Ch-14: गोष्टी आपोआप बदलत नसतात.. आपल्याला त्या बदलाव्या लागतात ( Marathi books - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

क्लासमध्ये एक लेडी टीचर शिकवीत होती. वर्गातले कॉलेजचे विद्यार्थी लक्ष देवून ऐकत होते. त्या विद्यार्थ्यातच जॉन आणि नॅन्सी बसलेले होते.

'' सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज... काहीही निर्णय न घेता अंधांतरी लटकण्यापेक्षा काहीतरी एक निर्णय घेणं केव्हाही योग्य..'' टीचरने आत्तापर्थंत शिकविलेल्या धड्यातल्या गोष्टीचं सार थोडक्यात सांगितलं.

नॅन्सीने एक चोरटी नजर जॉनकडे टाकली. दोघांची नजरा नजर झाली. दोघंही गालातल्या गालात मंद हसले. नॅन्सीने एक नोटबुक जॉनला दाखवली. त्या नोटबुकवर मोठ्या अक्षरात लिहिले होते 'लायब्ररी'. जॉनने होकारात आपली मान डोलवली. तेवढ्यात पिरीयड बेल वाजली. आधी टिचर आणि मग मुलं हळू हळू क्लासमधून बाहेर पडू लागली.

जॉन नेहमीप्रमाणे लायब्ररीमध्ये गेला तेव्हा तिथे कुणीही विद्यार्थी दिसत नव्हते. त्याने नॅन्सीला शोधण्यासाठी इकडे तिकडे एक नजर फिरविली. नॅन्सी एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होती किंवा किमान पुस्तक वाचत आहे असं भासवित होती. नॅन्सीने चाहूल लागताच पुस्तकातून डोकं वर काढून तिकडे बघितले. दोघांची नजरानजर होताच ती तिच्या जागेवरुन उठून पुस्तकाच्या रॅकच्या मागे जायला लागली. जॉनही तिच्या मागे मागे निघाला. एकमेकांशी काहीही न बोलता किंवा काहीही इशारा न करता सर्व काही घडत होतं. त्यांचा हा जणू रोजचाच परिपाठ असावा. नॅन्सी काही न बोलता रॅकच्या मागे जात होती खरी पण तिच्या डोक्यात विचारांच काहूर माजलं होतं.

आज काय तो शेवटचा निर्णय घ्यायचा...

अस किती दिवस अधांतरी लटकत रहायचं...

टीचरने जे गोष्टीचं सार सांगितलं ते खरंच होतं...

आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार...

आर किंवा पार ...

आता बास झालं...

तिच्या मागे मागे जॉन रॅकच्या पलिकडे काहीही न बोलता जात होता पण त्याच्याही डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं.

नेहमी नॅन्सी पिरियड झाल्यानंतर लायब्रीत भेटण्याबद्दल त्याला इशारा करायची...

पण आज तिने पिरियड सुरु असतांनाच इशारा केला..

तिच्या घरी काही अघटीत तर घडलं नसावं...

तिच्या चेहऱ्यावरुनही ती दुविधेत असलेली भासत होती...

तिच्या घरच्यांच्या दबावाला बळी पडून ती आपल्याला सोडून तर नाही देणार..

नाना प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होते.

रॅकच्या मागे एका कोपऱ्यात कुणाला दिसणार नाही अशा जागी नॅन्सी पोहोचली आणि भिंतीला एक पाय लावून उभी राहत ती जॉनची वाट बघू लागली.

जॉन तिच्याजवळ जावून पोहोचला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न करीत तिच्या समोरासमोर उभा राहाला.

'' तर मग ठरलं... आज रात्री अकरा वाजता तयार रहा..'' नॅन्सी म्हणाली.

चला म्हणजे अजुनही नॅन्सी आपल्या घरच्यांच्या प्रभावाखाली आली नव्हती...

जॉनला हायसं वाटलं.

पण तिने सुचविलेला हा दुसरा मार्ग कितपत योग्य होता?...

ही एकदम टोकाची भूमीकातर होत नाही ना? ...

'' नॅन्सी तुला नाही वाटत की आपण जरा घाईच करीत आहोत... आपण काही दिवस थांबूया ... बघूया काही बदलते का ते... '' जॉन म्हणाला.

'' जॉन गोष्टी आपोआप बदलत नसतात.. आपल्याला त्या बदलाव्या लागतात.'' नॅन्सी दृढतेने म्हणाली.

त्यांच्या बऱ्याच वेळ गोष्टी चालल्या. जॉनला अजुनही तिची भूमिका टोकाचीच वाटत होती. पण एका दृष्टीने तिचंही बरोबर होतं. कधी कधी तडकाफडकी निर्णय घेणं योग्य असतं. जॉन विचार करीत होता.

पण आपण या निर्णयासाठी अजून पुरते तयार नाही आहोत...

आपल्याला आपल्या घरच्यांचाही विचार करावा लागणार आहे...

पण नाही आपणही किती दिवस असं अधांतरी लटकून रहायचं...

आपल्यालाही काहीतरी दृढ निर्णय घ्यावाच लागणार...

जॉन आपला पक्का निश्चय करण्याचा प्रयत्न करीत होता.

तिकडे रॅकच्या मागे त्या दोघांची चर्चा चालली होती आणि इकडे दोन रॅक सोडून पलीकडेच एक आकृती लपून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होती.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network