Marathi books - Ad-Bhut Ch-15: पक्का निर्णय

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉनच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आता तो जे पाऊल उचलणार होता त्यामुळे होणाऱ्या नंतरच्या सगळ्या परिणामाचा तो विचार करु लागला. नॅन्सीसोबत लायब्ररीत झालेल्या चर्चेत त्याला दोन तिन गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या होत्या -

की नॅन्सी ही वरुन जरी वाटत नसली तरी मनाने फार पक्की आणि खंबीर आहे...

ती कोणत्याही परिस्थीतीत आपल्याला सोडणार नाही...

किंवा तसा विचारही करणार नाही...

पण आता स्वत:चीच त्याला शाश्वती वाटत नव्हती.

आपणही तिच्याइतकेच मनाने खंबीर आणि पक्के आहोत का?...

बिकट परिस्थीतीत आपलं तिच्याबद्दलचं प्रेम असंच कायम राहिल का?...

का बिकट परिस्थीतीत ते बदलू शकतं?..

तो आता स्वत:लाच आजमावून पाहत होता. वेळच अशी आली होती की त्याचा त्यालाच विश्वास वाटेनासा झाला होता.

पण नाही...

आपल्याला असं ढीलं राहून चालणार नाही...

आपल्याला काहीतरी एका निर्णयाप्रत पोहचावं लागणार आहे...

आणि एकदा निर्णय घेतला की, त्याचे मग काहीही परिणाम होवोत, आपल्याला त्या निर्णयावर ठाम रहावं लागणार आहे...


जॉनने शेवटी आपल्या मनाचा पक्का निर्णय केला. आपल्या रुमचे दार आतून बंद करुन तो आपल्याला ज्या लागतील त्या सगळ्या वस्तू एका बॅगमध्ये भरु लागला.

सगळ व्यवस्थीत तर होईल ना?...

आपण आपल्या घरच्यांना सगळं कळवावं का?...

विचार करता करता त्याचे सगळे कपडे भरणं झालं.

कपडे वैगेर बदलवून त्याने पुन्हा काही राहलं का याचा आढावा घेतला. शेवटची राहलेली एक वस्तू टाकून त्याने बॅगची चैन लावली. चेनचा विशीष्ट असा एक आवाज झाला. त्याने मग उचलून ती बॅग समोर टेबलवर ठेवली आणि तो टेबलच्या समोर असलेल्या खुर्चीवर विसावला. तो एकदोन क्षणच निवांत बसला असेल तेवढ्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने खिशातून मोबाईल काढून त्याचा डीस्प्ले बघितला. डिस्प्लेवर 'नॅन्सी' अशी अक्षरं उमटलेली होती. तो घाईने खुर्चीवरुन उठला. मोबाईल बंद केला, बॅग उचलली आणि हळूच खोलीतून बाहेर पडला.

हळूच, इकडे तिकडे बघत जॉन मुख्य दरवाजाच्या बाहेर आला आणि दार ओढून घेतलं. मग जॉगींग केल्यागत तो बॅग खांद्यावर घेवून कंपाऊंडच्या गेटजवळ आला. बाहेर रस्त्यावर त्याला एक टॅक्सी थांबलेली दिसली. समोरच्या कंपाऊंड गेटमधून बाहेर पडून त्याने ते दार लावून घेतलं. टॅक्सीजवळ जाताच त्याची टॅक्सीमध्ये मागच्या सिटवर बसून वाट पाहत असलेल्या नॅन्सीशी नजरा नजर झाली. दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले. पटकन जावून तो बॅगसकट नॅन्सीजवळ घूसला आणि त्याने टॅक्सीचे दार मोठा आवाज होणार नाही याची काळजी घेत हळूच ओढून घेतले. दोघंही एकमेकांच्या मिठीत शिरले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य तरळलं होतं.

एव्हाना त्यांची टॅक्सी घरापासून बरीच दूर निघून वेगात धावत होती. ते दोघंही वेगाने जाणाऱ्या टॅक्सीच्या खिडकीतून येणाऱ्या थंड हवेचा आस्वाद घेत होते. पण त्यांना कुठे कल्पना होती की एक काळी आकृती मागे एका टॅक्सीत बसून त्यांचा पाठलाग करीत होती....


.... डिटेक्टीव्ह बेकर सांगता सांगता थांबला. डिटक्टीव सॅमने तो का थांबला हे जाणन्यासाठी त्याच्याकडे बघितले. डिटेक्टीव्ह बेकरने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून पाण्याचा एक घोट घेतला. तोपर्यंत ऑफिसबॉयने चहा पाणी आणले होते. डिटेक्टीव्हने ते त्याच्या समोर बसलेल्या डिटेक्टीव सॅम आणि त्याच्या सोबत आलेल्या एका ऑफिसरला द्यायला सांगीतले.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network