Ch-39: सुटीत व्यत्यय (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishजॉन गाडी चालवित होता आणि त्याच्या शेजारी अँजेनी बसलेली होती. दोघंही समोर सरळ रस्त्यावर बघत होती. अगदी शांत.

बऱ्याच वेळची त्यांच्यामध्ये असलेली एक अनैसर्गिक शांतता तोडत जॉन म्हणाला,

" मी म्हटलं नाही तुला, हे खुनाचं प्रकरण अजूनही मिटलेलं नाही"

अँजेनीने त्याच्याकडे बघितले.

" खुनी अजूनही मोकळा फिरतो आहे" जॉन पुढे म्हणाला.

" मग जो मेला तो कोण असावा? " अँजेनीने विचारले.

"बऱ्याच शक्यता आहेत" जॉन अँजेनीकडे बघत म्हणाला.

अँजेनीने त्याच्याकडे फक्त प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.

" एक तर त्याचा खुनाशी काहीही संबंध नसावा ... किंवा तो खुन्याचा साथीदार असावा ... किंवा खुनांशी संबंधित असलेल्या टोळीचा तो एक क्षुद्र मेंबर असावा" जॉन म्हणाला.

" पण अॅलेक्सला असं काय महत्वाचं सांगायचं असावं? " अँजेनीने प्रश्न उपस्थित केला.

जॉन काहीतरी लक्षात आल्यासारखा तिला म्हणाला,

" बघ बरं ...माझ्या मोबाईलचा सिग्नल आला का? "

" तुझा मोबाईल?" प्रश्नार्थक मुद्रेने अँजेनीने विचारले.

जॉनने डोळ्याने इशारा करून अँजेनीच्या पलिकडे सिटवर ठेवलेला त्याचा ओवरकोट दाखविला. अँजेनीने ओवरकोट उचलून आपल्या हातात घेतला. ओवरकोटच्या खिशातला मोबाईल काढून तिने त्याचा डिस्प्ले बघितला. मोबाईलचा सिग्नल अगदी पूर्णपणे आला होता.

" सिग्नल तर आला आहे... थांब मी त्याला ट्राय करते"

अँजेनी अॅलेक्सचा फोन ट्राय करू लागली. तिने आपल्या चवळीच्या शेंगासारख्या नाजूक बोटांनी काही बटनं दाबून मोबाईल आपल्या कानाला लावला. जॉन उत्कंठतेने मधेच एखादी नजर तिच्यावर फिरवीत होता.

तिने कानाला लावलेला मोबाईल काढून रिडायल केले.

" काय झालं?" जॉनने उत्कंठतेने विचारले.

" मोबाईल स्वीच ऑफ केलेला आहे असा मेसेज येतोय " तिने पुन्हा मोबाईल कानाला लावत म्हटले.

थोड्या वेळाने तिने पुन्हा रिडायल केले पण तोच मेसेज पुन्हा पुन्हा येत होता.

" त्याने मोबाईल बंद केलेला दिसतो" मोबाईल जॉनजवळ देत ती म्हणाली.

जॉननेसुध्दा एकदादोनदा प्रयत्न करून बघितला. पण व्यर्थ.

" मला वाटते त्याने मोबाईल मुद्दामच बंद करून ठेवला असावा" जॉन मोबाईल त्याच्या खिशात ठेवत म्हणाला.

" मुद्दाम, पण का? " अँजेनीने उत्सुकतेने विचारले.

" मोबाईल संभाषण टॅप होण्याची कदाचित त्याला भीती असावी " जॉनने शक्यता वर्तवली.

" आता त्याला भेटल्याशिवाय खरं काय ते कळणार नाही असं दिसतं " अँजेनी म्हणाली.

जॉन काहीही न बोलता पुन्हा सरळ समोर रस्त्यावर बघून ड्रायव्हींग करू लागला. अँजेनीसुध्दा समोर बघता बघता तिच्या विचारात पुन्हा गढून गेली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network