Ch-54: हिलव्ह्यू अपार्टमेंट (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉन आणि सॅम कार्पोरेशन आफिसमधून बाहेर येत होते. बाहेर येतांना लोकांची गर्दी, इकडून तिकडे फाईल्स घेऊन जाण्याऱ्या ऑफीस बॉयची वर्दळ त्यांना मधे येत होती. त्या गर्दीतून वाट काढत ते ऑफिसच्या बाहेर पटांगणात आले. पटांगणात आल्यावर कुठे त्यांना हायसं वाटलं.

" सर , आता काय करायचं ?" सॅमने जॉनसोबत चालता चालता म्हटले.

तसे पाहिले तर आता केसचा पूर्णपणे चार्ज ऑफीशियली सॅमच्या हातात होता. तरीेपण तो त्याच्या बडतर्फ बॉस जॉनचा मोठेपणा विसरला नव्हता.

" मला वाटते बॉसने आपल्यासोबत जे दोनजण दिले आहेत त्यांना आपण आधी या दोन पत्यावर तैनात करूया ..."

" हं ... मला वाटतं यू आर राईट" सॅम आपल्या खिशातला मोबाईल काढत म्हणाला.

सॅमने एक नंबर डायल केला.

" हॅलो ... अँथानी ... हे बघ ... आम्ही पाचव्या खुनाचे तीन पॉसीबल अॅड्रेसेस मिळविले आहेत ... त्यातला एक अॅड्रेस मी तुला सांगतो ... तिथे तू लगेच तैनात व्हायचं आहे ...हं अॅड्रेस लिहून घे..."

सॅमने एका रहिवाश्याचे नाव आणि अॅड्रेस अँथनीला व्यवस्थित सांगितला.

तो पुढे म्हणाला , "... आणि ताबडतोब तिकडे जा ... त्याच्या जिवाला धोका आहे.."

सॅमने फोन कट केला. मग त्याने अजून एक नंबर डायल केला. त्याच्यासोबत दिलेल्या दुसऱ्या पोलिसालासुध्दा दुसऱ्या एका अॅड्रेसवर ताबडतोब तैनात होण्यास सांगितले.

" आता या तिसऱ्या अॅड्रेसचं काय करायचं?...बॉसनं तर आपल्यासोबत दोघंच दिले होते..." जॉननं सॅमला विचारलं.

" आपण बॉसला फोन करून आपला आतापर्यंंतचा प्रोग्रेस कळवू आणि अजून एका जणाला मागून घेवू ...म्हणजे त्याला आपण या तिसऱ्या पत्यावर तैनात करू शकतो"

" बॉस अजून एकाला आपल्याबरोबर देईल? ... मला तर शंका वाटते" जॉनने आपली शंका व्यक्त केली.

" बघूया तर खरं..."

सॅम बॉसचा फोन डायल करू लागला. तेवढ्यात सॅमचा फोन वाजला. जॉनने त्याच्या मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले. फोन बॉसचाच होता. सॅमने ताबडतोब फोन अटेंड केला.

"एक अॅड्रेस सांगतो लिहून घ्या..." तिकडून बॉस म्हणाला.

" यस सर ....प्लीज" प्रथम बॉस काय म्हणतो ते ऐकून घ्यावं आणि मग आपली प्रगति त्याला सांगावी असा विचार करीत सॅम म्हणाला.

सॅमने जॉनच्या खिशातलाच पेन आणि एक कागद अॅड्रेस लिहिण्यासाठी घेतला.

" याहोता क्राफ्ट, बी-1011 हिलव्ह्यू अपार्टमेंटस, केटी लेन-3" तिकडून बॉसने एक अॅड्रेस सांगितला.

हा तर त्यांच्याजवळ असलेला तिसरा अॅड्रेस होता...

पण बॉसला कसा काय कळला हा अॅड्रेस?...

आपण तर सांगितलेला नाही....

" ...तिथे तुम्ही ताबडतोब जा... पाचवा खूनसुध्दा झालेला आहे" बॉस पुढे म्हणाला.

तिकडून फोन कट झाला. बॉसला हा अॅड्रेस कसा कळला हे कोडे सॅमला उलगडले होते.

" आपल्याला उशीर झाला" हताश होऊन सॅम जॉनला म्हणाला.

" काय झालं?" जॉननं आश्चर्याने विचारले.

" पाचवा खूनसुध्दा झालेला आहे ... याहोता क्राफ्टचा"

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network