Ch-60: रात्री बेरात्री (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रात्रीचे अडीच वाजले होते. शहराच्या भयाण शांततेतून एकटाच जॉन गाडीतून भरधाव वेगाने फिरत होता. आजकाल दंगे सुरू असल्याने रस्ते लवकरच स्मशानवत होत. अन आता तर रात्रीचे अडीच वाजल्यामुळे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. आपल्याच धुंदीत एका चौकातून आपली गाडी भरधाव वेगाने नेत असता जॉनला मागून सायरनचा आवाज ऐकू आला. त्याने मिरर मध्ये बघितले. एक पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करीत होती. जॉनने -

गाडी थांबवावी की नाही?...

एक क्षण विचार केला आणि मग गाडीचा ब्रेक दाबला. त्याने आपली गाडी रस्त्याच्या एका कडेला लावली. मागून पोलिसांची गाडी येऊन त्याच्या गाडीच्या पुढे येऊन थांबली. प्रथम पोलिसांनी जॉनच्या गाडीकडे त्यांच्या गाडीतूनच डोकावून पाहिले. एव्हाना जॉन उतरून त्याच्या गाडीच्या बाहेर आला होता. दोन पोलीस उतरून त्याच्या जवळ चालत आले.

" इतक्या रात्री कुठे जात आहात आपण?" एक पोलिसाने जवळ येता येता दुरूनच विचारले.

जॉन काहीच बोलला नाही. दोघंही त्याच्या जवळ येऊन थांबले. त्यातला दुसरा जॉनकडे निरखून पाहू लागला.

" जॉन सर तुम्ही!" दुसरा एकदम जॉनला ओळखत म्हणाला.

जॉन त्याला ओळखत नव्हता पण कदाचित तो त्याला ओळखत असावा. नाही तरी शहरात सुरू असलेल्या खुनाच्या केसमुळे जॉन चांगलाच प्रकाश झोतात आला होता. तो बडतर्फ व्हायच्या आधी जवळ जवळ रोज त्याचा फोटो एकतर वर्तमान पत्रात यायचा किंवा टिव्हिवर त्याच्याबद्दल काहीतरी यायचेच.

" हो मी जॉन... झोप येत नव्हती म्हणून शहरात सहजच एक चक्कर मारत आहे" जॉन म्हणाला.

" नो प्रॉब्लेम सर... यू कॅरी ऑन प्लीज" तो विनम्रता दाखवित म्हणाला.

जॉन गाडीमध्ये बसला. ते दोघं तिथेच जॉनच्या गाडीची सुरू होण्याची वाट पाहत उभे राहिले . जॉनने गाडी सुरू केली आणि त्यांना हात दाखवून तो पुन्हा भरधाव वेगाने तिथून निघून गेला.

जॉनची गाडी एका निर्मनुष्य परिसरात एका घराजवळ येऊन थांबली. ते कमांड1 चे घर होते. तिसऱ्या खुनाच्या वेळी जेव्हा कमांड1चे बिल्डींगखाली पडलेले प्रेत सापडले होते तेव्हा त्यांनी या घरावरच धाड घालून कसून तलाशी घेतली होती. गाडी रस्त्याच्या कडेला लावून तो गाडीतून उतरला. प्रथम त्याने चहूबाजूंनी एक नजर फिरविली. चहूकडे एक भयाण शांतता पसरलेली होती. रात्रीची ती वेळ आणि शहरात दंग्यांचा हैदोस. तो चालत जावून बंगल्याच्या फाटकाजवळ गेला. गेटला कुलूप होतं आणि कुलुपावर पोलीस डिपार्टमेंटचं सिल लावलेलं होतं. त्याने एक चक्कर मारून बंगल्याच्या आवाराच्या भिंतीवरुने कुठून घुसण्याची शक्यता आहे का ते पडताळून पाहिले. आवाराच्या भिंतीवर काटेरी कुंपणासारखी एक तार लावलेली होती. त्याने बघितले की फाटकाच्या उजव्या बाजूला एका जागी वरचं काटेरी कुंपण तुटलेलं होतं. जॉनला तिथून आत जाणं शक्य वाटत होतं.

पण आत जावं का?...

आधीच आपल्याला बडतर्फ केलेलं. आणि अशा परिस्थितीत पोलिसांचं सिल असतांना आपण असे चोरून बंगल्यात गेल्याचं जर कळलं तर पोलिसांना वेगळीच शंका यायची...

काहीही झालं तरी चालेल...

अँजेनी गेल्यापासून तसंही जॉन स्वत:च्या जिवाबद्दल बेफिकीरच झाला होता. त्याचं विचारचक्र सुरू असतांनाच जॉन कंपाऊंड वॉलवर चढायला देखील लागला. चढणे कठीण जात होते. भिंत उंच होती आणि धरण्यासाठीसुध्दा काहीही नव्हते. जॉनने उडी मारून भिंतीच्या वर चाचपून बघितले - धरण्यासाठी काही सापडते का ते. त्याला भिंतीवर पकडण्यासाठी काहीतरी हातात आलं. त्यानं ते करकचून पकडून तो भिंतीवर चढला. पण चढत असतांनाच त्याला त्याच्या हातात तीव्र वेदना जाणवायला लागली. चढल्यानंतर त्यानं बघितलं तर त्यानं भिंतीच्यावर तुटलेली काटेरी तारच हातात पकडली होती . त्यानं पटकन ती तार हातातून सोडली. हाताकडे पाहिले तर हातातून घळाघळा रक्त वहायला लागलं होतं. तसाच हात पकडून त्याने भिंतीच्या दुसऱ्या बाजूला, कंपाऊंडच्या आतील बाजूस उडी मारली.

क्रमश:..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network