कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

डिप्लोमसी - विनोदी कथाकथन - पार्ट 1/2

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

" यार तु फार डिप्लोमॅटीक आहेस.'' यासारखं डिप्लोमॅटीक दुसरं वाक्य नसेल. कारण खरंतर त्याला म्हणायचे असते की ..."" साल्या ... तु फार हरामी आहेस.'' तशी डिप्लोमसीची जर 'डीप्लोमॅटीक' व्याख्या करायची असेल तर त्याचा अर्थ होतो ... टॅक्टीकली वागने की जेणेकरुन त्यात सगळ्यांच हित साधलं जाईल. पण आजच्या काळानुसार डिप्लोमसीचा अर्थ होतो. .... "मुहं मे राम बगल में छुरी'. किंवा मनातली गोष्ट चेहऱ्यावर दिसू न देणे. काही लोक तर त्याच्याही पुढे जावून - ते मनात काही, चेहऱ्यावर काही, बोलण्यात काही, आणि आचरणात अजुनच काही, अशी वागतात. हं ही वेगळी गोष्ट आहे की त्याचे परीणाम मात्र वेगळेच काहीतरी होतात. आणि विश्वास ठेवा की आजचा काळच असा काही आहे की जर तुम्ही डिप्लोमॅटीक नसाल तर तुमचं काही खरं नाही. आता काय सांगायचं, की आपण कुणाशी मोकळेपणाने हसु पण शकत नाही. हसलात तर फसलात. कुणाशी जर चूकुन मोकळेपणाने हसलात तर तो तुम्हाला कुठेतरी नेवून बकऱ्यासारखं कापणार. काही दिवस तर तुम्ही हंसणं सुध्दा विसरुन जाल. कुणी हसलं तर काही जणांना वाटतं की अरे हा काय थील्लर माणूस आहे, मुर्खासारखा हसतो!. ऑफिसमध्ये हसु शकत नाही... कुण्या सुंदरीचं काम आपल्या गळ्यात पडण्याची शक्यता असते.... घरात हसू शकत नाही... खिसा रिकामा होण्याची भिती असते. त्यामुळेच कदाचित आजकाल लाफ्टर क्लबमध्ये लोकांची जरा जास्तच गर्दी जमत आहे.

मी असाच आज सकाळी सकाळी लाफ्टर क्लबकडे निघालो होतो. रस्त्याच्या पलिकडून एक माणूस येतांना दिसला. तसा तो नेहमीच लाफ्टर क्लबमध्ये दिसायचा. नजरानजर होताच मी त्याला एक गोड स्माईल दिलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानेही माझ्या गोड स्माईलला गोड स्माईलनेच उत्तर दिलं... कारण आजकाल असं फार कमी बघायला मिळतं.

"" तुम्ही काय या कॉलनीत राहाता ? '' मी विचारलं.

"" हो ... तुम्ही कुठे राहाता?'' त्याने विचारले.

"" ते तिकडे तुमच्या शेजारच्याच कॉलनीत'' मी उत्तर दिलं.

एकाच बिल्डींगमध्ये समोरा समोर राहणारे शेजारीही जर अश्या गप्पा करु लागले... तर आजकाल आश्चर्य वाटायला नको.

गप्पा वाढता वाढता ... कुठे काम करता.... घरात कोण कोण काम करतं... पासून किती पॅकेज मिळतो इथपर्यंत जावून पोहोचल्या. मग इन्कम टॅक्सचा सरल फॉर्म भरला का? ... त्यात कोणतं डिडक्शन दाखवलं .. वैगेरे वैगेरे. त्या सरल फॉर्मच्या बाबतीत मला नेहमीच एक प्रश्न पडतो की ... इतक्या किचकट फॉर्मला सरल कोणत्या दृष्टीकोणातून म्हणतात काही कळत नाही.?

मग गप्पांचा विषय बदलून आज माणसाने किती प्रगती केली या विषयावर येवून थांबला. त्या माणसाचं म्हणणं होतं की आज माणूस चंद्राच्याही पुढे मंगळावर जाण्याचा विचार करतो आहे. फोन टीव्ही मोबाईल इन्टरनेट च्या सहाय्याने माणूस कितीही जरी दूर असला तरी क्षणात संपर्क होवू शकतो. वैगेरे वैगेरे....

मी म्हटलं ही कसली प्रगती? याला काय प्रगती म्हणतात? ...

एवढ्यात लाफ्टरक्लब आला आणि आमच्या गप्पा तेवढ्यापुरत्या थांबल्या...

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सायकल - विनोदी कथाकथन भाग 3/4
सायकल - विनोदी कथाकथन भाग 3/4
सायकल - विनोदी कथाकथन भाग 3/4
सायकल - विनोदी कथाकथन भाग 4/4
You can Email this comedy story to your friends!
आपल्या वाचन सुलभतेसाठी सुचना - आपल्याला ज्या चॅप्टरपासून पुढे वाचन करावयाचे आहे त्या चॅप्टरवर प्रथम क्लीक करा. नंतर ते चॅप्टर वाचणे झाले की पुढचे चॅप्टर वाचण्यासाठी सगळ्यात खाली डावीकडे 'newer posts' लिंक आहे त्यावर क्लीक करा म्हणजे पुढचे चॅप्टर आपोआप येईल. पुन्हा या पेजवर आपल्याला परत परत यायची गरज पडणार नाही.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

सायकल - विनोदी कथाकथन भाग 4/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सायकलवर बसून घोळक्यात कॉलेजात जायला लागलो. घोळक्यात सायकल चालविणं म्हणजे गंमत नाही. एकाचा जरी तोल गेला तर सगळेजण सायकलसह पडणार. तसं तोल जायचंच ते वय होतं. आम्ही 8्र9 जणं घोळक्यात कॉलेजला जायचो. एक दिवस घोळक्यात जातांना ढीशऽऽ टयूऽऽऽ असा टयूब फुटण्याचा आवाज आला. आम्ही सर्वजण गदगदून हासायला लागलो. शाम्या जाड असल्यामुळं हसतांना प्रथम त्याचं शरीर नुसतं हलत असे आणि हसण्याचा आवाज मागावून येत असे. जसं विज चमकल्यावर विज प्रथम दिसते आणि गडगडाट मागावून ऐकू येतो तसं. जेव्हा केव्हा काही हसण्यासारखं असे, तेव्हा हसण्याचा पहिला राऊंड संपवून आम्ही श्याम्याला हसतांना पाहून हसण्याचा दुसरा राऊंड सुरू करायचो. श्याम्याचा चेहरा हसता हसता एकदम खर्रकन उतरला जेव्हा त्याला कळले, की त्याच्याच सायकलचा टयूब फुटला होता.

एकदा आमच्या सायकल ग्रुपचा जोक सेशन झाला. जोक्स सेशनचं वैशीष्ट म्हणजे सगळे जोक सायकलवरचेच होते.

अर्थात पहीला जोक शाम्यानं सागींतला. जोक सांगतांना पात्र आपल्यापैकीच घ्यायची अशी आमची पध्दत होती. म्हणजे जोकची अजूनच मजा येते.

शाम्या जोक सांगू लागला -

एक दिवस सुऱ्या अन संज्या सायकलवर डबलसीट चालले होते. त्यांना एका अतीउत्साही टॅ्रफीक पोलीसाने थांबवलं. तो टॅ्रफीक पोलीस दंड करण्याच्या उद्द्ेशाने त्यांची कसून तपासनी करू लागला. पण काही एक सापडत नव्हतं. तेव्हा संज्या म्हणाला. तुम्ही आम्हाला कधीच पकडू शकणार नाही कारण आमचा देव नेहमी आमच्या सोबत असतो. असं कां मग मी तिबलसीट सायकल चालविण्याच्या गुन्हयावरून तुम्हाला पकडत आहे. टॅ्रफीक पोलीस म्हाणाला.

नंतर संज्या जोक सांगु लागला -

एकदा शाम्या मोटया पैदल कॉलेजमध्ये चालला होता. पहिले तर तो पैदल कॉलेजमध्ये चालला होता हाच सगळयात मोठा जोक. त्यात दुसरा जोक म्हणजे त्याला एका सायकलवाल्याने धडक मारली. धडक मारून वरून तो सायकलवाला शाम्याला म्हणतो कसा 'तु नशीबवान आहेस... तु खुप नशीबवान आहेस'. शाम्याने विचारले 'कसं काय?' 'कारण जनरली मी बस चालवित असतो.

आता सुऱ्या जोक सांगु लागला -

एकदा शाम्या एक नवी कोरी सायकल घेवून आला. तेव्हा संज्याने विचारले 'अरे नविन सायकल घेतलीस का?'

शाम्या म्हणाला 'अरे नाही ... काल काय झालं..मी घरी चाललो होतो तेवढयात समोरून एक सुंदर पोरगी या सायकलवर आली. तीनं ही सायकल रोडवर फेकून दिली. माझ्याजवळ येवून तिने तिच्या अंगातले सगळे कपडे काढून रस्त्यावर फेकून दिले आणि मला म्हणाली 'घे तुला पाहिजे ते घे'

संज्या म्हणाला ' तु फार चांगलं केलस सायकल घेतली... नाहीतरी कपडे तुझ्या कामी आले नसते..'



कॉलेज संपलं. जीवनाची गती वाढली आणि सायकल सुटली. कदाचित जीवनाच्या वेगासमोर सायकलचा वेग कमी पडत असावा. सायकलच्या टायर ची जागा मेहनत न करता येणाऱ्या टायर्डनेस ने घेतली. सायकलच्या सीट च्या ऐवजी मुलांच्या ऍडमिशनची सीट किंवा मंत्रयाच्या सिट वर जास्त चर्चा होत असे. एवढंच नाही तर स्पोक हा शब्द स्पीक चा भूतकाळ जास्त वाटायला लागला. जीवन तेच होतं पण जीवनाचा अर्थ बदलला होता.



परंतु आता खूप वर्षानंतर पुन्हा सायकल चालवायला लागलो.

अगदी रोज रोज संध्याकाळी वीस मिनिटं डॉक्टरांनी सांगितले म्हणून !

- समाप्त -
You can Email this comedy story to your friends!

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

सायकल - विनोदी कथाकथन भाग 3/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

एकदा आम्ही दोघं मित्र दुसऱ्या गावाला गेलो. दुसऱ्या गावाला सायकल चालवायची आणि ती पण भाडयाने घेऊन मजा काही औरच असते. तशा दुसऱ्या गावाला करण्यासारख्या बऱ्याच मजा असतात ... आता हे मी तुम्हाला सांगायला नको. कारण त्यात माझाच अडाणीपणा उघडयावर पडायचा. राम्यानं आणि मी एक सायकल भाडयाने घेतली. राम्याला सायकलचं इतकं वेड की कुठ नविन गावाला गेल्यावर हा प्रथम काय बघणार तर इथे सायकलचं दुकान कुठे आहे. एवढच काय त्याला जर कुणी सांगीतलं की अरे काल सायकलवर जातांना माझा ऍक्सीडेंड झाला तर हा लागलीच विचारणार 'सायकलला तर काही झालं नाही ना'' भाडयाच्या सायकलीला कॅरीयर नसते. एकजण दांडयावर बसणार आणि एकजण सायकल चालविणार.

भाडयाची सायकल घेऊन आम्ही खूप फिरलो. तहान लागली म्हणून एका हॉटेलसमोर सायकल लावली. मस्तपैकी चहा प्यायलो. तिथून निघालो तर थेट संध्याकाळ होईपयर्र्ंत फिरलो. मध्येमध्ये खिशातल्या पैशाचा आणि सायकलच्या वापरलेल्या तासांचा तालमेळ जमतो की नाही ते बघत होतो. नाहीतर त्या सायकलवाल्याला एकदीवसासाठी का होइना फुकट पंचर काढणारा पोऱ्या मिळायचा. संध्याकाळी सायकल परत करायला गेलो.

''किती झाले ?'' राम्याने सायकलवाल्याच्या ताब्यात सायकल देत विचारले.

सायकलवाला म्हणाला, ''अरे, ही कुणाची आणली तुम्ही... ही माझी सायकल नाही ''

आम्ही तर हबकलोच.

''अरे, तुझं डोकं वगैरे फिरलं की काय ?'' राम्या म्हणाला

''आम्ही आज सकाळी तुझ्याकडून तर घेऊन गेलो होतो''

''ते मला माहीत आहे पण ही कुणाची सायकल आणली तुम्ही?'' सायकलवाला म्हणाला, ''ही विमल सायकल स्टोअर्स वाल्याची त्याचं दुकान स्ट/न्डपाशी आहे माझं बघा कमल सायकल स्टोअर्स'' त्याने बोर्डाकडे हात दाखवीत म्हटले. आम्ही त्याच्या एका खिळयाला लटकुन कसरत करणाऱ्या बोर्डकडे बघीतलं. त्या बोर्डवरची अक्षरं वाचण्यासाठी आम्हाला मानेच्या व्यायामाचे बरेच प्रकार करावे लागले. खरंच ती त्याची सायकल नव्हती.

''आता झाली ना पंचाईत'' मी राम्याला म्हणालो,

''राम्या , आता माझ्या लक्षात आले अरे , आपण हॉटेलवर चहा प्यायलो ना तिथं अदलाबदली झाली बहुतेक आणि ही दुसरी कुणाचीतरी सायकल आपण इथे घेऊन आलो''

''पण सायकलला तर कुलूप होतं'' राम्या म्हणाला.

'' तिची चावी हिला लागलेली दिसते असं होतं कधीकधी '' मी म्हटलं.

''याचा अर्थ आपली सायकल कमल सायकलवाल्याकडे गेली असणार'' राम्या म्हणाला.

राम्याच्या डोक्यात निव्वळच भेद्र नसावेत हा माझा विश्वास तेव्हा प्रथमच बळावला. पण दुसऱ्या क्षणीच राम्याने एक गहन प्रश्न विचारला आणी तो विश्वास दुबळा पडला. त्यानं विचारलं -

'' आता आपल्याला स्टॅंडवर कमल सायकलवाल्याकडे जावे लागणार... जातांना आपण या त्याच्या सायकलवर जावू शकतो पण परत येतांना कसं यायचं ?

आम्ही दोघं पुन्हा सायकलवर बसलो आणि स्ट/न्डवर निघालो कमल सायकलवाल्याकडे.

तिथं गेलो तर ''ही आली ही आली'' म्हणत एका ग्राहकाने आनंदाने आमचं स्वागत केलं.

त्याच्याजवळ आमची सायकल होती. दोन्ही सायकली दिसायला एकदम सेमटूसेम होत्या. जश्या जुळया बहिणी. तो एकटाच होता. आम्ही दोघं होतो.

आम्हा दोघांना पाहून तो चिडतच पण दबक्या आवाजात म्हणाला , ''काय राव, तुम्ही माझी सायकल घेऊन गेलात.''

''तू नेली की आम्ही ?'' संख्याबळाचा फायदा घेत राम्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

''तुमचं बरं तुमचं कुलूप तरी उघडलं माझं तर कुलूपपण उघडलं नाही इतक्या दूरवरून ढुंगण वर करून चालवत आणली हिला '' त्याने परत चिडक्या सुरात म्हटले.

याने ढुंगण वर करून सायकल कशी चालवली असेल याची आम्हाला कल्पना करवेना. माझी तर हिम्मत झाली नाही पण राम्या थेट त्या मानसाच्या पार्श्वभागाकडे अविश्वासाने पहायला लागला.

माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे आणि राम्याच्या पाहण्याचा रोख पाहून तो म्हणाला, ''अरे बाबांनो ढुंगण या सायकलचं माझं नाही या सायकलचं लॉक उघडलं नाही म्हणून मागचं चाक उचलून इथपयर्र्ंत ढकलत आणली हिला'' त्याने सायकलचं मागचं चाक उचलून दाखवीत म्हटले.

क्रमशः ...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

सायकल - विनोदी कथाकथन भाग 2/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सायकलच्या वेगवेगळया ट्रिक्स शिकायला मला जास्त वेळ लागला नाही. घंटी वाजवून इशारे करणे, कट मारणे. कट मारणे हा प्रकार तर मी मोठया शिताफीनं शिकलो. सायकलची चेन कशी बसवायची येवढेच नाही तर कशी पाडायची हे पण मी शिकलो. म्हणजे आयत्या वेळी एखाद्या घरासमोर घुटमळायला प्रॉब्लेम नको. एकदा असाच मी सायकल दांडयावरून चालवितांना अचानक पडलो. असा रपकन् आपटलो की विचारता सोय नाही. उठून उभा राहून कुणालाही टक्कर न मारता कसा आपटलो हे मी शोधू लागलो. तोपर्यंत दोन तीन बघे जमा झाले होते. त्यातला एकजण म्हणाला चेन निघाली

वस्तूतः दांडयावरून सायकल चालविता चालविता सायकची चेन निघाली होती. त्यामुळे मी पडलो होतो. पण त्याने चेन निघाली म्हणताच काही न समजून गोंधळलेल्या स्थीतीत पटकण मी आपली पँटची चेन चेक करून घेतली. न जाणो घरून निघता निघता उघडी राहीली असेल.



एक दिवस मी आणि माझा मित्र राजा डबलसीट जात होतो. पोरांना डबलसीट नेण्याच्या पलीकडे अजून मी गेलो नव्हतो. समोरून एक सायकलवाला चेंडू दाबल्यागत इशारे करून एका मोटारसायकलवाल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

अपेक्षेप्रमाणे मागच्या राजाने विचारले, ''अरे , काय सांगतोय तो?''

''अरे, काही नाही हेडलाईट सुरू आहे म्हणून सांगतोय .'' मी म्हटले.

''लेकांना फुकट वीज वापरायची सवयच काय करणार'' राजाने टोला हाणला. मी आपला गपचूप सायकल चालवीत होतो. तेवढयात समोरून एक दुसरी मोटारसायकल आली. राजानं त्याच्या हाताचं मधलं बोट हालवून त्या मोटारसायकल वाल्याला काहीतरी विचित्र इशारा केला. राजा अचानक असे काही करेल याची मला अपेक्षा नव्हती.

मी राजाला ''गप बस मार खाऊ घालतोस की काय ?'' म्हणून सायकल जोरानी चालवायला लागलो.

राजा मागे फिरूनफिरून त्या मोटारसायकल वाल्याला इशारा करीतच होता. तो मोटारसायकलवाला राजाकडेच काय टारगट कार्टी आहेत या अविर्भावाने पाहात होता. मी त्याला मोटारसायकल वळवून आमच्या मागे येतांना बघितले.

मी मनातल्या मनात प्र्रार्थना केली, ''देवा, आता तूच वाचव रे बाबा कुठून दुर्बुध्दी झाली या राजाला मागे बसविले''.

तरी राजाचं आपलं मधलं बोट हलवून इशारे करणं सुरूच होतं. त्या मोटारसायकल वाल्याने आमच्या सायकलच्या समोर गाडी थांबविली. मला सायकलला ब्रेक लावण्यावाचून पर्यायच नव्हता. त्याने मोटरसायकलवरून उतरून सरळ राजाची कॉलर पकडली आणी एक झणझणीत त्याच्या कानशिलात लगावली.

''अंकल , ऐका तर'' राजा बिचारा कळवळून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

पण त्या गाडीवाल्याने अजून एक त्याच्या कानशिलात लगावली आणि मग म्हटला, '' हं, आता बोल''

''अहो केव्हापासून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तुमच्या गाडीचे साईड स्ट/न्ड वरती आहे म्हणून'' राजा बिचारा रडकुंडीला येऊन पुन्हा मधलं बोट हलवून बोलला.

क्रमशः ...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

सायकल - विनोदी कथाकथन भाग 1/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

आपुलकी असणे ओघानेच आले. जवळीक तिही इतकी दीर्घ ... इथे गैरसमज होण्याची शक्यता आहे .. नाहीतर कुणी म्हणेल आधीचेच एवढे प्रकार काय कमी होते की या नविन प्रकाराचा शोध लावण्याची गरज पडली. जीवनातल्या बऱ्याबाईट प्रसंगाना बऱ्याचवेळा माझी सायकल सोबतीण होती.
लहानपणी जेव्हा मी वयात आलो म्हणजे सायकल चालविण्याच्या , तेव्हा लहान सायकली नव्हत्या असं नाही. पण जे असतं त्यात 'ऍडजेस्ट' करणं ही आम्हाला शिकवण होती. त्यामुळे मी डायरेक्ट मोठी सायकल शिकण्याच्या नादाला लागलो.
एकदा आपली शिकवण विसरून मी घरी बूट घेण्यासाठी हट्ट धरला. हट्ट केल्याशिवाय काही एक मिळणार नाही असे आमच्या बालगुरूचे सांगणे. बूट मिळाला... पण पाठीत. त्यामुळे मी छोटया सायकलच्या नादाला न लागता एकदम मोठी सायकल शिकायला लागलो.
आता मोठी सायकल चालवायची कशी? माझ्या वयाची पोरं दांडयाखालून एक पाय घालून सायकल चालवीत. त्याला आम्ही कैची म्हणत असू. प्रथम अर्धे पायडल मारत सायकल चालवायची त्याला हाफ कैची म्हणत आणि पूर्ण पायडल मारले की झाली फुल कैची.
माझ्या प्रयोगशील स्वभावामुळे मी सायकल लवकर शिकलो. हाफ कैचीवरून फुल कैचीवर आलो. माझा प्रयोगशील स्वभाव मला स्वस्थ बसू देईना. इथे प्रयोगशील च्या ऐवजी मी इब्लीस हा शब्द वापरला असता... पण पुढे जिथे इब्लीस शब्द आला आहे तिथे कोणता शब्द वापरावा हा गहन प्रश्न मला पडला असता. आमच्यापेक्षा मोठी मुलं हात सोडून सायकल चालवून प्रौढी मिरवायची. मी पण हात सोडून सायकल चालविण्याच्या प्रयत्नाला लागलो. प्रथम एक हात सोडून सायकल चालवायला शिकलो. पण तेवढयावर समाधान होईना. दोन्ही हात सोडून बघितले. रस्त्याच्या कडेला दगडात जाऊन पडलो. दोन्ही हात सोडून कैची चालवायची नसते हे स्वानुभवारून शिकलो. तसा पडण्याचा एक फायदा पण झाला. माझा समोरचा एक दात किडका होता. सगळे दात पडून गेले. दूसरे आले. पण तो लेकाचा पडतच नव्हता. तो दात सायकलवरून पडल्यामुळे आयताच हातात आला ... तो तर आलाच बाजूच्या दुसऱ्या एका निरपराध दाताला सोबत घेवून आला.

उत्तरोत्तर जसं वय वाढत होतं, तशी प्रगती होत होती...म्हणजे सायकल चालविण्यात. एव्हाना मी दांडयावरून सायकल चालवायला लागलो. सायकल चालविण्यातच नाही तर सायकल सबंधित इतर विषयातही माझी प्रगती होत होती. खडूस मास्तरांच्या सायकलची हवा काढणे , त्यांच्यावरचा राग त्यांच्या सायकलच्या सीटवर ब्लेडने फाडून काढणे. मला तर नेहमी वाटायचं की 'नोबेल प्राइझ' मधल्या नो बेल चा कुठेतरी सायकलच्या बेलशी नक्कीच संबंध असावा. एकदा मी दांडयावरून सायकल चालवीत होतो. तेव्हा बेलबॉटमची फॅशन होती. सायकलची बेल वाजविण्याच्या फंदात बेलबॉटमची बेल सायकलच्या चेनमध्ये अडकली. अशी अडकली की निघता निघत नव्हती. ओढून काढण्याच्या प्रयत्नात प/ट थेट सायकलच्या चेनपासून तर प/टच्या चेनपयर्र्ंत उसवली. ते पाहून आमच्या वर्गातल्या मुली तोंड झाकून नुसत्या फिदीफिदी हसत होत्या. एकदा मी सायकलवर उतारावरून जोरात उतरत होतो. समोरून एक मुलगी चढावरून हळु हळु सायकल चालवत वर चढत होती. ती भसकन मधे आली. कशीतरी टक्कर वाचली. पण ती बेल वाजवून 'डूक्कर ... डूक्कर' अशी ओरडायला लागली. मी पण मागे वळून 'तु डूक्कर तूझा बाप डूक्कर तुझी खानदान डुक्कर' असा ओरडायला लागलो. समोर जेव्हा मी एका डूकराच्या कळपाशी ठोस लागुन खाली पडलो . तेव्हा मला समजले तिला बिचारीला काय म्हणायचे होते ते.

क्रमशः

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Songs

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

अल्बम - आम्ही पुणेरी
(Officially launched by Padmashree A.R.Rahman (The legendary Music Composer ) on 4th May 2006 @ 8PM;)
संगीत - प्रशांत
गीत - सुनिल डोईफोडे
1. मंजूळ झुळझुळ..
(A Marathi Romantic Number)
स्वर - विनिता
Download
2. दूर...
(A Hindi Song for todays youth )
स्वर - प्रिती, संजय आणि कोरस
Download
You can Email this Album to your friends!

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

View my complete profile

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



Name :- Sunil Doiphode (D)

DOB :- 19/07/69

Qualification : - MTech

Address: - R&DE Colony, New Scientist Hostel –16,Dighi, Pune-15

Mobile - 9423008902

Email - Email

Association Membership
· The Film Writers Association, 201,Richa, Off New Link Rd, Andheri(W) Membership no. - A-11080

Experience : -


1.Optioned as story and screenplay writer by Director Subhash Sehgal. (IMDB link) for the Hindi movie (title yet to be decided) to be produced by Focus Media. (shoot to be started from Nov 2011).

2. My story concept 'Honey' is selected in the first phase of a screenplay competition 'Sankalan' conducted by Mahindra and Mahindra and Bioscope ent. combinely. (sept2008)Judges - Anurag Kashyap (Satya, Black Friday) Anjum Rajabali (Gulam, The Legend of Bhagat Singh) Sriram Raghvan (Ek Hasina Thi, Johny Gaddar)

3. Written 2 songs ‘Manjul Zulzul’(Marathi) and ‘Duur’(Hindi) for the Hindi-Marathi album Amhi Puneri " which is Officially launched by Padmashree A।R.Rahman (The legendary Music Composer ) on 4th May 2006 @ 8PM; The album is composed by Mr. Prashant Pillai (Music Director - Shaitan) .  available for download on 1ndian.com


Written all songs (6) of the patriotic Hindi song album - '1ndian', The album is produced  by 'Mahant Media' and expected to be released soon.

5. Written a short story book in Hindi 'Cyber Love' Published by Maharastra Rastrabhasha Sabha,Pune

6. Marathi translation of a short story book 'Cyber Love' published by Shivam Prakashan, Pune on 10 Feb 2007.

7. Marathi thriller novel 'Shunya' is published by Shivam Prakashan, Pune in June 2007.

8. A Marathi novel ‘Adbhut’ is  published by 'Scion Publications Pvt. Ltd, Pune' ISBN  no - 978-81-905888-9-8  July 2010

9. Running English, Hindi & Marathi Novel blogs on Internet since 2007. (To get to blogs just search by the words 'Marathi Novels' 'Hindi Novels' or 'English Novels' on any search engine. The top result is mine.)


Capabilities: - Strong in Screenplay, Lyrics, story and novel writing
(Hindi, English, Marathi.)

Job :- Working as a Software Scientist in R&DE (Engrs), DRDO, Ministry of
Defence, Pune

Objective: - To give my best as a script & song writer to the the Entertainment Industry।

Loglines of my scripts।:-

1. Cyberlove / eLove 
Genre: Love, Suspense
Logline:- Anjali falls in love with Vivek during their chatting sessions over Internet. After they meet face-to-face Anjali gets a blackmailing mail from Vivek demanding ransom otherwise threatening to publish their romance photos on Internet. Anjali fights back revealing a totally different story…
(Script in Hindi is ready & is based on my short story ‘Cyperlove’ )


2. Adbhut/ Aghast 
Genre:- Thriller, horror
 Logline:- Police finds neck cut dead bodies lied in the bedrooms, latched from inside, they do not understand how the killer enters and escapes the bedroom, a new puzzle for them other than when?, why? and where?.
(Script in English is ready & is based on my short story)

3. Black Hole/ Soul Deep
Genre:- Horror, Mystery, Suspense
 Logline:- Following the mysterious disappearance of her husband, Stella Fernandez is led by a supposed friend of her missing husband's into a mysterious world of interconnecting portals which turn out to be black holes that transcend time and reality.
(Script in English is ready/ registered with FWA, Andheri, Mumbai.)

4. Mrigajal / Illusion 
Genre:- Love, Drama, Psychological thriller
Logline:- Priya loves Vijay but Vijay loves Nayana. Priya when comes to know that Naina’s love to Vijay is nothing but a hallucination Vijay is going through, due to hereditary schizophrenia. Priya tries her best to help Vijay but…
(Treatment is ready / based on my short story ‘Holocination’/ registered with FWA, Andheri, Mumbai.)

5. Feraferi
Genre:- Comedy
Logline:- This story is about incidences happening during the single day. The day proves to be bad day for the hero. He has fight with his wife in the early morning and the series of incidences starts. He got an accident.. he is been picked by a Don... he looses his job... he is been forcefully married to a bride, a mentally challenged girl and Don's sister... But at the end the running around (feraferi) starts and things turn out to be very different...
(The treatment is ready, registered with FWA, could be made into Hindi/Marathi film)

6. Shunya (Zero)
Genre:- Suspense, Thriller
Logline:- A series of serial kills of foreign visitors happens by a serial killer in Goa during Dec Month. Ajay investigates on the case and finds that the killings are some way or the other related to zero, a number invented by Indians. While he investigates he finds most important and interesting things about the Indian history when the zero would have been invented. The questions he faces are is it terrorism, is it Hindu terrorism?
( A synopsis registered with FWA. based on a Marathi Novel 'Shunya' Written by Sunil Doiphode, published by Shivam Prakashan Pune)(Could be made into Hindi/Marathi films)

7. Honey / Madhurani
Genre:- A story of feminine power
Logline:- She is like a honey bee queen, who decides to use her feminine power to seduce and create a workforce, which would be ready to do anything she wanted. But like honey bee queen whoever comes very close to her, like drones (male bees) has to die, for he comes to know her secrets.
( A synopsis registered with FWA. based on a Marathi Novel 'Madhurani' Written by Sunil Doiphode, and in phase of publication. ) (Could be made into Hindi/Marathi Film)


8. Karane Gaya Kuchh, Kat Gayi Sali Munchh
Genre:- Comedy
 Logline:- Whenever Vijay tries to do something, always something different happens, creating problems for him as well as for others. It goes to the extent that he is on the verge of loosing his girl friend too. Finally, the series of events of doing something and happening something continues in a comic way but leads to a dramatic situation where Vijay marries the same girl in an unexped way.
(Script in Hindi/Marathi is ready & registered with FWA, Andheri, Mumbai)

9. Premlakire ... The love lines
Genre: Love, Musical, Comedy, Suspense
 Logline - Let the whole world go against them, nobody can stop their Love if their love lines match.
(Script in Hindi is ready & is registered with FWA, Andheri, Mumbai. Also the lyrics for the songs is ready )


10. Desire

Genre:- Horror, Suspense
Logline:- In a house possessed by a ghost, a couple gets terrified and fearful experiences. The house is not only possessed by ghost, but also possesed with complex human lusts, desires and ambitions.
(Treatment is ready/ registered with FWA, Andheri, Mumbai.)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

आपल्या वाचन सुलभतेसाठी सुचना - आपल्याला ज्या चॅप्टरपासून पुढे वाचन करावयाचे आहे त्या चॅप्टरवर प्रथम क्लीक करा. नंतर ते चॅप्टर वाचणे झाले की पुढचे चॅप्टर वाचण्यासाठी सगळ्यात खाली डावीकडे 'newer posts' लिंक आहे त्यावर क्लीक करा म्हणजे पुढचे चॅप्टर आपोआप येईल. पुन्हा या पेजवर आपल्याला परत परत यायची गरज पडणार नाही.

1.मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-1/4

2.मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-2/4

3.मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-3/4

4.मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-4/4


You can Email this Comedy story to your friends

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-4/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

त्या दुकानातून बाहेर निघतांना समोर एक चपलांचं दुकान दिसलं. तीथे एक बोर्ड लावलेला होता 'एकावर एक फ्री' . आता उजव्या चपलीवर डावी चप्पल फ्री ... की डाव्या चपलीवर उजवी चप्पल फ्री... की एका चपलीच्या जोडीबरोबर दुसरी जोडी फ्री... हे त्या दुकानदाराला विचारण्याची माझी प्रबल इच्छा झाली. पण आता आता आलेल्या ताज्या अनुभवामुळे माझी त्या दुकानात जाण्याची हिम्मत झाली नाही.

रस्त्याने जातांना आपल्या भावना लपविण्यासाठी मी त्या छत्रीला कधी खिशात तर कधी मागुन कॉलरला लटकविण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या छत्रीला गळ्यात लटकवितांना एक विचार माझ्या मनात येवून गेला की ... अरे ही छत्री तर जबरदस्ती आपल्या गळ्यात पडली... आता हीला पुन्हा अजून गळ्यात अटकविण्याची काय गरज!

अनायास माझं लक्ष बाजुच्या एका बोळीत गेलं. तिथं कोपऱ्यात त्या दिवशी भेटलेला आंधळा आणि लंगडा भिकारी दिसला. तो मस्त मजेत उभा राहून सिगारेट ओढत होता. म्हणजे तो लंगडा नव्हता आणि कदाचित आंधळाही नसावा. माझा तर विश्वासच बसत नव्हता. त्याने आम्हा सगळ्यांना उल्लू बनवीलं होतं. विचारांच्या तंद्रीत मी थोडा समोर गेलो तर तिथे रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी जमलेली होती. कधी कधी गर्दी अशीच जमते. दोन लोक जमा होतात. ते दोन का जमा झाले हे बघण्यासाठी अजून तिन तिथे जातात. त्या तिघांच्या मागे अजुन सहा ... असाच मीही त्या गर्दीत घुसलो. बघतो तर त्या दिवशी भेटलेला दुसरा भिकारी जो ' माझी माय बिमार हाय' म्हणून भिक मागत होता, तो कुणा एका वृध्द महिलेचं डोकं आपल्या मांडीवर घेवून जोर जोरात रडत होता. ती महिला मेलेली दिसत होती. कदाचित त्याची 'माय'च असावी. त्या दिवशी किती विवशतेने पैसे मागत होता बिचारा. त्याला कुणीही समजू शकलं नव्हतं... किंवा तो आपल्या जरुरतीची बरोबर मार्केटिंग करु शकला नव्हता.

एवढ्यात तो दुसरा खोटा लंगडा आणि आंधळा भिकारी लंगडत लंगडत तिथे आला. त्याची चलाखीने परिस्थीतीथीचा फायदा घेण्याची जाण तर बघा. चटकन त्याने एक कॅप उलटी केली आणि लंगडत लंगडत "त्याच्या मायला जाळण्यासाठी पैसे द्या' म्हणून भिक मागु लागला ... ही इज अ परफेक्ट मार्केटींग मॅन ... इथे मार्केटींग लाईनचे लोक आहत होण्याची शक्यता आहे .. पण तसा माझा बिलकूल इरादा नाही. तरीही कुणी मार्केटींगचे लोक जर आहत झाले असतील तर मी त्या भिकाऱ्याच्या तर्फे सर्वांची जाहिर माफी मागतो.

मी आणि माझी पत्नी शॉपिंग आटोपून घरी परतत होतो. त्या भिकाऱ्याच्या आईला मरुन 7 - 8 दिवस होवून गेले असतील. तरीही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन हटायला तयार नव्हता. त्या खोट्या लंगड्या आणि आंधळ्या भिकाऱ्याने सर्वांना मुर्ख बनविले होते. ज्याला खरी गरज होती त्याला कुणीही पैसे दिले नव्हते. आज या भडकील्या ऍड्वर्टाइज, भडकिल्या मार्केटिंग च्या युगात खरंच आपली समज बोथट होत चालली होती, की पुर्णपणे संपत चालली होती? मी विचाराच्या तंद्रीत चाललो होतो.

" तो कॉफी सेट खरचं किती सुंदर होता. ... हो नं?' माझ्या पत्नीने माझी विचारांची तंद्री तोडली.

मीही स्वत:ला नॉर्मल भासविण्याच्या प्रयत्नात गोष्ट गमतीवर नेली.

" हो खरच खुप सुंदर होता.. पण एक गोष्ट त्या कॉफी सेटच्या सुंदरतेला नष्ट करत होती... ' मी म्हटलं.

" कोणती ?' माझ्या पत्नीने विचारले.

" त्यावर लावलेला प्राईज टॅग' मी म्हटलं.

थोडा वेळ अंधारात आम्ही काही न बोलता चालत राहालो. .

" तिकडे बघा ... तिकडे बोळीत' माझ्या पत्नीने एका बोळीकडे इशारा करीत म्हटले.

मी उत्सुकतेने त्या बोळीत बघीतले. जिथे त्या दिवशी तो भिकारी मजेत सिगारेट ओढत असतांना दिसला होता. तिथे आज दोन जण होते. तो खोटा लंगडा, आंधळा भिकारी आणि दुसरा ज्याची आई वारली होती तो. दोघंही मजेत मस्त होवून सिगारेट ओढत होते. ज्याची आई वारली होती तो एका हाताने सिगारेट ओढत होता आणि दुसऱ्या हाताने एखाद्या राजा सारखे पैसे मोजत होता.

.... कदाचित तो मार्केटिंग शिकला होता...

- The End -
You can Email this Comedy story to your friends.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-3/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

आज ऑफिसला जाण्यासाठी घरुन थोडा लवकरच निघालो. पण एक आफत टाळायला जावं तर ती दुसरं रुप घेवून तुमच्या समोर उभी राहाते ... याचा मला थोड्याच वेळात साक्षात्कार झाला. बससाठी अर्धा तास शिल्लक होता. आता काय करावं? विचार करता करता आठवलं....

" टाईम पास करण्यासाठी मार्केटिंगपेक्षा दुसरा कोणता चांगला पर्याय नाही... काही विकत घ्यायची गरज नाही... फक्त विचारपूस करायची...' पु. ल. देशपांडेंनी आपल्या एका पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे.

झालं... मग काय आजुबाजुला बघितलं आणि काही इकडचा तिकडचा विचार न करता मी सरळ एका दूकानात घुसलो. दुकानदाराने मस्त गोड हास्य देवून माझं स्वागत केलं. तिथे टांगलेल्या काही वस्तू मी न्याहाळू लागलो. पण बऱ्याच वेळचा मी फक्त तिथे ठेवलेल्या वस्तू न्याहाळत आहे हे पाहून त्या दुकानदाराच्या हसतमुख चेहऱ्याने आता उग्र रुप धारण केलं..

" क्या चाहिए साब ?' त्याने विचारले.

तरीही मी त्याच्याकडे लक्ष देत नाही असं पाहून तो म्हणाला, " जल्दी बोलो साब ... सुबह सुबह टाईम खोटा मत करो'.

आता पाणी डोक्यावरुन जावू नये म्हणून मी तिथे टांगलेल्या एका छत्रीचा आधार घेतला.

" केवढ्याची आहे ?' मी त्या छत्रीला गोंजारत विचारले.

" दो सौ रुपए ...' तो म्हणाला.

मी आता ती छत्री हातात घेवून न्याहाळू लागलो. दुकानदार आत गेला आणि त्याच्या जागी त्याच्या नोकर येवून उभा राहाला.

मी त्या नोकराला विचारले, " यात ते वेगवेगळे रंग असतात ना?'

काही न बोलता स्वयंचलीत खेळण्यासारखा तो आत गेला आणि चार पाच वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या घेवून आला.

' पण यावर ते पांढऱ्या रंगाचं डिजाईनसुद्धा असतं नं?''

" हो असते ... पण आमच्या जवळचा तो माल संपला आहे ' नोकर म्हणाला.

मी सुटकेचा श्वास सोडला. चला इथून सटकण्याचे हे चांगले निमीत्त आहे.

दुकानातून जायला वळलो तोच आतून दुकानदाराचा आवाज आला, '' क्यों ... क्या होगया?''

मी म्हटलं, '' मला निळ्या रंगाची ... त्यावर पांढरं डिझाईन असलेली छत्री पाहिजे होती... पण तुमच्याकडे नाही वाटतं''

'' कौन बोलता है नही है ?..'' तो नोकरावर ओरडला. पण नोकर तिथे नव्हता. तो कदाचित आत गेला होता.

त्याने नोकराला आवाज दिला, " टॉमी...'

एवढ्या वेळात नोकर कुठे गेला काही कळत नव्हतं.

त्याने पुन्हा रागाने नोकराला आवाज दिला, '' कहा मर गया... टॉमी...'

गल्लीत फिरणारा एक बेवारस कुत्रा धावतच तिथे आला.

कुत्र्याला पाहून तर तो दुकानदार अजुनच भडकला.

त्याने तिथेच बाजुला बसलेल्या एका दुसऱ्या पोराला बोलावले. कदाचित तो त्याचा नविन ट्रेनी नोकर असावा.

" बगल के दूकानसे ब्लू कलरके और सफेद डिजाईनवाले चार पाच पीस लेके आ ... जल्दी' दुकानदाराने त्याला आदेश दिला. तो पोरगा हिंन्दीत थोडा कच्चा असावा. कारण त्याची प्रचीती आम्हाला थोड्याच वेळात झाली. त्याला दुकानदाराने जे काही सांगितलं ते बरोबर समजलं नसावं. पण आधीच भडकलेल्या मालकाला विचारण्याची त्याची हिम्मत झाली नाही. तो धावतच तिथून दोन-चार दुकानं सोडून पुढे गेला. त्याला तिथे एक सलूनचं दूकान दिसलं. त्याने आपली अक्कल लढवली "बगल की दूकान' म्हणजे ... बगल साफ करण्याचं सलूनचं दुकान. त्याला तशी शंकाही आली की इथे छत्र्या कशा मिळतील. पण मालकाने सांगितले म्हणजे नक्कीच मिळतील. तो आत गेला. आता त्याने सलूनवाल्याला छत्र्या मागितल्यानंतर काय झाले असेल याची कल्पना न केलेली बरी. ही सगळी हकिकत नोकराने परत येवून आपला डावा गाल चोळत जेव्हा सांगितली तेव्हा आम्हाला कळली. एवढ्यात तो आधीचा नोकर तिथे आला.

" ... कहा मर गया था कुत्ते ...' मालक ओरडला.

इतक्या वेळचा जो दुकानदाराकडे मोठ्या आशेने पाहत होता तो कुत्रा ... बिचारा पळून गेला.

" वो शर्माजीके दुकानसे ब्लू कलर के और सफेद डिजाईनवाले चार पांच पिस लेके आ ...' म्हणत दुकानदाराने त्याला पळवले. नोकर धावतच गेला. मी आता तिथून सटकण्याचा दूसरा उपाय शोधत होतो.

मी म्हटलं, ' जर वेळ लागत असेल तर राहू द्या... मी पुन्हा कधीतरी येईन... तसा पावसाळा येण्यास अजून बराच अवकाश आहे'

" टाईम कायका साब ... दो मिनट का काम है' त्याने जवळजवळ माझ्या दंडाला पकडत म्हटले. आता तर पळून जाणंही शक्य नव्हतं. तो नोकर धावतच छत्र्या घेवून आला. त्याने सगळ्या छत्र्या माझ्यासमोर टेबलवर आपटल्या. मला खात्री आहे की त्याने त्या छत्र्या आपटतांना नक्कीच त्या टेबलाला माझं डोकं समजलं असेल ... आणि त्या छत्र्याच्या बंडलाला त्या दुकानदाराचं डोकं. त्यातली एक घेवून मी विचारलं, ' ही केवढ्याची आहे'

त्याले ती छत्री आलटून पालटून पाहाली. एका जागी काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्यासोबत मीही वाचण्याचा प्रयत्न करु लागलो. तिथे 1625 असं लिहिलेलं वाचून तर माझं हृदयच धडधडायला लागलं.

" ढाईसौ रुपए..' दुकानदाराने पटकन सांगीतले.

मी पुन्हा लक्ष देवून पाहू लागलो की 250 कुठं लिहिलेलं आहे. 250 कुठंच लिहिलेलं नव्हतं. मग मी मनातल्या मनात 1625 ला 2 ने, 3 ने, 4 ने भागण्याचा प्रयत्न करु लागलो. जेवढ्या गणिताच्या प्रक्रिया मला येतात तेवढ्या मी 1625 वर करुन बघितल्या. पण कोणत्याही परिस्थितीत 250 येण्याचं नाव घेत नव्हतं. कदाचित माझंच गणित कच्च असावं. एवढ्यात दुसऱ्या एका गिऱ्हाइकामुळे त्या दुकानदाराचं माझ्यावरचं लक्ष हटल्यामुळे मी ती छत्री तिथे तशीच ठेवून सटकू लागलो. मागुन दुकानदाराचा आवाज आला, '"अब क्या हूवा?'

मी जाता जाता वळून म्हटलं, "महाग आहे '

" अरे तो आप बोलीये ना आपको कितने में चाहिये ' त्याने म्हटले.

" जावूद्या .. मला घ्यायचीच नाही ' माझ्या तोंडातून निघालं.

हे ऐकल्याबरोबर तर तो दुकानदार अजुनच भडकला. तो रागाने म्हणाला 'अरे ऐसे कैसे लेने का नही...

... इतनी देर से हमारा टाईम खाया ... और अब बोलता है लेने का नही... इस दुकान को क्या बगीचा समझ रखा है ... बैठे तो बैठे नही तो चले गए.'

मी पुन्हा स्वत:ला सावरीत म्हणालो, "पण खुप महाग आहे'

" तो तुम बोलो ना कितने मे चाहिए... देखुतो तुम्हारी हैसीयत क्या है?' तो "आप' वरुन "तुम' वर आला होता.

मी भीतभीतच आजुबाजूला बघितले. शेवटी इज्जतीचा आणि इभ्रतीचा प्रश्न होता.

मी दबक्या आवाजात म्हटले, " पंच्याहत्तरला द्या '

वेडवाकडं तोंड करीत उपरोधाने तो म्हणाला, "पचत्तर... रुपए या पैसे'

"पंच्याहत्तर रुपए' माझ्या गळ्यातून अटकलेला आवाज आला. तो रागाने सगळ्या छत्र्या जमा करायला लागला. झाला तेवढा अपमान पूरे झाला. आता तो पुढे अजून काही म्हणून आपला अपमान ना करो म्हणून मी तिथून जाण्यासाठी वळलो.

" ए रुक... जाता किधर है ... ' तो तुच्छतेने म्हणाला.

" ये ले ... सुबह सुबह बहुनीका टाईम है इसलिए... नही तो पचत्तर रुपएमें इसका डंडा भी नही आता ... वैसे भी हम सुबह आये भिखारी को भी तो खाली जाने नही देते...' असं म्हणून त्याने ती छत्री माझ्याकडे जवळ जवळ भिरकावून दिली. मी क्रिकेटरच्या चपळाईने त्या छत्रीला कॅच केलं. कॅच मीच केलं होतं आणि आऊटसुध्दा मीच झालो होतो. चूपचाप 75 रुपए आतल्या खिशातून काढून त्या दुकानदाराच्या हातावर टेकवले आणि आपल्या कपाळावरचा घाम पुसत मी त्या दुकानातून बाहेर पडलो. खरं म्हणजे घाम पुसण्यापेक्षा आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपविण्याची आवश्यकता मला जास्त वाटली होती. ऍग्रेसीव मार्केटिंग कशाला म्हणतात हे मला आता चांगल्या तऱ्हेने समजले होते.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-2/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

एका जागी रस्त्याच्या कडेला जोतिषी बसलेला होता. तिथे " आमचा खडा घाला आणि आपलं भविष्य बदला'. अशी पाटी लावलेली होती. माझ्या पत्नीने मला त्याच्याकडे जाण्याचा आग्रह केला. आग्रह कसला, हट्ट केला. खरं म्हणजे ती हट्टाच्या सोनेरी मुलायम कपड्यात गुंडाळलेली गोड धमकी होती.

मी तीला समजविण्याचा प्रयत्न करु लागलो. म्हणजे 'समझा बुझाने लगा'. इथे 'समझाने' पेक्षा 'बुझाने लगा' म्हटले तर जास्त तर्कसंगत होईल. " हे बघ ... तो रस्त्यावर बसणारा ज्योतिषी ... खरं म्हणजे भविष्य बदलण्याची गरज त्याला स्वत:ला आहे. ... जो स्वत:चं भविष्य बदलू शकत नाही तो आपलं भविष्य काय बदलणार? '

" हो ना ... तुम्ही असतांना काय कपाळ भविष्य बदलणार आहे. ' ती चिडून पाय आपटत समोर निघून गेली.

त्यापुढं अजून ती काही बोलली नाही. पण एवढं बोलल्यानंतर अजुन काय बोलायचं राहालं होतं. कदाचित तिने आपला हट्ट सोडून दिला होता किंवा तिला माझं बोलणं आवडलं नसावं. खरं काय अन खोटं काय घरी गेल्यावरच कळणार होतं.

मग आम्ही बस स्टॉप वर गेलो. बेंचवर बसून आम्ही सिटी बसची वाट बघू लागलो. एक लंगडा आणि आंधळा भिकारी गाणे गात पैसे मागत होता. सगळ्यांना त्याच्यावर दया येत होती. बऱ्याच जणांनी त्याला पैसे दिले म्हणून मग मीही दिले. आणि मी दिले म्हणून आमच्या शेजाऱ्यानेसुद्धा दिले. नेबर टेडंसी- शेजाऱ्याने गाडी घेतली का मग मीसुद्धा घेतो... असं.... त्यासाठी मग कर्जात पुरती डूबन्याची वेळ आली तरी चालेल. थोड्या वेळाने अजुन एक भिकारी "माही माय बिमार हाय' म्हणत हात पसरवू लागला. त्याला कुणीच पैसे दिले नाही म्हणून मीही नाही दिले. आणि मी नाही दिले म्हणून आमच्या शेजाऱ्यानेही नाही दिले. तो जात नाही की त्याच्या मागे ते टाळ्या वाजविणारे आले .. तृतीय पंथी. त्यांना पैसे न द्यायची कुणाची हिम्मत. सगळ्यांनी चुपचाप पैसे काढून त्याच्या हातावर ठेवले. जर नाही दिले तर सरळ तुमच्या खिशात हात घालून पैसे काढण्यापर्यंतची त्यांची मजल. तसे ते पैसे उकळण्यासाठी समोरचा माणूस पाहून वेगवेगळे नुस्खे वापरतात.

" ए चिकने ...दे ना' कुणाच्या गालाला हात लावतील. किंवा " ए भिडू ...दे ना' म्हणत कुणाच्या कुठे हात लावतील काही भरोसा नाही.

" इथे जर जास्त वेळ बसलो तर थोड्याच वेळात कदाचित आपल्यालाही अशी भिक मागण्याची वेळ यायची' मी माझ्या पत्नीसमोर हात पसरुन पैसे मागण्याचा अभिनय करीत गमतीने म्हणालो.

अशा गमतीची हवा कशी काढायची हे तर कुणी माझ्या पत्नीकडून शिकावं ... आपल्या गंभीर चेहऱ्याला अजून गंभीर करीत तीने पटकन आपल्या पर्समधून एक नाणे काढले आणि तिथे बसलेल्या सगळ्या लोकांसमोर माझ्या पसरलेल्या हातावर ठेवले.

भिकाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी मी बाजूच्याच एका दुकानात गेलो. तिथे समोर एक कदाचीत काहीतरी खाण्याच्या जिन्नसाचे प्लॅस्टीकचे पाकीट लटकत होते. त्यावर लिहिले होते, '' आता पहिल्यापेक्षा चांगल्या स्वादात '. स्वाद आणि तोही चांगला. माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी विचारलं, '' काय आहे?''. तो मख्ख चेहऱ्याने म्हणाला, "कुत्र्याचं बिस्कीट' माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी उलट पावलांनी परत गेलं. कुत्र्याचं बिस्कीट ... आता पहिल्यापेक्षा चांगल्या स्वादात... आता याच्या पहिल्या स्चादात आणि आताच्या स्वादात काही फरक आहेकी नाही हे बघायला... एक तर माणसाला कुत्रा बनावं लागेल... किंवा कुत्र्याला लिहिणं वाचणं शिकावं लागेल...

" अहो ऐकतायका ... गाडी आली ... नाही तर नेहमीसारखं... ' श्रीमतीजीचा आवाज आला. तिने पुढेही बरंच काही कुरकुर करीत म्हटलं होतं... मला ते ऐकू आलं नाही असं नाही ... पण ते मी मुद्दाम ऐकलं नाही... नेहमी प्रमाणे... सवयीनुसार...


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-1/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

बायकोसोबत शॉपिंगला जाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो... म्हणजे आपापल्या बायकोसोबत. ही गोष्ट कोणीही नाकारु शकणार नाही विशेशत: जर त्यांच्या बायकांसमोर विचारलं तर...

मी आणि माझी पत्नी एकदा शॉपिंगसाठी गेलो होतो. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... काही घेण्यासारखं आहेका ते बघत होतो. एका दुकानावर लावलेल्या एका जाहिरातीने माझं लक्ष आकर्षित केलं.

लिहिलं होतं, " लसून शिलण्याचं यंत्र .... फक्त दहा रुपए'. "यंत्र' या शब्दाने माझी उत्सुकता चाळवली गेली ... तसे तर आजकल कोणत्याही गोष्टीचे यंत्र मिळतात ... मी दुकानदाराजवळ गेलो... त्याला मी ते "यंत्र' दाखवायला सांगितलं... पाहतो तर एक 6 इंच लांब आणि 3 इंच परिघ असलेली ती एक रबराची ट्यूब होती. मी ती उलटून पुलटून पाहू लागलो... खरं म्हणजे मी ते यंत्र सुरु करण्याचं बटन शोधत होतो.

"काय मुर्ख माणूस आहे ... ' या अविर्भावात पाहत त्या दुकानदाराने ती ट्यूब माझ्या हातातून हिसकून घेतली आणि तो दुकानदार त्या यंत्राचं प्रात्याक्षिक मला दाखवू लागला. त्याने एक लसुन ट्यूबमध्ये घातला आणि तो त्या ट्यूबला जोरजोराने रगडायला लागला. जर इतक्या जोरात रगडलं तर सालं तो लसून शिलायच्या ऐवजी आपले हातच शिलल्या जायचे. आणि इतक्या जोरात ती ट्यूब रगडण्याच्या ऐवजी जर सरळ तो लसूनच रगडला तर इतक्या वेळात कमीत कमी अर्धा किलो लसून शिलल्या जायचा. आता "काय मुर्ख माणूस आहे ......' या अविर्भावात पाहण्याची माझी पाळी होती.

ऐवढ्यात " अहो बघा तर ... कानातले झुमके ... कसे वाटतात ' बाजूच्याच दूकानातून माझी पत्नी म्हणाली. मी तिथे गेलो. मी आता थोडा सतर्क झालो होतो कारण आता त्या दुकानदाराच्या मार्केटिंग स्कीलच्या ऐवजी माझ्या मार्केटिंग स्कीलची खरी कसोटी होती. मी त्या दुकानदाराला किंमत विचारली.

" दोनशे रुपए ... तुम्ही आहे म्हणून दिडशेत देवू ' तो म्हणाला.

" तुम्ही आहे म्हणून ...' मी त्याच्याकडे निरखुन बघितले. मी त्याला ओळखत नव्हतो. कदाचीत तो मला ओळखत असावा....

त्याने माझ्या मनातलं व्दंद्व जाणलं असावं.

" मागच्या वेळीसुध्दा मी तुमच्याकडून जास्त पैसे घेतले नव्हते. ' त्याने म्हटले.

तो मला किती ओळखतो हे मला समजले होते - कारण मी पहिल्यांदाच त्याच्या दुकानात जात होतो.

पण त्याने ती गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगीतली की त्याला काही म्हणण्याच्या ऐवजी मीच आपल्या मनाची समजूत घातली की कदाचीत चूकीने तो आपल्याला दूसरंच कुणीतरी समजत असावा. तशी ते झुमके विकत घेण्याची माझी बिलकूल इच्छा नव्हती. आतापर्यंतच्या अनुभवातून मी माझ्या पत्नीची मानसीकता चांगल्या तऱ्हेने समजून चूकलो होतो. मी जर झुमक्यांना खराब म्हटले तर ती ते नक्की घेणार. म्हणून मी म्हटले " खुप चांगले आहेत... तुला शोभून दिसतील'

" ठीक आहे ... माझ्या बहिणीसाठीसुद्धा एक जोडी पॅक करुन द्या' तीने मला पैसे देण्याचा इशारा करीत दुकानदाराला म्हटले.

आता करण्यासारखं काही शिल्लक राहालं नव्हतं. चुपचाप पैसे काढून मी त्या दुकानदाराच्या हातावर ठेवले. कदाचित माझ्या पत्नीची मानसिकता ओळखण्यात मी उशीर लावला होता. तिची मानसीकता ओळखण्याच्या आधी तिनेच माझी मानसीकता ओळखली होती.

... क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Yes, definately, you can spread the word !

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Yes, definately, you can spread the word !
How?
Its very simple.
Simply copy the code into your 'Signature' field of the email account.
How to copy?
For yahoo mail account Goto ->Options->Signature->Color and graphics options->'tick' View HTML source, 'tick' Add signature to all outgoing messages
Copy the code from the following text area and just paste the code in the text area and save.
Its over!


The code at the base of your mail will look like this





Online Marathi, Hindi, English Novels

(Suspense, Thriller, Mystery, Comedy, Romance.. all genres)




Free subscription with your Email.

For rediffmail mail account Goto ->My settings->Add a signature
Copy the text from the above colored display (Not from text area) and just paste in the text area and save.
Its over!

----

For other mail accounts depending upon its signature field allows HTML or not pl. follow the appropriate procedure elaborated for Yahoo mail account or For Rediff mail account.
Thanks!

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

कादंबरी शून्य - Marathi Suspense thriller Complete Novel

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Email this Novel to your friends using following controls!
Bookmark and Share
SocialTwist Tell-a-Friend

वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया 
आपण माझ्या शून्य कादंम्बरीला भरभरून प्रतिसाद दिला, आणि प्रामाणिक प्रतिक्रिया दिल्यात आणि अजूनही देतच आहात त्याबद्दल आपले सर्वांचे मनः पूर्वक आभार आणि धन्यवाद !
Ch-1:हैप्पी गो अनलकी
Ch-2:आभाळ कोसळलं
Ch-3:वर्ल्ड अंडर अंडरवर्ल्ड
Ch-4: ती कुठे गेली ?
Ch-5: स्पंदन...
Ch-6: ब्लैंक मेल ...
Ch-7: मन वढाय वढाय...
Ch-8: अजुन एक ..
Ch-9: पहिली चुक ...
Ch-10: माय गॉड ...
Ch-11: विश्वासघात ...
Ch-12: फर्स्ट डेट ...
Ch-13: चित्र
Ch-14: पाठलाग ...
Ch-15: काय झालं ? ...
Ch-16: मधुर मिलन ...
Ch-17: बॉसचा फोन...
Ch-18: कमांड2चा डाव ...
Ch-19: डाव फसला? ...
Ch-20: बॉसचा मेसेज ...
Ch-21: जॉनच्या बॉसची व्हीजीट ...
Ch-22: डिटेक्टीव्ह ...
Ch-23: हॅपी बर्थ डे ...
Ch-24: मिस उटीन हॉपर ...
Ch-25: वेळेचा घात? ...
Ch-26: ऋषी ...
Ch-27: खुनाचा तपास ...
Ch-28: धाड ...
Ch-29: बॉसचा पुन्हा फोन ...
Ch-30: प्रेस कॉन्फरन्स
Ch-31: पॉलीटीक्स
Ch-32: व्हॅकेशन
Ch-33: सुगावा
Ch-34: फिशींग

Ch-35: चार तासांचा अवधी
Ch-36: प्रपोज
Ch-37: चांदन्या रात्री
Ch-38: डिटेक्टव्हचा फोन
Ch-39: सुटीत व्यत्यय
Ch-40: ठोका चूकला
Ch-41:अचानक मेडीयाशी सामना
Ch-42:शून्याचा शोध कुणी लावला?
Ch-43: पुन्हा प्रेस कॉन्फरन्स
Ch-44: एका दगडात दोन पक्षी
Ch-45: आय ऍम सॉरी
Ch-46: गुगल सर्च
Ch-47: यस्स
Ch-48: ओ के देन कॉल द मिटींग
Ch-49: मिटींग
Ch-50: ऑडीओ
Ch-51: वनवा
Ch-52: ब्रम्ह हे परीपूर्ण
Ch-53: वाय स्टार
Ch-54: हिलव्ह्यू अपार्टमेंट
Ch-55: भिंतीवरचा शेवटचा मेसेज
Ch-56: शेवटचे सावज
Ch-57: जशास तसे
Ch-58: आठवणी
Ch-59: आर्यभट्ट
Ch-60: रात्री बेरात्री
Ch-61: कंपाऊंडच्या आत
Ch-62: बहरलेली वेल
Ch-63: रेकॉर्ड डिटेल्स
Ch-64: डॉ. कयूम खान
Ch- 65: कागदाची पुंगळी
Ch- 66: झीरो मिस्ट्री
Ch- 67/67: शुन्यातून शुन्याकडे
- समाप्त -

Email this Novel to your friends using following controls!
Bookmark and Share
SocialTwist Tell-a-Friend

कृपया या कादंबरीबद्दल आपल्या  प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना Email  करा !

You can Email this Novel to your friends

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch- 67/67: शुन्यातून शुन्याकडे (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉनची कार भरधाव वेगाने रस्त्यावरून धावू लागली. कार जशी जशी शहराच्या बाहेर जाऊ लागली तशी रस्त्यावरची रहदारीही कमी होत होती. जॉनला एकटेपणा जास्तच जाणवायला लागला. जॉन रस्त्याच्या कडेला बघायला लागला. रस्त्याच्या कडेलासुध्दा घरांची गर्दी आता तुरळक व्हायला लागली होती. थोडं समोर जाऊन जॉनची कार डाव्या बाजूला वळून एका कच्च्या रस्त्यावर धावायला लागली. गाडी चालवितांना रस्त्यावर धुळीचा डोंब उठत होता. त्यामुळे आणि रस्ताही कच्चा असल्यामुळे जॉनच्या कारचा वेग कमी झाला होता. शेवटी जॉनची गाडी एका कुंपण घातलेल्या भयाण अशा मोकळ्या आवाराजवळ थांबली. गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून जॉन गाडीतून उतरला. गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेला तारेत गुंफलेला मोठा हार त्याने हातात घेतला. त्याने समोर बघितले. कुंपणाच्या दाराच्यावर एक मोठा सिमेटरीचा जुनाट आणि जंगलेला बोर्ड लागलेला होता. जॉन तो फुलांचा तारेत गुंफलेला गोल हार (रीथ) घेऊन सिमेटरीत शिरला. आत शिरल्याबरोबर त्याचे पाय जास्तच जड झाले. त्याची गती मंदावली. तो तशाच जड पावलांनी चालत जावून एका समाधीपुढे उभा राहिला. त्याने समाधीच्या कोरलेल्या अक्षरांवर एक नजर फिरविली. ती अँजेनीची समाधी होती. थोडा वेळ स्तब्ध उभे राहून त्याने वाकून तो गोल हार तिच्या समाधीवर ठेवला व गुढघे टेकून तो शांतपणे डोळे मिटून तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करू लागला. त्याला तिच्या त्या गंभीर, अवखळ, लोभस, गोंडस मुद्रा आठवायला लागल्या. त्याचा ऊर भरून यायला लागला.

त्यानं तिच्यासोबत पूर्ण आयूष्य व्यतित करण्याचा निश्चय केला होता. पण नियतीसमोर त्याच्या निश्चयाला काय किंमत होती?..

शून्य...

त्याच्या पाणावलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. एक टपोरा अश्रू त्याच्या गालावरून ओघळून अँजेनीच्या समाधीवर ठेवलेल्या गोल हाराच्या अगदी मध्ये पडला. थोड्या वेळाने त्याने कडांना अश्रू लागलेल्या पापण्या उघडल्या. त्याची नजर समोरच्या गोल हाराकडे गेली.

' खरंच किती विचित्र आहे माणसाचं जीवन' तो विचार करू लागला '... शून्यातून यायचं आणि शेवटी शून्यातच विलीन व्हायचं'

शहर पोलीस शाखाप्रमुख बाहेर बाल्कनीत सकाळच्या चहाचा स्वाद घेत बसले होते. ते आता रिटायर झाले होते. किंबहुना ते रिटायर झाल्यामुळेच जॉन केसवर व्यवस्थित काम करू शकला होता. आणि तपासाचं संपूर्ण श्रेय आपल्या पदरात पाडून घेवू शकला होता. शहर पोलीस शाखाप्रमुख एका आतंकवादी संघटनेचा मेंबर होता. त्याच आतंकवादी संघटनेच्या वरच्या अधिकाऱ्यांकडून जॉन ज्या केसवर काम करीत होता त्यात अडथळे निर्माण करण्याचे त्याला आदेश होते. डॉ. कयूम खान आणि शहर पोलीस शाखाप्रमुख यांचा प्रत्यक्ष तसा काहीच संबंध नव्हता पण ज्या संघटनेचा डॉ. कयूम खान मेंबर होता त्याच आतंकवादी संघटनेचा शहर पोलीस शाखाप्रमुखसुध्दा मेंबर होता. जेव्हा डॉ. कयूम खानला आपला भविष्यातला धोका कळला होता त्याने त्याचे कार्य दुसऱ्या कुणाला तरी सोपविण्याची विनंती वरच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. आणि वरील अधिकाऱ्यांनी त्याला रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाचे नाव सुचविले होते.

चहाचा एक एक घोट घेत रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुख एक एक गोष्ट आठवत होता. मरण्याच्या एक दिवस अगोदर डॉ. कयूम खान त्याला भेटायला आला होता. तो आला तेव्हा त्याने फक्त एवढीच ओळख करून दिली होती की त्याला संघटनेच्या वरच्या अधिकाऱ्याने त्याच्याकडे पाठविले आहे. तसा तो जास्त काही बोलला नव्हता. फक्त एक प्लास्टीकमध्ये गुंडाळलेलं पुडकं त्याने रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाच्या हवाली करून त्याला त्याच्या कार्याच्या यशस्वी होण्याच्या 'बेस्ट वीशेस्' देऊन तो तिथून निघून गेला होता. जेव्हा डॉ. कयूम खान मारला गेला आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात झळकले तेव्हाच रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाला कळले होते की तो डॉ. कयूम खान होता.

चहा संपवून रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाने आपल्या मांडीवर ठेवलेले प्लास्टीकचे पुडके उघडले. त्यात सूचनावजा काही कागदपत्रं होती. त्यांनी ती कागदपत्रं चाळून बघितली. त्यांच्या श्वासोश्वासाची गती वाढू लागली. त्यांच्यात एक नवचैतन्य संचारायला लागलं होतं. ते जरी शहर पोलीस शाखाप्रमुख पदावरून रिटायर झाले होते तरी संघटनेने डॉ. कयूम खानच्या वतीने झीरो मिस्ट्रीची पुढची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती कागदपत्रं बाजूला ठेवून त्या प्लास्टीकच्या पुडक्यात अजून डोकावून बघितले. त्यात एक जुने अगदी झिजून गेलेले एक पुस्तक ठेवलेले होते. त्यांनी ते पुस्तक आपल्या हातात घेतले आणि त्यालासुध्दा ते चाळू लागले. त्या पुस्तकाच्या बाबतीत इंग्रजीत नोट्स सुध्दा त्याच्या पानांत ठेवलेल्या होत्या. ते त्या नोट्स वाचू लागले. डॉ. कयूम खानने आपल्याकडे असलेली जोतिष्य विद्या रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाकडे हस्तांतरीत केली होती. रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुख आनंदाने अगदी मोहरुन गेले होते. ते विचार करू लागले...

की हे त्यांच्या संघटनेवरच्या निष्ठेचे फळ आहे की विधीलिखीत...

त्या ग्रंथातल्या नोट्स वाचता वाचता त्यांचा विश्वास दृढ होत होता की ते सगळं कदाचित विधीलिखीतच असावं...


स्वच्छ आणि नितळ पाण्याचा खळखळ असा मधुर आवाज सगळीकडे पसरला होता. त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यासोबत प्रवाहाच्या काठा काठाने तो ऋषी चालू लागला. थोड्या वेळाने चालत चालत तो आपल्या गुहेजवळ येऊन पोहोचला. गुहेजवळ येताच तो थांबला आणि सभोवार त्याने एक नजर फिरविली. जणू निसर्गातले सौंदर्य त्याने आपल्या तेजस्वी डोळ्यांनी पिऊन घेतले. मग हळू हळू मंद गतीने तो आपल्या गुहेकडे चालायला लागला. गुहेच्या दारात थांबून त्याने एकदा पुन्हा वळून नदीकडे पाहिले. मग तो आपल्या गुहेत शिरला. गुहेत धूसर प्रकाश होता. धूसर प्रकाशात तो आपल्या आसनाकडे चालत गेला. आपलं आसन नीट करून पुन्हा ध्यानासाठी तो आपल्या आसनावर बसला. धूसर प्रकाशातही त्याच्या चेहऱ्यावर एक तेज दिसत होतं. त्याच्या डोक्याभोवती एक गोल आभा पसरलेली जाणवत होती.

गोल मोठया शून्यासारखी...

मग त्याची नजर हळू हळू स्थिर झाली... शून्यात...

डोळे हळू हळू मिटले. आणि तो ध्यानस्थ झाला. काळ जागा आणि शरीराच्या पलिकडे त्याच्या जाणीवा झेपावू लागल्या.

मग मात्र काहीच नाही....

शून्य विचार, शून्य अस्तित्व...

अगदी शून्य!

सगळं काही शून्यच शून्य!

- समाप्त -


कृपया या कादंबरीबद्दल आपल्या  प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना Email  करा !

You can Email this Novel to your friends

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch- 66: झीरो मिस्ट्री (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मथळ्यांखाली वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत बातम्या झळकल्या

'झीरो मिस्ट्री' सॉल्व्ड अॅट लास्ट'

'झीरो मिस्ट्री' ही दुष्मनांची आगळी वेगळी चाल'

'झीरो मिस्ट्री' हे दुष्मनांनी पुकारलेले युध्दच. फक्त प्रकार वेगळा'

'झीरो मिस्ट्री' च्या निमित्ताने पोलिसांतील राजकारण चव्हाट्यावर'

'झीरो मिस्ट्री' ही घटना की फेनॉमेनॉ'

'झीरो मिस्ट्री' ची गुत्थी सोडविण्यात बडतर्फ केलेलाच पोलीस अधिकारी शेवटी सफल'

'झीरो मिस्ट्री' चा जनक डॉ. कयूम खान'

'विनय जोशी आणि डॉ. कयूम खान यांच्यातील संबंध काय?'

टीव्ही चॅनल्सवर सुध्दा आज दिवसभर 'झीरो मिस्ट्री'शी संबंधित बातम्यांशिवाय दुसऱ्या कोणत्याच बातम्या नव्हत्या. एकीकडे 'झीरो मिस्ट्री'ची गुत्थी सोडविल्यामुळे जनतेत समाधान होते तर दुसरीकडे त्या प्रकरणाचे गांभीर्य आणि होवू घातलेले परिणाम लोकांच्या चेहऱ्यांवर वेगवेगळ्या स्वरूपात उमटत होते. या सगळ्या खऱ्या खोट्यांच्या गोंधळात निरनिराळ्या अफवांना ऊत येता होता. अशावेळी लोकांना एका मार्गदर्शनाची आणि 'झीरो मिस्ट्री' या घटनेचे तथ्य जसेच्या तसे त्यांच्यासमोर ठेवण्याची गरज होती.

शहरात दंगे आता मंदावले होते. पण अधूनमधून आत धुमसत असलेली आग घात प्रतिघाताच्या स्वरूपात बाहेर येतच होती. अशावेळी एक स्पेशल प्रेस कॉन्फरंस घेऊन जनतेला 'झीरो मिस्ट्री' आणि त्यामागे असलेल्या खऱ्या उद्देशाची माहिती देणं आवश्यक होतं. 'झीरो मिस्ट्री'चे कोडे उलगडून सत्य बाहेर आणण्याचे संपूर्णपणे श्रेय जॉनला जात होते यात वादच नव्हता. पोलीस डिपार्टमेंटनेही जसे गाजावाजा करून त्याला बडतर्फ केले होते, तसेच गाजावाजा करून अगदी डोक्यावर घेऊनच विजयश्रीची माळ त्याच्या गळ्यात घातली होती. प्रेस कॉन्फरंसमध्ये शहराच्याच नव्हे तर अमेरिकेतल्या आणि जगाच्या पातळीवर बातम्या देणाऱ्या सर्व चॅनल्स आणि वर्तमान पत्रांच्या वार्ताहरांनी गर्दी केली होती. प्रेस कॉन्फरंन्समध्ये जॉनचे आगमन होताच एकच जल्लोष उसळला. जॉनच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईटची जणू चढाओढ लागली होती. इतक्या गर्दीतही समोरून पडणाऱ्या फ्लॅशच्या प्रकाशाप्रमाणे एक विचार जॉनच्या मनात चमकून गेला.

अँजेनीला गमावल्यापासून जॉनने स्वत:ला पूर्णपणे या केसमध्ये गुंतवून केस तडीस लावली होती...

पण आता नंतर काय?...

हीच केस थंड पडल्यानंतर ही जी गर्दी त्याच्याभोवती जमली आहे ती राहणार नव्हती...

पुन्हा तो एकटा पडणार होता...

आणि एकटा पडल्यावर पुन्हा ते नैराश्य, पुन्हा ते अँजेनीला गमावल्याचं दु:ख...

विचारांच्या तंद्रीत चालता चालता जिथे मायक्रोफोन्स एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे एकत्र ठेवलेले दिसत होते तिथे जॉन येऊन पोहोचला. तो केस सोडविल्याचा मान आणि अँजनीला गमावल्याचं शल्य घेऊनच सर्व वार्ताहरांसमोर उभा राहिला. आज प्रथमच पूर्ण आत्मविश्वासाने तो वार्ताहरांसमोर उभा होता.

पत्रकारांनी प्रश्नाचा भडिमार सुरू केला

" हा डॉ. कयूम कोण? "

" विनय जोशीचा आणि त्याचा काय संबंध?"

" ते कोणत्या संघटनेचे मेंबर होते?"

" दोघंही कसे काय मारले गेले? एकतरी जिवंत सापडायला पाहिजे होता"

" पोलीस काही लपविण्याचा किंवा दाबण्याचा तर प्रयत्न करीत नाहीत ना?"

" दोंघांना मारून हे प्रकरण संपणार का?"

" हा आतंकवाद आता कोणत्या स्तराला जाणार?"

" हिंदू आतंकवाद हे काय अजून नवीन धूड? "

" वन अॅट अ टाईम प्लीज " जॉनचा आत्मविश्वासपूर्ण आवाज घुमला.

त्याच्या आवाजाने थोडी शांतता पसरली.

" आज माझ्याजवळ या केसशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत त्यामुळं अगदी सावकाश आणि आता केस संपल्यामुळे मी अगदी रिकामाच आहे... मलाही काही घाई नाही. " आज प्रथमच जॉन पत्रकारांसमोर मोकळा बोलत होता.

पत्रकारांत थोडी खसखस पिकली. वातावरण थोडं मोकळं झालं.

एकजण प्रश्न विचारण्यासाठी समोर आला.

" मला वाटतं हिंदू आतंकवादाला अमेरिका प्रथमच सामोरी जात असावी याला आपण किती गांभीर्याने घेतलं पाहिजे? "

" ही जी 'झीरो मिस्ट्री'ची घटना आहे ती साधीसुधी घटना नसून अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच दुष्मनांनी इतकी विचारपूर्वक आणि चलाखीने रचलेली एक चाल आहे. या घटनेच्या तळाशी जाऊन आम्ही ज्या तथ्यांचा शोध लावला ती सर्व तथ्ये जनतेसमोर मांडल्यानंतर त्यांना ही गोष्ट मनोमनी पटेल.

तथ्य क्रमांक 1 - या 'झीरो मिस्ट्री' शी हिंदू आतंकवाद किंवा हिंदू सनातन धर्माचा किंवा हिंदू पुरातन साहित्याचा दुरूनसुध्दा काही संबंध नसून तसा जाणूनबूजून भास निर्माण करण्यात आलेला आहे.

तथ्य क्रमांक 2 - 'झीरो मिस्ट्री' चा जनक 'डॉ. कयूम खान' हा कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंधित नसून त्यांचा सरळसरळ संबंध 'लष्करे कायदा' या आतंकवादी संघटनेशी येतो. ही संघटना 'लष्करे तोयबा' किंवा 'अल कायदा' या आतंकवादी आणि बंदी घातलेल्या संघटनेचा आयसोटोप असू शकते किंवा त्यांचे ते हस्तक असू शकतात. त्यांच्या कार्य करण्याच्या पध्दती आणि त्या संघटनेचा उगम पाहता हे लक्षात येते.

तथ्य क्रमांक 3 - 'झीरो मिस्ट्री' हे प्रकरण प्रॉक्सी आतंकवाद या प्रकारात मोडू शकते. त्यांचा उद्देश भारत आणि अमेरिका यांच्यातले सुधारते संबंध, त्यांच्यातला अण्वस्त्र करार, त्यांची एकमेकावर विसंबलेली आर्थिक परिस्थिती पाहता या दोन्ही देशांत फूट निर्माण करून दोन्हीही देशांना आर्थिक हानी पोहोचविण्याचा होता."

जॉन एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलायला लागला

" त्यामुळे मी सर्व जगाला तुमच्या मार्फत पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 'झीरो मिस्ट्री' हा हिंदू आतंकवाद नसून तसा भास निर्माण केला गेलेला आहे ... आपण कुणीही मग ते अमेरिकन असोत,... भारतीय मूळ असलेले अमेरिकन असोत ..की भारतीय असोत,... या भासास बळी पडता कामा नये... यात नुकसान दोघांचेही आहे... जेवढे अमेरिकेचे ....तेवढेच भारताचेसुध्दा"

" पण ती इंटरनेटवर एक ऑडीओ रिलीज करण्यात आली होती त्याचं काय?... त्यातून तर वेगळाच मेसेज मिळतो" दुसऱ्या वार्ताहराने विचारले.

पुन्हा जॉन बोलू लागला

" तो एक भारतीय लोकांना अमेरिकन लोकांच्या विरुध्द आणि अमेरिकन लोकांना भारतीय लोकांच्या विरुध्द चिथविण्याचा प्रयत्न होता आणि दुर्दैवाने त्यात ते लोक यशस्वी झाले होते"

" पण या 'झीरो मिस्ट्री' ने अमेरिकेला कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचणार होते?...मला नाही वाटत अमेरिकेला यातून जीवांची हानी वगळल्यास काही विशेष नुकसान पोहोचू शकते"

" त्या लोकांनी आपल्या शहरात जशी 'झीरो मिस्ट्री' खुनी शृंखला पूर्ण करून सर्व अराजकता माजवली होती.... तशीच अमेरिकेतल्या इतरही मोठया मोठया शहरात 'झीरो मिस्ट्री' खुनी शृंखला राबविण्याचा त्या लोकांचा मनसुबा होता.... सुदैवाने तो आपण हाणून पाडलेला आहे.... या सगळ्या घटनेत वरकरणी पाहता असं वाटत नाही की अमेरिकेचे त्यात काही नुकसान होणार होते.... पण विचारपूर्वक बघितल्यास ....आजच्या परिस्थितीत भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याचे मोठया प्रमाणावर लोक इथे नोकरीसाठी येऊन स्थायी झालेले आहेत.... त्यात बहुतांश लोकांना अमेरिकन नाकरीकत्वसुध्दा लाभलेले आहे..... या लोकांना जर एकाच वेळी चिथावून त्यांना नुकसान पोहोचविले किंवा त्यांना जर साधे निष्क्रीय जरी केले तरी अमेरिकेतील मोठया प्रमाणावर काम बंद पडेल आणि परिणामत: अमेरिकेच्या इकॉनॉमीवर त्याचा निश्चितच वाईट परिणाम होईल.... तसेच आज अमेरिकेच्या पुष्कळ मोठमोठया कंपन्यांनी भारतात विनिवेश केलेला आहे.... तिथे भारतातही जर या कंपन्यांविरुध्द प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका मोठया प्रमाणावर त्या कंपन्यांना ....आणि परीणामत: अमेरिकेच्या इकॉनॉमीला बसणार आहे"

" आणि या 'झीरो मिस्ट्री'ने भारताला कोणत्या प्रकारचे नुकसान होणार होते?" एका भारतीय मूळ असलेल्या पत्रकारने प्रश्न विचारला.

"बऱ्याच लोकांच्या माहितीत किंवा ऐकीवात असेल ....की 90 च्या दशकात एक वेळ अशी आली होती की भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.... परकीय चलनासांठी रिजर्व बॅकेला शेवटचा उपाय म्हणून मोठया प्रमाणावर ठेवणीतलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं.... पण त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली होती ती एनआरआय लोकांच्या भारतातील गुंतवणुकीमुळे.... आणि परिणामत: परकीय चलनाचा जो तुटवडा निर्माण झाला होता तो भरून निघाला....त्यावेळी एक चांगली गोष्टसुध्दा घडली... हळू हळू भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्री भरभराटीला आली.... पुढे पुढे भारत अमेरिका आणि तेथील सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी आऊट सोर्सीग करू लागला.... आजही अशी परिस्थिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था आऊट सोर्सीगवर मोठया प्रमाणावर विसंबून आहे.... हे 'झीरो मिस्ट्री' प्रकरण जर अजून चिघळले तर भारताचे आऊटसोर्सीग आणि विदेशी कंपन्यांचा भारतातील निवेश थांबेल.... परीणामत: भारतीय अर्थव्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही..... कुणी कितीही नाकारो ....आज स्थितीला भारत आणि अमेरिकेचे 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' चे नाते आहे..... या नात्याला तडा गेल्यास ....नुकसान दोघांनाही भोगावे लागणार आहे..."

जॉनने एखाद्या अर्थतज्ञाप्रमाणे भारतीय आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मुद्देसूद विश्लेषण केले.

" पण एकट्या डॉ. कयूम किंवा विनय जोशी यासारख्यांना मारून किंवा पकडून समस्येचे समाधान होणार आहे का?"

वार्ताहराने पुढचा प्रश्न विचारला.

"नाही ... दुर्दैवाने याचं उत्तर 'नाही' असं आहे...कारण भारत आणि अमेरिकेत वितुष्ट निर्माण करण्याचा त्या संघटनेचा हा एक प्रयत्न होता ...आणि डॉ. कयूम काय किंवा विनय जोशी काय हे त्यांच्या हातातले फक्त एक बाहुले होते ... भविष्यात असे अजूनही प्रयत्न होवू शकतात... फरक एवढाच राहील की त्यावेळी डॉ. कयूम किंवा विनय जोशीच्या जागी दुसरं कुणीतरी राहील ..."

" मग आता यातून मार्ग काय?" एका वार्ताहराने पुढचा प्रश्न विचारला.

" यातून मार्ग एकच ... की अमेरिकन , भारतीय अमेरिकन आणि भारतीय लोकांनी आपली सद्विवेक बुध्दी शाबुत ठेवून या घटनेतील डाव आणि तीव्रता समजून घ्यावी ...आणि ताबडतोब दंगे थांबवावेत.... जर तसे झाले नाही तर आपले दुश्मन त्यांच्या योजलेल्या कार्यात पूर्णपणे यश्वस्वी होतील.... आपण आपापसात दंगे केले तर ते आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल ....आणि मग मात्र आपल्याला आपल्या अंध:पतनापासून मग कोणीही रोखू शकणार नाही ... आता वेळ आली आहे की जनतेने शहाणं आणि सावध व्हावे... कुणाच्याही चिथावणीला किंवा भडकविण्याला थारा न देता, डोळे उघडे ठेवून सद्विवेक बुध्दीने वागावे "

आता वार्ताहरांचे प्रश्न त्या एका घटनेशी संबंधित न राहता आतंकवाद या जागतिक विषयाकडे वळले. त्यामुळे जॉनने आता आटोपतं घेऊन इथून काढता पाय घेणेच योग्य आहे असे समजले. कारण आतंकवादावर बोलणे हा या पत्रकार परिदषेचा विषय आणि उद्देश नव्हता. आणि त्या विषयावर भाष्य करणे जॉनला तरी योग्य वाटत नव्हते. ज्या घटनेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली होती त्याची जवळपास संपूर्ण माहिती जॉनने दिली होती.

"सगळं जनतेवर सोपवून असे पोलीस कसं काय यातून अंग काढून घेवू शकतात?... त्यांचंही काही कर्तव्य असतेच की" एका पत्रकाराने खोचकपणे विचारले.

निघण्याच्या तयारीत असलेला जॉन म्हणाला,

" मी असं कधीच म्हणालो नाही... पोलिसांनाही त्यांचं कर्तव्य आहेच...आणि ते ते पार पाडतीलच...पण आतंकवाद ही एक घटना नसून एक फेनॉमेनॉ आहे... त्यामध्ये जनतेवर जास्त जबाबदारी आणि कर्तव्य असतात...ती त्यांनी पार पाडावीत एवढीच अपेक्षा..."

जॉन थोडा वेळ थांबला आणि म्हणाला,

"आता मला वाटते.... या घटनेशी संबंधित सर्वकाही माहिती मी आपल्याला मुद्देसूद स्वरूपात दिलेली आहे... थँक यू"

जॉन वळून पत्रकार परिषदेतून बाहेर जायला निघाला. जातांनासुध्दा पत्रकारांचा गराडा त्याला सुचू देत नव्हता. त्याच्या सोबतच्या पोलिसांनी त्याला त्या गराड्यातून मार्ग काढून देत त्याला त्याच्या वाहनापर्यंंत पोहोचण्यास मदत केली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch- 65: कागदाची पुंगळी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

विनय पूर्ण तयारीनिशी मध्यरात्र उलटल्यानंतर डॉ. कयूम खानच्या बंगल्याजवळ आला. बंगला बाकीच्या घरापासून अलिप्त असल्यासारखा होता. त्यामुळे बंगल्याच्या मागून आत प्रवेश करणे कदाचित शक्य होते. विनयने अंदाज बांधला. एकदा आजूबाजूला नजर टाकत तो बंगल्याच्या मागच्या बाजूने जाऊ लागला.

विनयची नजर पोहोचणार नाही अशा जागी एक काळी कार पार्क केलेली होती. आत जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या हालचाली बारकाईने टिपत होते.

" मला वाटतं आता त्याला जावून पकडण्यास काहीच हरकत नाही... नाहीतर उशीर झालेला असेल" सॅम म्हणाला.

" नाही अजून नाही... मला पक्की खात्री आहे तो आत खुनाची श्रृंखला पुढे नेण्यासाठी जात नसावा" जॉन म्हणाला.

" मग कशाला जात असावा" सॅमने विचारले.

"तेच तर आपल्याला माहित करायचे आहे" जॉन म्हणाला.

विनय बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊ लागताच आत बसलेले जॉन आणि सॅम एकदम अलर्ट झाले. विनय नजरेआड होताच ते कारमधून बाहेर आले.

विनय बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होता. हॉलमध्ये अंधार होता. समोर एक खोली उघडी दिसत होती आणि त्या खोलीतून धूसर प्रकाश बाहेर येत होता. बंदूक रोखून हळू हळू विनय त्या खोलीच्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. आता त्याच्या दृष्टीपथात एक खुर्चीवर बसलेली पाठमोरी आकृती आली. आकृती अंधारात असल्यामुळे कुणाची आहे हे ओळखणं शक्य नव्हतं. ती आकृती खुर्चीवर रेलून शांतपणे बसली होती. विनय त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात अचानक

" हॅन्ड्स अप... थ्रो द गन" असा करडा आवाज हॉलमध्ये घुमला.

जॉन आणि सॅम विनयच्या मागे बंदूक रोखून उभे होते. त्यांच्या दृष्टीपथात ती खुर्चीवर रेलून बसलेली आकृती पण होती. या अनपेक्षित घटनेने विनय घाबरला आणि गोंधळून गेला. त्याने आपली बंदूक जमिनीवर फेकली आणि आपले दोन्ही हात हवेत वर केले. समोर धूसर प्रकाशात बसलेल्या इसमाने आपली चाकाची खुर्ची आवाजाच्या दिशेने वळविली. थोडाफार सावरल्यानंतर विनय हळू हळू मागे वळायला लागला. समोर धूसर प्रकाशात खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागली.

" डोन्ट मूव्ह" जॉनचा करडा आवाज घुमला.

विनय जागच्या जागीच एखाद्या पुतळ्यासारखा स्थिर उभा राहिला. ती खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा जागच्या जागी बसून राहिली.

पण हे काय?...

त्या आकृतीच्या हातात कदाचित बंदूक होती....

त्याच्या हातातली बंदूक दिसता क्षणीच सॅमने बंदुकीच्या गोळ्यांचा भडीमार त्या आकृतीवर सुरू केला.

" नो...." जॉनने सॅमच्या हातातली बंदूक बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यासमोर 'धप' 'धप' असे दोन आवाज झाले. एक ती आकृती खाली पडण्याचा आणि दुसरा विनय खाली पडण्याचा. सॅमची बंदूक बाजूला सारण्याच्या प्रयत्नात विनयच्या मस्तकात गोळी घुसली होती.

" व्हॉट हॅपन्ड टू यू" जॉन चिडून सॅमला म्हणाला.

" मी नसती मारली तर त्यानं आपल्याला गोळी मारली असती" सॅम म्हणाला.

सॅम त्या काळ्या आकृतीच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. आणि जॉन विनयच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. सॅमने स्टडी रूममधला मोठा बल्ब लावला. खाली एक वयस्कर पांढरी दाढी ठेवलेला आणि मिशी पूर्णपणे कापलेला माणूस पडलेला होता. डॉ. कयूमचं शरीर एका राखेच्या ढिगाऱ्यावर पडून राख इकडे तिकडे पसरलेली होती. ती राख कदाचित काहीतरी कागदपत्रे किंवा एखादे पुस्तक जाळलेली असावी. डॉ. कयूमच्या हातात कागदाची एक पुंगळी होती. त्या पुंगळीलाच अंधारात बंदूक समजून सॅमने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या होत्या.

" त्याच्या हातातली कागदाची पुंगळी पाहून स्वत:वर चिडून सॅमच्या तोंडून निघाले, " शिट ... व्हाट अ फूल आय अॅम ... ही तर साधी कागदाची पुंगळी आहे"

सॅमने खाली उकीडवे बसून त्या खाली पडलेल्या माणसाच्या हाताची नाडी तपासली. त्याची नाडी पूर्णपणे थांबली होती.

" हि इज डेड" सॅमच्या तोंडून निघाले.

जॉनने खाली पडलेल्या विनयच्या शरीराकडे बघितले. तो अजूनही वेदनेने विव्हळत होता. त्याने खाली उकीडवे बसून त्याला कुठे गोळी लागली हे बघितले आणि तो त्याची वाचण्याची शक्यता पडताळून पाहू लागला.

" याला काहीही करून आपल्याला वाचवायला पाहिजे" जॉन म्हणाला.

त्याने तसेच उकीडवे बसून खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल करायला लागला.

तिकडे सॅमने त्या डॉ. कयूम खानच्या हातातली कागदाची पुंगळी ओढून आपल्या हातात घेतली. तो कागद त्याने उकलून बघितला. त्या कागदावर वेगवेगळ्या तारखा आणि वेळ लिहिलेली होती. कुठे 'लाभदायक काळ' तर कुठे 'अति लाभदायक काळ' असे नमूद केलेले होते. कुठे कुठे 'धोकादायक काळ' असेही नमूद केलेले होते. त्यात डॉ. कयूमची जवळजवळ सर्व कुंडलीच लिहिलेली होती. वाचता वाचता सॅमचे लक्ष कागदाच्या अगदी शेवटी गेले.

" माय गॉड !" सॅमच्या तोंडून निघाले.

" जॉन " सॅम आवाज देत जॉनकडे गेला.

जॉनने नुकताच हॉस्पिटलला फोन लावून इथे ताबडतोब अॅम्बुलन्स घेऊन येण्यास सांगितले होते.

"जॉन हे तर बघ" सॅमने तो कागद जॉनसमोर धरला.

जॉनने त्या कागदाकडे एक नजर फिरविली आणि तो कागद खाली फेकून देत म्हणाला-

" अरे आजकाल ज्योतिष्य ही फॅशनच झालेली आहे"

सॅमने तो कागद उचलला आणि त्या कागदाच्या अगदी शेवटी लिहिलेले दाखवत म्हणाला

" अरे हे बघ ... इथे ... तारीख 17 रात्री बारा ते पुढे 3 दिवस 'धोकादायक काळ' आणि हे बघ इथे रात्री 12 ते 2 'अति धोकादायक काळ' "

जॉनने तो कागद हातात घेऊन व्यवस्थित बघितले. त्याने घड्याळ्याकडे बघितले 1 वाजून 5 मिनिटे झाली होती आणि आज तारीख होती बरोबर 17. जॉन स्तब्ध होऊन त्या कागदाकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढमिश्रीत आश्चर्य पसरलेले होते. जॉन जिथे उभा राहिला होता तिथे खाली जमिनीवर पडून विनय विव्हळत होता. त्याने सॅमने जॉनला वाचून दाखविलेले ऐकले होते. त्याला बॉसजवळ असलेल्या विद्येची अगदी पुरेपूर खात्री पटली होती. शेवटी एक दीर्घ श्वास घेत विनयची मान एका बाजूकडे लटकली. त्याची ती विद्या हस्तगत करण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली होती...

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-64: डॉ. कयूम खान (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

कमांड2ची म्हणजे विनयची बॉसला शोधण्यासाठी या एरियात ही नेहमीची चक्कर होती. तो जवळपास रोजच नेमाने या एरियात येऊन बॉसला शोधण्यासाठी फिरत असे. स्वत: बॉसला ओळखू न येण्याची तो पुरेपूर खबरदारी घेत असे. त्याच्या जवळजवळ शंभरच्या वर या एरियात चकरा झाल्या असतील. पण त्याने प्रयत्न सोडला नव्हता. चिकाटी तसा त्याच्या स्वभावाचा एक पैलू होता. आज दिवसभर फिरून तो थकला होता. संध्याकाळ झाली होती. शहरातलं वातावरण आता बऱ्यापैकी निवळलं होतं. अलीकडेच बॉसचा त्याला इंटरनेटवर मेसेज आला होता. आता खुनी सत्र दुसऱ्या एका शहरात सुरू करायचं होतं. बॉसला वातावरण निवळू द्यायचं नव्हतं. तसा दुसऱ्या शहरात खुनी सत्र सुरू करण्याला अजून वेळ होता. पण विनयला दुसऱ्या खुनी सत्रात बिलकुल रस नव्हता. त्याआधीच त्याला त्याने सुरू केलेल्या खेळाचा पडदा पाडायचा होता. पण अजून एकही धागा दोरा हाती येत नव्हता. तो विचार करीत करीत एका इमारतीचं काम सुरू होतं तिथल्या मोकळ्या जागेत जाऊन थांबला. त्याला थकल्यामुळे कुठेतरी बसावसं वाटत होतं. त्याने आजूबाजूला काही बसण्यासाठी सापडतं का ते बघितलं. एका जागी वाळूचा एक मोठा ढीग होता. कुणी आपल्याला बघेल किंवा कुणी ओळखेल याची पर्वा न करता त्याने स्वत:ला त्या ढिगावर जवळजवळ झोकून दिलं.

जिथे विनय बसला होता तिथून जवळपास 200 मीटरच्या अंतरावर एक काळी कार रस्त्याच्या कडेला उभी होती. गाडीच्या काळ्या काचा चढवलेल्या होत्या. त्यामुळे आतलं काहीच दिसत नव्हतं. पण आतून जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या सगळ्या बारीकसारीक हालचालींचे निरीक्षण करीत होते.

" आज जवळ जवळ 5 दिवस झाले आपण याच्या मागावर आहोत साला या एरियात काय शोधतो काही कळत नाही" सॅम जॉनला म्हणाला.

" मला वाटतं त्यातच या साऱ्या खुनांच रहस्य दडलेलं असावं " जॉन म्हणाला.

" पण असं किती दिवस आपण याच्यावर पाळत ठेवणार? " सॅमने विचारले.

" जोपर्यंंत त्याला जे पाहिजे ते सापडत नाही तोपर्यंंत " जॉन म्हणाला.

" तो आपले पुढचे खुनाचे लक्ष्य तर हेरत नसावा"

" तेच तर आपल्याला शोधायचे आहे पण मला नाही तसे वाटत" जॉन म्हणाला.

विनयचं बसल्या बसल्या समोरच्या बंगल्याकडे लक्ष गेलं. समोर दाराच्या एका खांबावर दगडामध्ये कोरलेलं बंगल्याच्या मालकाचं नाव होतं. आणि तिथे दगडाच्या चारही बाजूने प्रकाश येण्यासाठी बल्बची व्यवस्था केली होती. विनयने सहजच ते नाव वाचले.

'डॉ. कयूम खान'

विनयने ते नाव पुन्हा वाचलं.

'डॉ. कयूम खान'

नाव ओळखीचं वाटत होतं. हे नाव आपण कुठंतरी ऐकलेलं किंवा वाचलेलं आहे. विनय डोक्यावर ताण देत आठविण्याचा प्रयत्न करीत होता. तशी त्याला सगळी मुस्लीम नावं सारखीच वाटत होती. कदाचित त्यामुळे त्याला ते नाव ओळखीचे वाटत असावे. तो विचार करीत होता. अचानक तो बसला होता त्याच्या मागे 'घरऽऽ घरऽऽ' असा जोराने आवाज यायला लागला. विनय अनपेक्षितपणे आलेल्या या आवाजाने दचकून जवळ जवळ उठूनच उभा राहिला. त्याने मागे वळून बघितले. मागे बिल्डींचे बांधकाम सुरू होते आणि रेडीमीक्स काँक्रीट मशीन नुकतीच सुरू झाली होती. तो कसाबसा सावरून तिथून बाजूला जायला लागला. अचानक त्याच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला.

" माय गॉड" त्याच्या तोंडून निघाले.

त्याने एकदा समोरच्या बंगल्याच्या दरवाज्याच्या खांबावरचे नाव वाचले. आणि परत त्या रेडीमीक्स काँक्रीट मशीनकडे बघितले. त्याच्या डोक्यात खडाखड सर्व कोडी उलगडायला लागली होती.

'डॉ. कयूम खान' हा तर आपण वाचलेल्या आर्यभटावरच्या रिसर्च पेपरचा कोऑथर होता...

आणि ही रेडीमीक्स काँक्रीट मशीनची घरघर त्याला एकदा बॉसच्या फोनवरून ऐकायला आली होती....

"म्हणजे डॉ. कयूम खान हाच बॉस आहे !"

त्याच्या शरीरात एकदम स्फूर्ती संचारली. तो डॉ. कयूम खानच्या घराकडे झेपावला. मग तो ब्रेक लागल्यागत थांबला.

नाही आता नको...

आपल्याला योग्य वेळ पाहून आणि योग्य प्लॅनींग करून आत प्रवेश करावा लागेल...

त्याने कसेबसे स्वत:ला आवरले.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-63: रेकॉर्ड डिटेल्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सॅम आणि जॉन एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर रन होत होतं. त्या साफ्टवेअरच्या सहाय्याने ते त्यांना काचेच्या तुकड्यावर सापडलेले हातांचे ठसे त्यांच्याजवळ असलेल्या गुन्हेगारांच्या डाटाबेसमध्ये पडताळून पाहत होते. डाटाबेसमध्ये गुन्हेगारांचे लाखो किंबहुना करोडो हातांचे ठसे साठवून ठेवलेले असतील. त्या प्रत्येकासोबत त्यांच्याजवळ असलेल्या हाताच्या ठश्यांची तुलना करणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम होते. पण आजकाल ते काम्प्यूटरमुळं अगदी सोपं झालेलं होतं. कॉम्प्यूटर एका सेकंदाला कमीतकमी हजारो ठश्यांची तुलना करीत होता. आणि तीही अगदी बारकाईने, एक छोटीशी महत्वाची माहितीही न सोडता. म्हणजे सगळ्या ठश्यांसोबत तुलना करायची झाल्यास काही मिनिटांचाच अवधी लागणार होता. ते दोघंही अधीर होऊन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे पाहू लागले. मॉनिटरवर किती जणांचे ठसे तपासून झाले हे दाखविणारा एक काऊंटर वेगाने पुढे पुढे सरकत होता. तो काऊंटर शून्यपासून सुरू होऊन एव्हाना सात लाखाच्या वर पोहोचला होता. शेवटी अचानक तो काऊंटर 757092 वर थांबला.

मॉनिटरवर एक मेसेज झळकला " मॅच फाऊंन्ड".

दोघांचे चेहरे आनंदाने चमकू लागले. त्यांनी एकमेकांकडे पाहून एक विजयी स्मित केले आणि पुन्हा मॉनिटरकडे कुणाचा रेकॉर्ड आहे ते बघू लागले.


॥।रेकॉर्ड डिटेल्स ॥।


नांव - विनय जोशी

वय - 30 वर्ष

गुन्हा - फोर्जरी

जन्मखूण - डाव्या हातला सहा बोटं

नागरीकत्व - अमेरिकन


दोघंही गुन्हेगाराची संपूर्ण माहिती वाचू लागले. त्यात गुन्हेगाराचे तीन फोटोसुध्दा होते. एक उजव्या बाजूने घेतलेला, दुसरा डाव्या बाजूने घेतलेला आणि तिसरा समोरून घेतलेला.

" ही संपूर्ण माहिती आपल्याला शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर ताबडतोब पाठवायला पाहिजे." सॅम म्हणाला.

" हो बरोबर ...पण मला एक भीती वाटते " जॉन म्हणाला.

सॅमने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

" की यावेळीसुध्दा ही माहिती खुन्यापर्यंंत पोहोचली तर? " जॉनने आपली शंका व्यक्त केली.

" यावेळी नाही पोहोचणार. त्या डॅनला त्याच्या करणीची शिक्षा मिळालेली आहे." सॅम म्हणाला.

मग त्यांनी त्या गुन्हेगाराची फोटोसहित सगळी माहिती शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर पाठविली आणि तसा कोणी इसम नजरेस पडताच त्यावर फक्त वॉच ठेवून सॅमला कळविण्यास सांगितले. कारण तो फक्त एक दुवा असू शकतो. तो त्यांच्या हातातले फक्त एक खेळणं असू शकतो. खरा गुन्हेगार दुसराच कोणी असू शकतो. सगळ्या प्रकरणाच्या तळाशी पोहोचून खऱ्या गुन्हेगारापर्यंंत पोहोचणे सगळ्यात महत्वाचे होते.


क्रमश:..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-62: बहरलेली वेल (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

बंगल्याच्या डाव्या बाजूला एका जागी एक फुलांची वेल बहरलेली होती. फुलांचा सुगंधही छान येत होता. ती वेल घराच्या भिंतीचा, खिडकीचा आणि पाईपचा आधार घेत घेत वर टेरेसपर्यंंत गेली होती. त्याने टॉर्चचा झोत पाडून त्या वेलीकडे खालून वरपर्यंंत निरखून पाहिले. वेल फुलांनी बहरुन अंगभर झालेली होती. मग पुन्हा त्याने वरून खालपर्यंंत निरखून पाहिले. वेलीच्या बुडाशी बराच कचरा पडलेला होता. प्लास्टीकच्या रिकाम्या पिशव्या, कागदांचे चूरगळलेले बोळे असा बराच कचरा होता. जॉन उकीडवा बसून तो कचरा हुडकायला लागला. त्याने आपल्या खिशातून एक प्लास्टीकची पिशवी काढली आणि त्यात तो तिथला त्याला जो महत्वाचा वाटला असा कचरा भरू लागला. तिथला कचरा हुडकल्यानंतर त्याने वेलीला बुंध्याला धरून जोरजोराने हलविले. त्याच्या अंगावर फुलांची बरसात होवू लागली. आणि अजूनही धप धप असा काहीतरी पडल्याचा आवाज येऊ लागला. त्याने टॉर्च लावून निरखून बघितले. वेलीच्या गुंत्यातून अजून काही कचरा खाली पडला होता. त्यातला पण काही त्याने थेट आपल्या थैलीत भरला. त्याला प्लास्टीकची एक तोंडाला गाठ मारलेली पिशवी सापडली. पिशवी त्याने हलवून बघितली. आत काहीतरी वाजण्याचा आवाज येत होता.

काय आहे ते नंतर बघूया...

असा विचार करून त्याने ती पिशवीसुध्दा आपल्या थैलीत टाकली.

चला आता बास झालं....

आता आपल्याला निघायला पाहिजे...

जॉनने थैली उचलली आणि परत कुंपणाकडे निघाला.

घरी येता येता जॉनला चार वाजले होते. तो पूर्णपणे थकला होता. प्लॅस्टीकची ती कचऱ्याची बॅग खाली ठेवून दुखऱ्या हाताला सांभाळत त्याने त्याच्या क्वार्टरचे दार उघडले. त्याला आठविले एकदा असेच त्याचा अॅक्सीडेंट झाला असतांना त्याला अँजेनीने सांभाळत घरी आणले होते. आणि क्वार्टरचे कुलूप तिनेच उघडले होते. तिची आठवण येताच त्याचे मन पुन्हा दु:खाने भरून गेले. त्याला आत्ता आठवले की-

अरे आपण व्हिस्कीची बॉटल तर आणायची विसरूनच गेलो...

आपल्या बाहेर पडण्यामागे व्हिस्कीच्या बॉटल्स संपणे हे एक कारण होते आणि तेच आपण विसरून गेलो...

दार उघडून खाली ठेवलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीकडे पाहून त्याला बरे वाटले.

चला म्हणजे दु:ख विसरण्यासाठी आपल्याजवळ अजून एक काम आहे तर...

या कचऱ्यात काही महत्वाचे सापडते का ते बघणे...

प्लॅस्टीकची पिशवी उचलून तो आत घरात गेला. आतून दार लावून घेतले. आणि सोफ्यावर बसून तो त्या थैलीतला एक एक चुरगाळलेला कागद बाहेर काढून व्यवस्थित करून त्यात काही मिळते का ते बघू लागला.

सगळे कागदाचे चुरगाळलेले बोळे व्यवस्थित करून झाले पण त्याला विशेष असे काहीच मिळाले नाही. मग तो एक एक पॉलीथीनच्या पिशव्या आणि गुंडाळ्या काढू लागला. काही पिशव्यात उरलेले आणि कुजलेले शेंगदाणे होते. काहींचा तर घाण वास येत होता. शेवटी त्याला एक गाठ मारलेली पॉलीथीनची पिशवी सापडली. त्याने त्या पिशवीची व्यवस्थित काळजी पूर्वक गाठ सोडली. आतून वास येईल या अंदाजाने तोंड बाजूला केले. पण आतून कसलाही वास आला नाही. त्याने पिशवीत डोकवून बघितले. आत काचेचे तुकडे दिसत होते.

ग्लासचे असावेत...

तो सोफ्यावरून उठून खाली मॅटवर उकीडवा बसला. त्याने ते तुकडे काळजीपूर्वक पिशवीतून खाली मॅटवर ओतले. दोन तीन तुकड्यांवर त्याला रक्ताचे पुसटसे डाग दिसत होते.

अरे वा हे तर खुन्याचं किंवा त्याच्या साथीदाराचं रक्त दिसतय...

त्याने एक रक्ताने भरलेला तुकडा अलगद उचलून हातात घेतला. आपल्याला आता सुतावरून स्वर्ग गाठायला पाहिजे...

पण या रक्तावरून आपण खुन्याबद्दल काही माहिती मिळवू शकतो का? तो सगळ्या शक्यता पडताळून पाहू लागला. आणि मग त्याचे डोळे अचानक आनंदाने चमकू लागले. त्या काचेच्या तुकड्यावर त्याला रक्ताने माखलेल्या हातांच्या बोटांचे ठसे उमटलेले दिसले.

" यस्स" तो आनंदाने ओरडला.

दुसरे रक्ताने माखलेले तुकडेसुध्दा त्याने अलगद उचलून निरखून बघितले. त्यावरसुध्दा हाताच्या बोटांचे ठसे दिसत होते. तसेच ते काचेचे तुकडे हातात घेऊन उठून तो फोनजवळ गेला. काचेचे तुकडे बाजूला टेबलवर ठेवून त्याने एक नंबर डायल केला.

" सॅम... मी तुझ्याकडे येतोय... आत्ता लगेच... एक महत्वाचा दुवा हाती लागलेला आहे " तो आनंदयुक्त उत्साहाने फोनवर बोलत होता.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-61: कंपाऊंडच्या आत (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

दुसऱ्या हाताने रक्ताळलेला हात धरीत तो उठून उभा राहिला. रक्त जरा जास्तच वाहत होतं म्हणून त्याने खिशातून रुमाल काढून हाताला घट्ट बांधला. दुखऱ्या हाताला सांभाळत मग तो बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ गेला. तिथेही एक मोठ्ठ कुलूप लावलेलं होतं आणि त्या कुलूपालासुध्दा पोलिसांचं सिल लावलेलं होतं. त्याने तिथे उभं राहूनच बंगल्याच्या चहूकडे एक नजर फिरविली. बंगल्याच्या आत जाणं, कमीत कमी इथून तरी, शक्य वाटत नव्हतं. पूर्वी बंगल्याचा तपास करतांना आत तो इतरांच्या सोबतच होता. आणि त्याला माहित होतं की आतली तपासणी त्यांनी फार काळजीपूर्वक केली होती. पण त्याला आठवलं की बाहेरच्या तपासणीला तेवढं महत्व न देता त्याने ती जबाबदारी कुण्या एका नवीन पोलिसावर सोपविली होती. त्याने ठरविलं की प्रथम आपण बंगल्याचा बाहेरचा भाग न्याहाळून पाहू. तसं काही सापडण्याची शक्यता अंधुकच होती कारण बरेच दिवस उलटलेले होते हा बंगला असाच ओसाड पडलेला होता. आणि बंगल्याच्या आतल्या पुराव्यापेक्षा बाहेरचे पुरावे नष्ट होण्याचीच जास्त शक्यता होती.

तरीही एक चान्स घ्यायला काय हरकत आहे....

कदाचित बंगल्याच्या बाजूने किंवा मागून आत जाण्याचा एखादा मार्गसुध्दा मिळू शकतो...

त्याने खिशातून टॉर्च काढला आणि टार्चचा प्रकाश इकडे तिकडे मारत तो बंगल्याच्या उजव्या बाजूने मागे जायला लागला. मधून मधून तो बंगल्यावरही प्रकाशाचा झोत मारून आत जाण्यासाठी एखादी खिडकी दिसते का ते पाहू लागला. खिडक्या होत्या पण खिडक्यांना जाड लोखंडी जाळी लावलेली होती.

तरीही एखाद्या खिडकीची जाळी तुटलेली असू शकते, जसं कंपाऊंडचं कुंपण एका जागी तुटलेलं होतं...

बंगल्याभोवती प्रशस्त मोकळी जागा होती. मोकळ्या जागेत गार्डन होतं. पण त्याची आधीही कधी काळजी घेतलेली दिसत नव्हती. गार्डनमध्ये गवत आणि इतर झुडुपे चांगली कंबरेपर्यंंत उंच दाटीवाटीने वाढलेली होती. जॉन अंधारात टॉर्चच्या सहाय्याने जपूनच त्या गवतातून आणि झुडुपातून रस्ता काढत समोर जात होता. या उंच वाढलेल्या झुडुपांमूळे काही पुरावा जरी असेल तरी सापडणं जरा कठीणच वाटत होतं. पण एक फायदाही होता की जर पुरावा असेलच तर तो नष्ट होण्याचा कालावधी या झुडुपांमूळे वाढण्याची शक्यता होती. इकडे तिकडे टार्चचा झोत मारत आता तो घराच्या मागच्या बाजूला येऊन पोहोचला होता. मागच्या तर दरवाजालाही जाळी लावली होती. त्यामुळे इथूनही आत जाण्याची शक्यता मावळली होती. मग त्याने टार्चच्या प्रकाशात मागची बाजूही पिंजून काढली. काहीही विशेष सापडत नव्हते. हळूहळू गवताच्या आणि झुडपांच्या बुंध्याशी टार्चच्या प्रकाशात शोधत त्याने घराला एक संपूर्ण चक्कर मारली. मोकळ्या जागेत तर काही सापडत नव्हतंच. एकाही खिडकीची जाळी तुटलेली दिसत नव्हती.

चला म्हणजे आता तरी आत जाणं शक्य दिसत नाही...

आत जाण्यासाठी पुन्हा कधीतरी आपल्याला सॅमची मदत घ्यायला पाहिजे...

आणि बाहेरही दिवसाच उजेडात काही सापडते का ते पुन्हा एकदा व्यवस्थित शोधणं योग्य राहिल...

असा विचार करून तो कंपाऊंडच्या बाहेर येण्यासाठी वळला. एवढ्यात त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. तो एकदम थांबला. वळून घाईघाईने मग तो बंगल्याच्या डाव्या बाजूने मागे जायला लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network