Ch-63: रेकॉर्ड डिटेल्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सॅम आणि जॉन एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर रन होत होतं. त्या साफ्टवेअरच्या सहाय्याने ते त्यांना काचेच्या तुकड्यावर सापडलेले हातांचे ठसे त्यांच्याजवळ असलेल्या गुन्हेगारांच्या डाटाबेसमध्ये पडताळून पाहत होते. डाटाबेसमध्ये गुन्हेगारांचे लाखो किंबहुना करोडो हातांचे ठसे साठवून ठेवलेले असतील. त्या प्रत्येकासोबत त्यांच्याजवळ असलेल्या हाताच्या ठश्यांची तुलना करणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम होते. पण आजकाल ते काम्प्यूटरमुळं अगदी सोपं झालेलं होतं. कॉम्प्यूटर एका सेकंदाला कमीतकमी हजारो ठश्यांची तुलना करीत होता. आणि तीही अगदी बारकाईने, एक छोटीशी महत्वाची माहितीही न सोडता. म्हणजे सगळ्या ठश्यांसोबत तुलना करायची झाल्यास काही मिनिटांचाच अवधी लागणार होता. ते दोघंही अधीर होऊन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे पाहू लागले. मॉनिटरवर किती जणांचे ठसे तपासून झाले हे दाखविणारा एक काऊंटर वेगाने पुढे पुढे सरकत होता. तो काऊंटर शून्यपासून सुरू होऊन एव्हाना सात लाखाच्या वर पोहोचला होता. शेवटी अचानक तो काऊंटर 757092 वर थांबला.

मॉनिटरवर एक मेसेज झळकला " मॅच फाऊंन्ड".

दोघांचे चेहरे आनंदाने चमकू लागले. त्यांनी एकमेकांकडे पाहून एक विजयी स्मित केले आणि पुन्हा मॉनिटरकडे कुणाचा रेकॉर्ड आहे ते बघू लागले.


॥।रेकॉर्ड डिटेल्स ॥।


नांव - विनय जोशी

वय - 30 वर्ष

गुन्हा - फोर्जरी

जन्मखूण - डाव्या हातला सहा बोटं

नागरीकत्व - अमेरिकन


दोघंही गुन्हेगाराची संपूर्ण माहिती वाचू लागले. त्यात गुन्हेगाराचे तीन फोटोसुध्दा होते. एक उजव्या बाजूने घेतलेला, दुसरा डाव्या बाजूने घेतलेला आणि तिसरा समोरून घेतलेला.

" ही संपूर्ण माहिती आपल्याला शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर ताबडतोब पाठवायला पाहिजे." सॅम म्हणाला.

" हो बरोबर ...पण मला एक भीती वाटते " जॉन म्हणाला.

सॅमने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

" की यावेळीसुध्दा ही माहिती खुन्यापर्यंंत पोहोचली तर? " जॉनने आपली शंका व्यक्त केली.

" यावेळी नाही पोहोचणार. त्या डॅनला त्याच्या करणीची शिक्षा मिळालेली आहे." सॅम म्हणाला.

मग त्यांनी त्या गुन्हेगाराची फोटोसहित सगळी माहिती शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर पाठविली आणि तसा कोणी इसम नजरेस पडताच त्यावर फक्त वॉच ठेवून सॅमला कळविण्यास सांगितले. कारण तो फक्त एक दुवा असू शकतो. तो त्यांच्या हातातले फक्त एक खेळणं असू शकतो. खरा गुन्हेगार दुसराच कोणी असू शकतो. सगळ्या प्रकरणाच्या तळाशी पोहोचून खऱ्या गुन्हेगारापर्यंंत पोहोचणे सगळ्यात महत्वाचे होते.


क्रमश:..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network