Ch-38: डिटेक्टव्हचा फोन (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


थंडीपासून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी अगदी घट्ट बिलगून जॉन आणि अँजेनी टेरेसवरच झोपले होते. सकाळच्या पक्षांच्या किलकिलाटामुळे अँजेनीला जाग आली. तिने अतीव समाधानाने गाढ झोप लागलेल्या स्थितीतून आपले जड डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तिला डोळे उघडावेसे वाटत नव्हते. तिला तसेच जॉनच्या मिठीत जन्मभर पडून राहावे असे वाटत होते . तशाच अवस्थेत तिने हलकेच डोळे उघडून पाहिले. पूर्वेकडे तांबडे फुटले होते. सकाळ झाली तेव्हा उठायलाच हवे होते. तिने आपले कपडे घालीत जॉनला हळुवारपणे हलविले.

" जॉन ऊठ, बघ सकाळ झाली."

"उं..." जॉनने आळस दिला आणि तिला पुन्हा आपल्या मिठीत ओढून घेतले.

तिने स्वत:ला सोडवित आपले कपडे घातले आणि पुन्हा जॉनला हलविले. तो उठला. बारीक डोळ्यांनी इकडे तिकडे बघितले. आणि पुन्हा तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच्या केसांतून हात फिरवीत ती गालातल्या गालात हसू लागली. तेवढ्यात त्यांना जाणवले की खाली रूममध्ये कदाचित जॉनचा मोबाईल वाजत आहे.

" जॉन बघ बरं, तुझा मोबाईल वाजत आहे"

इथे आल्यानंतर प्रथमच जॉनचा मोबाईल वाजला होता. तो खाडकन उठला. तो आपले कपडे घालीत घाईघाईने खाली जाऊ लागला. तीही त्याच्यासोबत खाली जाऊ लागली.

हो जॉनचाच मोबाईल वाजत होता...

मोबाईल उचलून जॉनने डिस्प्लेकडे बघितले. डिटेक्टीव्ह अॅलेक्सचा फोन होता.

इतक्या सकाळी अॅलेक्सचा फोन ?...

नक्कीच काहीतरी महत्वाचे असावे...

पटकन जॉनने बटन दाबून मोबाईल कानाला लावला.

" हं बोल अॅलेक्स " जॉन म्हणाला.

" जॉन एक महत्वाची बातमी आहे " तिकडून आवाज आला.

अचानक मोबाईलच्या सिग्नलमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येऊ लागला. काहीच एकू येत नव्हते.

" हॅलो हॅलो " जॉन ट्राय करू लागला.

" हॅलो" तिकडून प्रतिसाद आला.

" हं, बोल काय बातमी आहे ?" जॉन म्हणाला.

" खुन्याच्या ठिकाणाचा पत्ता लागलेला आहे. तू लवकरात लवकर... " तिकडून वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच काहीतरी न समजणारे बोलण्यासारखा आवाज आला आणि पुन्हा आवाज पूर्णपणे गेला.

" हॅलो हॅलो" जॉनने बोलण्याचा प्रयत्न केला.

त्याने त्याच्या मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले. त्याच्या मोबाईलचा सिग्नल गेला होता.

कदाचित शहरापासून दूर अशा निर्गम डोंगराळ भागात सिग्नल व्यवस्थित येत नसावा...

" काय झालं ? कुणाचा फोन आहे?" अँजेनीने विचारले.

तो फोन घेऊन बाल्कनीत गेला. पण त्याच्या मोबाईलचा सिग्नल यायला तयार नव्हता.

" अँजी लवकर तयारी कर. आपल्याला आता इथून ताबडतोब निघायला पाहिजे " म्हणत जॉन बाल्कनीतून जिन्याकडे घाईघाईने गेला.

जिन्यावरून धावतच तो टेरेसवर गेला. काही न समजून अँजेनीसुध्दा त्याच्या मागे मागे टेरेसवर गेली. टेरेसवर सुध्दा त्याच्या मोबाईलचा सिग्नल आला नव्हता.

"अॅलेक्सचा फोन होता... खुन्याबद्द्ल काहीतरी महत्वाची माहिती मिळाली आहे त्याला बहुतेक.... पण मध्येच सिग्नल गेला" मोबाईलचा डिस्प्ले अँजेनीला दाखवित जॉन म्हणाला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network