Ch-45: आय ऍम सॉरी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


बॉस पत्रकारांच्या गोतावळ्यातून जो सुटला तो खाड खाड बुटांचा आवाज करीत आपल्या कॅबीनकडे निघाला. जॉनही पत्रकारांना टाळत गर्दीतून बाहेर आला आणि बॉसच्या मागे निघाला.

बॉस असा कसा विश्वासघात करू शकतो...

मागेसुध्दा एकदा सगळं बॉसनंच पत्रकारांसमोर जाहिर केलं होतं. त्यात जॉनचा काडीचाही हात नव्हता...

किंबहुना बॉसनंच जॉनला जवळ जवळ जबरदस्ती सुटीवर पाठविलं होतं...

जॉनला बॉसचा राग आला होता.

प्रत्येक वेळी बॉसनं डिक्टेटरशीपने वागायचं आणि काही चुकलंच तर कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचं...

जॉनलाच काय हे कुणालाही पटण्यासारखं नव्हतं. जॉन घाईघाईने बॉसच्या मागे जायला लागला. त्याला बॉसला जाब विचारायचा होता.

बॉस त्याच्या कॅबिनजवळ येऊन पोहोचला. जॉन बॉसच्या मागेच होता. बॉसला जॉनची चाहूल लागली असावी किंवा त्याने जॉन त्याच्या मागे येईल हे गृहीत धरले असावे. कॅबिनमध्ये घुसायच्या आधी अचानक ब्रेक लागल्यागत बॉस एकदम थांबला. त्याच्या मागे जॉनसुध्दा थांबला. बॉस मागे वळून हळू हळू जॉनजवळ येऊ लागला. जॉनच्या अगदी पुढ्यात येऊन तो थांबला. आता तो जॉनसमोर कडकपणे उभा राहून त्याच्या डोळ्यांशी डोळे भिडवून पाहू लागला. जॉन अजूनही रागातच होता. तो सुध्दा रागाने बॉसच्या डोळ्यांशी डोळे भिडवीत उभा राहिला.

" असा काय उध्दटपणे पाहतोस? मला काय खाणार आहेस की काय?" बॉस जॉनवर ओरडला.

बॉस आपली नेहमीची ट्रीक आजमावत होता. पण यावेळी जॉन हादरला नव्हता.

मग अगदीच शेळी होऊन बॉसनं जॉनच्या खांद्यावर आपला धीराचा हात ठेवला.

" आय अॅम सॉरी जॉन. वेळच अशी होती की माझा काहीच इलाज चालला नाही"

यावेळी जॉन गोंधळलासुध्दा नाही. तो अजूनही बॉसच्या डोळ्यांशी डोळे भिडवून एकटक पाहत होता. बॉसला आपली ट्रीक वाया गेलेली दिसत होती.

" आय अॅम रिअली सॉरी " बासॅनं जॉनच्या खांद्यावर थोपटत हात मागे घेतला.

बॉस एकदम गर्रकन वळून पुन्हा खाट खाट असा बुटांचा आवाज करीत कॅबिनमध्ये घुसला. बॉसनं एका दगडात दोन पक्षी मारले होते. पोलीस खात्याची पत वाचविली होती आणि जॉनचा काटाही काढला होता.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network