Ch-51: वनवा (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

बॉस आणि इतर पोलीस टीव्हीच्या समोर उभे राहून संपूर्ण अमेरिकेत एखाद्या वणव्यासारख्या पसरलेल्या दंग्याच्या बातम्या पाहत होते. मधून मधून फोन वाजत होता. तो एक पोलीस अधिकारी मदतनीस अटेंड करीत होती. बॉसने दुसरा न्यूज चॅनल लावला. तिथेही तेच. सगळ्या न्यूज चॅनल्सवरती त्याच जाळपोळ, लाठीचार्ज , अश्रूधूर सगळ्या दंग्याच्याच बातम्या.
तेवढ्यात जॉन आवेशानं आत आला. त्याच्याकडे सॅमने सहानुभूतीपूर्वक पाहिले. बॉसने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि बाकीचे आपण आपापल्या कामात मग्न आहोत असा आव आणित होते. बॉसने असं दुर्लक्ष करावं हे त्याला आवडलं नाही. तो न राहवून जवळजवळ ओरडूनच म्हणाला,
" सर, पाचवा खून जर आपण रोखू शकलो नाही तर हेच जाळपोळ करणारे लोक हिंसक होतील. मग मात्र त्यांना रोखणं कठीणच नाही तर जवळ जवळ अशक्य होऊन जाईल ... कसंही करून आपल्याला हा खून रोखलाच पाहिजे."
बॉसनं एक कटाक्ष जॉनकडे टाकला. मग काहीतरी विचार केल्यासारखे केले. आणि सॅमकडे बघत तो म्हणाला,
" सॅम मला वाटतं जॉनचं म्हणणं बरोबर आहे. तू आणि अजून दोघं त्याच्यासोबत जा आणि काही करण्यासारखं असेल तर बघा. "
मग बॉस जॉनकडे वळला.
" आय अॅम सॉरी जॉन पण मी एवढंच करू शकतो"
जॉनला बॉसच्या बोलण्यातली खोच लक्षात आली. तो त्याचे साधे कपडे पाहून चेष्टेने म्हणाला होता.
जॉन काही बोलणार त्याआधीच सावरुन घेत बॉस म्हणाला,
" कारण कॅनॉट प्लेसला जाळपोळ सुरू झाली आहे... मला तिकडे सुध्दा लोक लागतील आणि अजून बऱ्याच जागी दंगे भडकू शकतात "
जॉन बॉॅसला काही म्हणणार एवढ्यात बॉससाठी अजून एक फोन आला.
बॉस फोन अटेंड करण्याच्या आधी जॉन आणि सॅमला म्हणाला,
"तुम्ही जा लवकर. वेळ वाया घालवू नका "
जॉन आणि सॅम लगबगीने बाहेर पडले.
क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network