Ch-56: शेवटचे सावज (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉनने धडधडत्या हृदयाने फ्लॅटचा दरवाजा ढकलला. दार उघडंच होतं. आतलं दृष्य पाहून जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याच्या समोर हॉलमध्ये त्याची प्रिय अँजेनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. आणि समोर भिंतीवर रक्ताने एक मोठे शून्य काढलेले होते. जॉन तिच्याजवळ गेला. त्याला जाणवले की त्याच्या पायातली पूर्ण शक्ती क्षीण झालेली आहे. तो मटकन खालीच बसला. कसेबसे सावरून त्याने अँजेनीची नाडी बघितली आणि तो तिच्या हातांत आपले तोंड खुपसून ओक्साबोक्शी रडू लागला.

अँजेनीचे प्राणपाखरू उडून गेले होते...

सॅमला काय करावे काही सुचत नव्हते. त्याने धीराचा एक हात जॉनच्या खांद्यावर ठेवला. त्याच्या हाताला जॉनच्या हुंदक्याचे धक्के एखाद्या धरणीकंपाच्या भयानक धक्याप्रमाणे जाणवत होते. सॅम जॉनच्या शेजारी गुडघ्यावर बसला.

खुन्याने आपले शेवटचे सावजसुध्दा बरोबर हेरले होते.

सॅमला " शून्य जिथून सुरू होते तिथेच संपते" या गूढ वाक्याचा अर्थ लागला होता.

आणि 'शून्य' या शब्दाच्या शेवटच्या अक्षराची महतीसुध्दा त्याला कळली होती.

अँजेनी - अँजेनीचे नावसुध्दा 'ए' या अक्षरानेच सुरू होत होते...

जॉनला आपले कर्तव्य पुकारत होते.

खुनी एवढ्यातच खून करून पसार झालेला होता...

म्हणजे तो एवढ्यातच कुठेतरी असला पाहिजे....

काहीतरी करायला पाहिजे....

पण जॉनचे हातपाय पूर्णपणे गळून गेले होते. त्याच्यात उठण्याची शक्तीच शिल्लक राहिली नव्हती.

" खुनी अजून जास्त दूर गेलेला नसावा" कसाबसा जॉन सॅमला म्हणाला.

सॅमने स्वत:ला सावरले आणि खाडकन उभा राहून तो आपल्या कामाला लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. just too good, wht a logic yar

  ReplyDelete
 2. :):):):)..filling so sad 4 John..


  Juilee Diksha Nagesh

  ReplyDelete
 3. wow, heart touching event  abhishek

  ReplyDelete
 4. Wow, heart touching seen...

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network