Ch-55: भिंतीवरचा शेवटचा मेसेज (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सायरन वाजणारी पोलिसांची गाडी एका अपार्टमेंटच्या समोर रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. गाडीतून घाईघाईने जॉन आणि सॅम उतरले. अजून प्रेसवाले लोक घटनास्थळी येऊन थडकले नव्हते. तेवढंच जॉनला बरं वाटलं. उतरल्याबरोबर जवळजवळ धावतच ते लिफ्टजवळ पोहोचले. दोन्हीही लिफ्ट एंंगेज पाहून जॉनने लिफ्टचं बटन दोन तीन वेळा दाबून रागाने लिफ्टच्या दरवाज्याला एक लाथ मारली. यावेळीसुध्दा खून दहाव्या मजल्यावरच झाला होता. एका क्षणापुरता जॉनने जिन्याने जाण्याचा विचार केला. पण दहाव्या मजल्यावर जिन्याने जाण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहणं केव्हाही शहाणपणाचं होतं. वारंवार आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटून जॉन लिफ्टची वाट पाहू लागला. सॅमसुध्दा अधीर होऊन येरझारा घालू लागला. मधूनच तो कधी एका लिफ्टसमोर उभा राहत होता तर कधी दुसऱ्या लिफ्टसमोर उभा राहून उगीचच लिफ्टचं बटण दाबत होता. तेवढ्यात एकदाची डाव्या बाजूची पहिली लिफ्ट उघडली. दोघंही घाईघाईने आत घुसले. आत जाताच सॅमनं 10 नंबरचं बटन दाबलं. लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्टच्या डिस्प्लेवर फ्लोअर दर्शविणारा नंबर 1... 2... 3... 4... असा दिसू लागला.

लिफ्टचे दार उघडता क्षणीच दोघंही बाहेर येऊन इकडे तिकडे गोंधळून बघू लागले. इमारतीचा नकाशा जरा किचकटच होता. जॉनने लिफ्टमधे घुसणाऱ्या एका माणसाला विचारले,

"फ्लॅट नं. 15 कुठे आहे"

तो माणूस नुसताच उजवीकडे हाताने इशारा करीत लिफ्टमध्ये घुसला. सॅम अजून काही विचारणार तेवढ्यात लिफ्टचे दार बंदसुध्दा झाले. तो माणूस लिफ्टमध्ये गुडूप झाला होता. दोघांनी अजून कुणी विचारण्यासाठी सापडतो का ते बघितले. जवळपास कुणीच दिसत नव्हतं. त्यांनी एक क्षण विचार केला आणि ते दोघंही उजवीकडे निघाले.

जॉनने फ्लॅटच्या दारावर बघितले. 1015 नंबर लिहिलेला होता. दोघांनीही एकमेकांकडे पाहून संमतीदर्शक इशारा केला. दोघंही सतर्क झाले. सॅमने आपली बंदूक काढली आणि समोर जावून हळूच दार ढकलले. दार उघडेच होते. सॅम आणि जॉन सावधपणे आत घुसले. आत सर्वत्र पसारा पडलेला होता. आणि सर्व पसाऱ्याच्या मध्ये हॉलमध्येच रक्ताच्या थारोळ्यात एक शरीर पडलेले होते.

" माय गॉड" सॅमच्या तोंडून निघाले.

" लेट मी चेक हिज बीट "

जॉनने खाली पडलेल्या शरीराची नाडी बघितली.

जॉनने सॅमकडे बघितले.

सॅमने जॉनला इशाऱ्यानेच विचारले.

" ही ईज डेड" जॉन निराशेने म्हणाला.

सॅमने निराशेने एक सुस्कारा सोडला. आणि मग तो सर्व फ्लॅट धुंडाळू लागला.

जॉनने अपेक्षेप्रमाणे समोर भिंतीवर बघितले. यावेळीही रक्ताचे शून्य काढण्यास खुनी चुकला नव्हता. शून्याच्या मधे रक्ताने लिहिण्यासही तो विसरला नव्हता. दुरून खुन्याने काय लिहिले होते ते ओळखू येत नव्हते. म्हणून जॉन भिंतीच्या जवळ जावून बघू लागला.

" शून्य जिथून सुरू होते तिथेच ते संपते " भिंतीवर लिहिलेले होते.

भिंतीवरच्या त्या मेसेजकडे बघून जॉन विचार करू लागला. तिकडे आत सॅमच्या हुडकण्याचा आवाज येत होता.

विचार करता करता अचानक जॉनच्या चेहऱ्यावर भीतीची सावली पसरली.

"सॅम..." जॉनने सॅमला थरथरतच मोठयाने आवाज दिला.

सॅम चटकन आपलं काम सोडून धावतच बाहेर आला.

" काय झालं?" सॅम जॉनच्या भीतीने काळवंडलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.

एव्हाना जॉनने दरवाज्याकडे धाव घेतली होती आणि सॅम काही समजण्याच्या आतच जॉन दरवाज्याच्या बाहेर सॅमच्या नजरेआड झाला होता.

दरवाज्याच्या बाहेरून जॉनचा आवाज आला,

" चल लवकर चल आपल्याला घाई केली पाहिजे"

" कुठे?" सॅमने दरवाजाच्या बाहेर जात विचारले.

बाहेर व्हरंड्यात जॉन लिफ्टकडे धावत सुटला होता. सॅमला जॉन का धावतो आहे, काहीच कळत नव्हते. फक्त त्याला जॉनच्या हालचालींवरून काहीतरी विपरीत घडल्याची किंवा घडण्याची शक्यता असल्याची चाहूल लागली होती.

गोंधळून सॅमसुध्दा त्याच्या मागे धावायला लागला.

लिफ्टजवळ पोहचून जॉनने लिफ्टचं बटण दाबलं. संयोगाने लिफ्ट जवळच होती. लिफ्टचं दार उघडलं.

जॉनने सॅमकडे बघत म्हटले, " चल लवकर ... आपल्याला ताबडतोब निघालं पाहिजे"

जॉन सॅमसाठी न थांबता लिफ्टमध्ये घुसला. सॅमने अजून जोराने धावत लिफ्टचा दरवाजा बंद व्हायच्या आत लिफ्ट गाठली. तोसुध्दा त्याच्या मागे लिफ्टमध्ये घुसायला लागला.

आत जाता जाता सॅमने पुन्हा विचारले, " पण ... कुठं जायचं आहे आपल्याला?"

" सांगतो" जॉन आपल्याला लागलेली धाप व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात म्हणाला.

सॅम लिफ्टमध्ये घुसून जॉनकडे आश्चर्याने पाहत त्याच्या शेजारी जावून उभा राहिला आणि हळू हळू लिफ्टचा दरवाजा बंद झाला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. bapre bahutek angina my god

    ReplyDelete
  2. ho ho anjenichach khun honar ata ,,,,,,,,horrible ,...really ....will john save his love???

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network