Marathi Novel - अद्-भूत - Ch-16: शेवटचा निरोप

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

ऑफिसबॉय चहापाणी घेवून आल्यामुळे बेकर जी हकिकत सांगत होता त्यात खंड पडला. सॅमला आणि त्याच्या साथीदाराला पुढील हकिकत ऐकण्यासाठी उत्सुकता लागुन राहाली होती. सगळ्यांचं चहापाणी आटोपल्यावर डिटेक्टीव्ह बेकर पुन्हा पुढे राहालेली हकीकत सांगू लागला ....


... जॉनची आणि नॅन्सीची टॅक्सी रेल्वे स्टेशनला येवून पोहोचली. दोघंही टॅक्सीतून उतरले. टॅक्सीवाल्याचे पैसे चूकवून ते आपापलं सामान घेवून तिकीट घराजवळ गेले. कुठे जायचं हे अजूनही त्यांनी ठरविलं नव्हतं. बस इथून निघून जायचं एवढंच त्यांनी ठरविलं होतं. एक ट्रेन लागलेलीच होती. जॉनने त्या ट्रेनचंच तिकिट काढलं.

प्लॅटफॉर्मवर ते आपलं तिकिट घेवून आपली बोगी शोधायला लागले. बोगी शोधण्यासाठी त्यांना जास्त त्रास घ्यावा लागला नाही. मुख्य दरवाजापासून त्यांची बोगी जवळच होती. ट्रेन निघण्याची वेळ झाली म्हणून पटकन ते आपल्या बोगीत चढले. बोगीत आल्यानंतर त्यांनी आपल्या सिट्स शोधल्या. आपल्या सिटच्या जवळ आपलं सगळं सामान व्यवस्थीत ठेवलं. तेवढ्यात गाडी हलली. गाडी निघण्याची वेळ झाली होती. जशी गाडी निघाली तशी नॅन्सी जॉनला घेवून बोगीच्या दरवाजाजवळ आली. तिला जाण्याच्या पूर्वी आपल्या शहराला एकदा शेवटचं डोळे भरून बघायचं होतं.

ट्रेनमध्ये नॅन्सी आणि जॉन अगदी जवळ जवळ बसले होते. त्यांना दोघांनाही एकमेकांचा आधार हवा होता. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यानंतर त्यांना एकमेकांचाच आधार होता. आपल्या घराचे सगळे बंध, सगळे पाश तोडून ते दूर निघून चालले होते. नॅन्सीने आपलं डोकं जॉनच्या खांद्यावर ठेवलं.

'' मग ... आता कसं वाटतं'' जॉनने वातावरण थोडं हलकं करण्याच्या उद्देशाने विचारले.

'' एकदम ग्रेट'' नॅन्सीही खोटं खोटं हसत म्हणाली.

जॉनला समजत होतं की ती वरुन जरी दाखवित नसली तरी आतून तिला घर सोडून जाण्याचं दु:ख वाटत होत. तिला आधार देण्यासाठी जॉनने तिला घट्ट पकडले.

'' तुला काही आठवतं का?'' जॉनने तिला अजून घट्ट पकडीत हसत विचारले.

नॅन्सीने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहाले.

'' नाही म्हणजे एखादा प्रसंग ... जेव्हा मी तुला असे घट्ट पकडले होते''

'' मी कसा काय विसरेन तो प्रसंग... '' नॅन्सी त्याने तिला होस्टेलमधे घोंघडी टाकुन पकडले होते तो प्रसंग आठवून म्हणाली.

'' आणि तु सुध्दा ... '' नॅन्सी त्याच्या गालावर हात चोळत त्याला मारलेल्या चपराकीची आठवण देत म्हणाली.

दोघंही जोरजोराने हसायला लागले.

दोघांचं हसणं ओसरल्यावर नॅन्सी त्याला लाडावत म्हणाली, '' आय लव्ह यू''

'' आय लव्ह यू टू'' त्याने अजून तिला जवळ ओढत प्रतिसाद दिला.

दोघही करकचून एकमेकाच्या आलिंगणात बद्ध झाले.

नॅन्सीने ट्रेनच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघीतले. बाहेर सगळा अंधारच अंधार होता. जॉनने नॅन्सीकडे बघितले.

'' तुला माहित आहे की तुझी माफी मागतांना तो फुलाचा गुच्छ मी का आणला होता?'' जॉन पुन्हा तीला माफी मागण्याचा प्रसंग आठवून देत म्हणाला. तो प्रसंग तो कसा विसरु शकत होता? त्याच प्रसंगात तर त्यांच्या प्रेमाचं बिज रोवल्या गेलं होतं.

'' अर्थातचं माफी जास्त इफेक्टीव व्हावी म्हणून..." नॅन्सी म्हणाली.

'' नाही ... मी सांगीतलं तर तुझा विश्वास बसणार नाही..'' जॉन म्हणाला.

'' मग ... का आणला होता?''

'' अग माझ्या हातांनी हावभाव करतांना पुन्हा पहिल्यासारखी काही गडबड करु नये म्हणून ... नाहीतर पुन्हा एखादी चपराक बसली असती'' जॉन म्हणाला.

नॅन्सी आणि जॉन पुन्हा खळखळून हसायला लागले.

त्यांचं हास्य हळू हळू निवळलं. मग थोडा वेळ अगदी निरव शांतता पसरली. फक्त रेल्वेचा आवाज येत होता. त्या शांततेत नॅन्सीला वाटलं की कुणीतरी या ट्रेनमध्ये आपला पाठलाग तर करत नसावा. नाही कसं शक्य आहे आपण पळून जाणार आहोत हे फक्त जॉन आणि तिच्या व्यतिरिक्त दुसरं कुणालाच माहित नव्हतं.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. I Like This Novel Thanks For Providing Such Wonderful Novel
    Rupesh

    ReplyDelete
  2. thanks for providing such wonderful novel

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network