कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

A story of a femine power - कादंबरी - मधुराणी - Complete Novel

Next Chapter Previous Chapter

This Novel in English




वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
Email this Novel to your friends using following controls!
Bookmark and Share
SocialTwist Tell-a-Friend





CH-1 - 'स्ट्रेट ट्रीज आर कट र्फस्ट

CH-2 - रिक्षावाला

CH-3 ओळख

CH-4 ते दिवस

CH-5 उजनी

CH - 6 सदा

CH-7 सरपंच

CH-8 खोली

CH-9 खराडे साहेब

CH-10 व्हिल्स

CH-11 कनेक्सन

CH-12 नजरेचे तिर

CH-13 घर

CH-14 स्पर्श

CH- 15 आपल्या घरी

CH-16 पुनर्मीलन

CH-17 ऑफीस

CH-18 - गुपीत भाषेचं रहस्य

CH-19 अष्टावधानी

CH-20 आठवडी बाजार

CH -21उत्साहाचं रहस्य 

CH-22 गोची

CH-23 गेसींग

CH-24 जिंदाबाद

CH-25 सिग्नल

CH-26 पाटलाचा वाडा

CH-27 मिटींग

CH-28 पाटील कसे नाही आले अजून?

CH 29 मंग मिटींग करायची सुरु?

CH-30 लर्फवर्फकर्फर येर्फे ...

CH 31काय डेंजर लोक आहेत ...

CH-32 चोरी

CH-33 गावातली क्रिकेट

CH-34 शिरशिरी

CH-35 मुक्याचं लग्न

CH-36 दाराची कडी

CH - 37 तिला राग तर नाही आला?

CH 38 भिक्याला काय झालं?



CH-39 प्रकरणावर पडदा

- समाप्त -
Email this Novel to your friends using following controls!
Bookmark and Share
SocialTwist Tell-a-Friend

कृपया या कादंबरीबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना ईमेल करा !


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Complete Novel - Madhurani CH-60 शेवटचा डाव (समाप्त)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Complete Novel  - Madhurani CH-60 शेवटचा डाव (समाप्त)

इतरत्र परिस्थीती आवाक्याबाहेर जरी गेली असली तरी गणेशरावने आपल्या साथीदारांच्या मदतीने लोकांना स्टेजकडे जाण्यास रोकले होते. तरीही गणेशराव आणि त्यांच्या साथीदारांची त्या लाल दिवटे बांधलेल्या लोकांशी चकमक अजुनही सुरुच होती. त्या लोकांशी चार हात करता करता, गणेशचे पटांगणात जिकडे त्याने त्याचे तिन खास जवळचे सहकारी मधुकररावची खबर घेण्यास पाठवले होते, त्या बाजुला लक्ष होते. तसे मधुकराव आणि ते पाठवलेले तिन्ही साथीदार गणेशराव ज्या जागेवर होते तेथून दिसत नव्हते. ते त्यांच्यावर दिलेलं काम फत्ते करतील याची गणेशरावला खात्री होती. पण बराच वेळ झाला तरी ते अजून दिसत नव्हते. गणेशरावला काळजी वाटू लागली.
की मधुकररावने त्यांचाच काटा काढला..
नाना प्रकारच्या शंका गणेशच्या डोक्यात येत होत्या. तेवढ्यात गणेशरावला ते तिघेही त्यांच्याकडे परत येतांना दिसले. त्यांच्या चालीत एक जोम होता आणि चेहऱ्यावर विजयी हास्य होते. म्हणजे त्यांनी सोपविलेले काम फत्ते केलेले दिसत होते. गणेशरावांच्या चेहऱ्यावरही हास्य तरळू लागले. ते आता त्यांचे साथीदार त्यांच्या जवळ येवून ती खबर त्यांच्याकडून एकण्यास उत्सुक होते. ती खबर एकण्यात जो एक आनंद होता तो त्यांना गमवायचा नव्हता. एव्हाना ते तिघे येवून गणेशरावच्या मागे उभे राहाले. गणेशराव आता वळून त्यांच्याकडून ती खबर एकणार तेवढ्यात त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजुवर काठीचा एक जबरदस्त दणका बसला. गणेशराव घेरी येवूनच पडले. गणेशरावांनी पडल्या पडल्या डोळे उघडून पाहाले तर त्यांच्या लक्षात आलेकी त्यांच्या साथीदारांपैकी बिंबानेच तो वार केला होता. त्यांनी आश्चर्याने त्यांच्या बाकी दोन साथीदारांकडे पाहाले. ते त्यांच्याकडे पाहून कुत्सीतपणे हसत होते आणि पुढचा वार करण्यास तयार होते. तेवढ्यात पुढील वार त्यांच्या कपाळावर करण्यात आला. यावेळी तो वार त्यांच्या विश्वासू साथीदार राजुने केला होता.
एव्हाना गणेशरावांच्या लक्षात आले की त्यांचा विश्वासघात झालेला होता...
पण का?... आणि कसा?...
कळायला काही मार्ग नव्हता.
नंतर एकामागुन एक काठीचे वार त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पोटावर होत होते. वार करणारे ते तिघेच होते... त्यांचे विश्वासू सहकारी. त्या तिघांनी झोडून झोडून गणेशरावांना अर्धमेलें केलं होतं. तेवढ्यात लाल दिवटेवाल्यांच्या एक मोठा लोंढा तिकडे येतांना दिसताच त्या तिघांनी काढता पाय घेतला. खाली पडलेल्या गणेशचे अनायसेच लक्ष तिकडे स्टेजच्या बाजूला गेले. लोकांच्या गर्दीतून वाचवत चारपाच कार्यर्कत्यांनी मधुराणीला तिच्या गाडीजवळ आणले होते. त्यात मधूकरावही होते. ते लोक पटापट गाडीत बसले. मधूकररावची आणि गणेशरावची नजरानजर झाली. मधूकरराव त्याच्याकडे पाहून गुढपणे हसले. मग मधूकरराव मधूराणीशी गणेशरावांकडे बोट दाखवत काहीतरी बोलले.
मधुराणीची आणि गणेशरावची नजरा नजर झाली.
म्हणजे हे जे केले ते मधूकररावने आणि त्यात मधूराणीचीही संम्मती होती...
पण का?... व ... कसे?...
तेवढ्यात गणेशरावला मधूकररावच्या गळ्यात त्यांनी त्याच्या त्या तिन साथीदारांच्या स्वाधीन केलेली ती स्वत:ची सोन्याची चैन दिसली.
अच्छा तर ते असं झालं..... .......
गणेशरावला आता एक एक गोष्ट स्पष्ट होवू लागली होती. गणेशरावच्या तिन साथीदाराने त्याच्याकडे येवून ती बातमी देणं म्हणजे तो एक मधूकरावाच्या डावाचाच भाग असावा.... की जेणेकरुन गणेशरावने त्याच्यावर वार करावा. आणि तसेच झाले. आणि जेव्हा गणेशराव मधूकराववर वार करायला गेले ते मधूकरावने मधूराणीच्या निर्दशनास आणून देले असावे. पुरावा म्हणून त्यांच्याजवळ त्याची चेन आणि अंगठ्या होत्याच. आणि मधूराणीला जेव्हा खात्री झाली की गणेशराव आपल्याला अंधारात ठेवून येवढं मोठं पाऊल उचलू शकतो, म्हणजे तो माणूस धोकादायक आहे. मग मधूकरावने गणेशरावचाच काटा काढण्याची परवानगी मधूराणीला माघीतली असेल आणि ती मधूराणीने त्याला दिली असणार.
तरीही गणेशरावच्या मनात मधूराणीबद्दल एक खोटी आशा डोकावली...
ती आता आपल्यालाही नेण्याची व्यवस्था करेल... .
तो जाण्यासाठी तयारच होता.
पण ती नजर आता त्याला ओळखत नव्हती...
ती नजर भेदरलेलीही नव्हती...
एवढा सगळा हिंसाचार चाललेला पाहून त्या नजरेत भीतीही नव्हती...
दु:ख ही नव्हते... कीवही नव्हती...
त्या नजरेत होती एक महत्वाकांक्षा...
वाटेत जेही येतील त्यांना वेळ आल्यास तुडवून जाण्याची जिद्द..
तिने बघून न बघितल्यासारखे करून दुसरीकडे नजर फिरविली आणि गाडी तिथून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आदेश दिला. गाडी सुरु होऊन ते तेथून पसार सुध्दा झाले. गणेशराव बघतच राहाले. गणेशरावच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते अजूनही मधुराणी स्टेजवर आहे असं समजून त्या लोकांशी लढा देत होते.
म्हणजे ह्या सगळ्यांना मरायला सोडून मधुराणीने पळ काढला होता...
आणि हे सगळे मुर्खासारखे लढत होते ...
गणेशराव अजूनही खाली पडल्या पडल्या धडपडत होते. आता मधुराणीसाठी नाही तर स्वत:चा जीव वाचविण्यासाठी. तेवढ्यात अचानक एक लोकांचा ओंढा गणेशरावकडे आला. ते लोक संख्येने एवढे जास्त होते की गणेशरावला काहीच करता आले नाही. ते लोक अक्षरश: गणेशरावला चिरडून पुढे निघून गेले. मग एकानंतर एक असे लोक त्यांना तुडवत होते. त्यांचा आक्रोश एवढ्या गोंधळात कुणालाही ऐकू येत नव्हता.
लोकांचा लोंढा गणेशरावला तुडवून जाऊन आता ओसरला होता. पण त्यांचा एकही अवयव शाबूत राहिला नव्हता. हललं तरीसुध्दा असह्य वेदना होत होत्या. त्यांनी तसंच पडलेल्या अवस्थेत आजुबाजूला एक नजर फिरविली. त्या उठलेल्या मोहोळाच्या माश्या अजूनही लोकांना चावत होत्या. लोक त्या माशांना आपल्या शरीरावरून ओरबडून चिरडून मारुन टाकण्याचा प्रयत्न करीत. त्यात बऱ्याच माशा मेल्या होत्या.
कामगार माश्याच त्या...
त्यांचं कर्तव्य होतं आपल्या राणी माशीचं सरंक्षण करणे....
गणेशरावला आता आपले प्राण पाखरु उडण्याचीच वाट होती. नव्हे त्यांना आता त्यांचे प्राणपाखरु उडण्याची घाई झाली होती. कारण प्राण गेले म्हणजे त्यांची होणाऱ्या असह्य वेदनेतून सुटका तरी होणार होती. अचानक त्यांची नजर आकाशाकडे गेली. आकाशात त्या आंब्यावरच्या मोहोळातली राणी मधमाशी आपल्या सोबत काही नर मधमाशांना आणि काही कामगार माश्यांना घेऊन पुर्वेकडे निघाली होती. नव्या जागेच्या शोधात. आणि ती जात आहे या गोष्टीपासून अनभिज्ञ इथे खाली तिचे काही कामगार साथी अजूनही शर्थीने लढत होते- या मधूराणीच्या कार्यकर्त्यांसारखेच.
गणेशरावने एकदा शेवटची नजर आजूबाजूला फिरविली. त्यांचे साथीदार अजूनही काही जण मरत होते तर काही जण लढत होते. गणेशरावने विचार केला.
हा प्रत्येकजण इथे मरत आहे तो कामगार माशीचे मरण मरत होता...
त्याही परिस्थीतीत गणेशरावांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची चुणूक उमटून गेली. त्यांना या गोष्टीचे समाधान होते की त्यांच्या आजुबाजुचे मधूराणीचे कार्यकर्ते जे मरण पत्करत होते ते कामगार मधमाशीचं.. पण त्यांना जे मरण मिळत होतं ते एका नर मधमाशीचं ...

समाप्त

The end

कृपया या कादंबरीबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना ईमेल करा !





This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Fiction books- Madhurani - CH-59 झडप

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Fiction books- Madhurani - CH-59 झडप



ते लाल बावटे बांधलेले लोक आता काठ्या घेऊन स्टेजकडे झेपावले. पण गणेशराव आणि त्याचे साथी कार्यकर्ते त्यांना अडवू लागले. त्यामुळे त्यांच्यातही जुंपली. त्यांना माहित होतं की ही लोक जर स्टेजवर पोहोचली तर मधुराणी आणि तिच्या बरोबर असलेल्या इतर लिडर लोकांचं काही खरं नाही. मधुराणीच्या जीवालाही धोका होता. त्यामुळे गणेशराव आणि त्याचे कार्यकर्ते शर्थीने अक्षरश: त्याच्याशी एखादी खींड लढविल्यासारखे लढू लागले. ज्या आंब्याच्या झाडावरून मोहोळ उठले होते तेही गणेशराव जिथे त्या लोकांशी चार हात करीत होते तिथून जवळच होते. त्या माश्या तिथेसुध्दा पोहोचल्या होत्या. मधुराणीच्या कार्यर्कत्यांना अक्षरश: दोन शस्रांशी लढावे लागत होते. त्या लाल दिवटे बांधलेल्या लोकांच्या काठ्या आणि त्या उठलेल्या मोहोळाच्या माश्या. गणेशरावचा चेहरा तर दोनतीन माशा डसल्यामुळे सुजून टंब झाला होता. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. हे लोक स्टेजवर पोहोचता कामा नये. मधुराणीचा जीव वाचवणे सगळ्यात महत्वाचे.
नाही काहीही झालेतर बेहत्तर ...
मधुराणीला काहीही व्हायला नको ...
शेवटी तीच तर आता आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा सहारा झाली होती...
कितीही नाही म्हटलं तरी आपला तिच्यावर जीव बसलेला आहे...
नाहीतर आपण जीवाची पर्वा न करता एवढ्या शर्थीने लढलो असतो का? ...
त्यांच्या समोर काही कार्यर्कत्याने तिथून काढता पाय घेऊन पळ काढला होता.
आपणही तसा पळ काढू शकलो असतो...
पण गणेशरावमध्ये आज काय संचारले होते काय माहित. ते या वयातही एकेका लाल दिवटे बांधलेल्या लोकांचा फज्जा पाडत होते. त्यांच्या हातातही एक काठी आली होती. ते ती एखाद्या तलवारीसारखी फिरवत होते.
हा सगळा गोंधळ चालू असतांना गणेशरावला मधूकराव त्यांच्या जवळून स्टेजकडे जात असलेले दिसले. त्यांची नजरा नजर होताच मधूकरराव गणेशरावला म्हणाले, " गणेशराव एकही दिवटा वर पोहोचला नाही पाहिजे ... साल्यांचा जीव घेण्याची वेळ आली तरी बेहत्तर... मी तिकडे मधुराणीच्या सुरक्षतेची व्यवस्था करतो."
पोलीसांची मागावून मागावलेली तुकडी आली होती. अश्रूधुरांच्या नळकांड्या फुटत होत्या. पण लोक कशालाही जुमानत नव्हते. कदाचित तो सगळा बंदोबस्त लोकांच्या संख्येच्या मानाने अगदीच तोकडा होता. गणेशराव आणि त्याच्या साथीदाराने यशस्वीरित्या लढून लोकांना स्टेजकडे जाण्यापासून रोकण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. तेवढ्यात गणेशरावच्या अगदी जवळचे तिन कार्यकर्ते त्यांच्याजवळ आले. गणेशरावच्या लक्षात आले की त्यांना काहीतरी खाजगीत बोलायचे होते. गणेशराव तेथील जबाबदारी इतर कार्यकर्त्यांवर सोपवून त्यांना घेवून बाजुला गेले.
'' साहेब खबर चांगली नाही...'' त्यातला एकजण म्हणाला.
'' काय झालं... जरा स्पष्ट सांग..'' गणेशरावच्या पोटात गोळा उठला होता.
मधूराणीला काही झालं की काय?...
'' मधूकराव आज तुमचा घात करण्याच्या विचारात आहे'' त्यातला एकजण म्हणाला.
'' काय?... तुम्हाला कोणी सांगितलं?'' गणेशरावांनी आश्चर्याने विचारले.
त्यांना असं कधीतरी होईल याची खात्री होतीच. पण ते इतक्या लवकर होईल याची अपेक्षा नव्हती.
'' राजूनं त्याच्या स्वत:च्या कानानं.. मधुकररावला... काशीनाथला सांगतांना एकलं'' त्यातला एक म्हणाला.
'' काय म्हणाला तो?'' गणेशरावांनी विचारले.
'' आज चांगला मौका आहे... गण्याला लेकाला आज ठेचा... माझ्याशी बरोबरी करतो साला... त्याला माहित नाही वाटतं एका म्यानात एकच तलवार राहू शकते म्हणून...'' असा म्हणाला होता तो काशीनाथला.
'' अ...सं'' गणेशराव विचार करत म्हणाला.
'' मग आता कसं करायचं?'' गणेश पुढे जणू स्वत:शीच बोलला.
'' साहेब तुम्ही आज्ञा द्या'' त्यातला राजू म्हणाला.
गणेशने राजूकडे निरखून पाहाले. त्याचा निश्चय पक्का दिसत होता. आणि या क्षणी त्याला कोणतीही आज्ञा दिल्यास तो स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता पार पाडणार होता यात शंका नव्हती.
गणेशरावचे आता जबडे वळू लागले होते.
'' हो त्याचं बरोबर आहे .. एका म्यानात एकच तलवार राहाली पाहिजे'' गणेश स्वत:ची सोन्याची चैन आणि अंगठ्या काढत त्यांच्या हवाली करीत निश्चयाने म्हणाला.
'' जी साहेब ... जशी तुमची आज्ञा... तसं तेही स्टेजच्या जवळ खाली गर्दीत उतरलं आहे... एका काठीत तं राम दावतो त्याला...'' त्यातला एक आडाणी आडदांड साथीदार बिंबा म्हणाला,.
'' हो साहेब'' बाकिच्या दोघांनीही हमी भरली.
आणि ते आपापल्या काठा सांभाळत मधूकराव ज्या बाजुला होता त्या बाजुला जावू लागले.
क्रमश:...



This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi kadambari - Madhurani CH-58 मधूराणीचं भाषण

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi kadambari - Madhurani CH-58 मधूराणीचं भाषण



बाकीच्या लिडर मंडळीची भाषणं आटोपल्यावर मधुराणी भाषणासाठी उभी राहाली. माइकसमोर गेल्यावर तिने एक बराच मोठा पॉज घेऊन समोर बसलेल्या लोकांच्या भव्य समुदायावर एक नजर फिरविली. सगळीकडे शांतता पसरली. जे काही लोक पेंगुळले होते ते कान टवकारुन ऐकण्यासाठी तयार झाले.
" बंधू आणि भगिनींनो..."
पुन्हा पॉज. लोकांचा टाळ्यांचा कडकडाट. आता कार्यर्कत्यांनी नव्हे तर लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या होत्या. शेवटी मधुराणीचे भाषण सुरु झाले या आनंदाने.
'चॅरिस्मा' म्हणतात तो हाच...
गणेशराव अभिमानाने तिच्याकडे पाहत होते.
नंतर मधुराणीचे जे भाषण सुरु झाले ते जवळपास पंचेचाळीस मिनिटे चालले. तिने लोकांना जसे मंत्रमुग्ध करून सोडले होते. गणेशरावने तिच्या वर्क्तुत्वाबद्दल आत्तापर्यंत नुसते ऐकलेच होते. आता ते स्वत: अनुभव घेत होते. खरोखर गणेशराव मंत्रमुग्ध झाले होते.
ते भानावर आले ते जनतेच्या समुदायात एका कोपऱ्यातून आलेल्या घोषणांमुळे.
" मधुराणी मुर्दाबाद..." कोपऱ्यातून एकदम अनपेक्षित घोषणा आल्या.
गणेशरावने वळून बघितले. तिकडे कोपऱ्यात लाल बावटे बांधलेले काठ्या घेऊन उभे असलेले काही तरुण त्यांना दिसले.
तरी मघाशी कुजबूज होतीच की कोणीतरी सभेत गोंधळ घालणार आहे म्हणून...
हे संपतराव पाटलाचा मुलगा दिपक पाटलाचं काम असावं...
संपतराव पाटील अपघातात मरण पावल्यापासून त्यांचा वारसदार मुलगा दिपक पाटलाने राजकारणाची सर्व सुत्र आपल्या हातात घेतली होती. त्यालाही कदाचित कल्पना असावी की त्याच्या वडीलाच्या मृत्यूमागे मधुराणीचाच हात असावा. कारण तेव्हापासूनच त्यांच्यातले सबंध दुरावत आणि बिघडत गेले होते. संपतराव हयात असते तर त्यांनी असा मार्ग चोखळला नसता. पण हा नव्या जोमाचा तरुण पोरगा. अंगात तरुण रक्त सळसळत होतं.
" मधुराणी मुर्दाबाद..." घोषणांचा जोम वाढतच होता.
सगळीकडे गोंधळ माजण्याची चिन्हं दिसत होती. मधुराणी एक क्षण थांबली. तिने मधूकरराव आणि इतर कार्यकर्ते मंडळीकडे एक नजर टाकली. मधुराणी आणि मधूकरावांमधे नजरेचीच काय मुक देवाणघेवाण झाली कुणास ठावूक. तो मोठ्या आवेशाने आपल्यासोबत आपल्या कार्यर्कत्यांना घेऊन तिकडे कोपऱ्यात जिकडून घोषणा येत होत्या तिकडे निघाला. मधुराणीने काहीही झाले नाही असा आव आणून आपले भाषण चालूच ठेवले.
मधूकरराव आणि त्याच्यासोबत बाकीचे चाळीस पन्नास कार्यकर्ते गेल्यावर प्रकरण अजूनच बिघडले. त्या लोकांजवळ काठ्या होत्याच त्यांनी काठ्यांनी मधुराणीच्या कार्यर्कत्यांना मारणे चालू केले. मधुराणीचे कार्यकर्तेही काही कमी नव्हते त्यांनीही त्यांच्याजवळच्याच काठ्या हिसकून त्यांनाच मारणे सुरु केले. पण इकडे जमलेल्या लोकांत गोंधळ सुरु झाला. पळापळी सुरु झाली. मधुराणीला भाषण थांबवावे लागले.
एक पोलीस अधिकारी माइकवर लोकांना शांत राहण्याचे आव्हान करु लागला. पण आता लोक आवाक्याबाहेर गेले होते. ते लाल दिवटे बांधलेले आणि काठ्या घेतलेले लोकही आता संख्येने वाढू लागले. ते काठ्यांनी आणि मधुराणीचे कार्यकर्ते त्यांच्याजवळ काही नसल्यामुळे आता दगड मारु लागले. ते कुठून येत होते काही पत्ताच लागत नव्हता. कदाचित ते आधीच लोकांत येऊन इकडे तिकडे विखुरले असावेत. त्यात अजून गोंधळ म्हणजे मधुराणीच्या एका माणसाने मारलेला एक दगड तिथे मैदानात आंब्याच्या झाडावर असलेल्या एका आग्या मोहोळाला जाऊन लागला. त्या सगळ्या माश्या उठल्या आणि तिथे जमलेल्या प्रेक्षक जनतेला डसू लागल्या. त्या माशांना काय... कोण मधुराणीकडचा? आणि कोण विरोधातला?. त्या सापडेल त्याला डसू लागल्या. त्या मोहोळाच्या माश्यांमुळे तर लोकांत अजूनच गोंधळ वाढला, चेंगरा चेंगरी वाढली.
हे सगळं मधुराणीच्या विरोधकाचंच कट कारस्थान होतं पण ते या स्तराला जातील किंवा प्रकरण एवढं बिघडेल असा कुणालाच अंदाज नव्हता. पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनला फोन करून शस्त्रास्त्राने लेस अजून पोलीस बोलवून घेतले.
क्रमश:...



This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi books world - Madhurani CH-57b तो म्हातारा कोण?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi books world - Madhurani CH-57b तो म्हातारा कोण?


मग भाषणांची झड सुरु झाली. मधुराणीसोबत स्टेजवर गेलेले नेते अधाश्यासारखे भाषणांवर भाषणं ठोकत होते. जसा त्यांना हा चांगलाच चान्स मिळाला होता. भाषण सुरु असतांना मधेच एखाद्या वाक्यावर मधुराणीचेच कार्यकर्ते टाळ्या वाजवत. आणि त्यांनी टाळ्या वाजविल्या की मग लाजेखातर का होईना बाकीची पब्लीक टाळ्या वाजवत असे. ते टाळ्या वाजविणारे कार्यकर्ते सुध्दा त्यांना नेमुन दिलेल्या कामाचाच भाग म्हणून की काय मधे मधे न चूकता टाळ्या वाजवत आणि मग बाकी पब्लीकही टाळ्यांचा कडकडाट करीत असे. भाषणांच्या फैरीवर फैरी चालू होत्या. मधुराणीचे भाषण मानाच्या स्थानावर म्हणजे सगळ्यात शेवटी होते.
गणेशरावला तेच ते रटाळ त्या लोकांची भाषणं ऐकण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते. त्यांनी एक जांभाळी देत आपल्या आजूबाजूच्या लोकांवर एक नजर फिरविली. तिकडे एका जागी त्यांना एक म्हातारा ओळखीचा असल्यासारखा वाटला. गणेशराव आठवण्याचा प्रयत्न करु लागले की या माणसाला आपण कुठे पाहाले?. त्या माणसाचे लक्षही गणेशरावकडे गेले. त्यांची नजरानजर झाली. पण त्याने चटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. गणेशराव आता त्या माणसाच्या जवळ जायला लागले. त्या माणसाने तिरप्या नजरेने गणेशरावला आपल्याकडे येतांना पाहले. एव्हाना गणेशराव त्या माणसाच्या शेजारी जाऊन त्याच्याकडे पाहत त्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न करु लागले.
" तुम्हाला कुठेतरी पाहल्यासारखे वाटते...? " गणेशरावने प्रश्नार्थक नजरेने पाहत त्या माणसाला विचारले.
" गणेशरावनं तुमी?..." त्याने विचारलेे.
" हो .... पण आपण कोण?" गणेशरावने विचारले.
" म्या उजनीचा..." तो म्हातारा म्हणाला.
भराभर एकामागे एक अशी दिवंगत स्मृतीतील चित्र गणेशरावच्या डोळ्यासमोरुन गेली आणि त्यांना मग उलगडा झाला...
अरे हा तर मुकीचा बाप....
पांडूरंग ... नाही पांडूरंग तर मुक्याचा बाप...
हा बहुत्येक रघुजी...
" हो ... हो... आता ओळखलं मी तुम्हाला" तो आपली अजून ओळख देण्याच्या आधी गणेशराव पटकन म्हणाले.
" कसं काय बरं आहे?" गणेशरावने त्याची विचारपुस केली.
" हो... बरंच मनायचं... दोन टायमाचं खायला प्यायला भेटते ... आजून काय फायजे ... आमच्यासारख्या गरीब माणसास्नी" तो एक सुस्कारा टाकत म्हणाला.
गणेशरावला ज्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा होती ते उत्तर गणेशरावला मिळालं नव्हतं.
म्हणून अजून स्पष्टपणे गणेशरावने विचारले, " कसं काय चाललं तुमच्या मुलीचं?"
" मुलीचं?" तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.
" म्हणजे... मुकीचं" गणेशराव अजून स्पष्टपणे म्हणाले.
गणेशरावला मुकीचं नाव माहित नव्हतं. सगळा गाव तिला मुकी या नावानेच ओळखत असे.
त्याने एक आर्त नजर गणेशरावकडे टाकली. आणि तो स्तब्धपणे स्टेजकडे पाहू लागला. कदाचित तो आपल्या भावना लपविण्याचा प्रयत्न करु लागला.
गणेशराव विचार करु लागले.
आपण चूकीचा प्रश्न तर नाही ना विचारला?...
उगीच आपण बिच्याऱ्याच्या दुखत्या रगीवर हात ठेवला...
" माफ करा... मला काही कल्पना नव्हती म्हणून मी आपलं सहजच विचारलं..." गणेशराव त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाले .
पुन्हा त्या म्हाताऱ्याने गणेशरावकडे पाहिले. यावेळी गणेशरावला त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या दिसल्या.
तो पुन्हा स्टजकडे पाहत म्हणाला, "' सायेब ... तिचं नशिबच खोटं... दुसरं काय..."
आता हा विषय सुरु केला ही चूकच केली ...
पण मधे असा सोडलेला बरं दिसणार नाही....
" का? काय झालं...? " गणेशरावने विचारले.
" त्या भोसडीच्या मुक्यानं लगीन केल्यावर आमी तिला ... दुसरा नवरा पाहून देला होता..." त्याचा बोलतांना गळा भरुन आल्यासारखा वाटत होता.
मुकीचा बाप थोडा थांबला. गणेशरावही तो पुढे काय सांगतो याची वाट पाहू लागले.
" तिचं लगीनबी ठरीवलं होतं... म्या आमचं शेतबीत इकून चांगल्या बक्कम हूंड्याची यवस्था केली होती... पर..." तो म्हातारा म्हणाला.
गणेशच्या डोक्यात सगळ्या शक्यता डोकावून गेल्या...
पण...
पण काय झालं?...
त्या नवऱ्या मुलानेसुध्दा तिचा अव्हेर केला की काय?...
" पर ... जसं तिलं कळलं तसं तिनं अन्नपाणी सोडून देलं.. 15 दिस तिनं अन्न नाय घेतलं का पाणी नाय पिलं... ज्या दिशी तिचं लगीन ठरीवलं होतं त्याच्या आदल्या दिशीच ती गेली ... आमाला सोडून गेली ... सुटली बिचारी...." तो म्हातारा आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाला.
" काय? गेली? ... सोडून गेली?... " गणेशराव आश्चर्याने म्हणाले.
पुढे गणेशरावला त्या म्हाताऱ्याला काहीच विचारण्याची हिम्मत झाली नाही. तो म्हातारा अजूनही स्टेजकडे पाहत होता. कदाचित आपल्या अनावर झालेल्या भावना लपवीत.
बिचारी मुकी...
खरोखर तिचं खूप प्रेम असावं त्या मुक्यावर...
असं लोकांनी त्यांच्या प्रेमाच्या आड यायला नको होतं....
तसा त्यांना काय अधिकार होता?....
गणेशरावने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. थोपटल्यासारखे केले. आणि ते तिथून जड पावलांनी निघून गेले.
क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Novel Madhurani - CH-57a सभा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English





पूर्ण पटांगण गच्च भरलं होतं. आता मधुराणीचीच वाट होती. तशी तिची तिथे येण्याची जाहिर वेळ होऊन वर एक तास होऊन गेला होता. दोनदा तीनदा अफवा पसरली की मधुराणीची गाडी आली तसे कार्यकर्ते एकदम गडबड करु लागत. ही अफवा कदाचित मुद्दामच कुणीतरी पसरवत असावा. म्हणजे जेवढं पब्लीकला ताटकळत ठेवलं तेवढं लिडरचं महत्व वाढतं. आणि पब्लीक नुसती वाट पाहून पेंगायला नको. सदैव त्यांनी जागृत राहून आपल्या नेत्याची वाट पहायला हवी. नाही तर वाट पाहून थकलेल्या मंडळीला आपला नेता आलेलाही कळायचा नाही. आता ती अफवाही जास्त वेळा पसरायला नको. नाही तर ते लांडगा आले रे आला सारख व्हायचं. राजकारण म्हणजे कसं योग्य गोष्टीचं योग्य वेळी योग्य प्रमाणात केलेलं मिश्रण असतं.
तेवढ्यात गणेशरावला दुसऱ्या एका ट्रकमधून उतरतांना अजून काही उजनीची मंडळी दिसली. हा ट्रक तसा उशीराच आला होता. कारण एव्हाना सभा सुरु व्हायला पाहिजे होती. कदाचित ही त्या ट्रकची उजनीची दुसरी वारी असावी. तसं गणेशराववर ज्या कामाची जबाबदारी सोपवली होती ते काम केव्हाच झालं होतं. आता फक्त मधुराणी येण्याची वाट होती. तेवढाच टाईम पास म्हणून पुन्हा गणेशराव तिकडे गेले. यावेळी त्यांची तिथे उजनीला राहणारा आणि गावोगावी मोटर पंप पंखे याचं मेकॅनिकचं काम करणारा बबन भेटला. अजूनही तो तेच काम करत होता. गावचे लोक ज्याला येडा म्हणत होते तोही भेटला. तो अजूनही येडाच होता. इकडे सगळे गप्पा मारत होते आणि त्याचं आपलं मधून मधून सुरुच होतं 'कधी सभा सुरु होते?... कधी सभा सुरु होते?'. गणेशरावला त्या गर्दीत मधुराणीचं शेत बघणारा संभाजीरावसुध्दा दिसला. पण का कोण जाणे त्याने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि तो तिथून सटकला. मारोती टेलरही दिसला. तो स्वभावाने तसा लाजाळूच म्हणून काही बोलला नसावा कदाचित. गावातले महादा, लोखंड्या, भिका वैगेरे क्रिकेट खेळ्णारी मंडळी भेटली. त्यांच्याकडून कळले की आता गावात क्रिकेट खेळण्याचा वसा नविन पिढीने उचलला होता म्हणून. नविन पिढीतली क्रिकेट खेळणारी पोरं आधीच्याच फेरीच्या वेळी आली होती. त्यांचं आपलं मधुराणीला क्रिकेटची कीट मागण्याचं चाललं होतं. मागच्या निवडणूकीच्या वेळी मधुराणीने स्वखुषीने त्यांना क्रिकेटची किट दिली होती म्हणे. गणेशरावला त्यांच्या जुन्या क्रिकेट खेळणाऱ्या साथीदारांकडून कळलं. मधुराणीची तशी युक्ती छान होती. पोरांना क्रिकेटची कीट दिली की सारं गाव खूश. दोनतीन नवीन पोरं दिसली. गणेशरावने कुणाला तरी विचारले तर त्यातले दोन बंडू हॉटेलवाल्याची पोरं होती. माय बाप अजूनही तिकडे गावोगावी फिरुन त्यांचा हॉटेलचा धंदा सांभाळीत होती आणि ही इकडे उनाडसारखी इकडे तिकडे बेफिकीरपणे फिरत होती. कुणीतरी गावातल्याने त्यांची माहिती सांगता सांगता त्यांचा उध्दार केला. अन् त्यातलं एक पंधरा सोळा वर्षाचं पोर मुक्याचं होतं म्हणे. गणेशरावला अचानक मुक्याची अन् मुकीची गोष्ट आठवली.
मुकीचं काय चाललं असेल?...
तिचं लग्न झालं असेल की नाही?...
ते ही सगळी माहिती गाववाल्यांना विचारणार एवढ्यात त्यांचा एक कार्यकर्ता लगबगीने येऊन गणेशरावला तिथून घेऊन गेला. जाता जाता त्यांच्या कानात त्या कार्यर्कत्याने सांगितले. " आज... सभेत गडबड होणाची शक्यता आहे... मधुकरावने सतर्क राहाण्यास सांगितले आहे..."
शेवटी एकदाची अफवा खरी झाली मधुराणीची गाडी आणि तिच्या गाडीच्या मागेपुढे सायरन वाजवत पोलीसांच्या गाड्या तिथे येऊन ठेपल्या. सगळ्या जमलेल्या जनमाणसात उत्साहची एक लहर पसरल्यासारखी दिसली. जमलेले सर्व लोक आपापले पाय ताणून, उंचावून साडी घातलेला ठिपका कुठे दिसतो का ते बघायला लागले. स्टेजवर गेल्यावर तो ठिपका दिसणारच होता. पण नाही तो ठिपका आधी दिसतो का याची घाई. स्टेजवर जातांना काही लोकांनी मधुराणीजवळ जाऊन तिच्या गळ्यात मोठमोठे फुलांचे हार घातले. ते हार कुणाला घालू द्यायचे आणि कुणाला नाही ते गणेशराव आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यर्कत्यांची जबाबदारी होती. ती त्यांनी चोख पार पाडली होती. हार घालतांना काही गोंधळ झाला नव्हता. कुणाला हार घालू द्यायचे त्यांना ओळखून आधीच गणेशराव आणि त्यांच्या माणसांनी मधुराणी जिथून स्टेजवर जाणार होती त्या रस्त्याच्या कडेला समोर उभे राहण्यास सांगितले होते. लोकांकडून हार स्वीकारल्यानंतर मधुराणी त्या फुलांच्या हारांना लोकांच्या गर्दीत फेकत होती. तो हार मिळविण्यासाठी किंवा त्या हाराचे एकतरी फुल मिळविण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडत असे.
आपल्या सोबत चारपाच लिडर घेऊन मधुराणी स्टेजवर पोहोचली. स्टेजवर पोहोचल्यावर तिने सगळ्या लोकांना हात ऊंचावून आणि हलवून अभिवादन केले. लोकही आपापले हात हालवून तिला अभिवादन करु लागले. आता एवढ्या लाखो लोकांत कोणाचा कोणता हात हे काही मधुराणीला कळणार नव्हते. पण नाही लोकांची आपली वेडी समजूत की मधुराणीने त्यांच्याकडे पाहूनच आपला हात हलविला.
क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Novel - Madhurani - CH-56 निवडणूका

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

निवडणूका जवळ आल्या होत्या. त्यासाठी प्रचार ही आवश्यक बाब होती. त्यानिमित्ताने आज मधुराणीने शहरात सभा ठेवली होती. चारपाच लाखाच्यावर पब्लीक येणार होती. मधुराणीने स्टेज, प्रमुख पाहूणे, त्यांची सेक्यूरीटी इत्यादि जबाबदारी आपल्या जवळच्या कार्यर्कत्यांना वाटून दिली होती. तसं मधुराणीचं मॅनेजमेंट फार चांगलं होतं. त्याचा अनुभव गणेशरावने आधीही बरेच वेळा घेतला होता. मधुराणीच्या सेक्यूरीटीची जबाबदारी गणेशराववर येऊन पडली होती. तसं सेक्यूरीटीसाठी पुलिस होतीच. पण गणेशरावला त्यांच्याशी संपर्कात राहून पूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी होती. मधूकररावकडे पब्लीक जमा करण्याची जबाबदारी होती. त्यांचं जवळच्या गावांतून ट्रकच्या ट्रक भरुन लोक आणनं सुरु होतं. लोकांनाही फुकटात तालूक्याच्या ठिकाणी फिरुन येण्याची नवलाई होती.
सभा आमराईत ठेवली होती. ती आमराई म्हणजे शहराच्या मधे एक मोठे पटांगण होते. आंब्याचे तिथे तुरळक दोन तीन झाडेच होती. पूर्वी कधीतरी तिथे आमराई असावी. तेव्हापासून त्या पटांगणास लोक आमराईच म्हणायचे. सभा भर दुपारी असल्यामुळे लाईटींगचा तेवढा प्रश्न नव्हता. स्टेजचे काम ज्या कार्यर्कत्याकडे दिले होते त्याने स्टेज उभारण्याचे काम चोख बजावले होते.
हळू हळू लोकांची गर्दी जमा व्हायला लागली. जवळपासच्या खेड्यांवरून ट्रकच्या ट्रक येत होते आणि गिट्टी रेती आणून ओतावी तसे लोकांना ते आणून उतरवत होते. आणि पुन्हा जात होते - पुढच्या ट्रीपसाठी. शहरातल्या लोकांचासुध्दा येण्याचा ओघ सुरु झाला होता. पण शहरातले लोक जेमतेमच होते.
स्टेजवर लाऊडस्पीकरवाल्यांची गडबड सुरु झाली. तो एक एक माईक लावून त्याचं माईक टेस्टींग वैगेरे करीत होता. खेड्याची लोक त्याचीसुध्दा मजा घ्यावी तसं ते लक्ष देऊन पाहत होते. तेवढ्यात एक आलीशान कार तिथे आली. त्यातून मधूकरराव आणि दुसरे मधुराणीचे जवळचे कार्यकर्ते उतरले. गणेशरावही त्याच कारमधून उतरले. मधूकररावने इकडे तिकडे एक पाहणी केल्यासारखी नजर फिरविली. मध्ये जो भेटेल त्याला 'सगळं व्यवस्थित आहे ना' अशी विचारणा केली आणि ते त्या कारमध्ये बसून पुन्हा पसार झाले. कदाचित ते आता पुन्हा येणार होते ते मधुराणीला घेऊनच.
पोलीसांचे ताफे येऊन इकडे तिकडे विखुरले. गणेशरावचं आता फक्त काम होतं ते त्यांच्या हाताखाली जे शंभरएक कार्यकर्ते होते त्यांना स्टेजच्या आजूबाजूला विखरुन पसरवीनेे. कारण जनतेच्या संरक्षणाची काळजी करणं हे त्यांचं काम नव्हतं. ती पोलीसाची जबाबदारी होती. आणि मधुराणीच्या संरक्षणासाठी जो पोलीसांचा ताफा होता त्याच्या व्यतिरिक्त तिच्या संरक्षणाचं काम करणं ही गणेशराव आणि त्यांच्या कार्यर्कत्त्याची जबाबदारी होती. आणि संरक्षण म्हणजे तरी काय की जे खरोखरच मधुराणीपर्यंत पोहोचण्याच्या लायकीचे आहेत त्यांनाच तिच्यापर्यंत पोहोचू देणे आणि बाकीच्या जनरल पब्लीकला रोखने.
उजनीचे लोक ट्रकमधून येऊन उतरले तसं गणेशरावचं तिकडे लक्ष गेलं. त्यातले बरेच लोक गणेशरावच्या ओळखीचे होते. गणेशराव त्यांना भेटण्यासाठी तिकडे गेले. गणेशरावची प्रथम भेट सदाशीच झाली. सदाला पाहताच त्याने दारु पिऊन त्यांना दिलेली शीवीगाळ आठवून हसू फुटले. सदा आता खूपच थकला होता. गणेशरावपेक्षा एखाद दोन वर्षाने मोठा असावा तो. पण तो अगदीच बारीक किडकिडा आणि म्हातारा दिसत होता.
" काय सदा कसं काय?" गणेशरावने त्याची विचारपुस केली.
तो गणेशरावकडे अचंब्याने पाहू लागला.
" गणेशराव?" तो आनंदाने म्हणाला.
" काय तब्येत खूप हालली तुझी" गणेशराव म्हणाले.
" तुमच्यातबी लय बदल झालाकी हो... आंगात भरल्यासारखे वाटता.. अन् हे काय ... लिडर बिडर झाले का काय?" तो म्हणाला.
त्याच्या चेहऱ्यावर अगदी आनंद मावत नव्हता.
" काय दारु बिरु सुटली का नाही आता?" गणेशराव गंमतीने म्हणाले.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आता एकदम नाहीसा झाला.
" आता जीवासंगच सुटणार आसं वाटते " तो म्हणाला.
गणेशरावला वाईट वाटत होते की त्याला हा प्रश्न उगीच विचारला.
" अजून कोण कोण आलं उजनीवरून?" गणेशरावने त्या ट्रकमधून उतरणाऱ्या गर्दीकडे पाहून म्हटले.
" हायत की ... आजून एक टरक येणार हाय म्हणत्यात..."
" सरपंच येणार आहेत का?" गणेशरावने विचारले.
त्याचा चेहरा पुन्हा काळवंडला.
" सरपंच गेले .. पाच सहा वर्स झाले" तो गंभीरतेने म्हणाला.
" कसं काय? " गणेशरावने आश्चर्याने विचारले.
" अवो वय झालं होतं... गेले ते बरं झालं ... लई तरास होता त्यानला... डोळ्यांनं दिसत नव्हतं... पायानं चालता येत नव्हतं... हागनं मुतनं जाग्यावरच करत होते... पोरगं त पाहत नव्हतं त्याचेकडे... म्याच केलं त्याचं त्या काळात... अवो शिलींगची का होईना त्यानी जमीन देली होती आमाला... पोरगं इसरलं आसल पर म्या नाय इसरलो त्याचे उपकार... ते कोणालाबी देऊ शकलं आसतं... पर त्यानं मलेच देली होती जमीन..." सदा अगदी गहीवरून येऊन बोलत होता.
गणेशरावला प्रथमच सदाची एक वेगळी बाजू माहित झाली होती. ते मोठ्या आदराने त्याच्याकडे पाहत होते .
तेवढ्यात गणेशराव उजनीला असतांनाचा तिथला चपराशी पांडू लगबगीनं गणेशरावजवळ आला.
" राम राम सायेब " त्याने आनंदाने गणेशरावला वाकून नमस्कार केला.
" अरे कसं काय? ..." गणेशराव त्याला म्हणाले.
तो वयाने जरी पोक्त झाला होता तरी त्याची वागण्याची आणि हाजी हाजी करण्याची तऱ्हा अजूनही बदलली नव्हती.
" काय रे आता कोण असतो ग्रामसेवक?..." गणेशरावने विचारलं.
" आता काय माहित नाय सायेब... तुमी तिथून गेले अन् म्या ते काम सोडलं... तुमी होते तोवर त्या कामात दम होता.. तुमच्यानंतर आला तो ग्रामसेवक सोताच पैसे घेत होता... मंग आपलं कामच काय तेथं... मंग माव्ह लगीनबी झालं अन् आता सिडच्या मानसामांग आसतो... बटईनं घेतलंनं सीड ... त्या गार्डसायेबाचं... "
" अरे वा ... म्हणजे आता मस्त चाललं असेल..." गणेशराव म्हणाले..
" हो तसं मस्तच हाय... पर तुमी होते तवासारखी आता गावात मजा नाय राह्यली"
क्रमश:...



This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network