Ch-7: रोनाल्ड पार्कर ( Marathi Kadambari - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishवाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


रोनाल्ड पार्कर साधारण पंचविशीतला, स्टायलीस्ट, रुबाबदार, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. तो राहून राहून अस्वस्थतेने आपला कड बदलवित होता. त्यावरुन असे दिसत होते की त्याचं डोकं काही ठिकाणावर नसावं. थोडावेळ कड बदलवून झोपण्याचा प्रयत्न करुनही झोप येत नाही असे पाहून तो बेडमधून उठून बाहेर आला, आजूबाजूला एक नजर फिरविली, आणि पुन्हा बेडवर बसला. त्याने बेडच्या बाजूला ठेवलेले एक मासिक उचलले आणि ते उघडून पुन्हा बेडवर आडवा झाला. तो त्या मासीकाची नग्न चित्रं असलेली पानं चाळू लागला.

सेक्स इज द बेस्ट वे टू डायव्हर्ट यूवर माईंन्ड ...

त्याने विचार केला. अचानक 'धप्प' असा काहीतरी आवाज त्याला दुसऱ्या खोलीतून ऐकायला आला. त्याने दचकुन उठून बसला, मासिक बाजूला ठेवले आणि आणि तशाच भितीयूक्त गोंधळलेल्या स्थीतीत तो बेडवरुन खाली उतरला.

कशाचा हा आवाज असावा...

पुर्वी कधी तर कधी असा आवाज आला नव्हता..

पण आवाज आल्यावर आपण एवढे का दचकलो...

किंवा होवू शकते की आज आपली मनस्थीती आधीच चांगली नसल्यामुळे तसं झालं असावं ....

हळू हळू चाहूल घेत तो बेडरुमच्या दरवाजाजवळ गेला. दरवाज्याची कडी उघडली आणि हळूच दरवाजा तिरका करुन त्याने बाहेर डोकावून पाहिले.

सर्व घराची चाहूल घेतल्यानंतर रोनाल्डने हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमधे गडद अंधार होता. हॉलमधला लाईट लावून त्याने भितभितच चहूकडे एक नजर फिरवली.

पण कहीच तर नाही ...

सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे...

त्याने पुन्हा लाईट बंद केला आणि किचनकडे निघाला.

किचनमधेही अंधार होता. तिथला लाईट लावून त्याने चहूकडे एक नजर फिरवली. आता बऱ्यापैकी त्याची भिती नाहिशी झालेली दिसत होती.

कुठे काहीच तर नाही ...

आपण उगीच मुर्खासारखं घाबरलो...

तो परत जाण्यासाठी वळणार तोच किचनच्या सिंकमधे कसल्यातरी गोष्टीने त्याचं लक्ष आकर्षित केलं. त्याचे डोळे आश्चर्याने आणि भितीने विस्फारलेले होते. एका क्षणात एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता. हातापायात कंप सूटला होता. त्याच्या समोर सिंकमध्ये रक्ताळलेला एक मांसाचा तुकडा पडला होता. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिथून धूम ठोकली होती. काय करावे त्याला काही कळत नव्हते. गोंधळलेल्या स्थितीत सरळ बेडरुममध्ये जावून त्याने आतून कडी लावून घेतली.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

8 comments: