Marathi Novel - अद्-भूत : Ch-22: आता पुढे कोण?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रात्री रोनॉल्ड आणि क्रिस्तोफर हॉलमध्ये पीत बसले होते. एका मागे एक त्यांच्या दोन साथीदारांचा खुन झाला होता. सुरवातीला जेव्हा स्टिव्हनचा खुन झाला तेव्हाच त्यांना शंका आली होती की हे प्रकरण नक्कीच नॅन्सीच्या खुनाशी सबंधीत आहे. पण नंतर पॉलच्या खुनानंतर तर त्यांची खात्रीच झाली होती के हे सगळं नॅन्सीच्या खुनाचंच प्रकरण आहे. कितीही घाबरणार नाही म्हटलं तरी आता त्यांना पुढचा नंबर त्यांच्या दोघांपैकीच एकाचा दिसत होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची भिती आणि चिंता हटायला तयार नव्हती. ते व्हिस्कीचे ग्लासवर ग्लास रिचवित होते आणि आपली भिती मिटविण्याचा प्रयत्न करीत होते.

'' मी म्हटलं नाही तुला ?'' किस्तोफर म्हणाला

रोनॉल्डने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहाले.

'' त्या साल्याला जिवंत सोडू नको म्हणून... त्याचा काटा आपण तेव्हाच काढायला पाहिजे होता... त्या पोरीबरोबर..'' क्रिस्तोफर व्हिस्कीचा घोट घेत कडवट तोंड करीत म्हणाला.

त्यांना शंका ... नाही पक्की खात्री होती की जॉनचाच या दोन खुनांमध्ये हात असावा.

'' आपल्याला वाटलं नाही साला एवढा डेंजरस असेल म्हणू...'' रोनॉल्ड म्हणाला.

'' बदला ... बदला माणसाला डेंजरस बनवितो'' क्रिस्तोफर म्हणाला.

'' पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की तो सारे खुन कशा प्रकारे करतो आहे... पोलिस तिथे पोहोचतात तेव्हा घर आतून बंद केलेलं असतं आणि बॉडी आत पडलेली असते... आणि तेच नाही तर पॉलच्या गळ्याचं तोडलेलं मांस माझ्या किचनमधे कसं काय आलं?.. आणि विशेष म्हणजे तेव्हाही माझं घर ...खिडक्या दारे सर्व मी व्यवस्थित बंद केलं होतं'' रोनॉल्ड आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला.

रोनॉल्ड कुठेतरी अधांतरी विचार करीत पाहत म्हणाला,

'' हे सगळं पाहता मला एकच गोष्ट शक्य वाटते...''

'' कोणती?'' क्रिस्तोफरने व्हिस्कीचा रिकामा झालेला ग्लास भरीत विचारले.

'' तूझा भूतावर विश्वास आहे?'' रोनॉल्डने बोलावं की नाही बोलावं या व्दीधा मनस्थीतीत विचारले.

'' काहीतरी मुर्खासारखा बडबडू नकोस.... त्याच्याजवळ काहीतरी ट्रीक आहे की तो अशा तऱ्हेने खुन करीत असावा... '' क्रिस्तोफर म्हणाला.

'' मलाही तेच वाटतं... पण कधी कधी भलती सलती शंका येते '' रोनॉल्ड म्हणाला.

'' काळजी करु नको ... आपण तो आपल्याला गाठण्याच्या आधीच आपण त्याला गाठून त्याचा काटा काढू'' क्रिस्तोफर त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

'' आपण पोलीसांचं प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे'' रोनॉल्ड विचार करीत म्हणाला.

'' पोलिस प्रोटेक्शन? ... मुर्ख आहेस की काय?... आपण त्यांना काय सांगणार आहोत... की बाबांनो आम्ही त्या पोरीला मारलं... आमच्याच्याने चूक झाली ... सॉरी ... अशी चूक पुन्हा होणार नाही ... कृपा करुन आमचं रक्षण करा ..'' क्रिस्तोफर दारुच्या नशेत माफी मांगण्याचे हावभाव करुन बोलत होता.

'' तो नंतरचा प्रश्न झाला... आधी आपलं प्रोटेक्शन महत्वाचं... सर सलामत तो पगडी पचास'' रोनॉल्ड म्हणाला.

'' पण पोलीसांकडे जावून त्यांचं प्रोटेक्शन मागणं म्हणजे...''

पोलिस प्रोटेक्शनची कल्पना येताच नाही म्हटलं तरी रोनॉल्डला बरं वाटत होतं. त्याची भिती पुर्णपणे नाही तरी कमी नक्कीच झाली होती.

'' त्याची तु काळजी करु नकोस... ते सगळं माझ्यावर सोडून दे'' रोनॉल्ड त्याचं वाक्य अर्ध्यातच तोडत उत्साहाने आणि आत्मविश्वासाने म्हणाला.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network