसे 'झीरो' लिहिलेले टी शर्ट घालण्याची हल्ली फॅशन आहे... पण हा खुनीही भिंतीवर रक्ताने झीरो काढतो त्यामुळे आम्ही हे खून आणि ते दोन टीशर्टवाले या घटना एकमेकांना जोडल्या होत्या... त्यामुळे अगदी सुरवातीपासूनच आम्ही खुनी पकडण्याच्या दृष्टीने निश्चित केलेली दिशा पूर्णपणे चुकली.... त्यात वेळ वाया गेला तो गेलाच, आमची मेहनतही वाया गेली... आणि शेवटी निराशाच पदरी पडली.... आता पुन्हा आम्ही नव्या जोमाने कंबर कसून तयार झालो आहोत... आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत अगदी जिवाचीसुध्दा पर्वा न करता..." जॉन म्हणाला.

त्याचा इशारा एवढ्यातच त्याच्यावर झालेल्या हल्याकडे होता.

"पूर्ण प्रयत्न करीत आहा. तर मग खुनी का सापडत नाही? तुम्हाला वाटत असेल एवढ्या सकाळी येऊन तुम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन शांत खुर्चीवर बसून आराम का करत नाही? माझ्या खुर्चीला किती काटे आहेत काही कल्पना आहे तुम्हाला? सारखं वरून दडपण असतं. सगळ्या शहरात दहशत पसरली आहे. रात्री आठ वाजायच्या आत सगळे रस्ते सुनसान होतात. प्रत्येक माणसाला वाटते की पुढचा नंबर त्याचाच आहे. इतके दिवस लोक चूप होते. आता ते त्या मेयरला जाऊन जाब विचारीत आहेत आणि तो मेयर माझ्या बोकांडीवर बसला आहे अन त्यात भर म्हणजे हे प्रेसवाले पोलिसांच्या बाबतीत उलटं सुलटं छापून आपली बदनामी करीत आहेत. अक्षरश: लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडण्याची वेळ आली आहे. आता खूप झालं आहे. डोक्यावरून पाणी जात आहे. प्रकरण अगदी मिनीस्ट्री पर्यंत गेलं आहे. अशा परिस्थितीत मी शांत राहू शकत नाही. तुम्हाला मी जास्तीत जास्त 4 दिवसांची मुदत देतो. तिकडे काहीही करा आणि चार दिवसात त्या खुन्याला माझ्यासमोर हजर करा लाईव्ह ऑर डेड"

"सर आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतोच आहोत"

" मला मेहनत नाही, रिझल्ट पाहिजे" शहर पोलीस शाखाप्रमुख खुर्चीवरून ताडकन उठत म्हणाले.

जॉनपण त्याच्या खुर्चीवरून उठला. शहर पोलीस शाखाप्रमुख आता जायला लागले. जाता जाता ते दारात थांबून वळले आणि म्हणाले,

"...आणि तुमच्याच्याने जर केस सुटत नसेल तर राजीनामा द्या. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करीन"

शहर पोलीस शाखाप्रमुख टकटक बुटांचा आवाज करीत निघून गेले. जॉन दरवाज्यापर्यंत गेला आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला जातांना बघत राहिला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-20: बॉसचा मेसेज ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



ती मेल आणि तिचे अटॅचमेंट्स पूर्णपणे वाचल्यावर कमांड2 कॉम्प्यूटरवरून उठला. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. ती पूर्ण माहिती त्याने त्याच्या डोक्यात, हृदयात आणि मनातच नाही तर त्याच्या जवळ असलेल्या थंब ड्राईव्हमध्येसुध्दा साठवून ठेवली होती. तो तिथून जाण्यासाठी वळणार एवढ्यात काम्प्यूटरचा बझर वाजला. त्याने बघितले की कमांड1ला मेल आली होती. त्याने कमांड1च्या उघड्या मेलबॉक्समध्ये जाऊन बघितले तर मेल बॉसची होती. तो पुन्हा कॉम्प्यूटरसमोर बसला. त्याने मेल उघडली. मेलमध्ये एक अटॅचमेंट होती. त्याने अटॅचमेंट उघडली. ते एक मॅडोनाचे सुंदर सेक्सी चित्र होते. बॉस मॅडोनाचा भलताच फॅन दिसतो...

त्याने विचार केला. एव्हाना कमांड2 कमांड1चं पाहून पाहून चित्रातला मेसेज कसा उघडायचा हे शिकला होता. त्याने चित्रातला मेसेज उघडला. त्यात पुढच्या कारवाईवद्दल माहिती होती. पुढचा खून कधी, कुणाचा करायचा ते सविस्तर लिहिलं होतं. आज 15 तारीख होती आणि पुढच्या खुनासाठी 17 तारीख नेमलेली होती. त्या मेलमध्ये 17 तारखेच्या रात्री 1 ते 3 च्या दरम्यानचा काळ अगदी योग्य आहे असे लिहिलेले होते. आणि 16 तारखेचा संपूर्ण दिवस आणि रात्र हा अतिधोकादायक काळ आहे असे नमूद केले होते. कमांड2 ने तो संपूर्ण मेसेज एका जागी कॉपी करून घेतला कारण तो मेसेज एकदा उघडल्यानंतर नष्ट होत असे. त्याला बॉसने तशा प्रकारे प्रोग्रॅमच केले होते. कमांड2ने ती मेल बंद केली. मेसेज आता नष्ट झाला होता. अचानक कमांड2 आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि काहीतरी तुफान त्याच्या डोक्यात उठल्यासारखा तो त्या खोलीत कॉम्प्यूटरभोवती चकरा मारायला लागला. त्याच्या डोक्यात काहीतरी द्वंद्व चाललेलं स्पष्ट जाणवत होतं. शेवटी तो आपल्या येरझारा थांबवून कॉम्प्यूटरच्या समोर खुर्चीवर बसला. तो काहीतरी निर्णयाप्रत येऊन पोहोचला होता.

त्याने बॉसचा आलेला मेसेज बदलविण्याचे ठरविले होते...

त्याने तो मेसेच 'इडीट' करण्यासाठी ओपन केला. पुन्हा इकडे तिकडे पाहत त्याने आपला निर्णय पक्का केला आणि मग तो तो मेसेज 'इडीट' करायला लागला. खुनासाठी जी योग्य वेळ दिली होती ती 17 तारीख रात्री 1 ते 3 अशी दिलेली होती ती त्याने बदलून 16 तारीख रात्री 1 ते 3 अशी केली. त्या मेसेजमध्ये 16 तारखेची संपूर्ण रात्र आणि दिवस अतिधोकादायक आहे असे नमूद केले होते. तो त्याने बदलून 17 तारीख असा केला. म्हणजे जो खूनासाठी योग्य काळ होता तो धोकादायक आहे असा आणि जो धोकादायक आहे तो योग्य आहे असा बदल त्याने मेसेजमध्ये केला होता.

असे त्याने का केले होते?

त्याच्या डोक्यात काय शिजत होते हे सांगणं फार कठीण होतं.

कदाचित त्याचा त्याच्या बॉसच्या भविष्यकथनावर विश्वास नसावा. कदाचित त्याला त्याच्या बॉसने जे भविष्य वर्तविले होते ते बरोबर आहे का हे आजमायचे असावे.

पण जर त्याच्या बॉसने वर्तविलेले भविष्य खरे झाले तर?..

अशा परिस्थितीत कमांड1च्या आणि स्वत: त्याच्या जीवाला धोका होता. मग यातून काहीतरी मार्ग काढायला हवा...

तो विचार करू लागला.

शेवटी त्याने ठरविले की यावेळेस तो कमांड1च्या सोबत जाणार नाही. काहीतरी बहाणा करून तो कमांड1ला एकटेच जाण्यास भाग पाडणार होता.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-19: डाव फसला? ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


कमांड2 कमांड1 काय सांगतो ते ऐकण्यासाठी अगदी उतावीळ होऊन गेला होता. तो त्याची वाट पाहत कॉम्प्यूटरपाशी येरझारा घालायला लागला.

किती वेळ झाला कमांड1 बेडरूमकडे गेला पण अजून बाहेर आला नाही. इतका वेळ?..

तिकडून परस्पर तो बाहेर तर नाही निघून गेला?...

कमांड2ला आता काळजी वाटायला लागली होती. कमांड2 त्याला बघण्यासाठी उठला आणि तो जिकडे गेला होता तिकडे जायला लागला. बेडरूमच्या समोर येऊन त्याने बघितले तर बेडरूमचे दार आतून ओढून घेतलेले होते. त्याने हळूच दार ढकलून आत डोकावून बघितले तर समोर कमांड1 बेडवर ढाराढूर अवस्थेत झोपला होता. कमांड2ला तोंडापर्यंत आलेला घास गेल्यासारखे वाटले. कसातरी तो सगळं सांगायला तयार झाला होता. शुध्दीवर आल्यावर तो त्याला काहीएक सांगणार नाही याची त्याला खात्री होती. तो त्याच्याजवळ गेला आणि त्याला हलवून उठविण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने त्याला जोरजोराने हलवून बघितले पण तो झोपेतच नाही तर नशेत चूर झालेला होता. कमांड2ने थोडा वेळ प्रयत्न करून मग त्याला उठविण्याचा विचार सोडून दिला. त्याने विचार केला की

हा जरी झोपला तरी आपण दुसरं काही करू शकतो का? ..

कमांड1ने तो जी माहिती सांगणार होता ती नक्कीच कुठेतरी दडवून ठेवली असणार...

ती जर आपण धुंडाळायचा प्रयत्न केला तर?...

आतापर्यंत या घरात नेहमी त्याच्यासोबत कमांड1 असायचा. आत्ता त्याला संपूर्णपणे एकांत लाभला होता.

त्या एकांताचा जर आपण फायदा करून घेतला तर?...

त्याने ठरविले की आत्ता हे घर पूर्णपणे धुंडाळायला पाहिजे.

नक्कीच काहीतरी आपल्याला सापडेल...

त्याने बेडरूमपासूनच सुरूवात केली. तो आवाज न करता बेडरूममध्ये इकडे तिकडे धुंडाळू लागला. बेडरूममध्ये विशेष असे काहीच सापडले नाही. मग तो घराचा इतर भाग शोधायला लागला. दुसरीकडेही त्याला उपयोगी असे काहीच सापडले नाही.

त्याच्या अचानक लक्षात आले की,

'अरे कमांड1ने तर कॉम्प्यूटर सुरूच ठेवले होते.'

तो घाईघाईने काम्प्यूटर पाशी गेला. बघितले तर काम्प्यूटर सुरूच नाही तर कमांड1चा मेलबॉक्ससुध्दा उघडा होता. कमांड2च्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य तरळले. तो काम्प्यूटरसमोरच्या खुर्चीवर पटकन जावून बसला. आणि थोडीही उसंत न घेता कमांड1च्या मेल्स चेक करू लागला. भरपूर मेल्स होत्या. तो एक एक उघडून त्यावरून भराभर आपली नजर फिरवीत होता. विशेष असं काही सापडत नव्हतं. अचानक एक मेल उघडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य पसरलं. त्या मेलमध्ये अशी काही माहिती होती की जी कमांड1 कदाचित आज त्याला सांगणार होता. त्याने एकदा वरवर ती मेल आपल्या नजरेखालून घातली. मग आपल्या खिशातला युएसबी ड्राईव्ह काढून कॉम्प्यूटरला लावला आणि ती मेल अटॅचमेंटसहित पूर्ण त्याच्या युएसबी ड्राईव्हमध्ये कॉपी केली. कॉपी झाल्यावर त्याने युएसबी ड्राईव्ह काढून आपल्या खिशात ठेवला. जिकडे कमांड1 झोपला होता त्या बेडरूमकडे एकदा बघितले आणि मग निवांत ती मेल तो वाचायला लागला. कधी त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारत होते तर कधी मध्ये मध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्य तरळत होतं.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-18: कमांड2चा डाव ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


कमांड2ने ओळखले की हीच योग्य वेळ आहे.....

...की कमांड1ला बोलतं करून त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी काढता येतील...

तो एकेका घोटाने त्याला साथ देत त्याला चांगली नशा चढण्याची वाट बघायला लागला. थोड्या वेळाने कमांड1ला बऱ्यापैकी नशा चढली आणि ही संधी साधून कमांड2ने आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

"कमांड1, मला एक सांग ..."

कमांड2 ने विचारण्याच्या आधी मुद्दाम थांबून कमांड1ला चढलेल्या नशेचा अंदाज घेतला.

कमांड2ला थांबलेलं पाहून कमांड1 बरळल्यासारखा म्हणाला, " बोल काय सांगायचं तुला ... एक का? दोन विचार... तीन विचार ... तुला पाहिजे तेवढं विचार"

त्याचे ते हाल बघून कमांड2 त्याला न दिसण्याची खबरदारी घेत कुत्सीतपणे हसला.

"नाही म्हणजे......ती घडी सुदैवाने तुमच्यासाठी चांगली होती आणि 45 मिनिटं अलिकडे किंवा पलिकडे असतात तर तुम्हाला कोणीही वाचवू शकले नसते असं बॉस का म्हणाला? मला तर काहीच कळत नाही आहे" कमांड2ने कमांड1 ला विचारलं.

कमांड1 ला आता चांगलीच चढली होती.

" ते तुला नाही कळणार. ती एक लंबी स्टोरी आहे" कमांड1 म्हणाला.

कमांड2 विचार करू लागला

आता याला बोलतं कसं करावं...

त्याने काम्प्यूटरवर बसून बॉसने मागे एकदा दिलेला मेसेज उघडला.

" आणि हे बघं मागे बॉसने पाठविलेल्या संदेशातसुध्दा 11 तारखेचा रात्री 3 ते 4 चा काळ तुमच्यासाठी योग्य आहे आणि 4 ते 7 चा काळ अतिशय धोकादायक आहे असं बॉसने लिहिलं होतं. त्याचा भविष्यावर जरा जास्तच विश्वास दिसतो. " कमांड2 कमांड1 ला अजून खुलविण्याचा प्रयत्न करू लागला.

" भविष्यावर विश्वास नाही. पक्की खात्री असते त्याची. आत्तापर्यंत त्याने सांगितलेल्या वेळेत कधीच दगा फटका झालेला नाही " कमांड1 म्हणाला.

" तो एक केवळ योगायोग असू शकतो" कमांड2 अजून त्याला डीवचण्याच्या उद्देशाने म्हणाला.

" योगायोग नाही. बॉसजवळ अशी एक गोष्ट आहे की जिच्यामुळे कोणती गोष्ट कोणत्या वेळी लाभदायक होईल हे तो आधीच वर्तवू शकतो"

कमांड1च्या तोंडून आता बऱ्याच त्याच्या पोटातल्या गोष्टी बाहेर येऊ पाहत होत्या.

" मला नाही खरं वाटत" कमांड2 ने असहमती दर्शवित आपले शेवटचे हत्यार वापरले.

" तुलाच काय कुणालाही खरं वाटणार नाही"

" या एकाच गोष्टीवरून तू निष्कर्ष काढतो आहेस की अजूनही काही पुरावे आहेत?" कमांड2ने मधेच विचारले.

" ही एकच गोष्ट नाही ... अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत...बॉसजवळचा पैसा बघ ... बॉसजवळ एवढा पैसा कुठून आला? ही पूर्ण संघटना चालविणं काही सोपं नाही आणि तो त्याच्या एकट्याच्या पैश्यावर ही पूर्ण संघटना चालवितो " कमांड2 म्हणाला.

" कशी काय?"

" त्याच्याजवळ असलेल्या विद्येच्या सहाय्याने. कोणत्या वेळी कोणता शेअर लाभदायी ठरू शकतो हे त्याला आधीच कळतं आणि असं म्हणतात की आत्तापर्यंत त्यात तो कधीच तोट्यात राहिला नाही" कमांड1 आता चांगलाच मोकळा बोलू लागला होता.

" विद्या? अशी कोणती विद्या आहे त्याच्याजवळ?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.

" सांगतो" कमांड1 आपला व्हिस्कीचा ग्लास पुन्हा भरीत म्हणाला.

" अन बॉसनं ही विद्या मिळविली तरी कुठून ?" कमांड2 आतुरतेने प्रश्नावर प्रश्न विचारायला लागला.

कमांड2 कान टवकारून कमांड1 काय सांगतो ते ऐकण्यासाठी उतावीळ झाला होता.

" सांगतो बाबा, सगळं सांगतो" म्हणत कमांड1 उभा राहिला.

आपल्या उजव्या हाताची करंगळी दाखवत कमांड1 म्हणाला,

" एक मिनिट थांब मी जरा इकडून येतो"

कमांड1 झोकांड्या देत बेडरूमकडे जायला लागला.
... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-17: बॉसचा फोन... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



कमांड1 काम्प्यूटरवर काहीतरी करीत होता. कमांड2 त्याच्या बाजूला हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन ऐटीत बसला होता.

" साल्याला कुचलायलाच पाहिजे होतं " कमांड2 आपला व्हिस्कीचा ग्लास रिचवित म्हणाला.

" अरे नाही. त्याला जिवंत ठेवणं फार आवश्यक आहे " कमांड1 काम्प्यूटरवरच्या की बोर्डवर पटापट कमांडस् टाईप करीत म्हणाला.

तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या फोनची घंटी वाजली.

कमांड1 ने फोन उचलला.

काम्प्यूटरवरचे आपले काम सुरू ठेवीतच तो फोनवर म्हणाला ,

" हॅलो"

तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

" हॅलो ... कोण बोलतय?"

कमांड1ने फोनच्या डिस्प्लेवर तिकडच्या फोनचा नंबर पाहण्यासाठी बघितले. डिस्प्लेवर काहीच नंबर नव्हता. आता मात्र कमांड1 चे धाबे दणाणले.

तो आपले काम्प्यूटरवरचे काम सोडून पुन्हा फोनमध्ये म्हणाला,

" हॅलो..."

" मी बॉस बोलतोय " कमांड1चे बोलणे तोडीत तिकडून आवाज आला.

"ब.. ब... बबॉस ? ... यस बॉस " कमांड1च्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.

कमांड1 ताडकन खुर्चीतून उठून उभा राहिला. त्याचे हात थरथरायला लागले. त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर घाम फुटला होता. एक घामाचा ओघळ त्याच्या कानामागून घरंगळत खाली आला.

कमांड2 अचंब्यात पडला

कमांड2ने कमांड1ला इतकं घाबरलेल्या स्थितीत पूर्वी कधीच पाहिले नव्हते...

कमांड1ची ही स्थिती पाहून कमांड2ने आपला व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवला आणि तो सुध्दा खुर्चीवरून उठून उभा राहिला.

बॉसने यापूर्वी कधी फोन केल्याचं त्याच्या ऐकीवात नव्हतं...

बॉस त्याचे पूर्ण आदेश इंटरनेटद्वाराच द्यायचा...

मग त्याला आज अचानक फोन करण्याची काय गरज पडली?...

" तुम्हाला जॉनला धडकावण्याचा शहाणपणा कोणी करायला सांगितला होता?" तिकडून कणखर आणि गंभीर आवाज आला.

आवाज इलेक्ट्रॉनिक उपकरणातून फिल्टर केल्यासारखा जाणवत होता.

"बबबॉस ... आम्ही त्याच्या गाडीला त्याला मारण्याच्या उद्देशाने धडक दिली नव्हती " कमांड1 कसाबसा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागला.

" चूप. मूर्ख.... तुम्हाला माहित आहे ... स्वत:चा शहाणपणा करणाऱ्यांसाठी या संघटनेत काही स्थान नाही " तिकडून बॉसचा रागीट स्वर ऐकायला आला.

" स सॉरी बॉस... चुकलो.... पुन्हा नाही होणार अशी चूक " कमांड1 पुन्हा क्षमायाचना करू लागला.

" तुम्हाला माहित आहे?... ती घडी सुदैवाने तुमच्यासाठी चांगली होती म्हणून तुम्ही वाचलात... तुम्ही 45 मिनिट अलिकडे किंवा पलिकडे असतात तर त्यावेळी तुम्हाला कोणीही वाचवू शकले नसते " बॉसचा करडा स्वर कमांड1च्या कानात घुमत होता.

एव्हाना कमांड2 कमाड1च्या जवळ येऊन फोनच्या स्पीकरजवळ आपलं डोकं घुसवून बॉस काय बोलतो आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करीत होता.

" आय अॅम रिअली सॉरी बॉस " कमांड1 पुन्हा गयावया करू लागला.

" ही तुमची पहिली चूक आहे... आणि ही चूक तुमची शेवटची राहिली पाहिजे.... समजलं? " तिकडून बॉसने इशारा दिला.

"हो सर; यस...."

कमांड1ने आपले बोलणे पूर्ण करण्याच्या आतच तिकडून खाडकन फोन आपटण्याचा आवाज आला.

कमांड1ने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत फोन क्रेडलवर ठेवून दिला. तो आपल्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू लागला.

" बॉसला आवडलेलं दिसत नाही" कमांड2 म्हणाला.

" आपण आपल्या मनाचा कारभार करायला नको होता " कमांड1 म्हणाला.

" जे झालं ते झालं. पुन्हा आपण काळजी घेवू " कमांड2 त्याला दिलासा देत म्हणाला.

" हा पहिल्यांदा बॉसने फोन केला.... त्याचा फोन आला तेव्हाच मला वाटलं काहीतरी सिरीयस झालं आहे म्हणून. " कमांड1 ने त्याचा व्हिस्कीचा ग्लास भरीत म्हटले.

कमांड2नेसुध्दा आपला बाजूला ठेवलेला व्हिस्कीचा ग्लास उचलला आणि तो कमांड1च्या समोर बसला. कमांड1 गटागट व्हिस्कीच्या ग्लाससोबत आपला अपमान गिळण्याचा प्रयत्न करीत होता.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-16: मधुर मिलन ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



अँजेनी त्याला आधार देत देत त्याच्या क्वार्टरकडे नेऊ लागली.

" अच्छा, म्हणजे ...त्यांनी तुझ्यावर हल्ला केला होता... तू असं एकटं फिरणं आता धोकादायक आहे... तू स्वत:ची काळजी घ्यायला पाहिजे आणि नेहमी स्वत: बरोबर प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे" अँजेनी त्याची सगळी हकिकत ऐकून निष्कर्षाप्रत पोहोचली.

" नाही... हल्ला नाही केला त्यांनी... जर त्यांनी ठरविलं असतं तर ते आज मला जीवे मारू शकले असते... पण त्यांनी नाही मारलं" तो तिचा आधार घेत म्हणाला.

" तुझ्यावर गोळ्या झाडल्या नं त्यांनी?" अँजेनीने त्याला पुन्हा विचारले.

" हो ... पण सगळ्या आजूबाजूला ... एकही गोळी माझ्या जवळून सुध्दा गेली नाही... ते त्यांच्या गाडीच्या खाली उतरूनसुध्दा माझ्यावर गोळ्या झाडू शकले असते" जॉन आपला तर्क सांगत होता.

" बरं जाऊ दे... तुला काही सिरीयस इजा तर झाली नाही ना... हे सगळ्यात महत्वाचं" ती त्याला दिलासा देत म्हणाली.

" त्यांनी फक्त मला चिथाविण्याचा प्रयत्न केला... असं दिसतं की ते या सिरीयल किलींगला जास्तीत जास्त प्रसिध्दी देवू इच्छितात..." जॉनने आपला अंदाज वर्तविला.

" पण त्याने काय होणार आहे?" अँजेनीने आश्चर्याने विचारले.

" तेच तर कोडं मला उलगडत नाही आहे.." जॉन चाबीने त्याचा फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

अँजेनीने त्याच्या हातातून चाबी घेतली आणि ती स्वत: त्याचा फ्लॅट उघडायला लागली.

जॉन उघडा बेडवर पडला होता. वरून वरून जरी वाटत नसले तरी त्याच्या शरीरावर बऱ्याच जागी मुक्या माराचे लाल व्रण होते. अँजेनीने त्याला जिथे जिथे लागले होते तिथे मलम लावून दिले आणि शेकण्यासाठी त्याला शेकायची रबराची पिशवी गरम पाण्याने भरून दिली.

"बराय आता मी निघते... तू आराम कर ... बराच उशीर झाला आहे" अँजेनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटले.

ती जाण्यासाठी वळायला लागली तेव्हा जॉनने त्याच्या खांद्यावर ठेवलेला तिचा हात पकडला. तिने वळून त्याच्याकडे बघितले. तिचा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. जॉन तिच्या डोळ्यास डोळे भिडवून बघायला लागला. तिचे पण डोळे त्याच्या डोळ्यातून हटायला तयार नव्हते. दोघांच्याही हृदयाची स्पंदनं वाढायला लागली. जॉनने तिला जवळ ओढून घेतले. आता दोघंही इतके जवळ आले होते की दोघांनाही एकमेकांचे गरम श्वास आणि हृदयाचे वाढलेले ठोके जाणवायला लागले होते. जॉनने हळूच तिच्या थरथरत्या ओठांवर आपले गरम ओठ टेकविले आणि करकचून तिला आपल्या बाहूपाशात बंद केले. जॉनला आठविले की तिला कृत्रिम श्वासोच्छवास देतांना त्याने असेच तिच्या ओठांवर ओठ टेकवीले होते. पण त्यावेळी आणि आता किती फरक होता. कृती तीच होती पण भावनेने तिला किती वेगळा अर्थ दिला होता. आवेगानं ते एकमेकांच्या चेहऱ्याचे, ओठांचे, मानेचे चुंबनं घ्यायला लागले. जॉन हळूवार तिच्या मोठमोठया श्वासांमुळे खालीवर होणाऱ्या उरोजांना स्पर्श करु लागला.

"अँजेनी... आय लव्ह यू सो मच" अनायास त्याच्या तोंडून निघाले.

"आय टू" म्हणत ती त्याला एखाद्या वेलीसारखी करकचून बिलगली.

" आं..ऊं" जॉन जोरात ओरडला.

"काय झालं?" पटकन ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली.

" अगं काही नाही ... पाठीवर जिथं लागलं आहे तिथं थोडं दुखलं" तो म्हणाला.

" आय अॅम सॉरी" ती लाजून म्हणाली.

त्याने हसून तिला पुन्हा आपल्या बाहूपाशात ओढून घेतले. ती पण हसायला लागली. आणि मग केव्हा ते आपल्या प्रेममिश्रीत हळूवार प्रणयात मग्न झाले त्यांना कळलंच नाही.

... to be contd...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-15: काय झालं ? ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


इकडे अँजेनी जॉनची वाट बघून बघून थकली.

काय झाले असावे? ...

जॉन कुठे गेला असावा?...

इतका वेळ झाला तरी तो परत का आला नसावा?...

तिला काळजी वाटू लागली.

बरं फोन करावं म्हटलं...

तर तो त्याचा मोबाईल इथेच ठेवून गेला होता....

तिला काहीच सुचत नव्हते. घटकेतच ती हॉटेलच्या आत जाऊन बसायची आणि बाहेर काही चाहूल लागताच पुन्हा बाहेर येऊन बघायची. तिला त्याची इतकी का काळजी वाटावी?...

तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात पुन्हा बाहेर कोणती तरी गाडी आल्याची चाहूल लागली. ती उठून पुन्हा बाहेर आली. गाडी हॉटेलच्या समोर थांबली होती. पण ती जॉनची गाडी नव्हती. ती एक प्रायव्हेट टॅक्सी होती. ती पुन्हा आत जायला लागली तर तिला मागून आवाज आला,

"अँजेनी"

तिने वळून बघितले तर टॅक्सीतून जॉन उतरला होता. त्याचे केस सगळे विस्कटलेले , शर्ट एका जागी फाटलेला आणि शर्टवर काळे मळके डाग पडले होते.

काय झालं असावं?...

तिला काळजी वाटून ती जॉनकडे जायला लागली. जॉनपण लंगडत लंगडत तिच्याकडे यायला लागला.

"काय झालं?" घाईघाईने ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली.

काही न बोलता जॉन तिच्याकडे लंगडत लंगडत चालू लागला. तिने पटकन जाऊन त्याला आधार दिला.

"आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे" अँजेनी त्याला कुठं कुठं लागलं ते पाहत म्हणाली.

" नाही ... तेवढा काही विशेष मार नाही ... फक्त मुका मार लागलेला आहे" तो कसाबसा बोलला.

"तरीपण चेकअप करायला काय हरकत आहे?" ती जाणाऱ्या टॅक्सीला थांबण्यासाठी हात दाखवित म्हणाली.

तिने त्याला आधार देत टॅक्सीत बसविले आणि ती पण त्याच्या शेजारी त्याच्याजवळ सरकून बसली.

" थ्री कौंटीज हॉस्पिटल" तिने टॅक्सीवाल्याला आदेश दिला.

" नको खरंच नको ... तशी काही गरज नाही आहे" तो म्हणाला.

" तुझी गाडी कुठाय?" तिने विचारले.

" आहे ... तिकडे ... मागे... रस्त्याच्या कडेला... मोठा अॅक्सीडेंट होता होता वाचला" तो सांगू लागला.

" ड्रायव्हर ... गाडी पोलीस क्वार्टर्सला घे" मध्येच त्याने ड्रायव्हर ला आदेश दिला.

ड्रायव्हरने गाडी स्लो करून एकदा अँजेनी आणि मग जॉनकडे बघितले. अँजेनीने 'ठीक आहे तो म्हणतो तिकडेच गाडी घे' असे ड्रायव्हरला इशाऱ्यानेच सांगितले.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-14: पाठलाग ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉनची गाडी भरधाव वेगाने धावायला लागली. थोड्याच वेळात ज्या गाडीच्या मागच्या काचेवर रक्ताने काढलेल्या शून्याचं चित्र होतं ती गाडी जॉनच्या दृष्टीक्षेपात आली. ती गाडी दिसताच जॉनच्या अंगात अजूनच स्फूर्ती संचारल्यासारखे झाले. त्याने त्याच्या गाडीची गती अजूनच वाढविली. थोड्या वेळातच त्याने त्या गाडीला जवळ जवळ गाठले. पण हे काय? त्याची गाडी जवळ जाताच समोरच्या गाडीने अचानक वेग वाढविला आणि ती जॉनच्या गाडीपासून दूर दूर जाऊ लागली. जॉनने पण अजून वेग वाढविला. दोन्हीही गाड्यांची जणू शर्यत लागली होती. रस्त्यावर दुसरी अशी रहदारी नसल्यातच जमा होती. या दोनच गाड्या एकामागे एक अशा बेफाम वेगाने धावायला लागल्या. जॉनला पुन्हा जाणवले की आपण समोरच्या गाडीला गाठू शकतो. जॉनने अजून त्याच्या गाडीचा वेग वाढविला. थोड्या वेळातच जॉनची गाडी समोरच्या गाडीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली. जॉनने खिशातून रिव्हॉल्वर काढले आणि तो समोरच्या गाडीच्या दिशेने फायर करणार एवढ्यात अचानक समोरच्या गाडीचे कर्रऽऽ कर्रऽऽ असा आवाज करीत ब्रेक लागले. जॉनची गाडी त्या गाडीच्या अगदी मागे अनियंत्रित आणि बेकाबू वेगाने धावत होती. समोरच्या गाडीचे ब्रेक लागल्याबरोबर जॉनला ब्रेक दाबणे भाग पडले. त्याच्या गाडीचे टायर किंचाळायला लागले आणि समोरच्या गाडीसोबतची धडक वाचविता वाचविता त्याची गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका जागी थांबली. अपघात थोडक्यात वाचला होता! अपघात वाचला हे बघून जॉनला थोडं हायसं वाटलं. पण हे काय? ती दुसरी गाडी पुन्हा सुरू झाली आणि अगदी जोरात जॉनच्या गाडीच्या दिशेने येऊ लागली. जॉन घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच ती गाडी त्याच्या गाडीला डॅश करूनसुध्दा गेली. जॉन या धक्यातून सावरतो न सावरतो तोच त्याने बघितले की त्या गाडीतून त्याच्या दिशेने रिव्हॉल्वरच्या गोळ्या येऊ लागल्या. थोड्या वेळात ती गाडी भरधाव वेगात समोर धावू लागली आणि मग दिसेनाशी झाली. जॉन त्याची गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याची गाडी सुरू होण्याचं नाव घेत नव्हती. शेवटी लंगडत लंगडत तो गाडीच्या बाहेर आला आणि समोरची गाडी त्याच्या तावडीतून सुटत आहे हे पाहून चिडून त्याने आपली आवळलेली मूठ गाडीवर जोरात आपटली.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-13: चित्र (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Next post 'Chapter - 13' will be posted on 5 Jan 2008
रात्रीचा गडद अंधार आणि त्यात भर म्हणजे बोचणारी कडक थंडी. अशा थंडीत बरीच प्रेमी युगल जोडपे रस्त्याच्या कडेला फिरत होती. रस्त्याच्या कडेला पलिकडे एक आलीशान हॉटेल होतं. ही जागा शहराच्या इतर भागांपेक्षा उंच असल्यामुळे शहरातील लाईट्स् एखाद्या टिमटिमणाऱ्या चांदण्यांच्या समूहासारखे दिसत होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खाली गोल तळ्याभोवतालचे लाईट्स् तर एखाद्या राणीच्या गळ्यातल्या हिऱ्याच्या नेकलेसप्रमाणे जाणवत होते. आणि तळ्यात पडलेल्या काही लाईट्स्च्या प्रतिबिंबामुळे त्या नेकलेसला एक वेगळीच शोभा आलेली दिसत होती. या सगळ्या वातावरणात एक विजोड जोडपं होतं. ते कमांड1 आणि कमांड2चं. तिकडे कोपऱ्यात एका बाजूला त्यांची काहीतरी चर्चा चालली होती. तेवढ्यात हॉटेलसमोर एक भलीमोठी आलीशान गाडी येऊन थांबली. गाडीतून जॉन आणि अँजेनी उतरले. त्यांना बघताच कमांड1 आणि कमांड2 ची चर्चा बंद झाली. ते दोघंही चोरून जॉन आणि अँजेनीकडे बघायला लागले.

अँजेनी आणि जॉन हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये एका कोपऱ्यात बसले.

बसल्यावर जॉन म्हणाला " काय घेणार? ... ड्रिंक्स?"

" नाही ... तुला घ्यायचं असेल तर तू घे" अँजेनी म्हणाली.

" नाही मग ... मी पण नाही घेणार ... बरं मग जेवणासाठी काय प्रीफर करणार" जॉन ने विचारले.

" काहीही ... तू म्हणशील ते" अँजेनी म्हणाली.

" चायनीज?" जॉन ने विचारले.

अँजेनीने मानेनेच होकार दिला.

"आधी सूप मागवू या ... कार्न सूप ?" जॉनने पुन्हा तिला विचारले.

तिने पुन्हा मानेनेच होकार दर्शविला. जॉनने त्याच्या हातातला मोबाईल समोर टेबलवर ठेवला आणि त्याची नजर आर्डर देण्यासाठी वेटरला शोधू लागली.

" असं दिसतं ...तू नेहमी इथे येत असतोस" अँजेनी काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.

" हो तसा नेहमीच येत असतो... पण एका स्त्रीसोबत पहिल्यांदाच आलो आहे" तो खट्याळपणे म्हणाला.

अँजेनीपण गालातल्या गालात हसली. तेवढ्यात वेटर तिथे आला. जॉनने सूपची आर्डर दिली.

"कशी आहे आता तुझी तब्येत ... एवढ्यात गेली होतीस का पुन्हा डॉक्टरकडे" जॉनने तिची चौकशी करीत विचारले.

"तशी तब्येत बरी आहे... कालच गेले होते डॉक्टरकडे ...पण ते तरी काय उपचार करणार... मला तर काहीच कळेनासं झालं आहे की या दु:खातून कसं बाहेर पडावं" अँजेनी म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावर पुन्हा दु:खाची काळीमा पसरली होती.

" वेळ ... वेळ हेच दु:खासाठी औषध असतं... सांगणारे कितीही सांगतील ... पण ज्याच्यावर बेतते त्यालाच कळते." जॉनने तिच्या हातावर आपला हात ठेवत तिला दिलासा देत म्हटले.

"वेळ .... हो वेळ ... पण किती वेळ" अँजेनी उसासा टाकत म्हणाली.

" बरं तू कामावर जाणं सुरू केलंस की नाही अजून?" जॉनने विचारले.

" नाही, माझं कशातच लक्ष लागत नाही... अगदी कशातच नाही... मग तिथे जाऊन तरी काय करू?" ती म्हणाली.

" माझं ऐक... उद्यापासून कामावर जायला लाग ... कामात गुंतून राहाणं तुझ्यासाठी फार आवश्यक आहे...कामात गुंतून राहिलं की हळू हळू दु:खाचा विसर पडत जातो" जॉनने तिला सल्ला दिला.

" बघू या ... तू म्हणतोस तर तसंही करून बघते" ती म्हणाली.

जॉनने तिच्या हातावर ठेवलेला हात तिने आता हलकेच आपल्या हातात घेतला.

" या वाईट दिवसांत खरोखर तुझा मला पुष्कळ आधार लाभला" ती त्याचा हात अजून घट्ट पकडीत म्हणाली.

तेवढ्यात जॉनला खिडकीच्या काचेतून बाहेर रस्त्यावर एक गाडी जातांना दिसली. त्या गाडीच्या मागच्या काचेवर रक्ताने शून्य काढल्याचे चित्र चिकटविलेले होते. जॉन ताडकन उभा राहिला.

" तू इथेच थांब मी आत्ता येतो..." असं म्हणत जॉन धावतच हॉटेलच्या बाहेर पडला.

अँजेनी गोंधळून काय झालं ते बघायला लागली. ती खिडकीतून बाहेर बघेपर्यंत बाहेरची गाडी तिच्या नजरेआड झाली होती. ती पण उठून जॉनच्या मागे घाईघाईने जायला लागली. पण तोपर्यंत जॉनने आपली गाडी पार्किंगमधून काढून रस्त्यावर एका दिशेने भरधाव वेगात दौडविली होती. अँजेनी हॉटेलच्या पायऱ्यांवरच असमंजसपणे इकडे तिकडे पाहत उभी राहिली.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-12: फर्स्ट डेट ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Next post 'Chapter - 12' will be posted on 3 Jan 2008
जॉनचं डोकं विचार करून करून गरगरायला लागलं होतं. दोन खून झाले होते आणि खुन्याचा सुगावा काही लागत नव्हता. कुठं थोडं चौकशीसाठी बाहेर जावं तर प्रेसवाले बाहेर दबा धरून बसले होते. जॉन दिसताच सगळे त्याच्यावर तुटून पडत. बरं काही केसमध्ये प्रगती असेल तरच काहीतरी सांगणार. प्रगती नसतांना प्रेसवाल्यांना फेस करणं मोठं कठीण होऊन बसलं होतं. बाहेर प्रेसवाले आणि आत एकजण कुणीतरी सगळी माहिती बाहेर फोडत होता. आतल्या कुणाजवळही काही बोलायची सोय नव्हती. न जाणो ज्याच्याशी चर्चा करावी तोच काफर असावा. आता कुणीतरी एका पोलीसवाल्याने गद्दारी केल्याची बातमी थेट प्रेसपर्यंत जाऊन पोहोचली.

(क्रमशः ...)

प्रेसवाल्यांनी

'पुढचा कोण?'

'पोलिसवाले स्वत:च बेईमान तर खुन्याला काय पकडणार?'

'अजून किती जणांचा मुडदा पडणार?'

अशा वेगवेगळ्या मथळ्याखाली वेगवेगळी माहिती पसरवून सगळ्या शहरात अक्षरश: दशहत पसरविली होती. आता लोक पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न विचारायला लागले होते. आणि हे एवढं टेन्शन अपूरं होतं म्हणून की काय वरून वरीष्ठांनी पण जाब विचारायला सुरवात केली होती. विचार करून करून जॉनचं डोकं अगदी शिणलं होतं. जॉननं खिडकीतून बाहेर डोकाऊन बघितलं. संध्याकाळ झाली होती. अंधार पसरायला थोडाच अवकाश होता. अचानक जॉनला काय सुचलं कुणास ठाऊक त्याने समोरच्या फोनचा रीसीव्हर उचलला आणि तो एक नंबर डायल करायला लागला.

" काय करते आहेस? ... " तो फोनमध्ये म्हणाला

" कोण? ... जॉन! " तिकडून अँजेनीचा उत्साहाने भरलेला आवाज आला.

" कशी आहेस...'' तो म्हणाला.

आपला आवाज ओळखल्याचं समाधान जॉनच्या चेहऱ्यावर झळकत होतं.

" आहे आपली बरी..." तिचा खोल आवाज आला.

तिला हा प्रश्न विचारुन उगीच दु:खी केल्याचं जॉनच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला काय बोलावं की ती पुन्हा उत्साहीत होईल. जॉनला काही सुचत नव्हतं.

" ... काय, काही माहिती मिळाली का खुन्याची ?" तिकडून अँजेनीने विचारले.

" याच प्रश्नांना कंटाळून मी तुला फोन केला आणि तू पण हेच विचार..." जॉन म्हणाला.

" नाही ....बऱ्याच दिवसांनी तुझा अचानक फोन आला ... म्हटलं काहीतरी प्रगती असेल" अँजेनी म्हणाली.

" नाही ... विशेष अशी काहीच प्रगती नाही ... बरं ... मी फोन याच्यासाठी केला की ... आज संध्याकाळी तुझा काय प्रोग्रॅम आहे? " जॉनने मूळ मुद्याला हात घालीत विचारले.

" काही नाही" अँजेनी तिकडून म्हणाली.

" मग असं कर ... तयार हो ... मी अर्ध्या तासात तुला घ्यायला येतो... आपण डीनरला जाऊया" जॉन हक्काने म्हणाला.

" पण..."

" पण ... बिण काही नाही ... काही एक बहाणा चालणार नाही ... मी अर्ध्या तासात तुझ्याकडे पोहोचतो आहे" जॉन म्हणाला.

आणि ती काही बोलण्याच्या आधीच फोन ठेऊन उठून तो निघाला पण.

इकडे इतक्या लवकर तयारी करायची म्हणजे अँजेनीचा गोंधळ उडाला होता. तिलाही पुष्कळ दिवसापासनं एकटं एकटं राहून गुदमरल्यासारखं होत होतं. तिलाही आता 'चेंज'ची आवश्यकता वाटत होती. तिने भराभर आपले कपडे बदलले आणि ड्रेसींग टेबलसमोर आरश्यात बघत मेकअप करीत बसली. तिला आठवत होतं आज जवळपास एक महिना होऊन गेला होता. ती बाहेर कुठे गेली नव्हती. सानीच्या खुनानंतर तिचे जीवन कसे नीरस होऊन गेले होते. सानी सोबत ती नेहमीच अशी नटूनथटून बाहेर, कधी शॉपींगला, कधी फिरायला तर कधी डिनरसाठी जात असे. सानीचा विचार येताच जरी मेकअप केला होता तरी तिचा चेहरा कोमेजल्यासारखा दिसू लागला. तेवढ्यात डोअर बेल वाजली. डोअर बेल वाजल्याबरोबर तिच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत असं तिला जाणवत होतं. पण का? काही कळत नव्हतं. ती उठून दरवाज्याकडे गेली. दरवाजा उघडला. समोर जॉन उभा होता.

" रेडी?" जॉनने आत यायच्या आधीच विचारलं.

" ऑलमोस्ट... जस्ट वेट अ मिनिट" त्याला आत घेत ती म्हणाली.

दरवाजा आतून लाऊन जॉनला तिने हॉलमध्ये बसायला सांगितले व ती आतमध्ये आवराआवर करायला निघून गेली. जॉन हॉलमध्ये बसून तिचा हॉल निरखून पाहत होता. जॉन उठून खिडकीजवळ गेला. खिडकीच्या बाहेर गोल आकाराचा तलाव त्याला दिसला. त्याने तो पूर्वी तपासासाठी आला होता तेव्हा पण पाहिला होता. त्यावेळी त्या तलावाबद्द्ल बरेच प्रश्न त्याच्या मनात आले होते. पण ते कुणाला विचारायचे? आणि ती वेळ ते प्रश्न विचारण्यास योग्य नव्हती म्हणून अनुत्तरीतच राहिले होते.

" हा तलाव नॅचरल आहे की कृत्रिम ?" त्याने उत्सुकतेने मोठया आवाजात आत अँजेनीला विचारले.

" हो ... एक मिनिट ... आलेच" आतून अँजेनी मोठ्याने म्हणाली.

त्याच्या प्रश्नाचे हे अनपेक्षित उत्तर आलेले ऐकून तो नुसता गालातल्या गालात हसला.

थोड्या वेळाने त्याच्यासमोर मेकअप करून, नटून थटून तयार अशी अँजेनी उभी होती. यापूर्वी त्याने तिला अशा रूपात बघितले नव्हते. तिची सुंदरता अजूनच खुलून दिसत होती.

" सुंदर दिसत आहेस" जॉनने तिला कॉम्प्लीमेंट दिले.

" काय म्हणत होतास ? ... आत असतांना हाक मारलीस ती " अँजेनी लाजून गोष्ट टाळत म्हणाली.

"नाही मी विचारत होतो की हे मागचे तळे नॅचरल आहे की कृत्रिम" जॉन खिडकीबाहेरचे तळे तिला दाखवित म्हणाला.

" हे ना... नॅचरलच आहे... हजारो वर्षापूर्वी एक मोठी उल्का आकाशातून पडली आणि हे तळे तयार झाले असं म्हणतात." अँजेनी सांगत होती.

" तरी मी म्हटलं ...हे तळं एकदम परफेक्ट गोल कसं काय?" जॉन म्हणाला.

" अरे हं... तर मग निघायचं" जॉन आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाला.

अँजेनीने डोळ्यांनीच होकार दिला आणि ते दोघं निघाले.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network