Ch-53: वाय स्टार (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉन आणि सॅम कॉर्पोरेशन ऑफीसमध्ये बसले होते. जॉनने आपल्या हातातल्या नकाशाची पुंगळी एका ऑफिसरच्या पुढ्यात उघडून नकाशा टेबलवर पसरविला. तो शहराचा नकाशा होता आणि त्यावर पाच फुल्या काढून त्यातून एक वर्तुळ काढलेले होते. जॉन पाचव्या फुलीकडे निर्देश करून ऑफीसरला म्हणाला,

" मि. पिटरसन आम्हाला या एरियात राहणाऱ्या आणि ज्यांची नावं 'वाय' (Y) या अक्षरानं सुरू होतात अशा लोकांची यादी हवी आहे "

" या एरियातले आणि 'वाय' (Y) या अक्षराने सुरू होणारे रहिवासी? मला वाटतं आपल्याला त्यासाठी कॉम्प्यूटरची मदत घ्यावी लागेल"

मग पीटरसन उभा राहत म्हणाला,

" चला या माझ्यासोबत"

पिटरसनने त्यांना एका कॉम्प्यूटर सेंटरमध्ये नेले. आत चार पाच क्यूबीकल्स होते. आणि क्यूबीकल्समध्ये कॉम्प्यूटरवर काम करीत मग्न असलेला स्टाफ बसलेला होता. कॉम्प्यूटरवर काम करीत असलेला स्टाफ म्हणजे मुख्यत्वे मुलीच होत्या. पिटरसनने त्यांना एका क्यूबीकलजवळ नेले. तिथे एक बॉबकट असलेली तरुण मुलगी कॉम्प्यूटरवर बसलेली होती. ती आपल्या कामात मग्न होती. तिच्या डोळ्यावर चष्मा होता.

पिटरसन त्या मुलीला उद्देशून म्हणाला,

" मेरी, या लोकांना काही रहिवाश्यांची यादी पाहिजे आहे"

जॉनने आपल्या हातातल्या नकाशाची पुंगळी पुन्हा उलगडून तिच्या पुढ्यात ठेवली आणि म्हणाला,

" या एरियात राहणारे..." जॉन नकाशावरच्या फुल्यांकडे निर्देश करीत म्हणाला.

"... आणि ज्यांची नावं 'वाय' या अक्षराने सुरू होतात अशी "

त्या मुलीने आधी जॉन आणि मग सॅमकडे एक दृष्टीक्षेप टाकला. नकाशात निर्देशीत केलेल्या जागी पाहत ती म्हणाली,

" शुअर सर... जस्ट अ मिनट"

तिने त्या फुल्यांकडे बघत तिनचार कॉलनीज्ची नावं तिच्या समोर असलेल्या कागदावर लिहिली. मग तिने कॉम्प्यूटरच्या डेस्कटॉपवर एक आयकॉन डबल क्लीक केला.

समोर एक सॉफ्टवेअर ओपन झाले. त्यात वेगवेगळे मेनू आणि त्या मेनूत वेगवेगळी आप्शन्स दिसत होती. डोळे बारीक करीत तिने एका मेनूच्या खाली असलेला एक ऑप्शन सिलेक्ट केला.

समोर टेक्स्ट बॉक्समध्ये तिने 'वाय स्टार' (Y*) टाईप केले आणि दुसऱ्या सिलेक्शन बॉक्समध्ये तिने कागदावर लिहिलेल्या सगळ्या कॉलनी आणि एरियाची नावं मध्ये कॉमा देऊन एकामागे एक अशी ओळीने लिहिली.

ती काय टाईप करीत आहे किंवा कुठे कुठे माऊस क्लीक करीत आहे हे पाहण्यापेक्षा तिच्या सफाईदार हातांच्या आणि बोटांच्या हालचाली मजेदार वाटत होत्या...

बस आता एक बटण क्लीक करण्याचाच अवकाश!..

शेवटी तिने 'फाईन्ड' बटणवर माऊस क्लीक केला.

मॉनिटरवर 'फाईन्डीग' असा मेसेज अवतरला.

जर कॉम्प्यूटरची सोय नसती तर ही सगळी माहिती शोधणंं म्हणजे फार अवघड काम होतं....

जॉन विचार करीत होता.

आणि कॉम्प्यूटर म्हणजे तरी काय सगळा 'शून्य' आणि 'एक' चा खेळ. हा 'शून्य' इथेही आलाच!...

एकदम मॉनिटरवर 29 रहिवाश्यांची नावं त्यांच्या पत्यांसकट अवतरली.

" एकोणतीस नावं!" सॅमच्या तोंडातून निघाले.

" बरं यातले कोण कोण दहाव्या मजल्यावर राहतात ते कळेल काय?" जॉनने मेरीला विचारले.

" दहाव्या मजल्यावरचे? कॉम्प्यूटरच्या साहय्याने कळू शकते... पण मला वाटतं त्यापेक्षा आपण त्यांचे अॅड्रेस वाचून माहित केलेलं सोपं राहील." मेरी म्हणाली.

तिनं तिच्या बोटांच्या आणि हाताच्या सफाईदार हालचालीने प्रिंट कमांड देऊन त्या एकोणतीस जणांचा नाव, पत्यासहित बाजूच्याच प्रिंटरवर एक प्रिंट घेतला.

मेरीने तो प्रिंट हातात घेताच सॅम आणि जॉन आपलं डोकं खुपसून त्या प्रिंटकडे पाहत होते. ते त्या प्रिंटमधील त्या रहिवाश्यांच्या अॅड्रेसच्या रकान्यातून आपली नजर फिरवू लागले. अॅड्रेसमध्ये कुठे मजल्याचा उल्लेख फ्लॅटच्या नंबर मध्ये होता तर कुठे वेगळा आणि कुठे कुठे तर रोमन आकड्यात उल्लेख केलेला होता. त्यांच्या लक्षात आलं होतं की दहाव्या मजल्यावरचे रहिवासी कॉम्प्यूटरच्या सहाय्याने शोधणंं खरोखर कठीण गेलं असतं.

जॉनने ती प्रिंट आपल्या हातात घेऊन त्यातल्या तीन नावांवर 'टीक' केले.

जॉनने मेरीशी आणि पिटरसनशी हात मिळविला

" थँक यू मेरी... थँक यू पिटरसन... यू हॅव रिअली मेड अवर जॉब इझी... थँकस्"

" यू आर वेलकम"

जॉन आणि सॅम प्रिंट घेऊन तिथून घाईघाईने निघून गेले.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network