Ch-48: ओ के देन कॉल द मिटींग (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


बॉसच्या समोर सॅम बसला होता. तो केसबद्द्ल बॉसला ब्रीफींग देत होता. बॉसने जॉनकडील सर्व जबाबदारी त्याला दिली होती. बॉस नेहमीप्रमाणे खुर्चीवर शांतपणे सिगारचे झुरके घेत होता.

तेवढ्यात शिपाई आत आला.

बॉसच्या पुढ्यात एक चिठ्ठी ठेवत म्हणाला,

" साहेब, जॉनसाहेब आलेले आहेत "

" जॉन....साहेब ..."

'साहेब' या शब्दावर वाजवीपक्षा जरा जास्तच जोर दिल्यामुळे बॉसच्या शब्दातला उपरोधकपणा स्पष्ट जाणवत होता.

बॉसने चिठ्ठी उघडली.

चिठ्ठीत लिहिले होते -

"खुनाच्या केसची अंत्यत महत्वाची माहिती माझ्या हाती लागली आहे त्यासाठी तुम्हाला तातडीने भेटायचे आहे"

बॉसने चिठ्ठीवरून निर्वीकारपणे एक नजर फिरविली.

सॅमपुढे चिठ्ठी सरकवित बॉस म्हणाले,

" जेव्हा दिवे लावायचे होते तेव्हा नाही लावले ... आता हे काय उजेड पाडणार आहेत ते देव जाणे?"

सॅमने चिठ्ठीवरून एक नजर फिरविली.

अचानक खुर्चीवर सरळ बसत बॉसने शिपायाला फर्मान सोडले ,

" सेंड हिम इन"

शिपाई लगबगीने बाहेर गेला आणि त्यापाठोपाठ जॉन आत आला.

" हॅलो जॉन, हाऊ आर यू?" बॉस त्याला समोर खुर्चीवर बसण्याचा निर्देश देत म्हणाला.

जॉन काहीच न बोलता समोरच्या खुर्चीवर बसला.

" हॅलो जॉन"

" हॅलो सॅम"

जॉन आणि सॅममधे अगदी मोजकाच संवाद झाला. दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत होतं.

" यस ... व्हाट कॅन वुई डू फॉर यू?"

बॉस एकदमच तिऱ्हाइतासारखे त्याच्या सोबत बोलत होते.

" सर, आय हॅव अॅन इंपॉर्टंंट इनफॉरमेशन रिगाडीर्ंंग नेक्स्ट पॉसिबल मर्डर"

" बट अॅज ऑल नो यू आर राईट नाऊ डिस्मीस्ड "

जॉन काहीच बोलला नाही.

" देन व्हाय शुड यू शेअर द इंन्फारमेशन विथ अस"

" हे बघा सर, ही जी माहिती आहे याचा तुमच्या डिपार्टमेंटल पॉलिटीक्सशी काहीही संबंध नाही. इथे पब्लीकच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. मी जर या माहितीच्या आधारे एकटा काही करू शकलो असतो तर तुमच्याकडे तोंड वेंगाडायला कधीच आलो नसतो"

जॉनच्या शब्दात त्याचा बॉसवरचा राग स्पष्ट जाणवत होता.

बॉसने समोरच्या अॅश ट्रेमध्ये सिगार चुरगाळली आणि हसत म्हणाले , " याला म्हणतात दोर जळाला पण पीळ नाही गेला. ऐनीवे काय माहिती आहे तुझ्याजवळ?"

" पुढचा खून कोणाचा होणार याची पॉसीब्लीटी आहे माझ्याजवळ" जॉन म्हणाला.

सॅम गप्पच होता कधी तो जॉनच्या तर कधी बॉसच्या तोंडाकडे बघत होता.

बॉस जोरजोराने हसायला लागला.

" पॉसीब्लीटी!"

" सर धीस इज नॉट सम काइन्ड ऑफ अ जोक"

बॉस हसायचं थांबला.

" हे बघ, या शहरात जवळपास 75 हजार घरं आहेत त्यातल्याच कुठल्यातरी एका घरात पुढचा खून होणार आहे ही पॉसीब्लीटी सांगायला एखादा मूर्ख मनुष्यसुध्दा पुरेसा आहे"

" पुढचा ज्याचा खून होणार आहे त्याचं नाव 'वाय' (Y) या अक्षराने सुरू होणार आहे"

बॉस पुन्हा हसायला लागला.

" इज धीस सम काईन्ड ऑफ वर्ड पझल"

इतक्या वेळचा गप्प असलेला सॅम कशीतरी हिम्मत करून बोलला.

"सर मला वाटते... वुई शुड लिसन थरोली व्हाट हि वांट टू से"

सॅम मधे बोललेला बॉसला आवडलेलं दिसत नव्हतं.

" ओ... हो... सॉरी ... मी तर पुर्णपणे विसरलोच की आता ही केस तू हॅन्डल करीत आहेस..." बॉस सॅमला टोमणा मारत म्हणाला.

" सर, तसं नाही ... शेवटी तुम्हीच आमचे बॉस आहात... मी फक्त तसं सुचविलं ...शेवटी काय डीसीजन घ्यायचं आहे तो अधिकार तुमचाच आहे..." सॅम ओशाळल्यागत म्हणाला.

बॉसचा 'इगो' सॅटिसफाय झालेला दिसत होता.

बॉस एकदम सिरीयस झाला. कॅबीनमध्ये शांतता पसरली. बॉसने नवीन सिगार पेटविली आणि खुर्चीला मागे शांतपणे रेलून म्हणाला ,

" ओ के देन कॉल द मिटींग"

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network