Marathi Novel - अद्-भूत : Ch-21: मग जॉन कुठे गेला?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

.... डिटेक्टीव्ह सॅम डिटेक्टीव बेकर समोर बसून ऐकत होता. त्याची सर्व हकीकत सांगून केव्हाच झाली होती. पण सगळी हकिकत एकून खोलीतले सगळे जण एवढे भारावून गेले होते की बराचवेळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. खोलीमध्ये एक अनैसर्गीक शांतता परसली होती.

एका उत्कट प्रेमकहानीचा असा अंत व्हावा?....

कॅबिनमधल्या सगळ्यांनाच ती हकीकत हुर हुर लावून गेली होती.

थोड्यावेळाने डिटेक्टीव सॅमने आपल्या भावनांना आवर घालीत विचारले,

'' जॉनने पुलिस स्टेशनला रिपोर्ट केला होता?"'

'' नाही ''

'' मग ... हे सगळ तुला कसं कळलं ?''

'' कारण नॅन्सीचा भाऊ... जॉर्ज कोलीन्सने रिपोर्ट केला होता''

'' पण त्याने रिपोर्ट कसा काय केला? ... म्हणजे त्याला हे सगळं कसं कळलं? ... जॉन त्याला भेटला होता की काय? '' सॅम एकावर एक प्रश्नांचा भडीमार करीत होता.

''नाही जॉन त्याला त्या घटनेनंतर कधीही भेटला नाही....'' बेकर म्हणाला.

'' मग त्याला खुनी कोण आहेत हे कसं कळलं?'' सॅमला आता त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याची घाई झाली होती.

'' काही महिन्यांपुर्वी जॉनने नॅन्सीच्या भावाला या घटनेबद्दल पत्र लिहिले होते... त्यात त्याने त्या चार जणांचे नावं पत्ते त्याला कळविले होते ...''

'' मग रिपोर्टचा काय निकाल लागला?'' सॅमने पुढचा प्रश्न विचारला.

''... या केसवर आम्हीच तपास केला होता पण नॅन्सीची डेड बॉडी मिळाली नव्हती की जॉन सापडला नाही ... जो की या घटनेचा एकुलता एक अतिशय महत्वाचा आय विटनेस होता... म्हणून केस तशीच खोळंबून राहाली... आणि अजुनही खोळंबून पडलेली आहे... ''

'' बरं जॉनचा काही पत्ता?'' सॅमने विचारले.

'' त्याच्याबद्दल कुणालाच काही माहित नाही ... त्या घटनेनंतर तो कधी त्याच्या स्वत:च्या घरी सुध्दा गेला नाही... तो जिवंत आहे का मेला आहे याचाही काही पत्ता लागला नाही ... त्याच्या जॉर्जला आलेल्या पत्रावरुन फक्त तो अजुनही जिवंत असावा असं वाटते... पण तो जर जिवंत असेल तर तो का लपतो आहे हेच कळत नाही...''

'' कारण सरळ आहे...'' इतका वेळ लक्ष देवून ऐकत असलेला सॅमचा साथीदार म्हणाला.

'' हो ....त्याचे एकच कारण असू शकते की आता एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्यात जॉनचाच हात असू शकतो ... आणि म्हणूनच मी तुला मुद्दाम बोलावून घेवून ही माहिती दिली...'' बेकर म्हणाला.

'' बरोबर आहे तुझं ... या खुनांमध्ये जॉनचा हात आहे असं गृहीत धरण्यास पूरेपूर वाव आहे... पण मला एक गोष्ट समजत नाही ... की जेव्हा की ती खोली किंवा घर आतून आणि सर्व बाजूनी बंद असतं तेव्हा तो खुनाच्या जागी पोहोचतोच कसा? ... तो हे सगळे खुन कसे करतो आहे हे एक न उलगडणारं कोडं होवून बसलं आहे''

'' बरं नॅन्सीच्या भावाला जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्याची प्रतिक्रीया काय होती? ... आणि निकालाला उशीर लागतो आहे या बाबतीत त्याची प्रतिक्रिया कशी आहे?''

'' त्या माणसाला तर वेड लागल्यागत झपाटलेला आहे तो... इथे नेहमी पोलिस स्टेशनला त्याची चक्कर असते आणि केसबाबत काय झालं हे नेहमी तो विचारत असतो... बरं तो फोन करुनसुद्धा विचारु शकतो.. पण नाही तो स्वत: इथे येवून विचारतो... मला तर त्याची खुप किव येते .. पण आपल्या हातात जेवढं आहे तेवढंच आपण करु शकतो''

'' म्हणजे एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्याचा खुनी नॅन्सीचा भाऊ जॉर्जही असू शकतो.. '' सॅम म्हणाला.

'' तुम्ही त्याला एकदा बघायला हवं... त्याच्याकडे बघून तरी असं वाटत नाही'' बेकर म्हणाला.

'' पण आपल्याला ही शक्यताही नाकारुन चालणार नाही...'' सॅमने प्रतिवाद केला.

डिटेक्टीव बेकरने थोडा वेळ विचार केला आणि मग होकारार्थी मान हलविली.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network