Ch-37: चांदन्या रात्री (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishमध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर पौर्णिमेच्या चंद्राचा स्वच्छ उजेड पडला होता. वाहत्या जलप्रवाहाचा खळखळणारा आवाज आणि चंद्राचा प्रकाश कॉटेजमध्ये येत होता. बेडवर पडल्या पडल्या जॉनची बोटं अँजेनीच्या शरीराशी खेळत होती. त्याचा हात तिच्या शरीराशी खेळता खेळता हळू हळू खाली सरकायला लागला.

" रिंग आणायची एवढी काय घाई होती? " अँजेनीने एक मंद स्मित देत त्याच्या खाली सरकणाऱ्या हाताला आपल्या हातात पकडून विचारले.

" जाण्याऱ्या वेळेला मी थांबवू शकत तर नाही. पण तो वेळ वाया जाऊ नये याची खबरदारी मी घेतलीच पाहिजे" तिला जवळ ओढून करकचून आवळत तो म्हणाला.

" अच्छा" तिने खट्याळपणे हसत त्याला दूर ढकलले.

तो तिला पुन्हा पकडण्यासाठी सरसावला. ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी बेडवरून उतरली तसा जॉन तिला पकडण्यासाठी अजूनच धडपडू लागला. ती इकडे तिकडे धावत त्याच्या पोहोचण्याच्या आवाक्यापासून दूर दूर जात होती. आता जॉनसुध्दा जिद्दीला पेटला. तो बेडवरून खाली उतरून तिच्याकडे सरसावला. ती हसत खिदळत जिन्याकडे धावली. तोसुध्दा तिचा पाठलाग करू लागला.

जिन्यातून धावत धावत शेवटी अँजेनी टेरेसवर येऊन पोहोचली. जॉनसुध्दा तिच्या मागे मागे टेरेसवर येऊन पोहोचला. वर टेरेसवर खुले आकाश, आकाशात चमकणाऱ्या चांदण्या आणि चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश जास्तच लोभनीय दिसत होता. त्यातच भर म्हणजे वरून वाहते खळखळणारे आणि चंद्रप्रकाशात चमकणारे पाणी विशेष विलोभनीय दिसत होते. ती त्या वाहत्या जलौघाच्या सुंदरतेकडे पाहून मंत्रमुग्ध झाली.

" बघ बघ किती सुंदर दिसते ते चमकणारे पाणी" ती म्हणाली.

एव्हाना जॉनने मागून येऊन तिला आपल्या मिठीत ओढले होते.

" पण या चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या तुझ्या चेहऱ्यापेक्षा नक्कीच सुंदर नाही" तो म्हणाला.

तो भावनाविवश होऊन तिच्या उघड्या बाकदार मानेशी आपल्या व्याकुळ ओठांनी खेळायला लागला.

तिच्या अंगातसुध्दा आता शिरशिरी संचारू लागली.

त्याने तिला फिरवून तिचा चेहरा आपल्या चेहऱ्यासमोर आणला. आणि आपली पकड अजूनच घट्ट करीत त्याने आपले गरम ओठ तिच्या ओठांवर ठेवले.

तीही त्याच्या चुंबनास आवेगाने प्रतिसाद देवू लागली.

त्याने तिच्या पाठीवर रूळणाऱ्या लांब तांबुस काळसर केसांना एका हाताने बाजूला केले. आणि तो तिच्या टॉपची पाठीवर बांधलेली लेस सोडू लागला.

अँजेनी त्याच्या छातीवरच्या केसांशी खेळत खेळत त्याच्या शर्टची बटनं काढू लागली.

एव्हाना त्यांना एकमेकांच्या श्वासातील आर्द्रता आणि उष्णता जाणवत होती.

" जॉन आय लव्ह यू व्हेरी मच" तिच्या तोंडातून आपसूकच निघाले.

" आय टू" म्हणत त्याने टेरेसच्या उघड्या फ्लोवरवर आपले आणि तिचे काढलेले कपडे टाकून त्यावर तिला अलगद फुलासारखे आडवे झोपवले.

आता दोघेही उघड्या गच्चीवर अगदी विवस्त्र होऊन भावनावेगाने एकमेकांना बिलगले होते.

चंद्राच्या शुभ्र प्रकाशात, खळखळत्या जलाच्या मधुर धुंद संगीतात एकमेकांच्या उत्कट भावनांना साद घालीत त्या अंधाऱ्या रात्रीत ते आपल्या प्रणयाचे रंग हळूवारपणे भरू लागले.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

6 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network