Ch-41:अचानक मेडीयाशी सामना (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉन नार्थ स्ट्रीटला नियोलच्या अपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी आपल्या गाडीतून उतरला, तोच त्याला चारही बाजूने प्रेसने घेरले.

" मि. जॉन.... तुम्ही तर म्हणाला होता की खुनी मेला आहे ...आणि केस संपलेली आहे."

एक पत्रकार गर्दीतून आपला कॅमेरा सांभाळत अचानक जॉनच्या पुढे येऊन ठाकला. गर्दीतून वाट काढून जॉनच्या समोर पोहोचेपर्यंंत त्याचे सगळे कपडे आणि केस विस्कटलेले होते.

जॉनच्या मागे आणि बाजूला बाकीचे पत्रकार घेराव करून उभे होते. तो एकदम समोर येऊन ठाकल्यामुळे जॉनला समोर जाण्याचा रस्ता सुध्दा बंद झाला होता. आता त्या पत्रकाराला काहीतरी उत्तर देऊन त्याची कशीतरी बोळवण करणे भाग होते. काय बोलावे जॉनला काही सुचत नव्हते.

" लेट मी र्फस्ट इनव्हेस्टीगेट द केस ..." असं म्हणज जॉनने त्याला बाजूला सारले आणि पुढे जाऊ लागला.

मागून तो पत्रकार ओरडला -

" सर यू कान्ट जस्ट इग्नोर अस धिस वे"

" यू हॅव टू अॅन्सर अस" दुसरा एकजण ओरडला.

" यस ... यस" बाकीचे पत्रकारसुध्दा ओरडून साथ देत होते.

त्याच्या मागे सर्व पत्रकार संतापाने ओरडून गोंधळ घालत होते. जॉन ब्रेक लागल्यागत थांबला. त्याने वळून बघितले. त्याला सगळे पत्रकार जणू खायला टपले होते असे वाटत होते. जॉनचा चेहरा पडला. त्याला कळत होते की चूक पोलीसांची होती.

आता यांना काहीतरी बोलून समजावणे आवश्यक आहे...

कॅमेऱ्यांचे फ्लॅश त्याच्यावर चमकत होते. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमुळे तो अजूनच गोंधळला. बाकीचे पोलीस मोठया मुश्कीलीने त्या पत्रकारांना मागे थोपवून साखळी करून उभे होते.

" या इनव्हेस्टीगेशननंतर संध्याकाळी मी प्रेस कॉन्फरंस घेणार आहे ... त्यात मी सविस्तर सगळं काही सांगेन" जॉन कसाबसा बोलला आणि वळून वेगाने चालत अपार्टमेंटमध्ये शिरला.

पत्रकार तेवढ्या वेळेपुरते तरी शांत झाले होते. जॉनला स्वत:चेच आश्चर्य वाटत होते.

तो कसा बोलला त्याचे त्यालाच कळत नव्हते...

तो प्रेस कॉन्फरंसबद्दल बोलला खरा पण प्रेस कॉन्फरंसमध्ये तो काय बोलणार होता?...

चला आता तर ब्यॅद टळली. संध्याकाळचे संध्याकाळी बघू...

असा विचार करून तो लिफ्टमध्ये चढला. लिफ्ट बंद झाली. त्याने लिफ्टमध्ये रांगेत असलेल्या बटनांपैकी शोधून 10 नंबरचे बटन दाबले.

... to be contd...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network