Marathi Novel - अद्-भूत : Ch-20: मी तुम्हाला सोडणार नाही

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉनला एकदम सर्व शांत आणि स्थब्ध झालेंलं जाणवलं.

'' ए त्याच्या डोळ्यावरचं कापड काढ रे... '' क्रिस्तोफरचा चिडलेला आवाज आला.

जॉनला त्याच्या डोळ्यावरचं कापड काढतांनाचं जाणवत होतं. त्याचा आक्रोश अश्रूंच्या द्वारे बाहेर पडून ते कापड ओलं झालं होतं.

जसं त्याच्या डोळ्यावरचं कापड सोडलं, त्याने समोरचं दृष्य बघितलं. त्याचे जबडे आवळल्या गेले, डोळे लाल झाले, सारं अंग रागाने थरथरायला लागलं. तो स्वत:ला सोडवून घेण्यासाठी तडफडू लाग़ला. त्याच्या समोर त्याची नॅन्सी निर्वस्त्र पडलेली होती. तिची मान एका बाजूला लटकत होती. तिचे डोळे उघडे होते आणि पांढरे झाले होते. तिचं शरीर निश्चल झालेलं होतं. तिचे प्राणपाखरु केव्हाच उडून गेलेले होते.

अचानक त्याला जाणीव झाली की त्याच्या डोक्यावर कशाचा तरी प्रहार झाला आणि त्याची शुध्द हळू हळू हरपू लागली.

जेव्हा जॉन शुद्धीवर आला त्याला जाणवले की त्याला आता बांधलेले नव्हते. पण जिथे मघा नॅन्सीची बॉडी पडलेली होती तीथे आता काहीच नव्हते. तो ताबडतोब उठून उभा राहाला, आजूबाजूला त्याने एक नजर फिरवली.

ते आपल्याला पडलेलं भयानक स्वप्न तर नव्हतं...

देवा ते स्वप्नच होवो ...

त्याला मनोमनी वाटायला लागलं.

पण स्वप्न कसं काय असू शकणार...

'' नॅन्सी '' त्याने एक आवाज दिला.

त्याला कळत होतं की त्या आवाजाला प्रतिसाद येणार नाही.

पण एक वेडी आशा...

त्याचं डोकं मागच्या बाजूने खुप दुखत होतं. म्हणून त्याने डोक्याला मागे हात लावून पाहाला. त्याच्या हाताला लाल लाल रक्त लागलं होतं.

त्या लोकांनी फटका मारुन आपल्याला बेशुध्द केलेल्याची ती जखम होती. आता त्याला पक्की खात्री झाली होती की ते स्वप्न नव्हतं.

धावतच तो रुमच्या बाहेर गेला. बाहेर इकडे तिकडे शोधतच तो व्हरंड्यातून धावत होता. तो लिफ्टजवळ गेला आणि त्याने लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टमधे जाण्याच्या आधी त्याने पुन्हा एकदा आजूबाजूला शेवटचा दृष्टीक्षेप टाकला.

कुठे गेले ते लोक...

आणि नॅन्सीची बॉडी कुठं आहे...

की लावली त्यांनी ठिकाण्यावर..

तो हॉटलच्या बाहेर येवून अंधारात इकडे तिकडे सैरावैरा वेड्यासारखा धावत होता. सगळीकडे अंधार होता. मध्यरात्र उलटून गेली असावी. रस्त्यावरही रहदारी फारच तुरळक दिसत होती. त्याला कोपऱ्यावर एक टॅक्सीवाला दिसला.

याला कदाचीत माहित असेल...

तो त्या टॅक्सीजवळ गेला, टॅक्सीवाल्याला विचारलं. त्याने काहीतरी डावीकडे हातवारे करुन सांगीतलं. जॉन टॅक्सीत बसला आणि त्याने टॅक्सीवाल्याला टॅक्सी तिकडे घ्यायला सांगीतली.

निराश झालेला जॉन हळू हळू चालत आपल्या रुमजवळ परत आला. रुममध्ये जावून त्याने आतून दरवाजा लावून घेतला.

त्याने बेडकडे बघितलं. बेडशीटवर वळ्या पडलेल्या होत्या. तो बेडवर बसला.

काय कराव?...

बरं पोलिसांकडे जावं तर ते आपल्याला आयतंच पकडतील...

आणि तिच्या खुनाचा आरोप आपल्यावर येईल...

आणि आपणच तर आहोत तिच्या खुनाला जबाबदार...

नुसता खुनच नाही तर तिच्यावर झालेल्या बलात्कारालासुद्धा...

त्याने गुडघे पोटाजवळ घेवून आपलं तोंड गुडघ्यात लपविलं. आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला.

रडता रडता त्याचं लक्ष तिथेच बाजूला आलमारीच्या खाली पडलेल्या कागदाच्या तुकड्याकडे गेलं. तो उभा राहाला. आपल्या बाह्यांनी आपले अश्रू पुसले.

कशाचा तुकडा असावा?...

त्याने तो कागदाचा तुकडा उचलला.

कागदावर चार अक्षरं लिहिलेली होती - सी, आर, जे, एस. आणि त्या अक्षरांपुढे काहीतरी नंबर्स लिहिलेले होते. कदाचीत एखाद्या पत्याच्या गेमचे पॉईंट असावेत...

त्याने तो कागद उलटा करुन बघितला. कागदाच्या मागे एक नंबर होता. कदाचीत मोबाईल नंबर असावा.

तो निर्धाराने उठला -

'' ऍसहोल्स ... मी तुम्हाला सोडणार नाही '' त्याने गर्जना केली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. purna story kevha vacayla milnar ? ani jar ka mala siril tv chennel sathi hvi ael tar ? horrer fakta

    ReplyDelete
  2. feeling so bad for Johna and Noncy!
    worst end of their love story!

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network