सायकल - विनोदी कथाकथन भाग 4/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सायकलवर बसून घोळक्यात कॉलेजात जायला लागलो. घोळक्यात सायकल चालविणं म्हणजे गंमत नाही. एकाचा जरी तोल गेला तर सगळेजण सायकलसह पडणार. तसं तोल जायचंच ते वय होतं. आम्ही 8्र9 जणं घोळक्यात कॉलेजला जायचो. एक दिवस घोळक्यात जातांना ढीशऽऽ टयूऽऽऽ असा टयूब फुटण्याचा आवाज आला. आम्ही सर्वजण गदगदून हासायला लागलो. शाम्या जाड असल्यामुळं हसतांना प्रथम त्याचं शरीर नुसतं हलत असे आणि हसण्याचा आवाज मागावून येत असे. जसं विज चमकल्यावर विज प्रथम दिसते आणि गडगडाट मागावून ऐकू येतो तसं. जेव्हा केव्हा काही हसण्यासारखं असे, तेव्हा हसण्याचा पहिला राऊंड संपवून आम्ही श्याम्याला हसतांना पाहून हसण्याचा दुसरा राऊंड सुरू करायचो. श्याम्याचा चेहरा हसता हसता एकदम खर्रकन उतरला जेव्हा त्याला कळले, की त्याच्याच सायकलचा टयूब फुटला होता.

एकदा आमच्या सायकल ग्रुपचा जोक सेशन झाला. जोक्स सेशनचं वैशीष्ट म्हणजे सगळे जोक सायकलवरचेच होते.

अर्थात पहीला जोक शाम्यानं सागींतला. जोक सांगतांना पात्र आपल्यापैकीच घ्यायची अशी आमची पध्दत होती. म्हणजे जोकची अजूनच मजा येते.

शाम्या जोक सांगू लागला -

एक दिवस सुऱ्या अन संज्या सायकलवर डबलसीट चालले होते. त्यांना एका अतीउत्साही टॅ्रफीक पोलीसाने थांबवलं. तो टॅ्रफीक पोलीस दंड करण्याच्या उद्द्ेशाने त्यांची कसून तपासनी करू लागला. पण काही एक सापडत नव्हतं. तेव्हा संज्या म्हणाला. तुम्ही आम्हाला कधीच पकडू शकणार नाही कारण आमचा देव नेहमी आमच्या सोबत असतो. असं कां मग मी तिबलसीट सायकल चालविण्याच्या गुन्हयावरून तुम्हाला पकडत आहे. टॅ्रफीक पोलीस म्हाणाला.

नंतर संज्या जोक सांगु लागला -

एकदा शाम्या मोटया पैदल कॉलेजमध्ये चालला होता. पहिले तर तो पैदल कॉलेजमध्ये चालला होता हाच सगळयात मोठा जोक. त्यात दुसरा जोक म्हणजे त्याला एका सायकलवाल्याने धडक मारली. धडक मारून वरून तो सायकलवाला शाम्याला म्हणतो कसा 'तु नशीबवान आहेस... तु खुप नशीबवान आहेस'. शाम्याने विचारले 'कसं काय?' 'कारण जनरली मी बस चालवित असतो.

आता सुऱ्या जोक सांगु लागला -

एकदा शाम्या एक नवी कोरी सायकल घेवून आला. तेव्हा संज्याने विचारले 'अरे नविन सायकल घेतलीस का?'

शाम्या म्हणाला 'अरे नाही ... काल काय झालं..मी घरी चाललो होतो तेवढयात समोरून एक सुंदर पोरगी या सायकलवर आली. तीनं ही सायकल रोडवर फेकून दिली. माझ्याजवळ येवून तिने तिच्या अंगातले सगळे कपडे काढून रस्त्यावर फेकून दिले आणि मला म्हणाली 'घे तुला पाहिजे ते घे'

संज्या म्हणाला ' तु फार चांगलं केलस सायकल घेतली... नाहीतरी कपडे तुझ्या कामी आले नसते..'कॉलेज संपलं. जीवनाची गती वाढली आणि सायकल सुटली. कदाचित जीवनाच्या वेगासमोर सायकलचा वेग कमी पडत असावा. सायकलच्या टायर ची जागा मेहनत न करता येणाऱ्या टायर्डनेस ने घेतली. सायकलच्या सीट च्या ऐवजी मुलांच्या ऍडमिशनची सीट किंवा मंत्रयाच्या सिट वर जास्त चर्चा होत असे. एवढंच नाही तर स्पोक हा शब्द स्पीक चा भूतकाळ जास्त वाटायला लागला. जीवन तेच होतं पण जीवनाचा अर्थ बदलला होता.परंतु आता खूप वर्षानंतर पुन्हा सायकल चालवायला लागलो.

अगदी रोज रोज संध्याकाळी वीस मिनिटं डॉक्टरांनी सांगितले म्हणून !

- समाप्त -
You can Email this comedy story to your friends!

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

15 comments:

 1. Apratim likhan aahe hay kathakathan mhanje!!!
  majaa aali khup wachtana.....

  ReplyDelete
 2. ekdam sunder wachun mla pan college madhle diwas aathwale good very good. shevatchi ole ekadam khari aahe

  ReplyDelete
 3. Khup maza aali, Khup diwsani marathi wachayala milala.

  ReplyDelete
 4. Hi, Mazyakade Marathi che kadambri ek hi nahi,aani marathi chya kadmbri wachnyas awadto tumhi waril chotisi kadmbari hi nakkich wacha.......

  ReplyDelete
 5. ase sunder pustke mhanje marathila labhalela anmol daginach hoy.

  ReplyDelete
 6. Hi, Mazyakade Marathi che kadambri ek hi nahi,aani marathi chya kadmbri wachnyas awadto tumhi waril chotisi kadmbari hi nakkich wacha.......

  ReplyDelete
 7. khup sundar!!! me kadhich cycle chalavali nahi pan itaki maja yet asel tar nakki chalvun pahen.

  ReplyDelete
 8. NICE. Especially last page.

  ReplyDelete
 9. Nik : I really love this story..I keep reading this when I feel lonely..If I could get the writer's name, I would have thanked him personally...this story is one of my best friends.

  ReplyDelete
 10. Apratim.... shevat faar sundar....

  ReplyDelete
 11. Very nice writing was laughing after long time

  ReplyDelete