This Novel in English
Valuable thoughts
It is better to deserve honors and not have them than to have them and not deserve them.
---Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)
संध्याकाळची वेळ होती. सुर्य पश्चिमेला मावळण्याच्या बेतात होता. अश्या वेळी पार्कमध्ये सुझान आणि डॅनियल हिरव्यागार लॉनवर पहूडले होते आणि वाहणाऱ्या थंड हवेचा आस्वाद घेत होते. डॅनियलचं डोकं सुझानच्या मांडीवर विसावलं होतं.
'' असं वाटतं सगळं कसं काल काल झालेलं आहे... वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही'' डॅनियल म्हणाला.
सुझान त्याच्या केसांतून हात फिरवीत त्याची नक्कल करीत म्हणाली,
'' असं होतं... प्रेमात असं होतं कधी कधी''
'' प्रेमात कधी कधी... आपल्याला एक क्षण कितीतरी वर्षासारखा वाटतो ... आणि कधी कधी किती वर्ष एका क्षणासारखी वाटतात... जणू वेळेचं मोजमाप पुर्णपणे बदलतं... '' पुन्हा ती त्याच्याच वाक्यांची पुनरावृती करीत म्हणाली.
डॅनियल तिच्याकडे पाहून गोड हसला. त्याला त्याच्या बायकोचा अभिमान वाटत होता.
तिला कशी आपली प्रत्येक सवय ... प्रत्येक लकब माहित आहे...
एवढेच नाही तर आपली कधीतरी म्हटलेली जशीच्या तशी वाक्य तिला आठवतात...
खरंच प्रेम म्हणजे काय शेवटी...
एकमेकांना पुर्णपणे जाणून घेणं म्हणजेच प्रेम....
एकमेकांना पुर्णपणे जाणून घेतलं की आपल्याला एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींची जाण असते...
डॅनियल विचार करीत होता.
तेवढ्यात काहीतरी आठवल्याप्रमाणे तो एकदम उठून बसला.
'' गिब्सन कुठे गेला?'' त्याने बागेत इकडे तिकडे पाहत सुझानला विचारले.
सुझानही काळजीने पटकन उठून उभी राहाली. आणि बागेत घाईघाईने इकडे तिकडे जात गिब्सनला शोधू लागली. बागेत एकीकडे डॅनियल तर दुसऱ्या बाजुला सुझान गिब्सनला शोधत होते.
घाईघाईने सुझान गिब्सनला शोधत एका झुडपाजवळ गेली. तिची शोध घेणारी नजर एका जागी स्थिरावली. तिच्या चेहऱ्यावरची काळजी भीती जावून त्या जागी आनंद दिसू लागला होता.
'' तू इथे काय करीत आहेस बाळा?'' ती म्हणाली.
तिच्या समोर एक 3-4 वर्षाचा मुलगा - गिब्सन माती खेळत होता. सुझान आणि डॅनियलने त्यांच्या मुलाचं नाव सुझानच्या भावाची आठवण म्हणून गिब्सनच ठेवलं होतं.
'' मी माझ्या मित्रासोबत खेळत आहे'' तो छोटा गिब्सन आपल्या बोबड्या शब्दात म्हणाला.
'' मित्र?... कुठे आहे तुझा मित्र?'' सुझानने आजुबाजुला शोधत विचारले.
छोट्या गिब्सनने आजुबाजुला बघितले आणि आवाज दिला,
'' स्टेला ... स्टेला तू कुठे आहेस?''
एक 3-4 वर्षाची मुलगी - स्टेला एका झुडपामागुन धावतच त्याच्या जवळ आली. तिही माती खेळीत होती आणि तिचे छोटे छोटे हात माती आणि चिखलाने माखलेले होते.
- समाप्त -
कृपया या कादंबरीबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना ईमेल करा !
Valuable thoughts
It is better to deserve honors and not have them than to have them and not deserve them.
---Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)
Marathi classic books, Marathi best books, Marathi literature, Marathi sahitya, Marathi rural sahitya, Marathi gramin sahitya, Marathi aadhunik sahitya, Marathi vinodi sahitya, Marathi fiction
This Novel in English