Ch-20: बॉसचा मेसेज ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishती मेल आणि तिचे अटॅचमेंट्स पूर्णपणे वाचल्यावर कमांड2 कॉम्प्यूटरवरून उठला. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. ती पूर्ण माहिती त्याने त्याच्या डोक्यात, हृदयात आणि मनातच नाही तर त्याच्या जवळ असलेल्या थंब ड्राईव्हमध्येसुध्दा साठवून ठेवली होती. तो तिथून जाण्यासाठी वळणार एवढ्यात काम्प्यूटरचा बझर वाजला. त्याने बघितले की कमांड1ला मेल आली होती. त्याने कमांड1च्या उघड्या मेलबॉक्समध्ये जाऊन बघितले तर मेल बॉसची होती. तो पुन्हा कॉम्प्यूटरसमोर बसला. त्याने मेल उघडली. मेलमध्ये एक अटॅचमेंट होती. त्याने अटॅचमेंट उघडली. ते एक मॅडोनाचे सुंदर सेक्सी चित्र होते. बॉस मॅडोनाचा भलताच फॅन दिसतो...

त्याने विचार केला. एव्हाना कमांड2 कमांड1चं पाहून पाहून चित्रातला मेसेज कसा उघडायचा हे शिकला होता. त्याने चित्रातला मेसेज उघडला. त्यात पुढच्या कारवाईवद्दल माहिती होती. पुढचा खून कधी, कुणाचा करायचा ते सविस्तर लिहिलं होतं. आज 15 तारीख होती आणि पुढच्या खुनासाठी 17 तारीख नेमलेली होती. त्या मेलमध्ये 17 तारखेच्या रात्री 1 ते 3 च्या दरम्यानचा काळ अगदी योग्य आहे असे लिहिलेले होते. आणि 16 तारखेचा संपूर्ण दिवस आणि रात्र हा अतिधोकादायक काळ आहे असे नमूद केले होते. कमांड2 ने तो संपूर्ण मेसेज एका जागी कॉपी करून घेतला कारण तो मेसेज एकदा उघडल्यानंतर नष्ट होत असे. त्याला बॉसने तशा प्रकारे प्रोग्रॅमच केले होते. कमांड2ने ती मेल बंद केली. मेसेज आता नष्ट झाला होता. अचानक कमांड2 आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि काहीतरी तुफान त्याच्या डोक्यात उठल्यासारखा तो त्या खोलीत कॉम्प्यूटरभोवती चकरा मारायला लागला. त्याच्या डोक्यात काहीतरी द्वंद्व चाललेलं स्पष्ट जाणवत होतं. शेवटी तो आपल्या येरझारा थांबवून कॉम्प्यूटरच्या समोर खुर्चीवर बसला. तो काहीतरी निर्णयाप्रत येऊन पोहोचला होता.

त्याने बॉसचा आलेला मेसेज बदलविण्याचे ठरविले होते...

त्याने तो मेसेच 'इडीट' करण्यासाठी ओपन केला. पुन्हा इकडे तिकडे पाहत त्याने आपला निर्णय पक्का केला आणि मग तो तो मेसेज 'इडीट' करायला लागला. खुनासाठी जी योग्य वेळ दिली होती ती 17 तारीख रात्री 1 ते 3 अशी दिलेली होती ती त्याने बदलून 16 तारीख रात्री 1 ते 3 अशी केली. त्या मेसेजमध्ये 16 तारखेची संपूर्ण रात्र आणि दिवस अतिधोकादायक आहे असे नमूद केले होते. तो त्याने बदलून 17 तारीख असा केला. म्हणजे जो खूनासाठी योग्य काळ होता तो धोकादायक आहे असा आणि जो धोकादायक आहे तो योग्य आहे असा बदल त्याने मेसेजमध्ये केला होता.

असे त्याने का केले होते?

त्याच्या डोक्यात काय शिजत होते हे सांगणं फार कठीण होतं.

कदाचित त्याचा त्याच्या बॉसच्या भविष्यकथनावर विश्वास नसावा. कदाचित त्याला त्याच्या बॉसने जे भविष्य वर्तविले होते ते बरोबर आहे का हे आजमायचे असावे.

पण जर त्याच्या बॉसने वर्तविलेले भविष्य खरे झाले तर?..

अशा परिस्थितीत कमांड1च्या आणि स्वत: त्याच्या जीवाला धोका होता. मग यातून काहीतरी मार्ग काढायला हवा...

तो विचार करू लागला.

शेवटी त्याने ठरविले की यावेळेस तो कमांड1च्या सोबत जाणार नाही. काहीतरी बहाणा करून तो कमांड1ला एकटेच जाण्यास भाग पाडणार होता.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network