कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Marathi books - Novels- Madhurani - CH-11 कनेक्सन

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

You must be the change you wish to see in the world.

…M. Gandhi

कोपऱ्यावर उभा राहून गणेश सिगारेटचे दीर्घ झुरके मारू लागला. त्याला त्याच्या चित्ताला थोडी शांती लाभल्यासारखी वाटत होती. त्याच्या बाजूलाच अंधारात भिंतीच्या आडोशाला एक पोरांचा कळप सिगारेट ओढण्यात आणि गप्पा करण्यात गुंग होता. अंधाराचा फायदा घेऊन ते एखादया भूकेल्या लांडग्यासारखे मधुराणीच्या दुकानाकडेच पाहत होते. कदाचित इथे अंधार असल्यामुळे तिकडून हे लोक दिसत नसावेत. पण गणेश त्यांच्या बाजूलाच कोपऱ्यावर उभा असल्यामुळे त्याला सगळं दिसत होतं.

" ए राम्या जरा कनेक्सन देरे..." एकजण आपल्या तोंडात पेटविण्यासाठी सिगारेट ठेवून दुसऱ्याला म्हणाला.

दुसऱ्याने आपल्या तोंडातली पेटलेली सिगारेट त्याच्याजवळ दिली. त्याने ती पेटलेली सिगारेट आपल्या तोंडातल्या सिगारेटच्या टोकाला लावून दोनचार जोरात झुरके मारले आणि आपली सिगारेट पेटल्यावर त्याने राम्याला त्याची सिगारेट परत केली.

' कनेक्सन' समोरचा सगळा प्रकार पाहून गणेशला त्या शब्दाचे हंसू आले.

दीर्घ झुरके मारल्यामुळे गणेशची सिगारेट लवकरच संपली. त्याने पाकीटातून दूसरी सिगारेट काढून तिला आधीच्या सिगारेटच्या सहाय्याने पेटविले - म्हणजे कनेक्शन दिले. तो गालातल्या गालात हसला.

तेवढयात गणेशला कुणाचा तरी जोरजोरात ओरडण्याचा आणि भांडण्याचा आवाज आला.

" त्या ग्रामसेवकाच्या मायला... "

" मादर...द साला "

गणेशच्या नावानं कुणीतरी उध्दार करीत होता. त्याला एकदम धडकीच भरली. पहिल्याच दिवशी आपल्या नावाचा असा उध्दार ऐकून तो गोंधळून गेला. कदाचित आधीच्या ग्रामसेवकाच्या नावाने कुणीतरी शिव्या घालीत असावं असा त्याने विचार केला आणि ज्या दिशेने आवाज येत होता तिकडे पाहू लागला.

आधीच्या ग्रामसेवकाच्या नावानंच ओरडत असला पाहिजे तो...

नाहीतरी आधीच्या ग्रामसेवकाचं आणि गावकऱ्यांचं विशेष पटत नसल्याचं त्याच्या आजच्या बडबडीवरून तरी वाटत होतं... तिकडे समोर अंधार होता. कदाचित समोर बोळीच्या पलिकडे सरपंच्याच्या घराजवळ कुणीतरी भांडत असावं.

" साल्याचं झालं सुरू रामायण... " बाजूला उभ्या असलेल्या पोरांच्या घोळक्यातलं कुणीतरी बोललेलं गणेशला एकू आलं.

अजूनही ग्रामसेवकाच्या नावाने शिव्याची लाखोटी वाहल्या जात होती.

गणेशने विचार केला.

चला .... जाऊन तरी बघू काय भानगड आहे ते....

तो जिकडून शिव्यांचा आवाज येत होता तिकडे जायला लागला.

गणेशने बघितले की एक माणूस अंधारात उभा राहून ग्रामसेवकाच्या नावाने शिवीगाळ करीत होता. त्याने जरा जवळ जाऊन बघितले तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो सदा होता. सकाळी त्याचं सामान घेऊन त्याला सरपंचाकडे नेणारा सदा! त्याचा आपल्या डोळयावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या बोलण्याच्या ढबीवरून आणि हावभावाच्या तऱ्हेवरून असं जाणवत होतं की तो पिऊन टून्न झाला होता. गणेश त्याच्या दृष्टीपथात येताच त्याने आपला मोर्चा त्याच्याकडे ओळविला.

" हयो बगा ... हयो ग्रामसेवक ... सोताला काय समजतो... कोणी लाटसायेब लागून गेला ... याच्या मायला ... मले एस्टी स्टँडून सामान उचलाया सांगतो... मादर ..द. "

सरळ सरळ आपल्यावर शिव्यांचा वर्षाव होतांना पाहून प्रथम गणेश गोंधळला. त्याला आता कसे रिअॅक्ट करावे काही सुचत नव्हते. सदाचा त्याच्यावरचा शिव्यांचा वर्षाव सुरूच होता. आता मात्र गणेश सावरला. त्याचा रागाचा पारा आता वाढू लागला. त्या शिव्यांची तीव्रताच इतकी होती की त्याच्या तळपायाची आग मस्तकात भिनली. तो चवताळून सदाच्या दिशेने जायला लागला. त्याला आता त्याच्या कानशिलात मारण्याची घाई झाली होती. चालतांना रागाने त्याचं अंग पूर्ण गरम झाल्यासारखं जाणवत होतं. त्याचा चेहरा लाल झाला होता. ओठ थरथरत होते. हातपायसुध्दा थरथरत होते. एव्हाना तो रागाने सदाच्या पुढयात जाऊन पोहोचला होता. पण सदाच्या वागण्यात काही एक बदल नव्हता. त्याचे चवताळून जोरजोराने शिव्या देणे चालूच होते. त्याने मनाचा हिय्या केला. जे होईल ते होवो. आता मात्र याला चांगलं बदडायचं. एक जोरदार त्याच्या कानशिलात तो मारणार एवढयात मागून त्याच्या खांदयावर कुणाचा तरी हाथ विसावला. त्याने मागे वळून पाहिले. ते सरपंच होते.

" गणेशराव ... जरा इकडं बाजूला या "

सरपंच गणेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला एका बाजूला घेऊन गेले.

" आवो मघा ... सकाळीच जव्हा तुमी सांगितलं की यानं तुमाला माझ्या घरी आणलं ... तव्हाच मला शंका आली होती "

" का काय झालं ? " गणेशने गोंधळून विचारले.

" आवो हा सदया एकदा का पिला की त्याचा तोलच जातो... मंग त्याला काही समजत नाय... दिसभर मंग ज्याला भेटला त्याला शिव्या देत सुटतो "

" विचित्रच केस दिसते... " गणेश आपल्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाला.

" याचा काहीतरी बंदोबस्त का लावत नाही तुम्ही लोक... " तो पुढे रागाने म्हणाला.

" असं काय बोलता गणेशराव... तुमीच तर सकाळी म्हणाले होते की हा माणूस फार सज्जन दिसतो " सरपंच त्याची गंमत करीत म्हणाले.

" हो म्हणालो खरा ... पण एवढा सज्जन असेल असं मला नव्हतं वाटलं " गणेश जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

क्रमश:...

You must be the change you wish to see in the world.

…Gandhi

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Kadambari - Novel - Madhurani - CH-10 व्हिल्स

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

chutkule_cartoons

Marathi Kadambari - Novel - Madhurani - CH-10 व्हिल्स

The trouble with the rat race is that even if you win, youe still a rat.

ily Tomlin

गणेशची पुर्ण दुपार खराडे साहेबांची बडबड ऐकण्यात आणि ऑफिसात सगळ्या फाईल्स चाळ्ण्यातच गेली. अपेक्षेप्रमाणे आज पूर्ण चार्ज हँडओव्हर झालं नव्हतं. कदाचित अजून एक दिवस लागणार होता. आणि खराडे साहेबांची बडबड जर अशीच सुरु राहाली तर कदाचित दोन दिवसही लागतील. खराडे साहेबांच्या एकूण बडबडीवरून गणेशच्या लक्षात आले होते की त्यांची या गावात राहण्याची अजून इच्छा होती. कारण त्यांच्या गावापासून हे गाव जवळ असल्यामुळे इथे नोकरी करणं त्यांना फार सोईचे होते. तिकडे आपल्या गावातल्या शेतीकडेही लक्ष देणं होत होतं. त्यांच्या बोलण्यावरून त्याच्या हेही लक्षात आले होते की त्यांची बदली करण्यात गावकऱ्यांचाच हात होता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात गावाबद्दल एकूण रोषच दिसत होता.

संध्याकाळी थकून भागून खोलीवर आल्यावर गणेशने विचार केला की थोडं पडावं आणि मग आहेच सरपंचाकडे जाणं रात्री जेवायला. त्याने खोलीचं कुलूप उघडलं. आत गेल्यावर दारामागचं इलेक्ट्रीक बल्बचं बटण दाबलं. लाईट लागला पण डीम.

साली खेड्यात ही आहेच इलेक्ट्रीकची पंचाईत...

डीम का असेना...लाईट तर आहेना...

तेच खूप झालं...

सरपंचाच्या गडयाने गादी अंथरून पांघरून टाकून संपूर्णपणे तयार केलेली पाहून त्याला हायसं वाटलं. खोलीत येतांना मुद्दामच त्याने समोरच्या मधुराणीच्या दूकानाकडे पाहणं टाळलं होतं. आत आल्याबरोबर त्याने समोरचं दार आतून लावून घेतलं आणि स्वतःला जवळजवळ गादीवर झोकूनच दिलं. तो गादीवर निपचित पडला. तो गादीवर निपचित पडला होता खरा पण त्याचे विचार थांबायला तयार नव्हते. शरीर थकले होते पण मेंदू थकायला तयार नव्हता. तो विचार करू लागला...

आज संपूर्ण दिवस सरपंचासोबत फिरण्यात आणि आफिसचे काम बघण्यात आणि खराडे साहेबांची बडबड ऐकण्यात गेला होता. पण एकही क्षण असा नव्हता की जेव्हा त्याला मधुराणीचा विचार आला नसेल. ती त्याच्या मनचक्षूसमोरून हटायला तयार नव्हती. तिचे ते आर्त डोळे आणि खोडकर हसू राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर येत राहाले होते. आणि अजूनही तेच. त्याने डोक्यातून तिला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात अस्वस्थतेने कड बदलला. पण त्याने विचार थोडीच बदलणार होते. त्याने विचार केला एखादी सिगारेट ओढली तर बरे वाटेल. त्याला दिवसातून किमान एक दोन तरी सिगारेट ओढण्याची सवय होती. आज एकही सिगारेट ओढली नव्हती. पण सिगारेट ओढायची म्हणजे दुकानावर जाणे आलेच. मग त्याला काय वाटले कुणास ठाऊक तो ताडकन उठला.

आपण तिला असे किती दिवस टाळणार आहोत....

एखादया प्राब्लेमपासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरे गेलेले केव्हाही योग्य....

तो उठून उभा राहिला. बाथरूमध्ये गेला. माठातले थंडगार पाणी ओंजळीने घेऊन त्याने आपल्या चेहऱ्यावर शिंपडले. बाजूला पितळीचा लोटा ठेवला होता. त्या लोटयाने माठातले पाणी काढून त्याने आपल्या हातापायावर ओतले. मग तसाच परत येऊन आपल्या बॅगजवळ गेला. बॅग उघडली. बॅगमध्ये वरच व्यवस्थित घडी करून ठेवलेला टॉवेल होता. त्याने तो काढला. तोंड पुसले. तोंड पुसता पुसता टावेलच्या येणाऱ्या वाशींग पावडरच्या सुगंधी वासाने त्याचे मन मोहरून गेले. काही क्षणाकरता का होईना त्याला आपल्या बायकोची आठवण आली. त्याने बॅगमधील सगळे कपडे उचलून बॅगच्या बुडात पाहिले. बॅगच्या बुडात त्याचा त्याच्या बायकोचा अणि मुलाचा फॅमीली फोटो ठेवलेला होता.

दूर गेल्यावरच आपल्या माणसाचं महत्व कळतं....

त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. त्याने पुन्हा बॅगमधील सामान व्यवस्थित ठेवले. आता तो उभा राहून हातपाय पुसू लागला. हातपाय पुसल्यानंतर त्या ओल्या टावेलला कुठे वाळू घालावे यासाठी तो इकडे तिकडे बघत जागा शोधू लागला. भींतीवर एका जागी खिडकीच्या शेजारी एक खुंटी दिसली. त्याने तो टॉवेल खुंटीवर टांगून ठेवला. टॉवेल खुंटीवर अडकवीता अडकवीता त्याने शेजारच्या उघडया खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. दुकानात आता बरीच गर्दी होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कदाचित. ओटयावरसुध्दा लोकांचे थवे च्या थवे बसावे तसे लोक कुणी विडया ओढत कुणी चिलीम भरत कुणी तंबाखु चोळत तर कुणी चकाटया पिटत बसले होते. त्याने दरवाज्याजवळ जाऊन पायात चप्पल चढवली. दार उघडून बाहेर पडत त्याने दुकानाकडे एक नजर टाकली. ओटयावरच्या बऱ्याच चिकीत्सक नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या. बाहेरून कुलूप लावून तो दुकानाच्या बाजूला एक ग्रुप बसला होता त्याच्या शेजारी जाऊन ओट्यावर एकटाच बसला. गृप तरण्या ताठया लग्नाला आलेल्या पोरांचा होता. पोरं चोरून चोरून गल्ल्याकडे बघण्यात मग्न होती. गणेश त्या पोरांकडे त्याचं काहीच लक्ष नाही अशा अविर्भावात बसला.

" इला शेतात नेऊन नागड्डीत घोळसायला पायजे " त्या गृपमधला एकजण बोलला.

" टोंगळे फुटेस्तो " दुसऱ्याने जोडले.

मग संपूर्ण गृपच्या गृप जोराने हसायला लागला.

' शीशी .... या पोरांच काय खरं नाही' गणेशने मनाशीच विचार केला.

आणि तो तिथून उठला आणि कधी दुकानासमोर जाऊन मधुराणीसमोर उभा राहिला त्याला कळलेच नाही.

मधुराणीने त्याच्याकडे पाहून त्याला एक गोड स्मित दिले. दिवसभर गल्ल्यावर बसूनसुध्दा ना तिच्या हालचालीत ना अविर्भावात थकवा जाणवत होता. अजूनही अगदी उमललेल्या कळीसारखी ती टवटवीत आणि प्रफुल्ल दिसत होती.

" बोला सायेब काय देऊ बोला" ती म्हणाली.

" जरा एक व्हील्स द्या "

" जरा कावून... पूर्णच घ्या की' तिने कोटी केली आणि ती खळखळून हसू लागली.

गणेशही तिच्यासोबत हसायला लागला.

" ए एक व्हील दे रे " तिने दूकानातल्या नोकर पोराला आदेश दिला.

तो पोरगा एकेका गिऱ्हाईकाचं ओळीने सामान देण्यात मग्न होता.

म्हणजे अजून वेळ लागणार होता....

गणेशने आजूबाजूला एक नजर टाकली. त्याच्या आजूबाजूला अजून काही गिऱ्हाईक उभे होते. त्याला लागूनच एक 7-8 वर्षाची सुती मळकट, जागोजागी ठिगळं लावलेला फ्रॉक घातलेली एक गोंडस मुलगी उभी होती. डोक्याला चिपीचीपी तेल लावलेले होते. आणि तिच्या छोटया छोटया दोन वेण्या मळक्या लाल रिबनने बांधलेल्या होत्या. तिच्या हाताच्या बोटात एक दोरीने गळा बांधलेली छोटीशी काचेची बाटली अडकवलेली होती.

" ताई... एक छताक गोडतेल " ती मुलगी मधुराणीकडे बघून म्हणाली.

मधुराणीलाही तिचा लाड आल्यावाचून राहला नाही.

" देते हं बाळ... जरा थांब " मधुराणी तिचा गालगुच्चा घेत म्हणाली.

" लर्फईर्फी दिर्फवसार्फानंर्फ आर्फलीर्फी " मधुराणी एवढ्या गडबडीत त्या पोरीला काहीतरी म्हणाली.

" मार्ल्फमाच्यार्ल्फा गार्ल्फवलार्ल्फा गेर्ल्फलीर्ल्फी होर्ल्फोतीर्ल्फी " ती पोरगी ही हसत हसत तोतऱ्या बोलात काहीतरी म्हणाली.

गणेश गंमतीने गालातल्या गालात हसत ते सर्व ऐकत होता. पण ते काय बोलले गणेशला काहीएक समजले नाही.

" काय ... काय? " गणेशने उत्सुकतेपोटी विचारले.

" काय नाय ... आमची खास भाषा हाय ती " मधुराणी खोडकरपणे हसत पुन्हा त्या पोरीचा गालगुच्चा घेत त्याला म्हणाली.

कदाचित ती त्यांची कोड भाषा होती. त्याला आठवलं लहाणपणी त्याच्या बहिणी अश्याच काहीतरी त्याच्यासमोर बोलत असत. आणि त्याने विचारले तर त्याला काही एक सांगत नसत. त्याने खूप प्रयत्न केला होता पण त्याच्या बहिणींनी त्याला ती भाषा शेवटपर्यंत कळू दिली नव्हती.

त्या मुलीच्या पलिकडे एक नऊवारी पातळ नेसलेली म्हातारी ऊभी होती. आणि तिला लागूनच एक साडीसारखे ठेवण असलेलं जूणं सूती पातळ घातलेली मजूरासारखी दिसणारी एक स्त्री ऊभी होती.

आजूबाजूला बघता बघता गणेशची नजर वर आकाशाकडे गेली. चांगलं अंधारून आलं होतं. तेवढयात रस्त्यावरच्या सिमेंटच्या विजेच्या खांबावरचे विजेचे दिवे लागले. गणेशने पाहिले ओटयावर बसलेल्या बऱ्याच जणांनी एका हाताने का होईना दिव्यांना नमस्कार केला होता.

गणेश पुन्हा अंतर्मुख होऊन आपल्या विचारात गढून गेला. त्याला जाणवत होते की आता आपण मधुराणीच्या समोर उभे असून तिच्याकडे पाहत नव्हतो तरी त्याच्या मनातली तिच्याबद्दलची ओढ आणि हुरहूर शमल्यासारखी जाणवत होती.

" हे घ्या सायेब "

तिच्या त्या मंजुळ आवाजाने तो भानावर आला.

तिने त्याच्यासमोर लाकडाच्या पेटीवर ठेवलेली व्हील साबन पाहून गणेशला हसू आवरेना. तो खळखळून हसायला लागला.

" काय झालं ? " ती सुध्दा हसत म्हणाली.

" व्हील साबन नाही... व्हील्स सिगारेट मागीतली होती मी"

" असं होय ... सायेब ... इथं ब्रिस्टॉल अन् चारमीनारच मिळते... व्हील ... का व्हील्स म्हणता ती इथं कोणी वढत नाय " ती म्हणाली

" बरं मग ब्रिस्टॉल दया ... अन् एक काडीपेटीसुध्दा दया"

" ए सायबांना ब्रिस्टाल अन् एक काडीपेटी दे" तिने नोकराला सांगितले.

ती एक एक सामान सांगायची अन् तो नोकर फक्त ऐकून घ्यायचा. 'हो' म्हणायचा नाही की 'नाही' म्हणायचा नाही. पण त्याचं बरोबर लक्ष असायचं. त्यानं तिचं ऐकलं पण तो आता त्या छोटया मुलीजवळील शीशी घेऊन तीत तेल टाकण्यासाठी तेलाच्या डबकीजवळ गेला.

" ए यांना आंधी दे... किती वेळचे ताटकळत उभे हायत ते " तिने त्याला हटकले.

त्या नोकराने नुसते तिच्याकडे पाहिले आणि ती शीशी तशीच हातात घेऊन त्याने एक ब्रिस्टॉलचे पाकीट आणि एक काडीपेटी काढून गणेशच्या हातात दिली.

क्रमश:...

The trouble with the rat race is that even if you win, youe still a rat.

ily Tomlin

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi literature - Novel - Madhurani - CH-9 खराडे साहेब

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

cartoon-jokes Marathi literature - Novel - Madhurani - CH-9 खराडे साहेब

Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.

scar Wilde

गणेश ऑफिसमध्ये बसून आधीच्या ग्रामसेवकाची वाट पाहू लागला. सरकारने ग्रामपंचायतव्दारे ग्रॅन्ट देऊन जिथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो तिथे मैदानात एका कोपऱ्यात छान टुमदार ऑफीस बांधून दिले होते. आधीच्या ग्रामसेवकाकडून चार्ज घेतल्याशिवाय गणेशला काम सुरु करता येणार नव्हते. तेवढ्यात त्याला दारात कुणाचीतरी चाहूल लागली. त्याने तिकडे पाहिले.

आले वाटतं आधीचे ग्रामसेवक...

तो त्यांची आत येण्याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी कुणीच आलं नाही म्हणून गणेश पुन्हा ऑफिसच्या भिंतीवर एक नजर फिरवीत ग्रामसेवकाची वाट पाहू लागला. पुन्हा त्याला कुणाची तरी सावली हलल्यासारखी दिसली.

कुणीतरी खेडूत कामानिमित्त आला असावा...

साला अजून चार्जच घेतला नाही अन् लोकही येणं सुरु झाले....

" कोण आहे?" गणेश जाग्यावर बसूनच ओरडला.

मळलेल्या कपड्यात एक माणूस आत आला.

" मी सायेब... पांडू"

" हे बघा मी आजच इथे जॉईन झालो आहे ...अजून चार्जसुध्दा घेतला नाही... तुम्ही उद्या या..."

" नाई सायेब ... मी इथला चपराशी"

" चपराशी ... पण चार्ज घेतांना मला तर इथे दुसरे कुणीच नसल्याचे सांगितले गेले होते"

" म्हंजे तसा नाय ... "

कुत्रं जसं शेपूट हलवत आपल्या मालकाजवळ जातं तसा तो जवळ आला.

" अच्छा अच्छा ..." गणेशच्या लगेच लक्षात आलं.

" अरे अजून... खराडे साहेब कसे आले नाहीत..." गणेशने त्याला विचारले.

" आता येतीनचं... ते त्येंच्या गावावरून येतातना ... म्हून कव्हा कव्हा उशीर होतो..."

" उशीर?... सकाळी यायला पाहिजे होते ... अजून दूपार होऊन गेली तरी आले नाहीत अजून..."

" येतील सायेब ... कव्हा कव्हा होते आसं"

" अन् तू कुठं राहत असतो..." गणेशने विचारले.

" हे इथंच पल्याड... इथं हाफिसात चाहूल लागली मलं वाटलं खराडे सायेब आले... तर सरपंच रस्त्यात भेटले... त्यास्नी सांगतलं की नईन सायेब आलेत म्हून..."

स्पष्ट होतं आधीच्या ग्रामसेवकाची यायची अशी काही फिक्स वेळ नसावी. गणेश काहीच बोलला नाही. त्याने पुन्हा अस्वस्थतेने आपल्या घड्याळाकडे पाहिले.

" च्या पाणी ... काही आणू का सायेब"

" चहा? ... इथं कुठं हॉटेल आहे की काय?"

" नाय सायेब..."

" मग चहा कुठून आणणार? "

" आनीन शेजारुन... कोणाच्यातरी इथून"

" अन् पैसे..."

" अवो सायब मनल्यावर ... पैसे घ्यायची कोणाची हिम्मत हाय"

" पण असं कसं ... काही फुकट कुणाच्या इथून कसं आणायचं..."

" सायेब ... इथली पब्लीक लय येडी हाय ... जबरदस्ती दिलं तरी पैसे घेणार नाय... मंग आपलबी काय जाते ... फुकट त फुकट " तो गणेशसमोर टाळी घेण्यासाठी हात पुढं करीत म्हणाला.

गणेशने त्याच्या मळक्या कपड्याकडे पाहून अन् घामेजलेल्या शरीराकडे पाहून आपला टाळी घेण्यासाठी पुढे जाणारा हात रोखला. स्पष्ट होतं तो गणेशला खुलवून मोकळं करण्याचा प्रयत्न करीत होता.

पुन्हा दारात हालचाल झाली. गणेशने आणि पांडूने तिकडे पाहिले. शेवटी एकदाचे खराडे साहेब आले होते. खराडे साहेब म्हणजे पांढरा पायजामा आणि वर रेशमी रंगाचा सदरा, तोंडात पान, काळा रंग, तेलकट चेहरा, डोक्यावरचे विरळ झालेले तरी अजून काळे कुळकुळीत बटबटीत तेल लावलेले केस असा अवतार होता.

चला म्हणजे आले एकदाचे खराडे साहेब...

" नमस्कार सायेब..." पांडूने नमस्कार केला.

पांडूच्या नमस्काराकडे दुर्लक्ष करीत आल्या आल्या त्यांनी तिथेच कोपऱ्यात एका जागी पानाची पिचकारी मारली.

" आवो काय करणार ... घरुन निघालो होतो सकाळीच पण बगा कसं दुपारी पोहोचलो इथं..." खुर्चीवर बसता बसता ते गणेशकडे पाहत म्हणाले.

गणेशने नुसते त्यांना स्माईल दिले. त्याला माहित होतं की आता त्यांच्याशी त्यांच्या उशीरा येण्याच्या विषयावर बोलण्यापेक्षा एकदम चार्ज हॅड ओवर करण्याच्या कामाला हात घातला तर लवकर तरी होईल. नाहीतर अजून एखादा दिवस लागायचा.

" किती वेळ लागेल चार्ज घ्यायला..."

" त्याचं काय गणेशराव ... मला द्यायला काही वेळ लागनार नाय ... पाच मिनीटाचं काम हाय... पण तुमाला घ्यायला किती वेळ लागतो ते तुमी बगा..." खराडे साहेब जणू स्वत:च्याच कोटीवर हसत टेबलाखाली पाय लांब करीत म्हणाले.

पांडू समोर आला आणि त्यांनी आपली बॅग पांडूच्या हातात दिली. पांडूने ती बॅग बाजूला भिंतीत असलेल्या बिनदरवाजाच्या कपाटात ठेवली. तिथे कपाटात अजूनही बरेच धूळ खात पडलेले कागदपत्र होते. कोपऱ्यात एक लोखंडी आलमारी होती.

त्यात सर्व फाईल असाव्यात ....

गणेशने विचार केला. अजूनही खराडे साहेब काही घाई करीत नाहीत हे पाहून गणेश म्हणाला.

" मग करायची सुरवात..."

" थांबा हो सायेब ... काय गडबड हाय... पहले चहा बिहा घेऊ ... अन् मंग करु कामाला सुरवात... सरकारी कामं अशी पटापट व्हायला लागली तर कसं व्हायचं... तुमी नविन हायनं म्हणून ... होईल हळू हळू सवय... मीबी नविन नविन असाच होतो...पण तुमाला खरं सांगू का ... लई राग यायचा आंधी ...सरकारी लोकांचा ... मी तर पूर्ण सिस्टीम बदलवायचं ठरवलं होतं ... पण बगा आता... निघालो सिस्टीमला बदलवायला ... अन् सिस्टीमनंच आम्हाला बदलवलं..." खराडे साहेबांची बडबड सुरु झाली.

गणेश नुसता ऐकत होता. त्याला माहित होतं बोलून काही उपयोग होणार नव्हता. उलटा अजून उशीरच झाला असता.

" ए पांड्या ... जा बरं आन बर त्या शांताबाईच्या इथून चहा" खराडे साहेबांनी हूकुम सोडला.

पांडू लगबगीने घावतच बाहेर पळाला तशी खराडे साहेबांनी बसल्या बसल्याच खुर्ची मागे सरकवली.

" मंग ... इथंच राहणार की अपडाऊन करणार?" खराडे साहेबांनी गणेशला विचारले.

" इथंच एक खोली दिली आहे सरपंचानी"

" असं... सरपंच लई चांगला माणूस हाय बगा"

खराडे साहेबांनी इकडे तिकडे कोणी नाहीना असे पाहत गणेशजवळ शक्य होईल तेवढे आपले तोंड नेत म्हटले,

" तुमाला एक पर्सनल ... सल्ला म्हणून देतो..."

गणेश खराडे साहेब काय सांगतात याची वाट पाहू लागला.

" इथले लोक म्हणजे ... लई खराब... कुणाच्या भानगडीत पडू नका... इथं आपण भलं अन् आपलं काम भलं असं रहावं लागते... एकाला सल्ला दिला तर दुसरा अंगावर येतो... दुसऱ्याला जवळ केलं तर तिसऱ्याला राग येतो... आवो लई खराब गाव हाय ... म्हणजे माझ्या नोकरीच्या हयातीत एवढ खराब गाव मी पाह्यलंच नाय" खराडे साहेब सांगत होते.

गणेशला खराडे साहेबांची बडबड ऐकण्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्याला केव्हा एकदा चार्ज घेतो असं झालं होतं.

" सगळ्या फाईल आलमारीत असतील नाही ..." गणेश पुन्हा मूळ मुद्द्यावर येत म्हणाला.

खराडे साहेब काहीच बोलले नाही. पुन्हा एकदा उठून ते कोपऱ्यात पाणाची अन् तंबाखाची पिचकारी थुंकून आले.

" आलमारीची चाबी तुमच्याजवळच असेल नाही ... " गणेश पुन्हा घाई करण्याच्या उद्देशाने म्हणाला.

" काय राव .... तुमी लयच गडबड करता राव... अशी सिन्सीयारीटी गव्हर्मेंटमध्ये काही कामाची नाय बरकां... अशी सिन्सीयारीटी आपल्याच अंगाशी येते... म्हणजे हे माझे अनुभवाचे बोल हायत बगा... पायजे तर लिहून घ्या.."

गणेशला आता या माणसाला कसे हॅन्डल करावे काही सुचत नव्हते. त्याला चिडही येत होती आणि हसूही येत होतं. पण चिडून जमणार नव्हते आणि हसून तर बिलकुलच जमणार नव्हतं. उलट ते अजूनच बिघडले असते. गणेशने शेवटी ठरवून टाकले की दोन दिवस लागले तरी चालतील आता खराडे साहेबांच्या कला कलानेच घ्यायचे. नाहीतरी त्याच्याजवळ दुसरा कोणता पर्याय होता?. तिकडे खराडे साहेबांची बडबड चालू होती आणि इकडे गणेश एका वेगळ्याच विश्वात रमला होता की ज्यात त्याला खराडे साहेबांची बडबड तर ऐकू येत होती पण चिडही येत नव्हती आणि हसूही येत नव्हतं.

Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.

scar Wilde

क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi world of novel books - Madhurani - CH-8 खोली

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

cartoon-jokes

Marathi world of novel books - Madhurani - CH-8 खोली

When hungry, eat your rice; when tired, close your eyes. Fools may laugh at me, but wise men will know what I mean.

---in-Chi

जेवण वगैरे घेऊन दूपारी गणेश आणि सरपंच घराच्या बाहेर पडले. त्यांच्यासोबत एक सरपंचाचा घरगडीसुध्दा होता.

"सगळयात आंधी इथं तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करने आवश्यक हाय... नेहमी नेहमी अपडाऊन करायला झेपनार नाय तुमाला... "

" हो मलाही तसंच वाटते ... कमीत कमी इथे आहे तोपर्यंत राहायला एखादी खोली मिळाली तर बरं होईल "

" हो मिळल की ...आमचं तिकडं एक घर हाय... तिथं कोणी राहात नसतो .. पण आम्ही नांगर डवरे पासा कुऱ्हाडी साखळया दोरखंड कासरे असं शेतीचं सगळं सामान तिकडे ठेवतो... पुढची खोली देऊ की तुमाला राहायला... "

" हो ... तेवढीच राखन होईल की आपल्या बासनाला " सरपंचाचा गडी मध्येच बोलला.

सरपंचाने त्याच्याकडे रागाने एक दृष्टीक्षेप टाकून त्याला चूप राहण्यास खुणावले.

साले हे घरगडी आडाणी ते आडाणीच कुठं काय बोलायच लेकांना साधी अक्कल नाय...

सरपंचाने विचार केला.

काय वाटलं असेल गणेशरावला... की आपण त्यांना राखनदार म्हणून आपल्या घरात ठेवतो...

" पण सरपंचजी ... मी जास्तकाही भाडं देऊ शकणार नाही "

" आवो त्याची काळजी तुमी करू नका ... आमी काय भाडं घेणार तुमच्याकडून ? " सरपंचाने गणेशच्या पाठीवर थाप देऊन म्हटले.

" नाही असं कसं ... जे काय असेल ते सांगा "

" आवो गणेशराव हे काय शहर हाय का भाडं घ्यायला... आमी जर भाडं घेतलं तुमच्याकडून तर साऱ्या गावात बोंबाबोंब अन् नालस्ती होईल आमची "

गणेशच्या लक्षात आले की आपण बसस्टॉपवरून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने चालत आहोत.

" मघाशी बस स्टॉपवरून इकडूनच आलो होतो आम्ही "

" होना... आमचं घरबी इकडंच हाय ... कामपडल्यास आमच्या घरापुढूनच आले अससाल तुमी "

ते तिघेही पुन्हा मघाच्या दुकानासमोर आले. दुकानाच्या गल्ल्यावर अजूनही ती सुंदर स्त्री बसलेली होती. तिच्याकडे पाहून का जाणे कोणास ठावूक गणेशच्या अंगात शिरशिरी भरल्यासारखी झाली. त्याच्या हृदयाचे ठोके जलद होत आहेत असं त्याला जाणवलं. तिचे आतासुध्दा इकडे लक्ष नव्हते. तिच्या जलद बिनधास्त हालचाली मात्र टिपण्यासारख्या होत्या असं गणेशला वाटून गेलं.

" ते मधुराणीचं दुकान बरं का " गणेशच्या पाहण्याचा रोख पाहून सरपंच म्हणाले.

" अच्छा .. अच्छा " गणेश अधिक उत्सुकता न दाखवीत म्हणाला.

" हे बगा बरोबर तिच्या दुकानासमोरच आमचं घर " सरपंच त्या दुकानासमोरच्या एका घरासमोर उभे राहत म्हणाले. सरपंचाच्या बोलण्यात खटयाळपणा होता की नाही कोण जाणे पण गणेशला त्यांच्या बोलण्यात तो जाणवला होता.

घर म्हणजे विटा मातीने बांधलेल्या 3-4 पक्या खोल्या होत्या. खोल्यांवर उतार असलेले टीन पत्रे टाकलेले होते. आणि टीन नटबोल्टने फिट केल्यामुळे टीनाला मध्ये मध्ये छोटे छोटे गड्डे दिसत होते.

सरपंचाने गडयाच्या हातात चाब्या देत त्याला समोरच्या दाराचे कुलुप उघडण्यास खुणावले. गडयाने लगबगीने सरपंचाच्या हातातली चाबी घेऊन समोरच्या दाराचे कुलूप उघडले.

तेवढयात गणेश त्याच्या बाजूच्या हालचालीने दचकलाच. जवळजवळ त्याच्या अंगाला अंग लावूनच मधुराणी त्याच्या शेजारी येऊन उभी राहाली होती.

" नमस्कार सरपंचजी " मधुराणीचा मधुर आवाज घूमला.

किती गोड आवाज आणि त्यात कसला मार्दव असलेला जाणवत होता....

" नमस्कार " सरपंचाने वळून तिच्या नमस्काराला प्रतिसाद दिला.

" काय लई दिसानं फिरकले इकडं ... काय घराची रंगोटी करायचा विचार हाय की काय... तसं असेल तर सांगा आमाला ... आमच्या दुकानात पडलेले हायत काही रंग " ती सरपंचाना म्हणाली.

गणेश अगदी तिच्या शेजारी उभा राहून तिच्याकडे निरखून तिच्या बोलण्याची ढब, तिच्या हालचाली टिपू लागला. त्याला बोलतांना तिच्या ओल्या गुलाबी ओठांच्या होत असलेल्या हालचाली आणि त्यातून दिसत असलेले तांदळाच्या दाण्यासारखे तिचे पांढरे शुभ्र दात विशेष मादक वाटत होते. गणेश मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होता.

" नाय हो... आपल्या गावात हे नवीन ग्रामसेवक आले हायत गणेशराव ... त्यांच्यासाठी एखादी खोली राहायला दयावं म्हणतो "

" अगंबाई खरंच की ... शहरातले दिसतात.... माझं तर बाई लक्षच नाय ... मी म्हटलं कोणी नविन पाव्हना हाय की काय तुमचा " ती गणेशकडे पाहत म्हणाली.

आता ती त्याच्याजवळून जरा दूर सरकून उभी राहाली. गणेशच्या हृदयात निराशेचे भाव तरळले. त्याला तिचा तो पुसटसा होणारा स्पर्श हवाहवासा वाटत होता.

पण ते निराशेचे भाव त्याच्या चेहऱ्यावरून पुन्हा विरले. तिची त्याच्या डोळयाला भीडलेली सरळ आर्त, गुढं आणि खोल नजर सरळ त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती.

तिच्याकडे पाहून गणेश पुसटसा हसला.

" इथं राहाणार व्हय तुमी ... मंग झाले की तुमी आमचे शेजारी... आपलं लई जमणार बगा " ती पुढे म्हणाली.

तोपपर्यंत सरपंचाचा गडी दरवाजा उघडून आत गेला.

" बरं गणेशराव मी काय म्हंतो ही पुढचीच खोली घ्या तुमी " सरपंच म्हणाले.

" बरं सरपंचजी ... येते हं " मधुराणी तिथून आपल्या दूकानाकडे निघत म्हणाली.

सरपंचांनी मान हलवली. जाता जाता तिने एक नजर गणेशवर टाकून त्याला एक स्मित दिले. गणेशही तिच्याकडे पाहून गाल्यातल्या गालात हसला.

ती निघून गेली तसे सरपंच आणि गणेश त्या गडयाच्या मागे आत खोलीत गेले. तो गडी आत येऊन इकडे तिकडे शोधाशोध करीत होता.

" ये येडया आधी लाईट लाव ना... आमचे गडी म्हंजे न एक एक हले हायत " सरपंच चिडून म्हणाले.

गडयाने परत येऊन दाराच्या बाजूला असलेला बल्बचा स्वीच दाबला. खोलीत सगळीकडे बल्बचा पिवळा पिवळा प्रकाश पसरला.

खोलीत सगळीकडे नांगर वखर वैगेरे शेतीचे सामान पसरवून ठेवलेले होते. आणि त्या सामानावर धूळ साचलेली दिसत होती. काही पोत्यांचे पुरचूंडे सुध्दा बांधून ठेवलेले होते.

" मंग काय बरी हाय ना ही खोली.... ए तू या खोलीतले सगळे सामान त्या आतल्या खोलीत नेवून ठेव अन् ही खोली यांना साफ करून दे ....ते इथं राहाणार हायत आजपासून "

" जी मालक " गडी म्हणाला.

" अन् हो न्हाणी तिकडे आत हाय"

"न्हाणी?"

"म्हंजे बाथरुम" सरपंच हसत म्हणाले.

गणेशने आत जाऊन बाथरूम बघून घेतली.

गणेश बाहेर येता येता तोंडातल्या तोंडात बोलला " संडास.... संडास दिसत नाही "

" गणेशराव ....हे उजनी गाव हाय इथ अजून एकही संडास नाय.... सगळयांना मोकळ्या हवेची सवय हाय .... एकदा सरकारने बांधून दिले होते तीनचार संडास .... पण त्यात कोणीच जात नव्हतं .... शेवटी लोकांनी तोडून टाकले कमीत कमी एखादा तर ठेवायचा .... तुमच्यासारख्याच्या कामी आला असता"

गणेशचा चेहरा हिरमुसला पण तो त्याचे भाव लपविण्याचा प्रयत्न करीत म्हणाला,

" खोली तशी चांगली आहे.... तसा मीही जास्त काही राहाणार नाही इथं ....हप्त्यातून दोन तीन दिवस राहालं की बस... "

" अन् ए आता एक काम लागलं तुह्याकडं .... हे इथं असले म्हंजे पाणी बीनी भरून ठेवत जा त्यांचं " सरपंच त्यांच्या गड्याला म्हणाले.

" पाणी ? " गणेशने आश्चर्याने विचारले.

" आता नळ कुठाय म्हणून विचारू नका " सरपंच गणेशची गंमत करीत म्हणाले.

गणेश ओशाळल्यागत हसला.

" पाणी तिकडं विहिरीवरून भरून आणून देत जातील तुमाला आमचे गडी " सरपंच म्हणाले.

" चला आता तिकडं बजारात ऑफीसात जाऊ... तोपर्यंत तू साफसुफ करून ठेव रे " सरपंचानी गडयाला बजावले.

" जी मालक " गडी म्हणाला आणि लागलीच कामाला लागला सुध्दा.

सरपंच आणि गणेश खोलीतून बाहेर पडले आणि आफिसकडे निघाले. जाता जाता गणेशने खूप प्रयत्न करूनसुध्दा त्याची नजर समोर मधुराणीच्या गल्ल्यावर गेलीच.

क्रमश:...

When hungry, eat your rice; when tired, close your eyes. Fools may laugh at me, but wise men will know what I mean.

---in-Chi

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi web of Novel books - Madhurani - CH-7 सरपंच

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Comedy-corner

Marathi web of Novel books - Madhurani - CH-7 सरपंच

Courage is not the absence of fear, but rather the judgement that something else is more important than fear.

--- mbrose Redmoon

ते दोघे सरपंचाचा घराजवळ येऊन पोहोचले. घर कसलं वाडा होता तो वाडा! वाडयाला समोर जुना तेल देऊन देऊन काळा झालेला भला मोठा दरवाजा होता. वाडयाचा घेरही खूप मोठा होता; समोरून तरी तसंच जाणवत होतं. वाडयाच्या डाव्या बाजूला, वाडयाला लागूनच शेजारी सरपंचाचा भला मोठा जनावरांचा गोठा होता. आता सध्या तो रिकामाच दिसत होता. कदाचित सरपंचाची गुरं सकाळीच चरायला रानात निघून गेली असावीत. वाडयाच्या मोठया दरवाजातून गणेशला आत नेत सदाने त्याला उजवीकडे असलेल्या बैठकीत बसवीले. बैठक म्हणजे थोडी उंच असलेली खोली होती आणि त्यात गादया लोड इत्यादि टाकलेले होते. गणेश बैठकीत इकडेतिकडे बघतच आत शिरला. तिकडे सदा आत गेला, कदाचित सरपंचांना बोलावण्यासाठी. बैठकीत भिंतीवर वेगवेगळया तसबिरी लावलेल्या होत्या - नेहरु, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, इत्यादि. गणेश त्या तसबीरींकडे बघत एका जागी गादीवर बसला. भिंतीवर त्याचे लक्ष एका भारदस्त लांब लांब मिशा आणि डोक्याला उंची पटका बांधलेल्या एका माणसाच्या तसबीरीने वेधून घेतले. कदाचित ते सरपंचाचे वडील असावेत किंवा वडिलाचे वडिल असावेत. तेवढयात सदा आतून एका बादलीत पाणी घेऊन आला.

" या सायेब हातपाय धून घ्या ... इतक्या लांबून आले शिणला असान. " बादली घेऊन सदा समोर ओटयावर जात म्हणाला.

" हो... " म्हणत गणेश उठला आणि समोर ओटयावर गेला.

लोटयाने बादलीतील पाणी घेऊन गणेशने हातपाय तोंड धूवून चूळ भरली. चूळ थोडावेळ तोंडात फिरवून तो आता ती थुंकण्यासाठी इकडे तिकडे बघत जागा शोधू लागला.

" थूकाकी तेथंच समोर... "

त्याने ती अवघडल्यासारखी समोरच पण थोडी बाजूला थूंकली. सदा गालातल्या गालात हसला.

" सरपंच पुजापाठ करतेत... दोन घडीत येतील ते ... आता तुमी बसा गुमान बैठकीत... मी च्यापाण्याचं बगतो " गणेशजवळ हातपाय पुसण्यासाठी एक कापड देत सदा म्हणाला.

गणेश हातपाय तोंड पुसायला लागला आणि सदा लगबगीनं आत गेला.

गणेशला आता हातपाय धूतल्यानंतर तरतरी जाणवायला लागली होती. बसमध्ये घामाने आणि धुळीने चेहरा सगळा म्लान झाला होता. चेहरा पुसत पुसत तो लोडवर पाय लांब करून टेकून बसला. बसमध्ये पाय एका ठरावीक जागेत ठेवून अकडून गेले होते. कपडा बाजूला ठेवत हातपाय ताणत त्याने आळस दिला. तेवढयात सदा प्यायला पाणी घेऊन आला. येथील पाणी देण्याची तऱ्हा जरा वेगळीच दिसत होती. सदाने पाण्याने भरलेला पितळीचा लोटा गणेशच्या हातात दिला. लोटयावर पितळीचीच एक वाटी ठेवलेली होती. ही अशी तऱ्हा त्याने तिकडे बारामतीकडे बघितली होती. जेवढं लागते तेवढं वाटीत पाणी ओतून घ्यायचं आणि मग पूर्ववत वाटी लोटयावर झाकून ठेवायची. न जाणो का? पण त्याला ती तऱ्हा पूर्वी पाहिली होती तेव्हासुध्दा आवडली नव्हती. त्याच्या मनात एक अढी होती की जर वाटीने पाणी पिऊन वाटी पुन्हा लोटयावर ठेवल्यास वाटीचे उष्टे पाण्याचे थेंब लोटयात घळंगणार नाहीत का? पण हा झाला त्याचा विचार तिकडे बारामतीकडे तर सर्व मोठमोठे लोक याच तऱ्हेने पाणी पीत होते. तशी त्याला तहानही भरपूर लागली होती. सकाळी उजाडायच्या आत निघाल्यापासून आतापर्यंत पाण्याचा एकही थेंब त्याच्या पोटात गेला नव्हता. तो तोंडाच्या वर लोटा तिरका करून वरून घटाघट पाण्याचे घोट पीऊ लागला. लोटा रिकामा झाल्यावरच त्याने तो खाली ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला.

" लई तहान लागलेली दिसते ... आणू का आजून " सदाने विचारले.

गणेशने मान हलवूनच 'नाही' असे म्हटले.

सरपंच पुजा आटोपून शांतपणे बैठकीत आले. पांढरं शुभ्र धोतर आणि वर कापडाच शिवलेलं पांढरं शुभ्र बनेन. कपाळाला लाल गंधाचा उभा टीका कोरलेला. पुजेच्या आधी नुकतीच अंघोळ केल्यामुळे त्यांचे तेल लावलेले ओले काळे पांढरे केस आणि चेहरा चमकत होता. एकूणच मुर्ती जरी वयस्कर असली तरी सात्विक वाटत होती. तशी गणेशची आणि सरपंचाची तालूक्याच्या ठिकाणी ओळख झाली होतीच. सरपंच येताच पहुडलेला गणेश सरळ होऊन बसला.

" नमस्कार ... गणेशराव "

" नमस्कार ... "

सरपंच गणेशच्या शेजारीच एका लोडला टेकून बसले.

गणेशच्या पाठीवर हलक्या हाताची थाप मारीत सरपंच म्हणाले " काय मंग... तरास वैगेरे झाला नाय ना "

गणेश गोंधळात पडला. हो म्हणावं की नाही त्याला काही कळेना.

त्याची विवंचना पाहून सरपंच म्हणाले " सुरवातीला ... तरास होईलच ...इतक्या दूर तेबी खेडयावर अन् वर कच्च्या रस्त्याने एस्टीने यायचं म्हटलं तर तरास होणारच ... पण होईल सय हळू हळू "

सरपंचाची एखाद दुसरा शब्द सोडला तर बाकी खेडूतांपेक्षा भाषा शुध्द वाटत होती.

तेवढयात सदा चहा घेऊन बैठकीत आला.

" अरे नुसता चहाच ... काही न्याहारीचंबी घेऊन ये की "

सदाने चहाच्या दोन कपबश्या दोन हातात धरून आणल्या होत्या. सरपंचाची फराळाची सुचना ऐकून तो दरवाज्यातच घूटमळला.

" नाही... सरपंचजी... मी येतांनाच फराळ करून आलो... मला सकाळी उठल्या उठल्याच फराळ करायची सवय आहे ... "

" नाय असं कसं ... तुमी आमच्याइथं पहिल्यांदाच येताय अन् बिना खान्याच जाता ... "

" नाही सरपंचजी ... खरंच नको.... "

" बरं बरं ... पण सदा यांच्या दुपारच्या अन् रातच्या जेवणाची व्यवस्था करायला सांगा आत "

सदाने हसत हसत मान हलविली आणि चहा घेऊन तो गणेश आणि सरपंचाच्या समोर येऊन उभा राहिला. चहाच्या कपबश्या त्यांच्या हातात देऊन तो लगबगीने परत आत गेला.

" फारच सज्जन माणूस दिसतो... " गणेशने चहा घेता घेता सदा ज्या दिशेने गेला तिकडे आपला रोख करीत म्हटले.

सरपंचसुध्दा चहा पीत होते. त्यांना चहा पीता पीता एकदम ठसका लागला.

त्यांनी गणेशकडे चमकून पाहत विचारले " तुमाला हा घेऊन आला का इथें ?"

" हो "

" अरे ... देवा ... " कपाळावर हात मारीत ते म्हणाले.

" काय झालं? "

" काय नाय "

त्यावर सरपंचानी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि ते चहाचा घोट घेऊ लागले हे पाहून तो पुढे म्हणाला,

" अहो त्याने माझी ओळख नसतांना बसस्टॉपवरून माझी बॅग उचलून इथपर्यंत आणली ... आणि रस्त्याने गप्पा करून माझी करमणूकसुध्दा केली.... खरोखर असे सज्जन आणि निस्वार्थी लोक फक्त खेडयातच मिळू शकतात... आणि तेही बोटावर मोजण्याएवढेच असतील... "

" सज्जन? ... कोण सदा ? " सरपंचाने आश्चर्याने म्हटले.

गणेश सरपंच पुढे सदाबद्दल काय सांगतात याची वाट पाहू लागला. पण सरपंच तेवढं बोलून गप बसले.

" का काय झालं? ... मला तरी फार सज्जन माणूस वाटला बघा तो "

" काही नाय ... तुमाला कळलच .. .हळूहळू... " एवढं बोलून सरपंचाने विषय बदलला.

" आता दिसभर काय करायचा विचार हाय ... नाय म्हणजे विश्रांती घेऊन कामाला सुरवात करता की लागलीच ... "

सरपंचाने सदाचा विषय बदलल्याचे गणेशच्या लक्षात आले. पण त्यालाही आतातरी तो विषय लावून धरून खोदून खोदून विचारने योग्य वाटले नाही.

जवळपास तीनचार तासाच्या प्रवासाने गणेश शिणला होता. त्याला आतातरी लागलीच कामाला सुरवात करण्याचा उत्साह वाटत नव्हता. गणेश विवंचनेत पडला.

काय कराव...

ताबडतोब कामाला सुरवात करावी...

की थोडा आराम करावा आणि मग....

मनकवडया सरपंचाने त्यांच्या मनातला विचार ओळखला.

" ठिक हाय असं करा ... आता जरा आंग टाका... थोडया वेळानं जेवण तयार होईल ... आपण जेवण बिवन करू अन् मंग लागू कामाला.. "

" हो तसंच करू या... " गणेश अवघडल्यासारखे पाय ताणत म्हणाला.

" तुमी आता निवांत पडा ... अगदी हातपाय लांब करून ... मी सदाला दरवाजा ओढून घ्यायला सांगतो... "

असं म्हणत सरपंच बैठकीबाहेर पडले.

क्रमश:

Courage is not the absence of fear, but rather the judgement that something else is more important than fear.

mbrose Redmoon

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Novels Books - Madhurani - CH - 6 सदा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Comedy-corner Marathi Novels Books - Madhurani - CH - 6 सदा

Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.

scar Wilde

धूळ आणि धूर निवळल्यानंतर गणेशने आजूबाजूला बघितले, खिशातला रुमाल काढून चेहरा स्वच्छ केला, केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, आणि कपड्यावरची धुळ झटकण्याचा प्रयत्न केला. गोठयाच्या समोर झाडाच्या सावलीत एका जून्या लाकडाच्या ओंडक्यावर काही लोक बसलेले होते. कुणी विडी ओढत होता तर कुणी चिलिम ओढत होता. सगळी लोक त्याच्याकडे असे बघत होते जसा तो एखादा परग्रहावरून आलेला माणूस असावा. असा शर्ट पँट घातलेला नीटनेटका माणूस इथे कदाचित फारच क्वचित येत असावा. गणेश त्यांच्याकडे जावू लागला. एका तंबाखुचा बार चोळणाऱ्या खेडूताजवळ तो जाऊन उभा राहिला. त्या खेडूताने डाव्या हातावर चोळलेल्या तंबाखुच्या बारावर उजव्या हाताने छोटया छोटया टाळया देत तंबाखुची झालेली धूळ फूकून उडवून लावली. आणि मग त्या उरलेल्या चोळलेल्या तंबाखुची चिमुट करून आपला गाल एका हाताने ओढत दाताच्या आणि गालाच्या फटीत ठेवली.

" सरपंचाच घर कुठे आहे? " गणेशने त्या खेडूताला विचारले.

तो खेडूत लाकडाच्या ओंडक्यावरून उठून गणेशच्या समोर उभा राहिला.

गणेश त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा करीत उभा राहिला. पण तो त्याला एखादया मुक्या माणसासारखे हातवारे करून खुणावू लागला. शेवटी त्याने गणेशला बाजूला सारत त्याच्या तोंडात जमलेली तंबाखुची लाळ एका बाजूला पचकन थूकली आणि म्हणाला,

" सरपंचाकडच पाव्हनं व्हय? "

' हो' गणेशने डोकं हलवून उत्तर दिलं.

त्या खेडूताने लगबगीने गणेशच्या हातातली बॅग आपल्या हातात घेतली आणि तिथून निघत म्हणाला,

" या माह्या मांगं"

किती भला माणूस आहे...

आपण रस्ता विचारला अन् हा आपली बॅग उचलून घेत आपल्याला पोहचवून सुध्दा देतोय...

गणेशने विचार केला. गणेश मुकाटयाने त्याच्या मागे मागे चालू लागला.

" तालूक्यातून आला व्हय? " त्याने दुसऱ्या हाताने आपलं धोतर नीट करीत विचारले.

" हो" गणेश म्हणाला.

कदाचित सरपंचाने याला आपल्याला घ्यायलाच तर नाही ना पाठविले?...

गणेशने विचार केला.

" मला घ्यायला सरपंचांनी पाठविलं का तुला?" गणेशने न राहवून विचारले.

" आवो नाय... सरपंचाचं पाव्हनं म्हंजे ... या गावचं पाव्हनं" तो गणेशच्या प्रश्नाचा मतितार्थ समजून म्हणाला.

" आमचे सरपंच म्हंजे या गावची श्यान हाय ... या गावची जीबी सुदारना झाली ... ती सरपंचामुळं... आंधी इथं भूर्मलबी येत नव्हती... "

" भूर्मल" गणेशने न कळून विचारले.

" आवो... म्हंजे .. एस्टी... तुमची ते बस..." तो खळखळून हसत म्हणाला.

तो पुढे बोलायला लागला " आवो एकडाव आसंच झालं... आमच्या चूलतीच्या भावाच्या पोरानं शहरातली बायको आणली... आवो ते माणसं लई माणूसकीचे.... लगीन लई धूमधडाक्यात केलं.... ते लोकंबी चाटच झाले व्हते... त्यानं मलं बी बलवलं होतं लगनालं .... एकडाव घरात सगळे जण पंगतीनं जेवाया बसले... ती बिचारी नवीन नवीन नवरी आपली वाढू लागली... जवा ती तिच्या नवऱ्यालं शार वाढू लागली ... तो मनला बस... बिचारी कावरीबावरी झाली अन् इकडं तिकडं बगू लागली... तिकडं पळीतून शारीची धार आपली चालूच व्हती... आमच्या चूलत्याचं पोरगं लई तापट ... वरडलं की हो ते तिच्यावर ... ते जोरानं वरडलं .. 'बसकी...' काय करणार बिचारी भीली ... अन् पटकन बसली की हो त्याच्या म्होरं तिथंच"

गणेश खळखळून हसायला लागला. तो खेडूत सुध्दा हसायला लागला.

" आता तुमी बगान कदी तिच्याकडं ... तुमाला वळखू येणार नाय की त्यानं शहरातली बायको आनली म्हून... लय टरेन केलं तिले आमच्या चूलतीच्या भावाच्या पोरानं... आता मस्त जाते माणसांच्या मागं शेतात ... निंदन खुडन कराया... " त्याने मागे गणेशकडे वळून बघत म्हटलं.

गणेश त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला.

" तुम्ही तर फार मजेदार गोष्टी करता राव.... अरे हो तुमचं नाव तर मी विचारायचं विसरूनच गेलो"

" सदा ... सदा हाय माझं नावं"

" म्हणजे तुम्ही सदा असेच गप्पा करीत अससाल म्हणून कदाचित तुमचं नाव सदा ठेवलं असेल" गणेश गमतीने म्हणाला.

" काय सायेब तुमीबी थट्टा करता या गरीबाची" तो लाजून म्हणाला.

चालता चालता ते एका मोठ्या मैदानातून जाऊ लागले.

" इथं आमच्या गावचा बजार भरते बगा... बस्तरवारी" सदा म्हणाला.

"बस्तरवारी?"

"म्हंजी गुरुवारी सायेब" तो हसत म्हणाला.

" अच्छा " गणेश त्या मैदानावर नजर फिरवीत म्हणाला.

बस्तरवार ... म्हणजे बृहस्पतीवारचा अपभ्रंश असावा कदाचित...

गणेशने विचार केला.

मग सदाने गणेशला दोन तीन छोट्या छोट्या बोळीतून नेले. समोर एका जागी गावातला मारोतीचा पार लागला.

पार बराच उंच होता. बाजूला एक मोठं वडाच झाड होतं. आणि वडाच्या झाडाच्या शेजारी पाणी पुरवठा विभागाने बांधलेली मोठी सिमेंटची पाण्याची टाकी होती.

" हयो आमच्या गावचा पार सायेब इथं या वडाच्या झाडामूळं लई मस्त थंडगार सावली पडते ... माणसतं बसतातच ...अन् थकली भागली कुत्री मांजरं ढोरंबी बसतात इथं ...वडाच्या सावलीला. "

" तुमच्या गावात नळ आलेला दिसतो" पाण्याच्या टाकीकडे पाहत गणेशने विचारले.

पाण्याच्या टाकीवर दोन तीन इब्लीस पोरं चढून खेळत होती.

" नळ कशाचा सायेब ... बांधून ठेवली नुस्ती टाकी ... कव्हा कव्हा उन्हाळयात सोडतात की पाणी या टाकीत... तव्हा मंग लई गर्दी होते इथं लोकांची "

तेवढ्यात एक टपोरं लालभडक उंबर वडाच्या झाडावरून खाली पडलं. तिथं उभी असलेली दोनचार पोरं तिकडे धावली. त्यातल्या एकाने चपळतेने ते उंबर उचललं आणि तो बाकीच्या पोरांना वेडावून वाकुल्या दाखवू लागला. त्या पोराने मग ते उंबर अलगद उकलून त्यातले बारीक बारीक किडे साफ करून बाकीचे पोरं त्याच्या हातातलं हिसकाटून घ्यायच्या आत पटकन तोंडात टाकलं. गणेशला ते पाहून कसंस झालं.

" आवो लय मस्त लागते.. तुमीबी एखांद्या बारीनं खावून बगा" सदा गणेशचा कसासा झालेला चेहरा बघून म्हणाला.

पाराला वळसा घालून सदा गणेशला पुढे घेऊन गेला. समोर रस्ता आधीच्या बोळींपेक्षा बराच रुंद होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मातीची शेणाने सारवलेली घरं होती. त्यातच डाव्या बाजूला समोर एक किराणा दूकान होतं. किराणा दुकानाच्या दोन्ही बाजूने दगडाच्या चिऱ्यांचे दोन ओटे होते. तिथे ओटयावर बरेच लोक घोळक्याने बसले होते. कुणी विडया फुंकीत होते. कुणी चिलीम भरत होते तर कुणी आपल्या चकाटया हाकीत बसले होते. सदा गणेशला तिथून घेऊन जाताच सगळया नजरा त्याच्याकडे वळून पाहू लागल्या. गणेशसुध्दा त्यांच्याकडे बघत होता. बघता बघता त्याची नजर दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीकडे गेली. त्या व्यक्तीकडे पाहून त्याला आश्चर्य वाटत होतं. ती एक सुंदर तरणी ताठी स्त्री होती. एका दुकानाच्या गल्ल्यावर तेही एका मागासलेल्या खेडयात एका सुंदर स्त्रीने बसावे याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आता त्याला लक्षात आलं की तिथे ओटयावर लोकांच मधमाश्यांसारखं मोहोळ कसं काय जमलं होतं ते. त्या गल्ल्यावर बसलेल्या स्त्रीचं राहणीमान एखादया शहरातल्या स्त्रीला लाजवेल असं होतं. तिची ती पिवळी धम्मक गोरी त्वचा. केसं लांब. ओठांवर लिपस्टीक लावल्यासारखी नैसर्गीक लाली. चेहऱ्यावर चांगलं पावडर वैगेरे लावलेलं. फक्त ते हनुवटीवरचे तीन गोंदणाचे ठीपकेच तेवढे तिच्या बाकी राहणीमानाला साजेसे नव्हते. तिने गुलाबी रंगाची पातळ साडी नेसलेली होती. आणि किंचित गर्द गुलाबी रंगाचच थोडया छोटया बाहया असलेलं ब्लाऊज घातलं होतं. त्या छोटया बाहयांमुळे तिचे ते भरीव गोरे दंड अजूनच उठावदार दिसत होते. गणेश क्षणभर थांबून तिच्याकडे बघण्याचा मोह आवरू शकला नाही. त्या स्त्रीकडे पाहून त्याला एखादया निवडूंगाच्या रानात चूकून एखादं गुलाबाचं फूल उगवावं असं वाटत होतं. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही की आजूबाजूचे ओटयावर बसलेले लोक गणेशकडे ज्याप्रमाणे पाहत होते त्यावरून तरी तिचंही लक्ष त्याच्याकडे जायला हवं होतं. पण ती गल्ल्यावर बसून आपले दुकानातले गिऱ्हाइक अटेंड करण्यात आणि दुकानातल्या नोकराला सुचना देण्यात मग्न होती. किंबहुना ती तसं दर्शवीत असावी. तिच्या वागण्यात एक लाघवी बेफिकीरपणा जाणवत होता. पुरूष या नात्याने एका स्त्रीने आणि तेसुध्दा आपण तिच्याकडे निरखून पाहत असता असे आपल्याकडे दुर्लक्ष करावे, गणेशला रूचले नाही. त्याचा पौरूषीक अहंकार दुखावल्या गेला होता. तसा गणेशही काही कमी सुंदर नव्हता. एकाहून एक सुंदर स्त्रिया अजूनही त्याच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेले असतांना सुध्दा त्याच्यावर भाळत होत्या. चटकन स्वतःला सावरून तो पुढे सदाच्या मागे जायला लागला. तो पुढे चालत होता. चालता चालता तो आपल्या डोक्यातले विचार झटकण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याला आपला अवमान झाल्यासारखे जाणवत होते आणि मनात उगीच एक हुरहूर लागून गेली होती.

क्रमश:...

Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.

scar Wilde

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi literature books - Novel Madhurani - CH-5 उजनी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

marathi-vinod

Thought of the day -

Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.

scar Wilde

Marathi literature books - Novel Madhurani - CH-5 उजनी

कंडक्टरने वाजविलेल्या घंटीने तो भानावर आला. गाडी थांबली. त्याने बाहेर डोकावून बघितले. उजनी अजून आली नव्हती.

" उजनी अजून किती लांब आहे? " त्याने त्याच्या शेजारी बसलेल्या खेडूताला विचारले.

" लई लांब हाय निवांत एक झोप घ्या गाव आलं की मी उठीवतो... " खेडूत म्हणाला.

'इतके गड्डे असलेल्या रस्त्यावर बस इतके धक्के देत चालली असता झोप येणं कसं शक्य आहे? ' त्याने मनाशीच विचार केला.

"धक्याचा इचार करू नगा ... असं समजा की तुमी पाळण्यात झोपले हात .... अन् कुणीतरी पाळणा हालवतो हाय"

गणेशने चमकून त्या खेडूताकडे पाहिले. त्या मनकवडया खेडूताने त्याच्या डोक्यात चाललेले विचार ताडले होते.

त्या खेडूताने पुन्हा आपली मख्ख नजर समोर रस्त्यावर खिळविली.

गणेशने पुन्हा आपल्या विचारांच्या दुनियेत प्रवेश केला.

तो तालुक्याच्या ठिकाणी चांगला रमला होता. मधल्या काळात त्याचं लग्न होऊन त्याला एक मूल सुध्दा झालं होतं.

विनय - किती गोंडस पोरगा...

अन् पहिला पोरगाच झाल्याने आईला किती आनंद झाला होता..

आपल्या परिवाराला सोडून इथे नोकरीसाठी येणे त्याच्या अगदीच जीवावर आलं होतं. पण काही इलाज नव्हता. त्याच्या बायकोला आणि मुलाला सुध्दा इथे खेडयावर आणने शक्य नव्हते. मुलाला याच वर्षी त्याने केजीला घातले होते. आणि इथे खेडयात केजी वैगेरे तर नव्हतेच शिक्षणाची इतरही एकूणच व्यवस्थित सोय नव्हती.

शेवटी आपल्या कुटूंबाच्या उत्कर्षासाठी एवाढा त्याग करणे आपल्याला आवश्यक आणि अपरिहार्य आहे...

एका ठिकाणी बसचा वेग कमी झाला आणि ती हमरस्त्यावरून उजवीकडे एका कच्च्या रस्त्यावर उतरली. जशी बस कच्च्या रस्त्यावर उतरली बसचे धक्के वाढले. गणेश समोरच्या सीटच्या दांडयाला धरून सांभाळून बसला. गणेशने खिडकीच्या बाहेर डोकावून बघितले. बाहेर हिरव्यागार शेतात मजूर निंदतांना दिसत होते. मधेच कुठेतरी विहिरीच्या बाजूला पाण्याच्या पंपाच्या पाईपमधून पडणारे काचासारखे शुभ्र पाणी. शेतातल्या छोटया छोटया गवताच्या झोपडया. वर आकाशात उडणारे पक्षी आणि त्यांना चकविण्यासाठी शेतात जागोजागी लावलेले बुजगावणे. गणेशचे मन त्या शेतातल्या दृश्यात हरवून गेले. जणू बसमध्ये लागणाऱ्या जीवघेण्या धक्यांचा त्याला विसर पडला होता. खरंच किती सुंदर जीवन आहे इथे खेडयातले. पण मग रस्त्याच्या एका बाजूने धावल्यागत चालणाऱ्या कृश काटकुळया मोळीवाल्यांना बघितल्यावर त्याचे येथील जीवनाबद्दलचे मत पुन्हा पूर्ववत झाले.

अचानक बसमध्ये प्रवाश्यांची चुळबूळ सुरू झाली. आणि धुळीचे लोट च्या लोट बसच्या चारी बाजूंनी उठले. बस गावाच्या शिवेत शिरली होती.

" आता येईल बगा उजनी" बाजूचा खेडूत म्हणाला.

बाहेर उठलेला धुळीचा लोट खिडकीतून बसमध्ये शिरला. गणेश घाई घाईने खिडकीची काच वर सरकवू लागला. पण ती खिडकीची काच जागची हलण्यास सुध्दा तयार नव्हती. तो आता उठून प्रयत्न करू लागला. तो निकरीने बसची काच बंद करण्याचा प्रयत्न करू लागला. एव्हाना धुळीने त्याचा चेहरा म्लान झाला होता. त्याच्या शेजारचा खेडूत त्याच्याकडे पाहून हसला.

"काई फायदा नाय सायेब... त्याच्यात धूळ जाऊन ते बी घट झालं... आमच्यासारखं... तुमीबी सय करून घ्या ... म्हंजी पुढं बरं पडल"

गणेशने त्या खेडूताकडे नुसते बघितले आणि मुकाटयाने खाली बसून काच बंद करण्याचा प्रयत्न सोडून दिला. अचानक घाण वासाचा दर्प खिडकीतून गणेशच्या नाकात शिरला. त्याने खिशातून रूमाल काढून आपल्या नाकाला लावला. तो खेडूत पुन्हा हसला. बस गोदरीतून चालली होती. समोरच्या काचातून गणेशला रस्त्याच्या दोन्ही बाजूने संडासला बसलेली लोक बस येत आहे असं पाहून एक एक उठतांना दिसली. जसं बसचा मान राखावा म्हणून ते अदबीनं उभे राहाल्यासारखे वाटत होते. गोदरीनंतर ओढा होता. ओढयावरचा मोडकळीस आलेला पुल ओलांडून एकदाची बस गावात शिरली.

बस गावात शिरताच चारपाच लहान लहान भोंगळ्या पोरांचा कळप बसमागे धावू लागला. त्यातचं बसच्या दुसऱ्या बाजूने चारपाच बेवारस कुत्री बसमागे धावू लागली. जणू बस आल्यामुळे त्या मरगळलेल्या खेड्यात जीवन संचारलं होतं.

' आली ... आली' म्हणून एका जागी रस्त्याच्या कडेला जमलेल्या लोकांनी तिचं स्वागत केलं.

त्या लोकांना कदाचित बसमध्ये बसून पुढे जायचं होतं. ड्रायव्हरनेसुध्दा गंमत म्हणून की काय कोणास ठाऊक बस त्या लोकांपासून बरीच समोर नेवून उभी केली. तसे ते लोक बसच्या मागे धावायला लागले. आधीच ती भोंगळी पोरं अन् कुत्री बसच्या मागे धावत होती अन् आता हे लोकही धावायला लागल्यावर दृष्य फार मजेशीर दिसत होतं.

बस थांबली तशी आत येणाऱ्यांची आणि बाहेर जाणाऱ्यांची बसच्या दारात एकच गर्दी झाली. गणेशने विचार केला एकदा गर्दी ओसरू दया मगच उतरू...

पण कुणीच थांबायला तयार नव्हते. बाहेरच्यांना आत येण्याची आणि आतल्यांना बाहेर जाण्याची जणू फार घाई झाली होती. त्यातच बाहेरचे काही लोक माकडासारखे बसच्या खिडकीला लोंबकळून खिडकीतून आत रूमाल टोपी किंवा पिशवी सिटवर ठेवून आपली जागा राखून ठेवत होते. गणेश हा सगळा गोंधळ पाहत होता. गोंधळ काही कमी होत नाही असे पाहून तो सुध्दा उतरायला लागला. उतरतांना त्याचे लक्ष एका खिडकीकडे गेलं. एका बाहेरच्या माणसाने तर हद्दच केली होती. त्याच्याजवळ जागा राखून ठेवण्यासाठी कदाचित काही सामान नसावे. त्याने चक्क खिडकीला लोंबकळून खिडकीतून त्याची चामडयाची चप्पल सिटवर ठेवली होती. गणेशला चिडही येत होती आणि हसूही येत होतं. गर्दीतून उतरतांना गणेशला गुदमरल्यासारखं होत होतं. कसातरी गणेश लोकांचे धक्के खात बसमधून उतरला. जेव्हा तो बाहेर आला, त्याचे सगळे केस गर्दीमुळे विस्कटलेले होते, कपडे चुरगळलेले होते आणि शर्टची इनही बाहेर निघाली होती. त्याला कुठे कल्पना होती की ही त्याने केलेली शर्टची कदाचित शेवटची इन असावी. बाहेर आल्याबरोबर मोकळया हवेत श्वास घेतल्यानंतर कुठे त्याला हायसं वाटल. तो तिथेच क्षणभर थांबला. पुढच्या क्षणीच ती बस सगळी धूळ आणि डिझेलचा धूर अंगावर उडवत पुढे निघून गेली.

क्रमश:..

Thought of the day -

Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.

scar Wilde

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Sahitya Literature Books - Madhurani - CH-4 ते दिवस

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

marathi-logo Marathi Sahitya Literature Books - Madhurani - CH-4 ते दिवस

The richest man is not he who has the most, but he who needs the least.

nknown Author

गणेशराव खुर्चीवर पाय मोकळे करून बसले. मधून मधून ते दरवाजातून भेटायला आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या लोकांकडे पाहत होते. त्यांनी एकदा हॉलमध्ये नजर फिरवली.

देव जाणे इतक्या लोकांमध्ये आपला नंबर केव्हा लागतो ते?...

तेवढ्यात त्यांना अचानक हॉलमध्ये हालचाल झालेली जाणवली. काही लोक उठून उभे राहत होते. तर काही जण माना उंचावून पाहत होते. काही जण नमस्कार करीत होते.

कोण आहे?... श्रेष्ठी तर नाहीत ना?...

त्या लोकांच्या गर्दीतून रस्ता काढीत जात असलेला त्यांना एक गोरा गोमटा उंचापुरा धीप्पाड मनुष्य दिसला.

आता हा कोण?...

तो मनुष्य दरवाजातून आत गेला - श्रेष्ठींना भेटायला- बिनदिक्कत. त्याला कुणीही अडविले नाही. तो गेल्यानंतर गर्दी पुन्हा आपल्या जागेवर बसून स्थिरावली.

" कोण होता तो?" गणेशरावांनी त्यांच्या उजवीकडे बसलेल्या माणसाला विचारले.

त्या माणसाने आश्चर्याने विचारले,

" काय? तुम्हाला माहित नाही?"

गणेशरावांनी ओशाळल्यागत आपली मान हलवून आपले अज्ञान व्यक्त केले.

" अहो ते मधूकरराव आहेत ... श्रेष्ठींचा खास माणूस... अगदी उजवा हातच म्हणानां"

" अच्छा ... अच्छा"

गणेशरावांच्या डावीकडे एक पांढरा कुर्ता पायजामा घातलेला माणूस पेपर वाचत बसला होता.

त्यांनी त्याच्याकडे बघत आळस देत म्हटले,

" आता काय माहित किती वेळ लागतो ते?"

त्या माणसाने पेपर तसाच समोर ठेवून पेपर वरून त्यांच्याकडे निरखून पाहिले.

" तुम्ही आताच आले ना? "

" हो" गणेशरावांनी उत्तर दिले.

" मी मागच्या दोन दिवसापासून चकरा मारतोय...पण श्रेष्ठींचा भेटायचा पत्ता नाही... कधी श्रेष्ठी नसतात ..तर कधी असतात... पण श्रेष्ठींना वेळ नसतो " असं जसं गर्वाने म्हणून तो पुन्हा पेपर वाचायला लागला.

गणेशरावच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. क्षणभर त्यांना इथून उठून जावसं वाटलं.

पण नाही...भेटणं तर आवश्यक आहे ...

आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलाच्या नोकरीकरीता तरी...

खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांचं विचारचक्र भूतकाळात झेपावलं. त्यांना आठवत होतं 20-25 वर्षापूर्वी एकदा त्यांना असेच याला भेट त्याला भेट असे हेलपाटे खावे लागले होते. आणि एवढे खस्ते खावूनही त्याची पोस्टींग खेडेगावी झालीच होती.

आताही तर तसंच नाहीना होणार...

मागच्या वेळपेक्षा यावेळी बदली थांबवनं त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण तेव्हा ते तरूण होते . दगदग सहन करू शकत होते. विचार करता करता त्यांना ते मागचे त्यांच्या तारूण्यातले दिवस आठवू लागले.....

.... बस घाटातून गिरक्या घेत चालली होती. गणेश खिडकीच्या जवळच्या सिटवर बसलेला होता. त्याच्या शेजारी एक खेडूत बसलेला होता. बसच्या गिरटयांनी होणारी मळमळ टाळण्यासाठी गणेश खिडकीतून घाटातील हिरवळीवर आपले लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने बसमध्ये बसलेल्या इतर प्रवाश्यांवरून एकदा आपली नजर फिरविली. कुणी पेंगत होते तर कुणी आपापसात गप्पा मारीत होते. गाडीच्या मधल्या रिकाम्या जागेतसुध्दा काही प्रवाशी उभे होते. कुणी मधे असलेल्या लोखंडी खांबाचा आधार घेऊन उभे होते तर कुणी बाजूच्या सिटचा आधार घेऊन उभे होते. त्या गर्दीतून रस्ता काढीत कंडक्टर आपल्या जागेजवळ गेला. त्याच्या सिटवर बसलेल्या माणसाकडे त्याने नुसते बघितले. त्या बसलेल्या माणसाने मुकाटयाने उठून कंडक्टरला बसायला जागा दिली. कंडक्टरने बसल्या बसल्या तिकीटांची बॅग चाळली आणि त्यातून एक कागद आणि पेन काढला. पेन कानाच्या मागे लावत त्याने त्या कचऱ्यात फेकून देण्याच्या लायकीच्या झालेल्या कागदाची घडी उकलली. मग तो एका हाताने तिकींटाचे नंबर पाहून दुसऱ्या हाताने कानामागचा पेन काढीत कागदावर लिहून घेत होता. तो हे सगळं इतक्या सफाईनं करीत होता की जणू त्यासाठी त्याला एखादं स्पेशल ट्रेनिंग दिलं असावं. नाहीतर बसचे इतके धक्के बसतांना कागदावर काही लिहिणं म्हणजे कठीणच नाही तर जवळ जवळ अशक्य होतं.

गणेशने पुन्हा आपली नजर खिडकीच्या बाहेर हिरवळीवर खिळविली. त्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. किती आटोकाट प्रयत्न करूनही ती वेळ त्याच्यावर आलीच होती. पाच वर्ष तिथेच तालूक्याच्या ठिकाणी कोर्टात डेली वेजेसवर कारकुणी केली. मग लग्नही केलं. आता पाचवर्षापर्यंतच्या प्रयत्नानंतर गणेशची ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाली होती. ग्रॅजूएट असूनही त्याच्यावर ग्रामसेवक म्हणून काम करण्याची पाळी आली होती. तीही नोकरी सहजा सहजी मिळालेली नव्हती. सतरा जणांचे लग्गे लावून, विनवण्या करून, पाय धरून आणि वरून पैसे सुध्दा चारल्यानंतर... तेव्हा कुठे ग्रामसेवकाची नोकरी मिळाली होती. नोकरी मिळाल्यानंतर प्रश्न होता नेमणूकीचा. गणेशला तालूक्याच्या जवळ 4-5 किलोमिटरच्या आतच एखादया खेडयात नेमणूक हवी होती. पुन्हा लग्गे, विनवण्या आणि पैसे देणे आलेच. तेही केलं. पण नाही. जे व्हायला नको होतं तेच झालं. तो आपली पोस्टींग तिथेच जवळपास एखाद्या खेडयावर करून घेऊ शकला नव्हता. नोकरी लावण्याच्या वेळी लावलेल्या लग्यापेक्षा यावेळी त्याच्या लग्याचं वजन कदाचित कमी पडलं असावं. आणि शेवटी नाईलाजाने का होईना त्याला आता तालूक्यापासून 50 किलोमिटर असलेल्या उजनी नावाच्या खेडयात नेमणूक होऊन जावे लागत होते. आज तिथे जाण्याचा त्याचा पहिलाच दिवस होता.

क्रमश:...

The richest man is not he who has the most, but he who needs the least.

-unknown Author

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Online Novels - Madhurani - CH - 3 ओळख

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

afw_logo

When a person can no longer laugh at himself, it is time for others to laugh at him.

--- homas Szasz

Online Novels - Madhurani - CH - 3 ओळख

गणेशराव आणि विनय समोरच्या त्या भल्यामोठ्या कंपाऊंडमध्ये शिरु लागले. कंपाऊंडच्या दरवाज्यावर त्यांना तेथील सेक्यूरीटी गार्डने हटकले. जेव्हा त्यांनी आपली ओळख दाखवून त्यांचा आत जाण्याचा उद्देश सांगितला तेव्हाच त्यांना आत जाण्यास परवानगी देण्यात आली. ते कंपाऊंडच्या दरवाज्यातून दुतर्फा शोभेची झाडे असलेल्या एका रूंद रस्त्यावरून आत जाऊ लागले. रस्त्याच्या कडेला उंचच्या उंच गगनचूंबी अशोकाची आणि निलगीरीची झाडे सुद्धा होती. जसे जसे ते आत जात होते तसा बंगल्याचा थोडा थोडा भाग त्यांच्या दृष्टीपथात पडू लागला. जेव्हा ते बंगल्याच्या अगदी जवळ गेले तेव्हा पूर्ण बंगला त्यांच्या दृष्टीपथात आला. बंगला कसला तो ! तो तर अक्षरशः राजवाडाच होता. चारही बाजूने भलेमोठे कंपाऊंड होते. आणि त्या कंपाऊंडमध्ये मोठमोठी झाडे वाढलेली होती. बाहेरून जर बघितले तर दृष्टीपथात ती झाडेच येत. बाहेरून आत झाडांच्या गर्दीत कुठेतरी बंगला असेल असे न माहित असणाऱ्यांना वाटणेच शक्य नाही. जेव्हा ते बंगल्याजवळ पोहोचले, त्यांनी बघितले की तिथे अक्षरशः लोकांची जत्रा भरली होती. बंगल्याच्या आजूबाजूला झाडांच्या सावलीत लोकांचे झुंडच्या झुंड बसले होते. धोतर घातलेले, पायजामा घातलेले, पँट शर्ट घातलेले, सगळ्या प्रकारची लोक होती. धोतर घातलेली खेड्यावरची मंडळी जास्त प्रमाणात दिसत होती. त्यातच काही काही खादीचा सदरा आणि पायजामा किंवा धोतर घातलेली लिडर मंडळी किंवा स्वत:ला लिडर समजत असलेली मंडळी मिरवत होती. गांधी टोपी आणि त्यातल्या त्यात ती जर तिरपी घातलेली असेल तर तो माणूस लिडर असला पाहिजे अशी गणेशरावांच्या मनात कुठेतरी खुणगाठ बांधलेली होती. अशा लोकांची नेहमीच गणेशरावांच्या मनात भीती राहीलेली होती. त्यामुळे गणेशराव होता होईस्तोवर अश्या लोकांच्या सानिध्यात येण्याचे टाळत असत. पण आज... पण आज वेळच तशी आली होती, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता.

लोक बाहेर आपला नंबर कधी येतो याची वाट पाहत बंगल्याबाहेर ताटकळत थांबले होते.

पण आपल्याला असं थांबण्याची गरज पडणार नाही...

आपली तर श्रेंष्ठींशी फार जवळची ओळख आहे...

विचार करीत गणेशरावांनी त्या आजुबाजूला ताटकळत उभ्या असलेल्या लोकांवरून एक नजर फिरविली. त्या नजरेत प्रयत्न करूनही थोडा का होईना एक तुच्छतेचा भाव चमकून गेला.

' विनू चल आपण सरळ आत जाऊ ' गणेशरावांनी विन्याला आपली तितकी ओळख असल्याच्या अभिमानाने म्हटले.

दोघंही बंगल्याच्या आत गेले. बंगल्याच्या अग्रभागी लोकांना थांबण्यासाठी एक मोठा हॉल होता. त्यात लोकांना बसण्याची व्यवस्था होती. गणेशराव विनयला घेऊन त्या हॉलमध्ये शिरले. हॉल लोकांनी अगदी तुडूंब भरला होता. गणेशरावांनी एकदा त्या सर्व ताटकळत बसलेल्या लोकांवरून आपली नजर फिरविली. काही लोक राजकारण्यासारखे कडक इस्तरीचे कपडे घालून मोठया थाटात तिथे बसले होते. काही जण दिनवाण्या नजरेने दरवाज्याकडे डोळे लावून आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहत बसले होते. इतके सगळे लोक आणि त्यातले काही आपल्यापेक्षा हौदयाने आणि प्रतिष्ठेने नक्कीच मोठे असलेले लोक पाहून गणेशरावांचा आत्मविश्वास डगमगू लागला. पण नाही आपली इतकी ओळख असतांना आपण घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आपल्या डोक्यात आलेला हीनतेचा भाव झटकला. त्यांनी इकडे तिकडे पाहून चार पाच दरवाजांपैकी श्रेष्ठींना भेटण्यासाठी जाण्याचा दरवाजा कोणता हे नक्की केलं आणि ते सरळ दरवाज्यातून आत जायला लागले.

एक बलदंड माणून त्यांना आडवा आला आणि त्याने इशारानेच 'काय काम आहे?' असे उद्दामपणे विचारले.

" भेटायचं आहे? "

" ही सगळी लोक सुध्दा भेटण्यासाठीच बसलेली आहेत "

तो माणूस तिरसटपणे म्हणाला.

" नाही माझी श्रेष्ठींशी फार जवळची ओळख आहे " गणेशराव अभिमानाने म्हणाले.

त्याने गणेशरावकडे वरून खालपर्यंत पाहिले आणि तो कुत्सितपणे हसत म्हणाला,

" अहो असं सगळेच जणं म्हणतात ... ते तिथे बाजूला त्या काऊंटरवर जा ... नाव गाव पत्ता आणि काय काम आहे असं व्यवस्थित चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी तिथे जमा करा...अन् मग तुमचं जेव्हा नाव पुकारण्यात येईल तेव्हा आत जा "

"पण.."

" अहो जर तुमची खरंच जवळची ओळख असेल तर तुम्हाला लवकर बोलावण्यात येईल" तो येड्याची समजूत पेढ्याने काढावी तसं लाडावत म्हणाला.

तरीही गणेशराव तिथून हटण्यास तयार नव्हते असं पाहून तिथे असलेल्या दुसऱ्या एका माणसाने त्यांना व्यवस्थित सगळे समजावून सांगितले. आपला झालेला अपमान गणेशरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपला अपमान गिळून विन्याची नजर चूकवत मुकाटयाने ते त्या काऊंटरपाशी गेले. तिथेही रांग लागलेली होती. मुकाटयाने जाऊन त्या रांगेत उभे राहाले. विन्याही मुद्दाम उद्दामपणे त्यांच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करीत आहे असे गणेशरावला जाणवले.

ही अशी का तुमची जवळची ओळख...

या अपमानापेक्षा ओळख नसलेली परवडली असती...

कमीत कमी अपमान तर झाला नसता...

असं कदाचित विन्याला म्हणायचे असेल असे गणेशरावांना तिरप्या नजरेने विन्याकडे पाहत असतांना जाणवले.

रांगेत आपला नंबर आल्यानंतर काऊंटरवर आपले नाव पत्ता आणि भेटण्याचा उद्देश लिहिलेली चिठ्ठी देऊन गणेशराव हॉलमध्ये बसण्यासाठी रिकामी खुर्ची शोधू लागले. प्रथम हॉलमध्ये एक नजर फिरविली नंतर हॉलमध्ये एक चक्कर मारली. हॉलमध्ये एकही रिकामी खुर्ची नव्हती. विन्या दरवाच्यातच आपल्या वडीलांकडे चिडलेल्या नजरेने पाहत उभा राहिला. शेवटी गणेशराव आपल्या मुलाकडे त्याची चिडलेली आणि रागावलेली दृष्टी टाळत जायला लागले.

" गणेशराव सायेब... " अचानक मागून आवाज आला.

गणेशरावांनी आश्चर्याने वळून पाहिले.

चला आपल्याला इथे कुणी ओळखतो तर...

त्यांना हायसं वाटलं होतं. त्यांनी मागे पहायच्या आधी अभिमानाने एक दृष्टी आपल्या मुलाकडे टाकली. त्याच्या चेहऱ्यावरच्या अविर्भावात काहीच फरक नव्हता. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक खेडूत त्यांना आवाज देत खुर्चीवरून उठून उभा राहिला होता. ते त्या खेडूताला ओळखत नव्हते पण कदाचित तो त्यांना ओळखत असावा. आता नोकरीच्या निमित्ताने हजारो लोकांचा संबंध येतो. सगळयांची ओळख ठेवणं जरा कठीणच होतं आणि त्यातच त्यांच उतरतं वय. स्मरणशक्तीही पहिल्यासारखी तल्लख राहिली नव्हती आता.

त्यांनी त्याला स्माईल दिलं.

" या सायेब ... इथं बसा"

त्या खेडूताने त्यांना खुर्ची ऑफर करीत म्हटले.

ते खुशीत चालत त्या खेडूताजवळ गेले. त्यांना खरोखरच गहिवरून आलं होतं. त्या खेडूताच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारीत म्हणाले,

" अरे ... राहूदे... तू बसकी ... आम्ही बाहेर जाऊन उभे राहतो... "

" नाय सायेब ... आसं कसं ... आमी बसायचं अन् तुमी उभं राहायचं ... बसा बसा" तो नम्रतेने म्हणाला.

त्यांना तिथे त्याला उठवून बसणं ही योग्य वाटत नव्हतं आणि त्याच्या आग्रहाचा मानही तोडवत नव्हता. शेवटी त्याच्या आग्रहाचा मान राखून ते तिथे खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसून त्यांनी दरवाजाकडे बघितले. त्यांचा मुलगा तिथे दिसत नव्हता.

कदाचित बाहेर उभा राहिला असावा मोकळ्या हवेत...

" मी भायेर हाय सायेब.. " म्हणत तो खेडूतसुध्दा हॉलमधून बाहेर पडला.

तो इतका भराभरा तिथून निघून गेला की गणेशरावांना त्याने 'धन्यवाद' म्हणण्याचीसुध्दा संधी दिली नाही.

क्रमश:...

When a person can no longer laugh at himself, it is time for others to laugh at him.

-- homas Szasz

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi literature blog - Novel - Madhurani CH-2 - रिक्षावाला

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

marathi-jokes Marathi literature blog - Novel - Madhurani CH-2 - रिक्षावाला

Wisdom quote-

You can do anything, but not everything.

avid Allen

गणेशराव आणि त्यांचा मुलगा विन्या एका रिक्षात बसून निघाले - बंगल्याकडे. रिक्षात गणेशरावांच्या बाजूला स्पंजच्या गादीवर एक सीट रिकामी होती. पण विन्या गणेशरावांच्या बाजूला न बसता समोर एक लाकडाची फळी होती त्यावर बसला . गणेशरावांनी त्याला त्यांच्या बाजूला बसायला सांगितलेसुध्दा होते. पण नाही.

'' नाही इथंच बरं आहे हवा चांगली लागते '' तो म्हणाला.

गणेशरावांना माहित होतं तिथं लाकडाच्या फळीवर किंवा इथे स्पंचच्या सीटवर बसल्याने लागणाऱ्या हवेत काही फरक पडणार नव्हता.

जनरेशन गॅप दुसरं काय...

किंवा कदाचित आपणच आपल्या मुलाशी मित्राप्रमाणे जवळीक निर्माण करण्यास अयशस्वी राहिलो...

काय करणार आपलं जीवनाचं गणितच पहिल्यापासून चूकत गेलं...

लग्नासाठी मुली पाहतांना गफल्लत झाली आणि अशी तापट बायको पदरी पडली...

पण ती सुरवातीला अशी तापट नव्हती...

ती आत्ता आत्ता मागच्या पाच सहा वर्षापासून तापट झाली...

कि तिलाही असेच वाटत असेल की आपल्याला चूकीचा नवरा मिळाला म्हणून...

अन् ते तर ते हे असं बिनडोक पोरगं पोटी आलं...

आपल्या नोकरीमुळं आपण त्याच्या अभ्यासावर तेवढं लक्ष केंद्रीत करु शकलो नाही हे जरी खरं असलं...

तरी लोकांची पोरं आहेतच की ज्यांचे मायबाप तर त्यांच्या अभ्यासावर बिलकूल लक्ष देऊ शकत नाहीत...

मग ती कशी पुढं जातात..

हा आपला पोरगाच लेकाचा ठोंब्या आहे...

याच्या वयाचं असतांना आपल्याला हा झाला होता..

अन् याचं तर अजून नोकरीचचं काही नाही...

लग्नाची तर गोष्टच दूर...

काय करणार आपलं नशिबच खोटं दुसरं काय...

तेवढ्यात रस्त्यावर चढ लागला आणि रिक्षावाला खाली उतरुन रिक्षा ओढू लागला. रिक्षा ओढणारा पूर्ण शक्तीनिशी रिक्षा ओढू लागला. रिक्षा ओढतांना त्याच्या काळ्याकुट्ट पायाचे आणि हाताचे स्नायू कसे तटातट वर येत होते. शिरा तर अश्या फुगल्या होत्या की वाटत होतं फुटतात की काय? त्यातचं उन्हाळ्यातल्या सकाळच्या रणरणत्या उन्हात त्याला घाम फुटला होता. घाम कदाचित उन्हापेक्षा त्याला होणाऱ्या शारीरीक कष्टानेच फुटला असावा. गणेशला त्या रिक्षावाल्याची कीव आली

'' थांबा मी उतरतो म्हणजे सोपे जाईल.. '' गणेशराव म्हणाले.

रिक्षावाला काहीच बोलला नाही तो आपला रिक्षा ओढण्यात मग्न होता. गणेशराव रिक्षा हळू झाल्याचा फायदा घेऊन रिक्षाच्या खाली उतरले. विन्याने तुच्छतेने नुसते त्याच्या बापाकडे पाहिले आणि तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांकडे पाहत रिक्षात बसून राहिला.

" आवो उतरले कशाला ... बसा की ... हा झालाच की आता चढ... मंग उतारच उतार..." रिक्षावाला म्हणाला.

चढ संपला तसे रिक्षावाला थांबला आणि गणेशराव रिक्षात बसले. रिक्षावालाही त्याच्या सिटवर चढून बसला. आणि मग उतारावर रिक्षा मस्त संथपैकी पायडल न मारता चालू लागली. तोच आता दु:खी कष्टी दिसत असलेला रिक्षाचालक मस्तपैकी उलटे पायडल फिरवीत तोंडाने शीळ घालू लागला.

आता काय म्हणावं या रिक्षाचालकाला?...

एवढ्या बिकट कष्टी जीवनातसुध्दा तो आनंद शोधू शकतो...

म्हणजे आनंदी राहाणं हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून नसून तुमच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोणावर अवलंबून असते..

या रिक्षावाल्यापेक्षा आपली परिस्थिती तर हजारो पटीने चांगली आहे...

मग आपणच का असे नेहमी दु:खी कष्टी राहतो...

रिक्षा एका चारही बाजूने मोठमोठी झाडे असलेल्या एका भल्यामोठया कंपाऊंडसमोर थांबली. गणेशराव आणि विन्या रिक्षातून उतरले.

" किती झाले"?'' गणेशरावने विचारले.

" चार" रिक्षावाला खांद्यावरच्या रुमालाने आपला घाम पुसत म्हणाला.

गणेशरावने एक पाच रुपयाची नोट काढून त्याच्या हवाली केली. त्याने ती घेतली आणि मग पायजामाच्या प्रथम उजव्या आणि मग डाव्या खिशात तो एक रुपयाचे नाणे शोधू लागला.

' राहूदे एक रुपया ठेवून घे' असं म्हणण्याचे गणेशरावांच्या जवळजवळ तोंडात आले.

पण नको...

हा विन्या घरी गेल्यावर बोंबलायचा...

मला खर्चाला द्यायला तुमच्याजवळ पैसे नसतात...

अन् त्या रिक्षावाल्यावर फुकट उधळायला असतात...

त्या रिक्षावाल्याने एक रुपयाचे नाणे शोधून गणेशरावांच्या हातावर ठेवले. त्यांनी ते आपल्या सदऱ्याच्या डाव्या खिशात ठेवले. त्यांना तशी सवयच होती. चिल्हर नोटा सगळ्या वरच्या खिशात. चिल्हर नाणे सगळे सदऱ्याच्या डाव्या खिशात आणि मोठ्या नोटा सगळ्या सदऱ्याखाली असलेल्या कापडाच्या बनेनच्या चोरखिशात.

क्रमश:

Wisdom quote-

You can do anything, but not everything.

avid Allen

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi new books - Novel - Madhurani CH-1 - 'स्ट्रेट ट्रीज आर कट र्फस्ट'

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

marathi-new-jokes

Best quotes -

Perfection is achieved, not when there is nothing more to add, but when there is nothing left to take away.

—Antoine de Saint-Exupéry

गणेशराव अंघोळ आटोपून आपले कपडे घालत होते. पांढरा टेरीकॉटचा सदरा आणि पांढरा त्याच कापडाचा नाड्याचा पायजामा. त्यांच्या हालचालीवरून वयाच्या पन्नाशीच्या मानाने त्यांच शरीर जरा जास्तच थकलेलं दिसत होतं. काय करणार वयापेक्षा बीपी, शूगर, अॅसीडीटी अशा वेगवेगळया व्याधींनीच त्यांना जास्त हैराण करून सोडलं होतं. त्यांना आठवलं...

आपण जेव्हा तरुण होतो पँट शर्ट घालायचो...

तेही सुरवातीला इन वैगेरे करून .... अगदी टापटीप...

खरंच माणसात कसा हळू हळू बदल होतो...

आजुबाजूच्या परिस्थितीचा माणसावर किती मोठा पगडा असतो...

इकडे गणेशरावांची कपडे घालण्याची गडबड आणि तिकडे स्वयंपाकघरात बायकोची भांडयाची आदळआपट आणि तोंडाची वटवट चालू होती - नेहमीप्रमाणे.

"'25 वर्ष झाले नोकरी करता अन्... इतके वर्ष झाले ....काय कमावलं तर डीपार्टमेंटमध्ये थोडीसुध्दा ओळख नाही... चांगलं इथं तालूक्याचं गाव होतं... अन् त्यातल्या त्यात आपलं घरही इथं होतं... धरलं त्या लोकांनी आणि बदली करून दिलं 70 किलोमिटर दूर फेकून ... कोण्या खेडेगावात... म्हणजे त्यांची कायमची कटकट दूर झाली... मी कितीदा म्हणत होते... जास्त इमानदारी काय कामाची नाही ... इमानदार लोकांनाच असं भोगावं लागतं"....''

गणेशरावांच्या डोक्यात एक वाक्य येऊन गेलं-

'स्ट्रेट ट्रीज आर कट र्फस्ट' ...

आपल्या बाबतीत लागू पडते का?...

पडते थोडं थोडं...

कुणाचं वाक्य आहे हे?...

कोणत्या पुस्तकातलं आहे?...

काही आठवत नाही ...

पण याच अर्थाचं काहीतरी आपल्या चाणक्यानं संस्कृतमध्ये लिहून ठेवलय म्हणे...

त्यांच्या बायकोची बडबड चालूच होती

''... पण ऐकणार कोण ... मी अडाणी पडते ना ... पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारी ज्ञान केव्हाही श्रेष्ठ ... पण ऐकतय कोण माझं डोंबलं...''

आता मात्र गणेशरावांना राहावलं गेलं नाही. पुस्तकी ज्ञानाचा उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागला होता.

'' ... आता तू जरा तूझी वटवट बंद करशील ... चाललो ना आता ... त्याच्यासाठीच तर चाललो ना बंगल्यावर ...''

ते चिडून म्हणाले.

'' म्हणजे माझ बोलणं तुम्हाला वटवट वाटते तर... इतके वर्ष संसार करून मीच सांभाळत आले तुम्हाला म्हटलं ...मागच्या वेळेस माझ्या भावाने मदत नसती केली तर न जाणे कुठे सडत पडले असते नोकरी करत...''

'' तो तुझा भाऊ गप्पाडया ... कसला करतो मदत ... गप्पा करतो नुसत्या''

गणेशरावही आता भांडायच्या मूडमध्ये आले.

'' हे बघा ... सांगून ठेवते ... माझ्या माहेरच्यांना काही म्हणायचं नाही''

त्यांची बायको म्हणाली.

'' अन् म्हटलं तर काय करशील... सोडून देशील मला''

'' हं हेच तर पाहिजेना तुम्हाला ... सोडून दिलं म्हणजे नवी कोरी बायको आणता येते ना..''

तेवढयात आतून त्यांचा 25-26 वर्षाचा मुलगा विन्या तिथे आला. तो चांगला आडदांड आणि चेहऱ्याने राकट होता.

'' ए चूप ... एकदम चूप'' तो जोराने ओरडला.

'' सालं ... इथं जीनं मुश्कील करून टाकलं या थेरडयांनी''

आता मात्र दोघंही एकदम गप्प झाले.

आता काय म्हणावं आजकालच्या पोरांना ...

एकदम थेरडा म्हणतो मायबापांना...

पण जाऊ दे कमीत कमी अजूनतरी आहो जाहो करतो...

तेवढ्यावरच समाधान मानायला पाहिजे...

त्यांच्या मुलाने रागाने एकदा दोनदा आतबाहेर चकरा मारल्या आणि गणेशरावांचं अजूनही संथ गतिने चाललेलं पाहून म्हणाला

'' मग जायचं ना बंगल्यावर ?''

'' हो... हे बघ झालंच'' गणेशराव घाई करत असल्याचं दाखवून म्हणाले.

'' अन् नुसतं तुमच्या बदलीचं घेऊन बसू नका... माझ्या नोकरीचं बघा ... तेच सगळयात महत्वाचं आहे''

'' हो...'' गणेशरावच्या तोंडातून निघाले.

विन्या काळं टी शर्ट आणि खाली जिन्सचा पँट घालून तयार होता.

'' तू हे कपडे घालणार?...' "

'' हो काय झालं याला?... ''

'' तो दिवाळीला घेतलेला ड्रेस घालकी ... त्या लोकांसमोर हे टी शर्ट अन् हा पँट चांगला नाही दिसणार"

"" चांगला दिसणार नाही?... त्यांना म्हणावं हा असा आहे माझा पोरगा... अन् आजकाल हीच फॅशन आहे"''

'' अरे पण... ''

'' तुम्ही ते माझ्या कपड्याबिपड्याचं बघू नका... त्यांना काय बोलायचं... कसं बोलायचं ते फक्त बघा.'"

गणेशराव काहीच बोलले नाही. त्यांनी 'आता काय बोलणार याला?' अशा अविर्भावात फक्त हवेत हात फिरवला.

क्रमश:...

Best quotes -

Perfection is achieved, not when there is nothing more to add, but when there is nothing left to take away.

—Antoine de Saint-Exupéry

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Next Marathi Novel Madhurani ( मधूराणी) starting from 8/7/2009 ...

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

free-ejokes-online

आपल्याला कराव्या लागलेल्या प्रदीर्घ प्रतिक्षेबद्दल क्षमस्व.... खरं म्हणजे मी आधी आपल्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या ब्लॉगवर 'मृगजळ'च प्रकाशित करणार होतो. पण ती कादंबरी वेळेत पुर्ण होवू शकली नाही आणि म्हणून त्याऐवजी मी 'मधूराणी' या ब्लॉगवर दि. 8-7-2009 पासून प्रकाशित करण्याचे ठरविले आहे... याही वेळा आपण मला आधी प्रमाणेच उदंड प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो...

धन्यवाद् !

 

... सुनिल डोईफोडे.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network