कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Final Post - Novel - Mrugajal - Ch - 50 (The End)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

It is a curious sensation: the sort of pain that goes mercifully beyond our powers of feeling. When your heart is broken, your boats are burned: nothing matters any more. It is the end of happiness and the beginning of peace.
.... George Bernard Shaw

मागील दोन-तिन दिवसांपासून प्रिया विजयच्या घरीच होती कारण तिचे पुन्हा तिच्या वडीलांशी विजयच्या इथे वारंवार जाण्याच्या कारणावरुन बिनसले होते. आज सकाळी तिला का कोण जाणे उशीराच जाग आली. तशी तिला सकाळी लवकरच उठण्याची सवय होती. पण आज जेव्हा जाग आली तेव्हा तिला जाणवले की उन्हाची किरणे खिडकीतून घरात येत आहेत. तिने आपल्या बाजुला बघितले. विजयची आई नेहमीप्रमाणे सकाळीच उठून आपल्या कामाला लागली असावी. आणि विजयची बहिणही आपल्या अंथरुणावर नव्हती. तिची तशी उठण्याची आणि झोपण्याची अशी ठरलेली कोणती वेळ नव्हती. ती कधीही लहर आली की झोपत असे आणि जाग आली की उठत असे. पण आज प्रियाला सकाळी उठल्याबरोबर एकदम ताजेतवाने वाटत होते. कदाचित बऱ्याच दिवसांची झोप आज भरुन निघाली होती त्यामुळे. तिने अंथरुणावरच उठल्या उठल्या अंगाला आळेपिळे देत आळस दिला आणि ती उठून समोरच्या दाराकडे निघाली. समोरच्या दारात जणू अधांतरी शुन्यात पाहात, आपल्याच विचारांच्या तंद्रीत ती कितीतरी वेळ उभी होती. तेवढ्यात तिला समोरुन येणारा एक दाढी वाढलेला इसम ओळखीचा वाटला. ती एक टक लावून तिकडे बघायला लागली. जसा-जसा तो इसम अजुन जवळ येवू लागला तिच्या चेहऱ्यावर हास्य खुलायला लागलं. तिने स्वत:ची खात्री करुन घेतली की आपण स्वप्नात तर नाही आहोत. कारण तिची जवळ जवळ खात्री पटायला लागली होती की तो दाढी-मिशा वाढलेला इसम दुसरा तिसरा कुणी नसून विजयच आहे. दाढी मिशांमुळे जरी त्याचा चेहरा वेगळा वाटत होता, तरी ती त्याची चालण्याची ढब चांगलीच ओळखत होती. जसा जसा तो अजुन जवळ येत होता तिला त्याची अजुनच पक्की ओळख पटत होती. तो इकडे त्याच्या घराकडेच येत होता. जसा तो उघड्या फाटकातून आत आला प्रियाला त्याची ओळख पुर्णपणे पटली होती. तिच्या समोर विजयच उभा होता.

'' विजय...'' तिच्या तोंडातून अनायसेच आनंदोद्गार निघाले.

ती एखाद्या वेलीसारखी त्याला बिलगली, '' विजय ... मला माहित होतं, नव्हे खात्री होती की तू जिवंत आहेस... देव आपल्या प्रमाच्या बाबतीत एवढा नाही निष्ठूर होऊ शकत... त्या लोकांनी दुसऱ्याच कुणाचे तरी प्रेत आणले होते... ते एवढे चिरडलेले होते की ओळखुही येत नव्हते... मला माहित होतं,.. की देव आपल्या बाबतीत एवढा निष्ठूर होऊ शकत नाही...'''

'' तुझ्या प्रेमानेच मला मरु दिले नाही...'' विजय मिठीतून बाहेर येत तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला.

मग कितीतरी वेळ ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत गप्पा मारत होते. तिकडे आत विजयच्या आईला बाहेरची चाहुल लागली असावी. कारण ती प्रियाचा आवाज ऐकून ती बाहेर आली.

'' विजय ... कुठे होता इतके दिवस... आणि हे काय किती अशक्त झाला आहेस?'' प्रिया बोलत होती.

जसे विजयच्या आईने प्रियाकडे बघितले तसे तिचे हातपाय थरथरायला लागले. साऱ्या अंगाला घाम फुटला होता. कारण प्रियाच्या समोर कुणीच नव्हते. ती जशी हवेशीच बोलत होती.

'' हे देवा आधी माझी पोरगी ... मग माझा पोरगा... आणि आता प्रिया सुध्दा... देवा ... देवा जरा दया दाखव रे बाबा... हे सगळं आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होत आहे... देवा...'' विजयची आई वेड्यागत देवाची आळवणी करीत होती.

इकडे विजयच्या आईचे काय चालले आहे याचे प्रियाला काहीच भान नव्हते. ती हळू हळू चालत जावून फाटकाच्या बाहेर जावू लागली. ती अशी चालत होती, जसा विजय तिच्या सोबत सोबत तिचा हात हातात घेवून चालत असावा. विजयची आई आता प्रियाच्या मागे मागे चालायला लागली होती. जशी प्रिया समोर समोर चालत होती तशी तिच्या मागे सकाळच्या उन्हामुळे पडणारी तिची सावलीही चालत होती. त्या सावलीकडे जेव्हा विजयच्या आईचे लक्ष गेले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिने बघितले की प्रियाच्या सावलीसोबत आणखी एक सावली - विजयची सावली प्रियाचा हात आपल्या हातात हात घेवून चालत आहे. जेव्हा विजयची आई त्या धक्यातून थोडी बहूत सावरली तेव्हा तिने बघीतले की तोपर्यंत प्रिया त्या सावलीसोबत बरीच पुढे निघून गेली होती. विजयची आई आता प्रियाच्या मागे जवळ जवळ धावतच जावू लागली. विजयची बहिण शालीनीही, जी अंगणात उभी होती, आपल्या आईला धावतांना पाहताच, तिच्या मागे मागे लाळ गाळत धावायला लागली.

'' थांब प्रिया... '' विजयच्या आईने मागून आवाज दिला.

प्रिया थांबली. तिच्या सोबत जमिनीवर पडलेली विजयची सावलीही प्रियाच्या सावलीसोबतच थांबली. विजयची आई प्रियाजवळ गेली. आपल्या मुलाची सावली का होईना, पाहताच तीच्या आनंदाला आता पारावार राहाला नव्हता. ती आपल्या मुलाच्या सावलीजवळ गेली आणि खाली बसुन त्या सावलीला प्रेमाने कुरवाळू लागली. विजयची बहिण, जी तिच्या आईच्या मागे धावत आली होती, ती आता आपल्या आईजवळ पोहोचली होती आणि आपल्या आईला खाली बसलेलं पाहताच तिच्या पाठीवर बसून एखाद्या लहान मुलीसारखी तिच्या केसांशी खेळायला लागली.

विजयच्या घरासमोर चौकात एव्हाना बरीच गर्दी जमली होती. रस्त्याने जाणारे येणारे लोक काय गडबड चालली आहे हे बघण्यासाठी त्या गर्दीत सामिल होत होते. सकाळच्या दारुचा डोज घेवून नुकतेच परत येत असेलेले विजयचे वडीलही काय झाले हे बघण्यासाठी त्या गर्दीत सामिल झाले. त्यांनी बाकीच्या अवतीभवती जमलेल्या लोकांसोबत बघितले की गर्दीच्या अगदी मधे प्रिया उभी होती. आणि ती जशी हवेशीच बोलत होती. विजयची आई खाली जमिनीवर बसलेल्या अवस्थेत तेथील मातीला जणू कुरवाळत होती. विजयची बहिण तिच्या आईच्या पाठीवर बसून तिच्या आईच्या केसांशी खेळत होती.

... आणि जमिनीवर फक्त तिन सावल्या पडलेल्या होत्या - एक प्रियाची, दुसरी विजयच्या आईची आणि तिसरी विजयच्या बहिणीची.....

- समाप्त -


It is a curious sensation: the sort of pain that goes mercifully beyond our powers of feeling. When your heart is broken, your boats are burned: nothing matters any more. It is the end of happiness and the beginning of peace.
.... George Bernard Shaw
Sometimes reality is more tragic than fiction.
... Anonymous


कृपया या कादंबरीबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि ही कादंबरी आपल्या मीत्रांना ईमेल करा !


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

202 comments:

  1. speechless....... got tears in eyes .. kunachyahi premacha asa durdevi ant hou naye..

    ReplyDelete
  2. Namskar,

    me tumchay sarv kadmbari vachlya pan mala hi kadambari khup aavadli kharch khup chan hoti pan thodi apurna rahilya sarkhi wate hoti.

    ReplyDelete
  3. Excellent ..novel...i told my freind to read this site..excellent novel..
    No words to express.....

    ReplyDelete
  4. Khupach masta novel aahe ...end farach sad jhala wachun far dukha jhala.
    pan sunilji tumhi farach chhan lihita mala tumchya saglyach kadambrya khoop awadlya specially e-love, mrugjal,shunya excellent work. ekda hatat ghetil wachayla tar purna wachya shival rahavtach nahi. khoopach chhan. speechless.
    thank you so much .
    and all the best for ur future

    ReplyDelete
  5. Khupach chhan hoti hi kadambari....
    I really like it...
    Pan shevat ajun chagala asayala hava hota....
    But its ok ....i will tell my friends to read this.
    I am waiting for next novel.....

    ReplyDelete
  6. Ekadam Jabardast
    Shabdach nahit.
    pan kunachya hi premacha asa ant hone khup vait vatale.
    pan story mast hoti next story chi vat pahat aahe.

    ReplyDelete
  7. Sunilrao kadambari farach chhan ahe. parantu ant atishay vait ahe. kunachyahi ayushyat ase prasang na yeot hich parmeshwarala prarthana.

    ReplyDelete
  8. it is a very nice novel. i like it very much.
    reaaly very touching and sentimental

    ReplyDelete
  9. Kharach jyala tyala tyacha khara prem milava.
    konachya premacha asa shewat nako.....
    Pn tumhi khup chaan lihita..
    Me out of India ahe ...ani tumche novels mala online wachata yet ahet..khup bare watat ahe...
    Thank You So Much...

    ReplyDelete
  10. excellent.......pan shevat khoopach dakaadayak hota....i am speechless..

    ReplyDelete
  11. khupach chan hoti kadambari. shevat vachtana tar aksharshaha angavar kata yet hota,
    tumhi khup chan lihita
    waiting for next novel

    ReplyDelete
  12. Hi Novel kup chan hoti, vijay sathi priya chi dhadpad baghun khar prem kalal, vijay chya aai chya pan yatana baghavat nahi. pan shevat thoda ajun vegala hava hota. kahitari adhur rahil ahe asa vatay sarakh.

    ReplyDelete
  13. Khup chan! akhadyavarchya premamule kay ghadu shakta, yach excellent example,,,,,,vichar karayla llavnari,

    ReplyDelete
  14. Hi Sunil I like all novels.Keep it up.
    Waiting for your next novel eagerly...

    ReplyDelete
  15. नमस्कार. कथा अत्यंत भन्नाट होती. फारच सुंदर. तुमच्या सर्व कादंबर्‍या अत्यंत दर्जेदार व खिळवून ठेवणा-या आहेत.... शुभेच्छा!!

    ReplyDelete
  16. very nice novel i like it very much.
    pratekveli wachtana watat hota ata kay hoil ata kay hoil??
    pan kharach khupach chan story ahe.
    WAITING for your next novel.

    ReplyDelete
  17. Dear sunilji

    I am awaiting for your new story

    Regards
    Sheetal Shinde

    ReplyDelete
  18. Dear Sunilji

    I am also awaiting for your new story.

    Pl load at the earliest.

    Regards
    Tanvi Dixit

    ReplyDelete
  19. Are story sampali end khup dukhad hota manala chur chur lavnara khup sundar hoti tumchi novel khare pream kay aste he kharech ajchaya yuva yuvatila sangne khup garjeche ahe ani te tumhi tumchya story madhun sangitle tumhi tumchi new story lavkar publish kara

    ReplyDelete
  20. Hi Sunil jee,
    I red your whole novel but
    remains some posts that is no 28,29,30,31,32
    please tell me that where that found. my email id kalpnagaikwad_11@rediffmail.com
    your novel is superb... I like it.

    ReplyDelete
  21. Awesome novel, I am a die heart fan of Suhas shirwalkar, Baba Kadam etc. and I have at the first time liked some one's other than these.

    Great work. Thanks a lot for this experience.
    Keep posting.

    ReplyDelete
  22. kharach khupach chan hoti tumachi mrugjal kadambari vishwas vatat nahi ki true story evdhi dramatic asel than a fiction.. shevatachi post vachun mi kharach khup dukh budale mi ase jar aaplya babtit ghadale tar kay hoil.. anyways mi khup utsuk ahe tumachi next kadambari vachayala.

    ReplyDelete
  23. nice novel...but really I have not heard of people seeing\imagining shadows in any mental illness..does this happen?

    ReplyDelete
  24. जीवनाच्या प्रतेक पैलूंचे इतक्या सहजतेने आणि उत्कृष्ट रित्या केलेले हे वर्णन , सोबत लिखाणाची उत्कृष्ट सचोटी , या पेक्षा ही कथानकातील व्यक्तिमात्वंची वर्णने खरेच मनाचा ठाव घेउन गेलीत,
    अश्या आशयपूर्ण कादम्बरी करीता मनोमन धन्यवाद
    आपला
    प्रवीण आम्बेकर

    ReplyDelete
  25. Kadambari Chan Aahe. Pan Shevat Apurn Vatala!!!

    All the best for next Novel...........

    ReplyDelete
  26. Hi,,

    Story Chan Aahe..

    All the best for next novel...

    ReplyDelete
  27. Khupach chan. shevat positive zala asata tar chan zale aste

    ReplyDelete
  28. SADMA chi aathvan zali!
    Sunilrav please Happy ending vali kadambari liha na!

    ReplyDelete
  29. i liked ur novels very much and i read all novel post ur new novels as soon as possible ur well wisher mahendra

    ReplyDelete
  30. मृगजळ...... नावासारखीच कादंबरी आहे. जितकं घट्ट पकडायला जावी तितकी हातातून निसटून जाणारी कथा ......
    उत्कृष्ट कादंबरी वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  31. Mi khup kadmbari vachlyat pan hi Mrugajal agdi vegli khup emotional,hrudycha kappyt jaun ghar karun geli.
    Rahun rahun vichar yeto ki, ka kadmbari cha shevat asa dukhi zala. pan mag jar mrugajal cha shevat happy zala asta,tar kadmbari etki utkrusha zali nasti. shevti hech sangen,hi kadmbari mannala lagun jat. sunil ji tumhi ashyach romantic kadmbari lihet ja. best of luck for ur new novel. regards soha.

    ReplyDelete
  32. kunasobat itka vait nako whyla

    ReplyDelete
  33. Story chan ahe pan end vachun far vait vatle.

    ReplyDelete
  34. sunil ji tumche lekhan atishay kotukaspad ahe, itki guntagunt asnari katha tumhi khup sahajritya shabdanmadhe mandawi he aaplya matrubhasheche sarthak ani sohala,
    katha kashi suru karawi ani kashi tichi sangata whavi he aaplyasarkhe kaushalyawan lekhakach januu shaktat.
    kharokhar mendula chalana milte hi katha wachtana,premala kashachihi hadd naste te khup niragas aste agdi lahan navjaat balasarkhch,
    pan tyanchya premacha asa ant, sunn karun takto.
    tumhala bharpur shubhechya ani abhari ahe ashi kadambari wachayla milalyabaddal.

    ReplyDelete
  35. pharach chan story hoti. suruvati pramane shevat hi tevdach suspence vala hota.
    waiting for u r new story

    ReplyDelete
  36. remains some posts that is no 28,29,30,31,32,novel khupach channn ahe next story chi wait karat ahot.................

    ReplyDelete
  37. Sahi Yaar. Story Khup Interesting Hoti. Mala Khupach Awadali.
    Pudhacha story chi khup aaturtene wat baghat aahe.

    ReplyDelete
  38. Khupach heart touching story ahe. Pan kahitari rahilay asa watat. He jar real story asel tar asa ka ani tyach gharat ka. Kahi karan asel tar sang please.

    ReplyDelete
  39. ending itka dukhad nako hota..prem karnyachi itaki mothi shiksha asate ka???

    ReplyDelete
  40. speechless,
    dev konalahi ashya prasnag n devo,
    dear sunil sir,
    tumha lokana kothoon ashya kalpana suchtat,aamhi sadhi kalpana dekhil karu shakat nahi,thnx,

    santosh.

    ReplyDelete
  41. deepali belhekarMay 7, 2011 05:31 AM

    manala sparsh karun geli. kunachyahi premacha asa ant hou naye.

    ReplyDelete
  42. shevt vachtana dolyatun pani aal khupch chan story ahe

    ReplyDelete
  43. Khup chan katha ahe, Priya che carector kiti sundar ahe, evdhe sundar ki mala ata roj priya diste chehera nahi disat fakt priya ahe asa abhas hoto... asa prem khup durmil asta. Kadachit me bhavnik houn mhanat asel pan sadhya tari hech mala suchte ahe. Thank you verry much...

    ReplyDelete
  44. story khup chan ahe.......especially PRIYAcha character apratim ahe.........priya cha character eka IDEAL LOVER sarkha ahe...............happy ending zali asati tar mala story ajun avadali asati

    ReplyDelete
  45. Ho kharach IDEAL LOVER chan upma dili....anyways katha suru zali te Rajesh chya lagna chya Reception pasun pan ending la Rajesh cha kahich thav thikana nawhata...he kalle ki toh kuthe tari devastana la gelela pan kadachit Rajesh che charector as a good friend of them apurna vatala....still i love the story......

    ReplyDelete
  46. premala upama nahi, hein dava gharache lene, kharach ..... gud love story, ash hoti ki kahi ajun rang chata pahayala miltil pun mansala jivanat sankatal samore janyakarita atmavishwas lagato, ani tyakarita ek ashecha kiran, jo andharmay jivan ujalun takato, tya kiranacha abhav janavala, vijaychya aaiche dukh sampayala have hote..... gud 1, like it.

    ReplyDelete
  47. Mala sangayala anand vathto ki mi ashi khuphach prempurn katha vachli, tasech mi lekhakal dhyanyawad karto ki etki sunder kadha lihili.

    ReplyDelete
  48. wow best novel......rahul

    ReplyDelete
  49. story sundar aahe pan Prem adhure rahele.......

    ReplyDelete
  50. mazya kade shabdacha nahit yakadambari sathi...................................................................

    ReplyDelete
  51. Abhishek KadamJun 2, 2011 10:17 AM

    all matter is best. But in end this seems like incomplete...................

    ReplyDelete
  52. shevat khup dardnak hota, dolyat ashru datun aale pan khupach chaan lihili aahe

    ReplyDelete
  53. khup chan novel aahe ......
    kharach konacha hi babatit aas kadhich ghadu naye ..... khup thararak anubhav vatala .....pan novel khupach aavadli....thanks for that

    ReplyDelete
  54. mast .....................

    ReplyDelete
  55. khupach mast ..........................

    ReplyDelete
  56. chhan love story aahe!!!!pan apurna vatate.... priya character khup chhan vatate....tichya ani vijaychi aai chya nashibi evadhe durdaiv ka? assa prashna padhto...........asso pan novel khup chhan aahe....all the best!!!!!!

    ReplyDelete
  57. Khupach changli kadambari ahe
    Hrudaysparshi!!!!!

    ReplyDelete
  58. Khupach chhan hoti hi kadambari....
    I really like it...
    Pan shevat ajun chagala asayala hava hota....

    ReplyDelete
  59. khup chan..kahi shabach suchat nahi kai bolava

    ReplyDelete
  60. खुपच सुंदर कादंबरी आहे, मजा आली वाचायला, पण कुणाच्या प्रेमाचा
    इतका वाईट अंत होऊ नये,
    खूप वाईट वाटल शेवट वाचून.

    ReplyDelete
  61. KHUP SUNDER AHE.COLLEG CHE DIVAS ATHAVLE. SHEVAT KHUP DUKHAD HOTA.PRAMACHA ASA ANT HOU NAYE.... ALL THE BEST & THANKS

    ReplyDelete
  62. farach chan. karach man hadrun taknari kahani aahe.

    ReplyDelete
  63. Mane guntatat........ prem phulate na phulate toparayant haravate... kharach jitake javal jave titakech te dur hot gele.... ase hey mrugajal....
    Ek Hrudaysparshi katha


    I like this atory so much

    ReplyDelete
  64. Manisha RajbhojJun 23, 2011 03:16 AM

    Kharach khup khup chan kadambari ahe...
    speechless ahe me he sangayala ki kiti mast ahe..
    All d best :)

    ReplyDelete
  65. khup mast aahe, mnje vachtana pudhcha andajch kadhu shkt nvto, ani khup ustukta vatli vactana,ani shevt pn ekdum sajesa hota.

    ReplyDelete
  66. Really it is awesome !!!!!!!!! Full on Hart touching..............

    ReplyDelete
  67. Tyag ani balidan he premache don baaju aahet..
    Excellent Story.. But End is something that can not be forgotten. This shouldnt happen in any one's life..
    Could have changed the End..
    There would have much greater effect cause already it has made the people cry..

    ReplyDelete
  68. mast......................

    ReplyDelete
  69. khup chaan...hi katha manala chataka laun geli....kharach prem karav tar Priya sarkha....!!

    ReplyDelete
  70. अमितेश घाटेJun 29, 2011 12:55 PM

    खरच मृगजळ नाव अगदी सजेस आहे
    शेवट तर अवर्णनीय आहे
    धन्यवाद आणि अभिनंदन मराठी साहित्यात अशी एक कादंबरी देण्याबद्दल.

    ReplyDelete
  71. kandbari far far chhan ahe . itki chan ki shabdach nahit..pan kharach evdhya nissim premacha ant ha asa nako..

    ReplyDelete
  72. kadmbari khupach chan ahe pan kharya premacha asa ant nako....

    ReplyDelete
  73. Really to good....Speaclesssssssssss...Excellent... :-)

    ReplyDelete
  74. Tejaswini
    Nava pramane Kharach chan aahe.

    ReplyDelete
  75. kharach khup sundar varnan kelele aahe.

    ReplyDelete
  76. Kanchan WankhedeJul 4, 2011 12:05 AM

    sunder.....aatisunde......kharach prem karav tar priyasarkh!!! pan kharya premacha shevat ha nehmi dukhatach ka??? asa prashn ethe vichar karayla lavto

    ReplyDelete
  77. khup chan katha ahe pan end angavar kata anto ani priya che prem khuppppppppppppppppppppppppppppp avdele

    ReplyDelete
  78. kharach khup chan novel ahe ahe.kharach khaya premachi khari kahani ahe hi.
    aksharshaha lihayala shabdh apure padtate.

    ReplyDelete
  79. Hi, Me Pankaj Thakur,

    Sunil Bhaiya,Kharach tumchya likhanat jaadu hoti. Vijay, Rajesh, Priya, Shalini, Kamal, Nayna Vijaychi Aai aani Priyache Vadil; Ekandarit sarvach patra aksharshha jivant aslycha aani dolyansamor ghadlycha bhas hot hota.
    Shevatcha bhag wachatanna tar angawar kata ubha rahila va dolyantun ashru aalet. Kharach shevat atyant dhakkdayak watla.
    Ishwarcharni hech prarthna karto ki kunalahi evdha durdaiv devu nakos.

    IN SHORT, TOO TOUCHING...

    ReplyDelete
  80. pranali thakurJul 12, 2011 10:27 AM

    hi kadambari vachtana vatat hota ki sagla kharokhar aaplya dolyasamor ghadtay..khupch heart touching ahe..kata aala angavar ani dolyat pani..khup sundar kadambari ahe..

    ReplyDelete
  81. ChandrashekharJul 14, 2011 02:35 AM

    This is my first time in life where I gone through Marathi Novel(in fact any Novel). I found it too good and heart touching. It's a superb novel. Congrats!!!

    ReplyDelete
  82. pharach chaan, hrudayala helaun takanari katha ahe

    ReplyDelete
  83. apratim kadambari aahe...
    ekach baithakit vachun purn keli..
    thodi far gudh watte.....
    kahrrrrrrrrrrrrrach khuuuuuuuuuuup surrrrrrrekh....
    dhanyawaad

    ReplyDelete
  84. @सुनील डोहीफोडे, कादंबरी वाचून मन अगदी सुन्न झाले. खर्या प्रेमाची अशी शोकांतिका. खूप वाईट वाटत आहे. प्रिया, विजय ची बहिण आणि विजयची आई ह्यांची झालेली अवस्था मनाला अगदी दुःख देणारी आहे. बिचार्या प्रियाच्या नशिबात तर असला विरह आणि अशी अवस्था...तो विचार पण आता सहन होत नाही. एका जीवावर अवलंबून असलेले त्याचे लोक...आणि नंतर त्यांची झालेली दुरवस्था. असे कोणाच्या हि जीवनात न होवो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
    From , जगदीश

    ReplyDelete
  85. Novel is realy speechless.
    Mala kadambaritala jasta kahi kalat nahi pan mazya mate shevat thodasa sukhad vhayala hava hota. Khupach dukhhad shevat aahe.

    ReplyDelete
  86. KAHICH shabd nahiyet majyakde..........akshrshaha dolyat pani,angawr kata n manat ek anamik hurhur watat hoti........pudhe ky hoyil ya wishyi khup utsukta watat hoti.........
    kunachyahi life madhe as hou naye..........khrch khup sundar lihili ahe.......ek jabardast takd ahe tyat.....wachnaryachya manala chatak lawun jate hi gost..........

    -MRIGANAYANI MADHUSUDAN

    ReplyDelete
  87. I am not fond of reading but this made me read more and more...Thank you..

    ReplyDelete
  88. farach chhan..surwatila hurhur lawnari pan shewti manala swabdh karnari katha..shwabdancha kami pan bhawnancha khel far..shewat ekdam manala chatka lawun gela..dolyat don ashru ni manala antrmukh banwanari hi katha... Deepmala waradhakar

    ReplyDelete
  89. oh my god ! mi eka velet hi kadambari vachli...kshana kshanala utsukta vadhli.....such a great twists in nivel.....nice thinking...relly a diffrent love story...man ajunhi tharyavar yet nahiye.....kuthetari kahitari aswasta janvtiye....mi tumchya etar novels vachalya aahet pan tyana ek sukhad shevtachi zalar hoti...pan mrugjal,,,,etki heart touching hoti ki ugichach vachali as vattay!.....aata tar mala priyahi mazyasobat konitari aahe asach vattay....!

    ReplyDelete
  90. Sunilji,tumchi hi kadmbari nava pramanehoti jase man he aplay bhovti ke kosh tayar karte, v thyt gurphadt jate

    ReplyDelete
  91. its a very heart touching story..... pan end ha atishay dukhadayak ahe.... kharach kunachahi premacha asa anta nahi vayla pahije
    keep writing sunilji!!!!!!
    im waiting for ur next novel

    ReplyDelete
  92. khup chan pan,dolyatun paani aalyavachun rahila nahi,,pan khup negative vatali,,,

    ReplyDelete
  93. Sandesh

    the best ultimate

    ReplyDelete
  94. manala helavun taknari katha mi prathamach vachli
    vachun kharach man sunn jhale. kharech kunachya ayushyat evadhya vaait ghatana ghadu naye ase vatate..........!!!!!!!!

    ReplyDelete
  95. no doubt its 1 of the best i had read
    mast.....!!

    ReplyDelete
  96. heart toching novel hoti. kupach emotional vatali
    mastch vatali...

    ReplyDelete
  97. shevat asa hoil kharach vatal navhat
    Priya(an ideal lover) he chatacter khup mast foolooon aalay n khup inspirational pan aahe
    Mrugjal he tital pan khup sajes aahe
    pan thodi tari happy ending havi hoti
    n me ek second pan bore nahi zaale read kartana

    ReplyDelete
  98. Supriya Jadhav.
    Khup Sundar kadambari aahe aani etaki exiting aahe ki prtyek veli utsukata lagaleli asate ki pudhe kay honar aahe khup sundar khup sundar pan mala vatata thodi ardhavat rahili asavi kadachit khup sundar kalpana aahe aani khup sundar tyancha prem aahe prem he faqt eka mula mulicha nahi tar tyachya aaicha mul;avar asalela aani eka bahinicha bhavavar asalela purnapane disun yet aahe

    ReplyDelete
  99. खरच खूप छान कादंबरी आहे...
    मला खुप खुप आवडली... Really awesome...
    thanks for this novel.....

    ReplyDelete
  100. सुनील डोहीफोडे सरांचे हार्दिक आभार...
    "मृगजळ" खूपच भावनात्मक आणि हदयस्पर्शी कादंबरी आहे.
    खूप खूप आवडली.आभारी आहोत.

    ReplyDelete
  101. khupach chan...apratim kalpana.....vachatana angavar kata yet hota....

    ReplyDelete
  102. Kadambari Farach chan lihile ahe. prem kiti Nishpap astat ani prem kasa nibhavala jata, he hya kadambarine vachakanchya manaparyant pohchlyashivay rahanar Nahi,
    Aksharsha Pani ale dolyatun,
    Romacha ubhe rahat hote vachatana.
    very nice.

    ReplyDelete
  103. prajakta tejasviAug 17, 2011 10:26 PM

    mast... khupach chan... unexpected end.

    ReplyDelete
  104. khup chan hoti mrugajal .......kharat lekhkane vachtana purnpane bandhun thevle hote. thanks

    ReplyDelete
  105. shevat agdich anapekshit hota.ase vegla kahitari vachayla mala nehemich avdete.so waiting for new one!

    ReplyDelete
  106. farac chaan aahe novel.
    mi pahilyandach online novel vachali aani tehi etaki zakkas.
    aaplya sagalya novels vachin.
    ani pudhachya aplya novelchi vhat pahin..

    thanks......


    shri@...!

    ReplyDelete
  107. novel far sundar aahe
    pan ekhadya mansala evdha trass ka???
    tohi evdha changala astana .....
    vijay che charecter evdhe chan sangitale aahe ki konihi tyachya premat padel......
    pan kharech far chan novel aahe...
    mala vatale tumhi tyacha positive end karal pan end far hrudaysparshi asa aahe........

    thx....

    ReplyDelete
  108. far sundar novel wachnyat aale baryach divsat. far chhan. dole panawale maze, wachta2. keep it up.

    ReplyDelete
  109. ITS REALLY GREAT NOVEL, KHUP VAIT VATAL, SHEVAT KHUP CHAN AAHE, SOMEONE HAS TO TAKE THIS IN MARATHI MOVIE & AT LEAST IN MARATHI STAGE PLAY....
    I DONT KNOW WHETHER IT IS TRUE STORY OR NOT.
    BUT IF IT IS TRUE STORY... REALLY HATS OFF FOR THE GREAT LOVE STORY...
    PRIYA IS REALLY GREAT......

    THANKS
    JAGDISH

    ReplyDelete
  110. very nice story......kashi waln ghet jate ?? aani kasa samapt hoto???? very heart touchng...yeah waiting for ur new story.....
    amit

    ReplyDelete
  111. namaskar khar sangu tar pahila fakt virangula mhnun ekach page vachayala ghetal hot pan nantar etaki oodh lagali ankhin purn kadambari kenva vachun zali kalalech mast vatali shatasha abhar tumhi lihili mhanunach vachayala milali .....//.. pan kharach novel badal bolayach zal tar tar vijayach caracter khup avadal hats of priya's caracter kharokhar tila manalach pahije .....//.. pan mala vatat vijayachya babatit aas ghadan sahajikach aahe..///.

    ReplyDelete
  112. Outstanding! I Couldn't stop myself from finishing it. Superb, heart touching story!

    ReplyDelete
  113. hi novel ter khupch chan ahe...pan expecting happy ending...:(
    as kadhich kona barober hou naye.....:(

    ReplyDelete
  114. Kharach apratim kadambari aahe...
    mala khup aavadli..
    mansik tanavache chan varnan kele aahe

    ReplyDelete
  115. very nice sunilaji..............great

    ReplyDelete
  116. kharach khup sunadar ahe kadambari me first time tumachi kadambari vachali and mala khup khup awadali

    ReplyDelete
  117. supab kadambari vachun dolyat pani aala... agadi sundar aahe... vry heart touching story

    ReplyDelete
  118. Shevat chatka laun gela..... Pan kharach... khup chan lihita apan..
    I have read your all novels on this site.. and they all are superb..

    Waiting for next novel.... :)

    -- Swati

    ReplyDelete
  119. Oh! My god!!
    There are no words for comparison to any other stories or movies. I could not come out of that story for two days, thinking about priya and her luck, that is a real impact of this story. Evadh sundar likhan..wow!! Sunilji you are great.
    At onetime I was feeling like to go and help priya as like I am real witness to their life through out story and thinking that sunilji should have made happy end…..so that I could have avoided my moisturized eyes.

    Sometime I was feeling that I am becoming like mrugjal. The way of writing and describing a situation is feeling like real one and heart touching. It gives feel about sunilji that how he has very strong hold on Marathi... of course for sure. End of story is very sad and feel that no girl like priya should not have such luck in real life.

    Waiting for next novel!!!
    Lalit

    ReplyDelete
  120. mala ya kadambari ne khup kahi shikavl, karach aajcha ghadila yevde changle manse fakt nasibvanalach bhettat..........


    I LOVE YOU

    ReplyDelete
  121. kadambari khupach chan ahe

    ReplyDelete
  122. Excellent ..novel...i told my freind to read this site.... Ayushya he asch asta nehmi sagalya goshti aplya manachya virudhach gadhat asatat..........

    ReplyDelete
  123. hi
    i realy like this kadambari
    vachthana dole bharun ale
    pream means te na sanganare aste

    ReplyDelete
  124. i don`t understand ki mala kay sangayche aahe pan agdich shant aani barach vel mi fakt mazya computer chya monitor kade dole fadun baghat hote when i read it`s end

    ReplyDelete
  125. Khup Chan ahe...Keep It Up..

    ReplyDelete
  126. Khup chhan....Asech lihit ja...khup khup shubhechha..

    ReplyDelete
  127. तुमच्या कथा मी सलग वाचतो त्यामुळे लिंक चांगली जुळते, बाकी तुमच्या कथा खूपच छान आहेत. प्लीज आणखीन नवीन कादंबऱ्या इथे लिहा.
    तुमच्या नवीन कादंबऱ्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. :)

    ReplyDelete
  128. Speechless................
    dnt hav words to express..............
    jst liked it very much..............
    mrugajalane kharach bhural ghatali............

    ReplyDelete
  129. श्री. सुनिल डोईफोडे यांस, सप्रेम नमस्कार

    तुमची लेखनशैली आवडली. कथेची मांडणी वाचकाच्या मनात ओढ निर्माण करण्याजोगी आहे. पात्रनिर्मीती आणि वातावरण निर्मिती अतिशय उत्तम केलेली आहे. भाषेच्या चुका अर्थातच मी नजरेआड केल्या. प्रियाचे पात्र तुम्ही खूपच उत्तमपणे रंगविलेलं आहे. विजयाच्या पत्राची मांडणीसुद्धा छान जमली आहे. विजयाच्या वडिलांचे पात्रही थोडे विस्तृत होऊ शकले असते असे माझे मत आहे.

    एकंदर हि कादंबरी वाचून अतिशय आनंद झाला आणि भविष्यात तुमचे इतर साहित्य वाचण्याची ईच्छा आहे. धन्यवाद.

    गिरीष गोखले.

    ReplyDelete
  130. GREAT, KHUPACH CHAN KADAMBARI AAHE. ASHRU DOLYATUN YEVU LAGLE. SUNDER, APRATIM AAHE.

    ReplyDelete
  131. kharach ashi vel kunavarhi yeu naye ekhadyachya ayushyat evadhi sarv sankate kadhi yeu naye .ya novel madhil aai che charecter agadi chan chitrit kele ki vachtana ase vatle ki ti aai janu samor ahe...gre88 job sir atyant jivant bhasha shaili ahe tumachi ..

    ReplyDelete
  132. Smita GangawaneOct 13, 2011 11:56 AM

    katha surwatila intresting vatali pan shewat asa kadhich kunacha aayushat yeu naye.maitri ani prem ya madhil nat kiti ghatta asu shakate yachi olakh patali.....

    ReplyDelete
  133. kup mast ani thodi sad pan hoti mala kup avadali

    ReplyDelete
  134. the story was excellent
    but the i think the story should have good end

    ReplyDelete
  135. atishay sundar pan shewat asa sad sad??? pan khup chhan watale, ekada vachayla ghetlyavar shewatparyant vachatach rahave vatate...

    ReplyDelete
  136. सुनील डोईफोडे साहेब,

    मी तुमच्या सर्व कादंबऱ्या वाचल्या आहेत, आणि सगळ्या खूप आवडल्या. हि कादंबरी पण एक वेगळ्या विषयावरचा एक वेगळा अनुभव आहे. प्रथम तुमचे अभिनंदन, एकदम छान लिहिल्याबद्दल, खरच उत्कंठा वाढवणारी, पुढे काय होईल याबद्दल विचार करायला लावणारी. प्रेमाच्या कक्षा रुंदावणारी, पण शेवट थोडा अतिशयोक्ती वाटला. कादंबरी लवकर संपवण्यासाठी केल्यासारखा. अजून थोडी वाढवता आली असती. संकटावर मात केलेली दाखवली असती तर थोडं बरं वाटलं असतं.



    पुढच्या कादंबरीची आतुरतेने वाट पहात आहे.



    तुमचा नियमित वाचक,

    राहुल तिळवे.

    ReplyDelete
  137. Kdak yaar..jabrdast...khupach chan hota ha NOvel...shevat itaka vait kela aahe ki vachlya nantar dolyatun yenare ashru he thambnas tayar nhavate..pan hich tari khari maja aahe ya novel madhye...thank u so much..:(

    ReplyDelete
  138. REALLY I CANT EXPRESS MY FEELINGS ABOUT UR STORY REALLY......ITS REALLY HEART TOUCHING STORY...... I WAS FEELING I M IN THE STORY ONLY.....PLS IF POSSIBLE THEN PLS WRITE AGAIN ONE STORY LIKE THIS

    ReplyDelete
  139. Sunil cer i realy cellut u , karan me vachlelya novels paiki dolyant ashru annari he pahili novel pan plz punha asa vait shevat karu naka karan ,kadambari he apurna rahilya sarkhi vatte .if the posiibale plz write the story like this, but plz do happy end in that ,ill wait for ur next story.........................avishkar

    ReplyDelete
  140. Awsome story............... I hav no words to express bt I m quite disappointed by end coz at the end Priya didnt have his love with her in real life................... Just one word for you i.e. WOW..........

    ReplyDelete
  141. tumchi navin kadambarichi aamhi vaat bahgto..kadhi publish hoil ithe

    ReplyDelete
  142. Awesome......yaar ..mi explain kru shakt nahi mi kay feel kartey...itki chhan novel tumhi lihu kshi shakta pan 1 request ahe plssssssss ya novelchi second part liha na mazyasathi....mi wat baghen....urs fan rupali (Animator)

    ReplyDelete
  143. novel khup chhan aahe...specially second half.....

    ReplyDelete
  144. chanch aahe....
    vachatana dolyat pani aale..

    ReplyDelete
  145. kumud nandkumar patilNov 10, 2011 01:15 AM

    khup changli watli katha....pan konachyahi premacha annt itka vidarak howu naye... at the end of the novel i got tears in my eyes.... atlast i can only say that 'mrugjal' is very heart touching novel i love it.... wating 4 next novel which has happy ending....

    ReplyDelete
  146. Khupach chhan kadambari. Va.Pu.mhanale hote ki udand prem kara. tasach udand prem pan tyacha asa aant vhayala nako hota. dole panawale shevat vachtana.

    ReplyDelete
  147. Kalpana DeshmukhNov 18, 2011 04:14 AM

    very nice story
    khup bhavpurn story aahe hi
    vachta vachta mazya netratun pani aale
    speechless story

    ReplyDelete
  148. khup chan ahe sunilji he story pan Adhuri vatli.
    pan ekdam mastmantlya Athvani jagya zalya khup chn vatl

    ReplyDelete
  149. hi novel vachtana jara hi kantala ala nhi.... agdi majet vachun zali story..kuthetari mazya a8vni tajya zalya....akdam mast ahe hi novel...i just love it..

    ReplyDelete
  150. Khup chan hoti novel... tumhala sangu me tyat itka utarlo hoto ka... ti mazhi ch kahani watayala lagali hoti.. pan jevha shewat vachala mala tya ratri zhop dekhil aali nahi.. Priya chi, Vijay chya aai chi and tyachya bahini che kay zhale asel hi kalgi lagli hoti... I m crying..

    ReplyDelete
  151. Me prathamch hi kadambari vachli aahe,
    aani mala ti khup aavadli karan ti khup manala lagnari aahe.

    ReplyDelete
  152. Khupach Chan Kadambari aahe hee. Khupach Sundar. Manala sparsh karun geli.

    ReplyDelete
  153. Speechless, i was expecting happy ending. Great novel sir. Next time make successful to this love story.

    ReplyDelete
  154. kadambricha shevat kupach dukhad hota, vatat hota ki e-love sarkha ya kadambaricha shevat hi anandi asel, pan kadambari apratim ahe. vachtana sarkhe phude kay hoil yachi ustukta asayachi.priya baddal atmiyata vatayachi. mi tumchya hya donch kadambarya vachlet pan tumchya itarahi kadambrya vachnyachi ichya ahe.

    ReplyDelete
  155. khupach chan hoti kadambari. shach chan kadambarya lihat raha. best of luck
    .

    ReplyDelete
  156. ROHI- " MIND BLOWING NOVEL " I JUST LOVE THIS NOVEL AND REALLY I CANT EXPRESS MY FEELINGS ABOUT UR STORY REALLY......ITS REALLY HEART TOUCHING STORY...PAN MALA PRIYA VISHYI KHUP WAIT WATATAY REALLY.......

    ReplyDelete
  157. Kadambari khoopach chaan hoti, pan shevat vegla karta ala asta

    ReplyDelete
  158. mind blowing. it very heart touching story.
    pudhe asach kahi tari liha he vinanate.

    ReplyDelete
  159. tumchi hi kadambari vachtanaa majh bhan harpun me hi kadambari vachat hote as mala vatat. ani tya sarv ghatna majya najre samorun jat hotya jas jashi me vachat hote janu kahi me ekhada picture baghat ahe asech....
    kharch majhyakade shabdch nahi ahet kadambari kashi hoti he sangnyasathi pan vachatana dolyat pani ale....

    awesome....... out of the world

    ReplyDelete
  160. suvarna mirakarDec 19, 2011 10:20 PM

    shri sunil doiphode tumchya sarwach katha far manala harwun janarya aasatat pan hi mrugjal katha kharokharach farach surekh aahe aksharshaha dolyatun pani aale.

    ReplyDelete
  161. aksharsha dolyat ashru aale... farach chhan.. pan kharach kunachya premacha ni aayushyacha asa anat hou naye...

    ReplyDelete
  162. khupch chhan...agadi man helavun taknari stori ahe.

    ReplyDelete
  163. Shabdach nahit bolayla.........Kadambari wachtana sampurn chitrch dolyansamor ubhe rahte.
    Really "Heart Touching"........
    Khup radu aale.
    Far sundar likhan kele ahe. Thanks for such a good novel.

    ReplyDelete
  164. @सुनील डोहीफोडे, कादंबरी वाचून मन अगदी सुन्न झाले. खर्या प्रेमाची अशी शोकांतिका. खूप वाईट वाटत आहे. प्रिया, विजय ची बहिण आणि विजयची आई ह्यांची झालेली अवस्था मनाला अगदी दुःख देणारी आहे. बिचार्या प्रियाच्या नशिबात तर असला विरह आणि अशी अवस्था...तो विचार पण आता सहन होत नाही. एका जीवावर अवलंबून असलेले त्याचे लोक...आणि नंतर त्यांची झालेली दुरवस्था. असे कोणाच्या हि जीवनात न होवो हीच इश्वर चरणी प्रार्थना...

    ReplyDelete
  165. Layiiiiiiiiiii bhari!! kharach shabd nahit bolayla..agdi heart touching story ahe! MINDBLOWING! KEEP IT UP! n all d best 4 ur future!

    ReplyDelete
  166. sir pls tumchi navin kadambari lavkar aana
    khup aaturtene vat baghat aahe
    aani mrugajal khupch sundar kadambari aahe manach nahi lagat vachun zalyavar
    lavkar dusri kadambari prakashit kara.

    ReplyDelete
  167. awesome.truly illusion chracters.. this is an real love story .. thn wat hapnd with vijay and priya?

    ReplyDelete
  168. khupach chan aahe anek bhavana ekasobat wyakta hotat cant express

    ReplyDelete
  169. Kharach hi kadambari barach kahi shikaun jate, tyat pratek gost mahatwachi ahe.
    Maytri, prem. He sagale kay ahe ani te kase nibhavave. He sarv gosti ya maddhe ahet. Khup chhan ani dardnak ahe.
    i like it.

    ReplyDelete
  170. tumchi ji kadam bari aahe actually tich khere ssgne zale tar tichya shevatach ticha men paya aahe kup kup chaan shevat ghetlat

    ReplyDelete
  171. I don't have any word to say..feeling like cry...

    ReplyDelete
  172. अप्रतिम कादंबरी! शब्द अपुरे पडतील वर्णन करायला...
    तुमच्या नवीन कादंबऱ्यांची मी आतुरतेने वाट पहात आहे.

    ReplyDelete
  173. khupach chan hoti kadambari.agadi hrudhyala sprash karun geli.zakassssssssss.

    ReplyDelete
  174. नमस्कार,
    अतिशय उत्कृष्ठ अशी कादंबरी.
    वाचताना प्रत्येक page ला उत्कंठा अतिशय ताणली जात होती.
    वरील काही प्रतिक्रिया वाचल्या. लोकांना शेवट आवडला नाही असा एकंदर सुर वाटला.
    पण अगदी खरं आणि मनापासून सांगायचं तर मला तरी हा शेवट खरंच काळजाचा ठाव घेणारा, अनपेक्षित (अगदी पूर्णपणे नसला तरी बरयाच प्रमाणात, कारण मधले मधले धक्के पाहून थोड़ी कल्पना आलेली होती की असा ही धक्का असू शकतो) आणि अतिशयच भन्नाट वाटला. एकदम superb, fantabulous वगैरे वगैरे.
    जबरदस्त! Keep writing!!!
    ~ अमोद

    ReplyDelete
  175. Khupach chan kadambari ahe.

    ReplyDelete
  176. Atyant surekh kadambari ahe.........scrizophenia che mast exp ahe he...................

    ReplyDelete
  177. chana ahe......
    pudhe kai honar yachi odh lagat rahate.....

    pan he vachla nantr....
    mala khup aswast vataty....

    ReplyDelete
  178. फार सुंदर लिहलेली कादंबरी आहे,उत्कृस्थ लिखाण,शेवट तर अप्रतिम वाटला,कहाणीचा हन्गोवर काही केल्या डोक्यातून जात नाहीय,सतत विचार येतात मृगजला बद्दल...

    MAHESH WATWATEKAR

    ReplyDelete
  179. kharokhar me tumcha rashik zalo karan vachtana asa vatat hota ki he sagala ghadat ahe pratically pan durdyava ya gosticha vatato ki kharya premachi he ashi vel kunachya aushyat yeu naye,,,,,,,,,
    tumhi khup chan varnan lihale ahet nakkich tumhi khup manane mothe asal,rasikaho pan aaj hech prem haluhalu durmil hot chalalay he khantachi gosta ahe
    Sir tumhala mazya khup subhecha agdi manapasun
    Ketan Dilip Chalke

    ReplyDelete
  180. Ati Sundar ! Vachtana Utkantha vadhat hoti, agdi hridayala sparshun geli. Vachtana dolyat pani ale, asa vatat hote ki janu samor he sarv ghadte ahe. Kunachyahi premacha asa durdaivi anta hou naye.

    ReplyDelete
  181. Kharach Mrugjal. Prem asatach ek mrugjal.

    ReplyDelete
  182. nice story! kathecha purwardh jast awadla. shewat matr jara wegala asawa ase watale. baki tumche sarve novels jabardast ahet yaat shankach nahi.
    pudhchi katha kadhi post karnar ahat? pls lawakar ashich ekhadi katha liha. we r waiting....

    ReplyDelete
  183. khupach chan hoti.janu panch tya goshtit gelyasarkh vatat hot.... ashach rahsyamal storya lihit raha. All the best!!!!

    ReplyDelete
  184. kharch khupch chan kadambari ahe....

    pan devakd me prarthana karel ki kunachyahi premacha asa shevat hou naye....

    aksharsha haraun gelto me...

    ReplyDelete
  185. Replies
    1. ayushyat first time kadambari wachali,... ti pan Mrugjal...

      shewati mich weda zalo ki kaay ase watat hote..... kautukala shabdach nahiyet...

      APRATIM....

      Delete
  186. Atishay sundar katha..............cant imagine ki asehi kahi hou shakte......asha katha far kami vachayala milatat...lekhakane uttam ritine lekhan kelele aahe.......Thank's ashi katha ithe vachayala milalyabaddal....

    ReplyDelete
  187. vinayak shirkeFeb 21, 2012 03:59 AM

    kharch kadambari far sundar ahe.......

    ReplyDelete

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network