डिटेक्टीव्ह सॅम आपल्या ऑफिसमध्ये विचारांच्या तंद्रित बसला होता. जेफ त्याचा ज्यूनिअर टीम मेंबर तिथे आला.
'' सर माझ्या डोक्यात एक आयडीया आली आहे... की खुनी कसा खुनाच्या जागी घुसत असेल आणि मग बाहेर पडत असेल'' जेफ उत्साहाने म्हणाला.
सॅमने आपलं डोकं वर करुन त्याच्याकडे पाहालं.
जेफ दरवाजाच्या बाहेर गेला आणि त्याने दरवाजा बाहेरुन ओढून घेतला.
'' सर बघा आता'' तो तिकडून जोरात म्हणाला.
डिटेक्टीवने बघीतले की दाराची आतली कडी हळू हळू सरकत बंद झाली होती. सॅम आश्चर्याने बघत होता.
'' सर तुम्ही बघितलं का?'' तिकडून जेफचा आवाज आला.
मग हळू हळू दाराची कडी दूसऱ्या बाजूला सरकु लागली आणि थोड्या वेळातच कडी उघडल्या गेली.
सॅमला आश्चर्य वाटत होतं.
जेफ दरवाजा उघडून आत आला, त्याच्या हातात पाठीमागे काहीतरी लपविलेलं होतं.
'' तु कसं काय केलं? '' सॅमने आश्चर्याने त्याला विचारले.
जेफने एक मोठा मॅग्नेट आपल्या पाठीमागून काढला आणि सॅमच्या समोर धरला.
'' ही सगळी या चूंबकाची करामत आहे कारण ती कडी लोखंडाची बनलेली आहे'' जेफ म्हणाला.
'' जेफ फॉर यूवर काइंड इन्फॉर्मेशन... घटनास्थळी असलेल्या सगळ्या दाराच्या कड्या ऍल्यूमिनियमच्या होत्या'' सॅम उपरोधाने म्हणाला.
'' ओह... ऍल्यूमिनीयमच्या होत्या'' मग अजून काहीतरी डोक्यात आयडीया आल्यासारखा तो म्हणाला, '' काही हरकत नाही ... त्याचं पण सोल्यूशन आहे माझ्याजवळ''
सॅमने अविश्वासाने त्याच्याकडे बघीतले.
जेफने आपल्या गळ्यातला एक स्टोन्सचा नेकलेस काढून तोडला, सगळे स्टोन्स एका हातात घेवून त्यातला नायलॉन धागा दुसऱ्या हाताने ओढला. त्याने सगळे स्टोन्स खिशात ठेवले. आता त्याच्या दूसऱ्या हातात तो नॉयलॉनचा धागा होता.
डिटेक्टीव सॅम त्याच्याकडे तो काय करतो आहे हे गोंधळलेल्या स्थितीत पाहात होता.
'' आता बघा ही दूसरी आयडीया आहे.. तूम्ही फक्त माझ्यासोबत या'' जेफ म्हणाला.
सॅम त्याच्या मागे मागे गेला.
जेफ दरवाजाजवळ गेला. दरवाज्याच्या कडीत तो नॉयलॉन धागा त्याने अडकविला. धाग्याचे दोन्ही टोकं एका हातात पकडीत सॅमला म्हणाला, '' तुम्ही आता दरवाजाच्या बाहेर जा''
सॅम दरवाजाच्या बाहेर गेला. जेफही आता धाग्याचे दोन्ही टोकं एका हातात पकडून दरवाजाच्या बाहेर आला. आणि दार ओढून घेतलं.
दार बंद होतं पण तो धागा जो जेफच्या हातात होता दाराच्या फटीतून अजूनही आतल्या कडीला अडकविलेला होता. जेफने हळू हळू त्या धाग्याचे दोन्ही टोकं ओढले आणि मग धाग्याचं एक टोक सोडून दूसऱ्या टोकाने धागा ओढून घेतला. सगळा धागा आता जेफच्या हातात होता.
'' आता दार उघडून बघा'' जेफ सॅमला म्हणाला.
सॅमने दार ढकलून बघीतलं आणि काय आश्चर्य दार आतून बंद होतं.
सॅम अविश्वासाने जेफकडे पहायला लागला.
'' आता मला पुर्णपणे खात्री पटायला लागली आहे...'' सॅम म्हणाला.
'' कशाची?'' जेफने विचारले.
'' की या नोकरीच्या आधी तू कोणते धंधे करीत असला पाहिजेस..'' सॅम गमतीने म्हणाला.
दोघही एकमेकांकडे पाहून हसले.
'' पण मला एक सांग'' सॅम म्हणाला.
जेफने प्रश्नार्थक मुद्रेने सॅमकडे बघीतले.
'' की जर दाराला आतून कुलूप लावलेले असेल तर?'' सॅमने विचारले.
'' नाही...मग त्या स्थीतीत ...एकच शक्यता आहे'' जेफ म्हणाला.
'' कोणती?''
'' की ते दार उघडायला एखादी अघोरी शक्तीच लागेल'' जेफ म्हणाला
क्रमश:...
good suspense. i enjoyed.
ReplyDeletegood suspense I enjoyed
ReplyDeletegood story
ReplyDeleteMAST TRICK AHE
ReplyDeleteGeff is so smart!
ReplyDeleteGood suspense!
masta aahe story
ReplyDeletevery nice story
ReplyDeletei like it