Ch-8: गोल्फ ( Marathi Novel - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


डिटेक्टीव सॅम गोल्फ खेळत होता. रोजच्या कटकटीतून आणि ताण तणावातून हा त्याला विरंगुळा होता. त्याने एक जोराचा शॉट मारल्यानंतर बॉल छिद्राच्या जेमतेम सहा फुटाच्या अंतरावर घरंगळत थांबला. तो बॉलजवळ गेला. जमीनीच्या चढाचा आणि उताराचा अंदाज घेतला. बॉलवरुन टी फिरवुन किती जोरात मारावी लागेल याचा अंदाज घेतला. आणि काळजीपुर्वक, बरोबर दिशेने, बरोबर जोर लावून त्याने एक हलकेच शॉट मारला आणि बॉल छिद्राकडे घरंगळत जावून बरोबर छिद्रात सामावला. डिटेक्टीवच्या चेहऱ्यावर एक विजयी आनंद पसरला. एवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला. डिटेक्टीव्हने डिस्प्ले बघीतला. पण फोन ओळखीचा वाटत नव्हता. त्याने एक बटन दाबून फोन अटेंड केला, ''यस''

'' डिटेक्टीव बेकर डीयर'' तिकडून आवाज आला.

'' हं बोला'' सॅम दुसऱ्या गेमची तयारी करीत म्हणाला.

'' माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आता चालू असलेल्या सिरीयल किलर केसचे इंचार्च आहात... बरोबर?'' तिकडून बेकरने विचारले. .

'' हो '' सॅमने सिरीयल किलरचा उल्लेख होताच पुढच्या गेमचा विचार सोडून बेकर अजून काय बोलतो ते लक्ष देवून ऐकण्याला प्राधान्य दिले.

'' तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर ... म्हणजे तुम्ही फ्री असाल ...तर तुम्ही इकडे येवू शकता का?... माझ्याकडे या केस संदर्भात काही महत्वाची माहिती आहे.... कदाचीत तुमच्या उपयोगी पडेल''

'' हो ... चालेल'' बाजूने जाणाऱ्या पोराला सामान उचलण्याचा इशारा करीत सॅम म्हणाला.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

  1. Post khupach lahan hoti hi..
    Atleast 2-3 pages tari asu dya each part..

    ReplyDelete
  2. Hello,
    Me Himangi,
    Aanad mhnato tyapramane hi post kharch khup lahan hoti, ani mala 11 April nantarchi Post ajun milali nahi.
    Kahi problem zala ahe ka??
    I m eagerly waiting for the same....

    ReplyDelete
  3. suspense kaayam tevnyasathi kami kela asel ha post :)

    ReplyDelete
  4. khupach changla suspence ahe. like suhas shirwalkar.

    ReplyDelete