Ch-35: चार तासांचा अवधी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishरात्र झाली होती. दोघांनी मिळून स्वयंपाक केला. जेवणाच्या टेबलवर सगळे पदार्थ सजवून ठेवले. जॉनने खोलीत अंधार करून टेबलवर कॅन्डल्स लावून पेटविल्या. दोघं जण जेवणाच्या टेबलवर मेणबत्यांच्या अंधूक प्रकाशात समोरासमोर एकमेकांना प्रेमाने न्याहाळत बसले. जेवणाचे पदार्थ तसेच पडून होते. त्यांना भूक तहानेचे भान होतेच कुठें! त्यांची भूक तहान हरविली होती. अचानक तिला जाणवले की जॉनचा चेहरा पुन्हा काळजीत पडून विचारमग्न झाला आहे.

" हॅलो" तिने चुटकी वाजवून त्याला विचारातून बाहेर आणले.

" काय विचार करतोस?" तिने विचारले.

" इथून जर गाडीने शहरात जायचे असेल तर किती वेळ लागेल?" त्याने विचाराच्या तंद्रीतून बाहेर येत विचारले.

" लागतील दोन एक तास. का? का विचारतोस?" तिने त्याला विचारले.

" प्लीज तू मला चार तासांचा अवधी देशील?"

" कशाला?" तिने विचारले.

" एक अर्जंंट काम निघालं आहे. दोन तास जाण्यासाठी आणि दोन तास येण्यासाठी. बस चार तासात मी जाऊन आलोच." तो तिच्याकडे बघत म्हणाला.

तिचा चेहरा पडल्यासारखा झाला.

" प्लीज " तो तिची विनवणी करीत म्हणाला.

" जाणे आवश्यक आहे का?" ती र्नव्हस होत त्याला म्हणाली.

" हो, फार आवश्यक आहे" तो तिला म्हणाला.

" पण असं काय काम आहे?" तिने विचारले.

" ते मी तुला आत्ता सांगू शकत नाही. तिकडून आल्यावर नक्की सांगेन" तो तिचा मूड व्यवस्थित करण्यासाठी खुर्चीवरून उठत हसत म्हणाला.

ती काही बोलण्याच्या आधीच तो घाईघाईने बाहेरसुध्दा गेला. 'ठक..ठक' पायऱ्या उतरण्याचा आवाज येऊ लागला. ती उठून खिडकीजवळ गेली. खिडकीतून ती त्याला गाडीपर्यंंत जात असलेला पाहत राहिली. गाडीजवळ जावून त्याने वळून वर खिडकीकडे बघितले.

" तू काळजी करू नकोस. बरोबर चार तासात मी परत येईन" खालून मोठयाने सांगत तो गाडीत बसला.

'खाट' गाडीचे दार त्याने जोरात ओढून घेतले. तिचे हृदय धडधडू लागले. त्याने गाडी सुरू करून गाडीच्या खिडकीतून तिला 'बाय' केले आणि तो निघून गेला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा म्लानता दिसायला लागली. चार तासांसाठी का होईना तो तिला हुरहूर लावून गेला होता.

तो कशासाठी गेला असेल?...

तो नक्की परत येईल ना?...

की सानीसारखा तोसुध्दा आपल्याला अर्ध्या वाटेतच सोडून जाईल?...

तिचं विचारचक्र सुरू झालं होतं.

... to be contd...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network