Ch-57: जशास तसे (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रात्रीची वेळ होती. डॅनने आपल्या घराचा दरवाजा तिरका करून बाहेर डोकावून बघितले. चहूकडे गडद अंधार होता. तो हळूच घरातून बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याने सभोवार नजर फिरवून आपणास कोणी बघत तर नाही ना याची खात्री केली. कुणी बघत नसल्याची खात्री होताच तो घराच्या कंपाऊंडच्या बाहेर आला. पुन्हा रस्त्यावर त्याने चहूकदे एकदा आपली नजर फिरविली. रस्त्यावर सामसूम होती. आता तो उजवीकडे वळून चालू लागला. अंधारात झपाझप पाऊले टाकीत. त्याच्या चालण्याच्या वेगाबरोबरच त्याच्या विचारांनीही वेग धरला. मागच्या वेळी आपल्याला खुन्याने भरपूर बक्षिसी देऊन खुश केले होते. याही वेळी जॉन, सॅम आणि बॉसला पुढचा खून कुणाचा होणार आहे याची माहिती मिळाल्याचे त्याने खुन्याला ताबडतोब कळविले होते. खुनी त्याच्यावर खूप खुश झाला होता. फिदाच झाला होता. खुन्याने त्याला एक जागा सांगून तिथे तो कल्पनाही करू शकणार नाही एवढी रक्कम ठेवण्याचे कबूल केले होते. आता तो तिथे ते पैसेच घेण्यासाठी निघाला होता. पैशाचा विचार येताच त्याचे मन हुरळून गेले. मागच्या वेळी मिळालेले पैसे दहा पटीने त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. आनंदाने त्याचे अंग शहारून गेले. चालण्याचा वेग मंदावला आणि त्याच्या चालण्यात आता एक प्रकारची मस्ती जाणवू लागली होती.

झालं आता हे शेवटचं...

यानंतर अशी बेइमानी करायची नाही...

किंबहुना येवढे पैसे मिळाल्यावर आपल्याला अशी बेइमानी करण्याची पुन्हा वेळसुध्दा येणार नाही....

पैसे मिळाल्याबरोबर नोकरी एकदम सोडायची नाही. नाहीतर कुणाला शंका येईल....

नोकरी टाईमपास म्हणून करायची आणि योग्य वेळ येताच नोकरी सोडून एखादा धंदा टाकायचा....

नाहीतर प्रथम धंदा टाकायचा आणि त्यात जम बसल्यावर नोकरी सोडायची....

डॅनचे विचारचक्र सुरू होते. अचानक त्याला जाणवले की ज्या जागी खुन्याने पैसे ठेवल्याचे आपल्याला सांगितले होते ते ठिकाण आता जवळ आले होते. तो एक क्षण थांबला. पुन्हा सभोवार पाहून तो जिथे पैसे ठेवले होते त्या ठिकाणाकडे निघाला. त्याच्या चेहऱ्यावर आता स्मित तरळत होते. स्थान एकदम निर्जन होते. सगळीकडे अंधार पसरलेला होता. अधून मधून कुत्र्यांचा विचित्र आवाज येत होता. स्थान कुणालाही भीती वाटण्यासारखेच होते. पण पैशाच्या लालचीने डॅनची सगळी भीती जणू पळून गेली होती. समोर एक मोठे झाड होते.

हेच ते झाड ज्याच्या बुंध्याशी खुन्याने पैसे ठेवले होते...

आता डॅनला त्याच्या शरीरात एकप्रकारची शिरशिरी भरल्यासारखी जाणवत होती. आता काही क्षणच! काही क्षणातच आपण एका मोठया संपत्तीचे मालक होणार. तो उतावीळपणे झाडाच्या बुंध्याशी गेला. तिथे एक मोठा दगड ठेवलेला होता. डॅनने एका क्षणाचीही उसंत न घेता तो दगड तिथून हलविला. जसा डॅनने तो दगड तिथून हलविला एक मोठा स्फोट झाला आणि डॅनचा हात छिन्नविच्छिन्न झाला. त्याच्या शरीरातसुध्दा दगडाचे अणकुचीदार तुकडे घुसले आणि रक्तबंबाळ अवस्थेत तो मृत्यूमुखी पडला. त्याला पटले होते की त्याने ठरविल्याप्रमाणे ही त्याची शेवटचीच बेइमानी होती.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. Sunil Sir Tumchi Kadambari kharach khup sunder aahe... me Chaitanya Bhave- Sharjah la asto... tumchi kadambari roz wachto... Last Week Punyat aalo hoto.. aaplyala bhetaychi khup ichcha hoti pan jamlech nahi.. next time nakki bhetun aaple aabhar manayche aahet evdhya sunder kadambari baddal...

  ReplyDelete
 2. Sir, first I want to say "Thanks". I enjoyed it a lot every day. And waiting for next to come sooon...
  Best wishes...
  Rekha N. Barhate, CA, USA

  ReplyDelete
 3. sunul, khupach chan lihtos, mala khup aavadali tuzi kadambari, aani aasha karte ki pudhehi aasach lihat rahavas, tu assach lihata raha mi nehami vachat rahil,

  waiting for next.

  ReplyDelete
 4. oh my god why angina? shit

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network