Marathi Novel - अद्-भूत : Ch-19: आय प्रॉमीस

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

हॉटेलच्या एका रुममध्ये नॅन्सी आणि जॉन बेडवर एकमेकांच्या समोर बसले होते. जॉनने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा बाजूला सारल्या.

'' मला तर भीतीच वाटली होती की आपण त्यांच्या तावडीत सापडू की काय'' नॅन्सी म्हणाली.

ती अजूनही त्या भयानक मनस्थीतीतून बाहेर आलेली दिसत नव्हती.

'' अगं मी असतांना तुला काळजी करण्याचं काय कारण?... मी तुला काहीही होवू देणार नाही... आय प्रॉमीस'' तो तिला दिलासा देत म्हणाला.

तिने मंद हसत त्याच्याकडे पाहाले.

खरंच तिला त्याच्या या शब्दाने किती धीर आला होता...

हळूच जॉन तिच्याजवळ सरकला. तिने त्याच्या डोळ्यात बघितले. तोही तिच्या डोळ्यातून डोळे हटविण्यास तयार नव्हता. हळू हळू त्यांच्या श्वासांची गती वाढायला लागली. हळूच जॉनने तिला आपल्या बाहूपाशात ओढून घेतले. तिलाही जणू त्याच्या उबदार बाहूपाशात सुरक्षीत वाटत होते.

जॉनने हळूच तिला बेडवर झोपवून तिचा चेहरा आपल्या तळहातात घेवून तो तिच्याकडे निरखुन बघू लागला. हळूच, आपसूकच त्याचे गरम ओठ आता तिच्या थरथरत्या ओठांवर विसावले होते. दोघंही आता आवेगाने एकमेकांवर चूंबनाचा वर्षाव करु लागले. इतक्या आवेगाने की त्या आवेगाच्या भरात ' धाडकन्' ते दोघंही बेडच्या खाली जमीनीवर पडले. नॅन्सी खाली आणि जॉन तिच्या वर पडला होता. वेदनेने ओरडत नॅन्सीने त्याला दूर ढकललं.

'' माझे हाडं मोडणार आहेस की काय'' ती वेदनेने कन्हत म्हणाली.

जॉन पटकन उठला आणि तिला वर उचलण्याचा प्रयत्न करु लागला.

'' आय ऍम सॉरी ... आय ऍम सो सॉरी '' तो म्हणाला.

नॅन्सीने त्याला एक चपराक मारण्याचा अविर्भाव केला. त्यानेही भीतीने डोळे बंद करुन आपला चेहरा बाजूला सारला. नॅन्सी गालातल्या गालात हसली. एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्याच्या याच तर निष्पाप भावांवरती ती फिदा झाली होती. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्याच्या ओठांचे एक करकचून चूंबन घेतले. तोही तिच्या चुंबनाला तेवढ्याच आवेगाने प्रतिसाद देवू लागला. आता तर त्यांना तिथून गालीच्यावरुन उठून बेडवर जाण्याची सुध्दा उसंत नव्हती. किंबहूना ते एक क्षणही वाया जावू देवू इच्छीत नव्हते. ते खाली गालीच्यावरच आडवे पडून एकमेकांच्या शरीरावर चूंबनाचा वर्षाव करु लागले. चुंबनासोबतच त्यांचे हात एकमेकांचे कपडे काढण्यात व्यस्त होते. जॉन आता तिचे आणि आपले संपुर्ण कपडे काढून तिच्यात सामावून जाण्यास आतूर झाला होता. त्याचा देह हळू हळू तिच्या देहावर झूकु लागला. तेवढ्यात... तेवढ्यात त्यांच्या रुमच्या दरवाजावर थाप पडली. ते जसे जिथल्या तिथे थीजून गेले. गोंधळाने ते एकमेकाकडे पाहू लागले.

आपल्याला दरवाजा वाजण्याचा भास तर नाही ना झाला?...

तेवढ्यात अजून एक जोरदार थाप दारावर पडली.

सर्विस बॉय तर नसावा...

'' कोण आहे?'' जॉनने आवाज दिला.

'' पोलिस...'' बाहेरुन आवाज आला.

दोघंही गालीच्यावरुन उठून कपडे घालू लागले.

पोलिस इथपर्यंत कसे काय पोहोचले?...

जॉन आणि नॅन्सी विचार करु लागले.

त्यांनी आपले कपडे घातल्यानंतर अवसान गळलेल्या स्थीतीत जॉन दरवाजापर्यंत गेला. त्याने पुन्हा एकदा नॅन्सीकडे बघीतले. आता या प्रसंगाला कसं सामोरं जायचं याची ते मनोमन तयारी करु लागले. जॉन कीहोलमधून बाहेर डोकावून बघू लागला. पण बाहेर अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते.

किंवा त्या कीहोलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा...

हळूच त्याने दरवाजा उघडला आणि दार तिरकं करुन खींडीतून तो बाहेर बघण्याचा प्रयत्न करु लागला तोच.. क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल, आणि स्टीव्हन दरवाजा जोरात ढकलून खोलीत घुसले.

काय होत आहे हे समजण्याच्या आधीच क्रिस्तोफरने दरवाजाला आतून कडी घातली होती. एखाद्या चित्त्याच्या चपळाईने रोनॉल्डने चाकू काढून नॅन्सीच्या मानेवर ठेवला आणि दूसऱ्या हाताने ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले.

क्रिस्तोफरनेही जणू पुर्वनियोजीत ठरविल्याप्रमाणे त्याचा चाकू काढून जॉनच्या मानेवर ठेवला आणि त्याचं तोंड दाबून धरलं. आता सर्व परिस्थीती त्यांच्या आटोक्यात आल्याप्रमाणे ते एकमेकांकडे पाहून वहशीपणे गालातल्या गालात हसले.

'' स्टीव्ह याचं तोंड बांध'' क्रिस्तोफरने स्टीव्हनला आदेश दिला.

जशी नॅन्सी ओरडण्याचा प्रयत्न करु लागली रोनॉल्डची तिच्या तोंडावरची पकड मजबूत झाली.

'' पॉल हिचंही बांध...''

स्टीव्हनने जॉनचं तोंड, हात आणि पाय टेपने बांधले. पॉलने नॅन्सीचं तोंड आणि हात बांधले.

त्यांनी ज्या सफाईने ह्या सगळ्या हालचाली केल्या त्यावरुन ते ह्या अशा कामात रुळलेले आणि निर्ढावलेले गिधाडं वाटत होते.

आता क्रिस्तोफरच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य लपविल्या लपविले जात नव्हते.

'' ए ... त्याच्या डोळ्यावर काहीतरी बांधारे... पाहावल्या जाणार नाही बिचाऱ्याच्यानं'' क्रिस्तोफर म्हणाला.

स्टीव्हनने त्यांच्याच सामानातलं एक कापड घेवून जॉनच्या डोळ्यावर बांधलं. आता जॉनला फक्त अंधाराशीवाय काहीच दिसत नव्हतं. आणि ऐकू येत होतं ते त्या गिधाडांचं राक्षसी आणि वहशी हास्य आणि नॅन्सीचा दाबलेला दडपलेला चित्कार.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network