Ch-50: ऑडीओ (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉन, सॅम आणि बाकीचे पोलीस अधिकारी पाचव्या खुनाच्यावेळी कसा फास लावून खुन्याला पकडायचे याची चर्चा करू लागले. जॉनने प्रथम प्रत्येकाची आयडीया नीट ऐकून घेतली. आणि मग सर्व आयडीयांचा सारांश एक आयडीया ठरवून ती चर्चेसाठी घेतली. चर्चेसाठीही त्याने सगळ्यांना सारखे प्राधान्य दिले होते. ही चर्चेची तऱ्हा प्रत्येकासाठी जरा नवीनच होती. कारण बॉसची तऱ्हा वेगळीच असायची. तो डिक्टेटरशीप ने वागायचा. ही डेमोक्रॅटीक तऱ्हा सर्वांंना आवडत होती असं दिसत होतं. प्रत्येकाचा सहभाग आणि यामुळे प्रत्येकाच्या डोक्याला चालना मिळत होती. पण त्यांना काळजी होती की नेमका बॉस तिथे यायचा आणि सर्व विचका करून टाकायचा. आणि नेमके तसेच झाले. त्यांची चर्चा अर्ध्यावर असतांना अचानक घाईघाईने बॉस तिथे आला. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. त्याची ती दशा पाहून सर्वजण शांत झाले. नक्कीच काहीतरी अघटित झाले होते. त्याच्या मागोमाग एक शिपाई लॅपटॉप घेऊन आला.

" एक गडबड झाली आहे" बॉस आत आल्या आल्या म्हणाला.

सर्वजण स्तब्ध होऊन बॉस काय म्हणतो ते ऐकू लागले.

" हा खुनी कोणी एकटा दुकटा नसावा. ती एक मोठी संघटना असावी ...कदाचित अतिरेकी संघटना"

" अतिरेकी संघटना?" बरेच आश्चर्योद्गार निघाले.

कारण ही तेथील प्रत्येकांसाठी नवीन माहिती होती. कुणीही या घटनेचा त्या अंगाने विचारच केला नव्हता.

" प्रेसचा फोन होता सगळीकडे धुमाकूळ माजला आहे या लोकांनी इंटरनेटवर एक ऑडीओ रिलीज केली आहे " बॉसने एका श्वासात सांगितले.

नंतर बॉसने डॅनला लॅपटॉप सुरू करण्याचा आदेश दिला. डॅन लॅपटॉप सुरू करू लागला तसा बॉस पुढे बोलू लागला,

" मी अजून ऑडीओ ऐकला नाही. मला वाटते प्रथम तो आपल्याला ऐकला पाहिजे" बास लॅपटॉपच्या समोर बसत म्हणाला.

तोपर्यंंत डॅनने लॅपटॉप सुरू करून गुगल सर्च इंजीन सुरू केलं होतं. डॅनला बॉसच्या बोलण्यावरून कल्पना आली होती की प्रथम ती ऑडीओ फाईल इंटरनेटवर शोधावी लागेल.

डॅनने सर्च स्ट्रींग टाईप करण्याच्या आधी 'काय सर्च स्ट्रींग देवू' या आविर्भावाने बॉसकडे पाहिले.

तसं बॉसचं आणि डॅनचं टयूनिंग चांगलं होतं. कोणाच्या मनात काय घोळत आहे हे त्यांना एकमेकांसोबतच्या अनुभवावरून आधीच कळायचे.

" झीरो मिस्ट्री" बॉस म्हणाला.

डॅन ने ' झीरो मिस्ट्री' सर्च स्ट्रींग देऊन सर्च बटन क्लीक केलं. क्षणार्धात शंभर एक निळ्या रंगाच्या लिंक्स कॉम्पूटरच्या ब्राउजरवर अवतरल्या.

सगळे जण आपलं डोकं शक्य होईल तितकं घुसवून मॉनिटरकडे पहायला लागले.

" ती चौथी लिंक " बॉस म्हणाला.

सॅमने ती चौथी लिंक क्लीक केली. एक साईट ओपन झाली. त्यावर एक ऑडीओ फाईलची लिंक होती. प्ले आणि डाऊनलोड असे दोन ऑप्शन्स होते.

"प्ले इट डायरेक्टली" बॉस ने आदेश दिला.

सॅमने प्ले बटनवर क्लीक केले. सुरवातीला ऑडीओवर एखाद्या वादळापूर्वी जशी शांतता असावी तशी शांतता होती. नंतर एक धीरगंभीर आवाज घुमायला लागला. सगळे जण एकदम शांत होऊन स्तब्धतेन ऐकायला लागले.


" मेरे हिंदूस्थानी भाईयों और बहनो..."

मधे एक लांब पॉज होता.

बोर्डरूममधल्या सर्वांंनी एकमेकांकडे एका प्रश्नार्थक नेत्रकटाक्षाची अदलाबदल केली.

ऑडीओमधला आवाज पुन्हा बोर्डरूममध्ये घुमायला लागला.

" किसी ना किसी तरह कोई हमपर आजतक राज करते आया है. हमे जैसे गुलामी की आदत सी हो गई है. इससे पहले 150 साल तक हमपर ब्रिटीश लोगोंने राज किया ... और बुरी तरह... किसी जानवरो की तरह हमसे बर्ताव किया. यह लोगोंका हमपर राज करने का सिलसिला अभीभी जारी है. अभीभी हमपर कोई राज कर रहा है. यह सुनकर आपको आश्चर्य हो रहा होगा. लेकिन यह सच है और यह आश्चर्य की नही शर्म की बात है. हमारे गुजरे हूए कल पर थोडी नजर डाली जाएँ तो यह जो आजका प्रगत विज्ञान है. इसकी नींव हमने रची हुई है. लेकिन उसे कोई मानने को तैयार नही. वह विज्ञान इन प्रगत देशोंने या तो हमसे चुराया है या अपने ताकद की जोर पर जबरदस्ती हमसे हथीया लिया है. उदाहरण के तौरपर है शून्य. शून्य का शोध हमने लगाया है. लेकिन यह कोई मानने के लिए तैयार नही. पायथॅगोरस थेरम उसका शोध हमारे पूर्वज वैज्ञानिक आर्यभट्टने लगाया. लेकिन आज वह किसी और के नाम से प्रचलित है ज्या (sine) का शोधभी आर्यभटने लगाया है. ये होगए गणिती क्षेत्र के शोध और संशोधन. स्वास्थविज्ञानमें विविध जडीबूटीयाँ, उनके औषधीय उपयोग. इन सबको अनदेखा करते हूए अमेरिकाका हल्दीका पेटेंट अपने झोलीमें डालनेका प्रयास किसीको नागवार गुजरा नही क्योंकी वह एक शक्तीशाली देश है. अपने शक्तीके जोर पर वे कुछ भी करने की क्षमता रखते है. अपने शक्ती के जोर पर वे किसी झूठ को सच का सुनहरी मुलामा देकर मिडीया का सहारा लेकर सारे विश्वपर थोपते है. ऎैसे बहुत सारे शोध है जो हमने लगाये हूए है लेकिन वह आज कोई दुसरे लोगोंने चुराकर अपने नाम पर कर लिए है या फिर वे अपने ताकत के जोरो पर उसको वे अपना संशोधन या शोध बताते है. इससे एक बात साबीत होती है की हम दिमागी तौर पर ना कभी कीसी देशसे कम थे ना है. हाँ आज भी नही है. आज इस वक्त अमेरिका, युरोप मे हमारा ब्रेन ड्रेन हो चूका है. यह बात यह साबीत करती है की आज भी दिमागी तौर पर हम किसीसे कम नही है. हमारे पास दिमाग होते हूए भी यह सब क्यो हो रहा है? उसके लिये हमारी सोई हूई राष्ट्रीयता और इन प्रगत देशोंकी हमारे प्रति नीतीयाँ और उनका हमारे अंदरूनी मामलेमें हस्तक्षेप है.

उन लोगोंका हमारे प्रती ध्यान खिंचकर उन्हे झिंजोरने के लिए और अपने हिंदू लोगोंका सोया हूवा धर्माभीमान , अभिमान और राष्ट्रीयता जगाने के लिए हमने यह 'झीरो मिस्ट्री' हत्या श्रृंखला अभियान चलाया है. क्योंकी सोये को जगाया जा सकता है लेकीन सोनेका ढोंग करने वाले को जगाने के लिए किसी बडे धमाको की जरूरत होती है. हाँ इस वक्त हमें बडे धमाके की जरूरत है. क्योंकी हमेशा हमारे अहिंसा और शांतीप्रीय भाव को लोगोंने गलत तरीके से लिया है और उसकी वजहसे वे हमे कमजोर समझते है. यह तो सिर्फ पहला कदम है. हमें अपना खोया हूवा वैभव पाने के लिए और बहुत कुछ करना बाकी है. मुझे आशाही नही बल्की विश्वास है की आप सब हिंदू लोग इस अभियान मे हमारा तहे दिलसे साथ देंगे. हिंदूज आर मच मोर कॅपॅबल बी रेडी फॉर रूलींग द र्वल्ड ...

... जय हिंद! "


मेसेज हिंदीत होता. बोर्डरूमधल्या कुणालाच हिंन्दी येत नव्हती. पण बोर्डरुमधे भारतीय मूळ असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यामुळे बाकींच्यांना समजण्यास ते कठीण गेले नाही. मेसेज ऐकत असतांनाच मधे मधे तो त्याच्या सहकाऱ्यांना इंग्लीशमधे भाषांतर करून सांगत होता.

बोर्डरूममध्ये एक गूढ शांतता पसरली होती.

" माय गॉड" बॉसच्या तोंडून निघाले.

" इट इज अ टेररीझम" सॅम म्हणाला.

" नो. नॉट सिप्ली टेररीझम इट्स हिंदू टेररीझम... अर्लीयर वुई वेअर व्हीक्टीम ऑफ मुस्लीम टेररीझम. नाऊ इटस् हिंदू टेररीझम आल्सो इन द लिस्ट" बॉस म्हणाला.

" सर मला वाटते आपण आता पुढचा खून टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे" जॉन म्हणाला.

" मि. जॉन आता हे प्रकरण निव्वळ एक सिरीयल मर्डर केस राहिलेलं नाही ... नाऊ इट हॅज बिकम अ फेनॉमेनॉन" बॉस म्हणाला.

" पण हा पुढचा खून जर आपण टाळू शकलो... आणि खुन्याला जर पकडू शकलो ... तर यावर नक्कीच काही तरी नियंत्रण येईल " जॉनने आपले मत व्यक्त केले.

" आता काय काय टाळणार आहोत आपण... ऑलरेडी संपूर्ण अमेरिकेत भारतीय अमेरिकन आणि अमेरिकन लोकांत दंगे सुरू झालेले आहेत . आणि खुनी हा एक नसून ती एक आतंकवादी संघटना आहे. हिंदू आतंकवादी संघटना "

" पण दंगे इतक्या लवकर आणि एकदम असे कसे सुरू झाले? " सॅमने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले..

" 9/11 च्या दरम्यान लोकांचा राग एका सीमेपर्यंंत म्हणजे त्याच्या थ्रेशोल्ड लेव्हलपर्यंंत पोहोचला होता... आणि आता हे अजून एक टेररीझम ऐकून त्यांचा राग आऊट र्बस्ट झालेला आहे." बॉसने लोकांच्या वागण्याचे विश्लेशण करून सांगितले. तसा मॉब बिहेवीयर आणि मॉब टेन्डंसीबद्दलचा बॉसचा अभ्यास दांडगा होता.

पुन्हा शिपाई आत आला.

" साहेब, मेयरचा फोन" शिपाई बॉसच्या कानाजवळ अदबीने वाकून म्हणाला.

बॉस उठून उभा राहिला.

" चला उठा. आता आपल्याला हे दंगे हाताळायला पाहिजेत."

बॉस बाहेर जाऊ लागला. जॉन सोडून सगळे जण उठून बॉसच्या मागे मागे जाऊ लागले. निराशेने जॉन जाणाऱ्या सगळ्यांच्या पाठमोऱ्या आकृतींकडे पाहत उभा राहिला.

क्रमश:..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network