Ch-40: ठोका चूकला (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉनने डिटेक्टीव अॅलेक्सच्या दाराची बेल वाजवली. आतून पुसटसा आवाज आला-

'डिंग डाँग'

जॉन दार उघडण्याची वाट पाहत उभा राहिला. जॉनने वेळ घालविण्यासाठी सभोवार एक नजर फिरविली.

....अॅलेक्स घरी एकटाच राहत होता. जॉनची आणि अॅलेक्सची मैत्री बरीच जुनी होती. घरासमोरील बागेची अॅलेक्स विशेष काळजी घेत नसावा असं जाणवत होतं. जेव्हा अॅलेक्सची बायको हयात होती तेव्हा तिनेच ही बाग मोठया हौसेने आणि मेहनीतीने जोपासली होती. जवळपास पाच वर्षापूर्वी अॅलेक्सच्या बायकोचा मृत्यू एका दुर्घटनेत झाला होता. तेव्हापासून समोरच्या बागेची काळजी कुणीही घेत नव्हतं. अधून मधून तिथला चौकीदारच मजूरांना लावून त्या बागेला थोडंफार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते काही नियमित होत नसे. त्यामुळे ती बाग भयाण आणि रूक्ष अशी दिसत होती. अगदी अॅलेक्ससारखी...

बेल वाजवून बराच वेळ झाला होता. तरी अजूनही अॅलेक्सनं दार कसं उघडलं नाही ?...

जॉननं पुन्हा एकदा दोनदा बेल वाजवली. दार जोरजोराने ठोठावलं आणि पुन्हा दार उघडण्याची वाट पाहू लागला.

...अॅलेक्सच्या पत्नीच्या मृत्यूनंतर याच्या व्यक्तीमत्वातसुध्दा खूपच बदल झाला होता. तेव्हापासून अॅलेक्सचं मित्रांसोबत हसणं खिदळणं जवळजवळ एकदम बंदच झालं होतं. अचानक त्याच्यात प्रौढत्व आणि पोक्तपणा आल्यासारखा वाटत होता. स्वभावानेसुध्दा तो एकलकोंडा झाला होता. त्यातच आई वडील आणि मूलबाळही नसल्यामुळे तो अजूनच बेफिकीर झाला होता. त्याची बायको होती तीच त्याची सर्वस्व होती आणि ती गेल्यापासून तो जो एकटा झाला तो अजूनही एकटंच राहणं त्याला आवडत होतं. त्याचं कामही तसं रात्रीच्या अंधाराशी जास्तीत जास्त संबंधित होतं. पण आता त्याची त्या अंधाराशी घट्ट मैत्री झाली होती. त्याचं जीवन तेव्हापासून जे नीरस झालं होतं ते त्याच्या जीवनात कुण्याही स्त्रीला येण्यासाठी त्याने काही वावच ठेवला नव्हता...

अजूनही अॅलेक्सच्या घराचं दार उघडलं नव्हतं...

आता मात्र जॉनला काळजी वाटायला लागली होती. त्याने पुन्हा जोरजोराने दार ठोठावलं.

" अॅलेक्स" जॉनने जोरात हाक दिली.

आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती.

जॉन आता अॅलेक्सच्या घराच्या बाजूने मागे जायला लागला. मागे जाता जाता त्याने बाजूच्या खिडकीतूनही डोकावून आणि ठोठावून पाहिले. पण काहीच प्रतिसाद नव्हता. तो घराच्या मागे जावून पोहोचला. मागचं दार सताड उघडं होतं. जॉननं पुन्हा अॅलेक्सला उघड्या दारातून हाक दिली. तरीही काहीच प्रतिसाद नव्हता. आवज फक्त घरात घुमला. आत पूर्णपणे अंधार होता. जॉन हळू हळू आत जायला लागला. आता मात्र जॉनच्या डोक्यात वेगवेगळ्या शंका घर करायला लागल्या होत्या.

काय झालं असेल?...

काही दगा फटका तर नाही झाला ना?...

त्याच्या श्वासांची गती विचलित व्हायला लागली होती. नकळत त्याचा हात त्याच्या कंबरेला लावलेल्या बंदुकीकडे गेला. त्याने बंदूक काढली. बंदूक इकडे तिकडे रोखत तो परिस्थितीचा कानोसा घेत आत जाऊ लागला. घरात सगळीकडे वस्तू इतस्तत: पडलेल्या होत्या.

तशीही अॅलेक्सला वस्तू व्यवस्थित ठेवण्याची सवय नव्हती...

कशीतरी त्याला रागावून, दाटून त्याची बायको त्याला व्यवस्थितपणा शिकविण्याचा प्रयत्न करायची...

पण अॅलेक्सची बायको गेल्यापासून घराची रयाच गेली होती...

बेडरूमध्ये जाताच जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला. बेडरूममध्ये अॅलेक्स बेडवर आडवा पडलेला होता. घाईघाईने जॉन त्याच्या जवळ गेला.

" अलेक्स..." त्याने त्याला हलवून बघितले.

शरीरात काहीच हालचाल नव्हती. त्याने त्याची नाडी तपासून बघितली. त्याची नाडी केव्हाच बंद पडलेली होती. जॉनने घाईघाईने आपला मोबाईल काढण्यासाठी खिशात हात घातला. पण व्हायब्रेट होणारा मोबाईल त्याच्या हातात आला. त्याने मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले. त्याला त्याचा सहकारी सॅमचा फोन आला होता. त्याने मोबाईलचे एक बटन दाबून तो अटेंड केला.

" हं सॅम"

"सर एक वाईट बातमी आहे ...सर खुन्याने चौथासुध्दा खून केलेला आहे..." तिकडून सॅम म्हणाला.

" काय ?" अनायसेच जॉनच्या तोंडून निघाले.

" नियोल वॅग्नर .. नॉर्थ स्ट्रीट, 2024.... याचा पण तशाच तऱ्हेने खून झाला आहे" सॅमने माहिती दिली.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network