Marathi Novel - अद्-भूत : Ch-24: योजना

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

पोलिस स्टेशनच्या कॉन्फरंन्स रुममध्ये मिटींग चालली होती. समोर भिंतीवर टांगलेल्या पांढऱ्या पडद्यावर प्रोजेक्टरवरुन एक लेआऊट डायग्राम प्रोजेक्ट केली होती. त्या डायग्राममध्ये दोन घरांचे लेआऊट एका शेजारी एक असे काढलेले दिसत होते. लाल लेजर पॉईंटर वापरुन डिटक्टीव सॅम समोर बसलेल्यांना समजावून सांगत होता...


'' मि. क्रिस्तोफर ऍन्डरसन आणि मि. रोनॉल्ड पार्कर ...'' सॅमने सुरवात केली. समोर इतर पोलिसांसमवेत क्रिस्तोफर आणि रोनॉल्ड बसलेले होते. ते सॅम काय सांगतो ते लक्ष देवून एकत होते.

'' .. तुमच्या घरात या जागी आपण कॅमेरे बसविणार आहोत. बेडरुमध्ये तिन आणि घरात इतर जागी तिन असे एकूण सहा कॅमेरे एकएकाच्या घरात बसविले जातील. हे कॅमेरे सर्किट टिव्हीला जोडलेले असतील जिथे आमचे टेहळणी पथक सारखे घरातल्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून असेल.

'' तुला वाटते याने काही होणार आहे?'' क्रिस्तोफर रोनॉल्डच्या कानात व्यंगपूर्वक कुजबुजला.

रोनॉल्डने क्रिस्तोफरकडे पाहाले आणि काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता सॅमला विचारले, '' जर खुनी कॅमेऱ्यांपासून दूर राहाला तर?''

'' जन्टलमन आपण घरात मुव्हीग कॅमेरे लावतो आहोत .. ज्यामुळे तुमचं संपूर्ण घर कॅमेऱ्यांच्या क्षेत्रात राहणार आहे... आणि हो... मी तुम्हाला आश्वासन देतो की हा सगळ्यात चांगला आणि इफेक्टीव्ह उपाय आपण खुन्याला पकडण्यासाठी वापरत आहोत ... खुन्याने जर आत घूसण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही परिस्थीतीत सुटू शकणार नाही... अक्षरश: आमच्या तंत्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत घेवून हा ट्रॅप तयार केला आहे... ''

'' बरं ते ठिक आहे... आणि समजा एवढं करुन खुनी तुमच्या हाती लागला तर तुम्ही काय करणार आहात?'' क्रिस्तोफरने विचारले.

'' अर्थातच त्याला आम्ही कोर्टापुढे हजर करु...आणि कायद्यानुसार कोणती शिक्षा द्यायची ते कोर्ट ठरविल'' सॅम म्हणाला.

'' आणि जर तो सुटून पळून गेला तर?'' क्रिस्तोफरने पुढे विचारले.

"" जसे नॅन्सीचे खुनी तिचा खुन करुन पळून गेले तसे'' एक पोलीस उपाहासाने म्हणाला.

क्रिस्तोफर आणि रोनॉल्डने त्याच्याकडे रागाने पाहाले.

'' तुम्हाला आम्ही काय तीचे खुनी वाटतो? '' रोनॉल्डने त्या पोलिसाला रागाने प्रतिप्रश्न केला.

'' लक्षात ठेवा अजून आम्हाला कोर्ट खुनी ठरवू शकलेलं नाही '' क्रिस्तोफर रागाने चिडून म्हणाला.

'' मि. रोनॉल्ड पार्कर, मि. क्रिस्तोफर ऍन्डरसन ... इझी ... इझी ... मला वाटते आपण मुळ मुद्यापासून भटकत चाललो आहोत... सद्य:परिस्थीतीत मुळ मुद्दा आहे तुम्हाला कसे संरंक्षण देता येईल हा... तुम्ही नॅन्सीच्या खुनात गुन्हेगार आहात की नाही हा नंतरचा मुद्दा झाला..'' सॅम ने त्यांना शांत करण्याच्या उद्देशाने म्हटले.

'' तुम्हीही आधी आमच्या संरक्षणाचं बघा... बाकिच्या गोष्टी नंतरच्या नंतर बघता येतील.'' क्रिस्तोफर रुबाबात, विषेशत: त्या पोलिस अधिकाऱ्याकडे, ज्याने त्यांना डिवचलं होतं, त्याच्याकडे पाहत म्हणाला. त्या पोलिस अधिकाऱ्याला या दोन जणांचं सरंक्षण करणाऱ्या तुकडीत त्याचा समावेश केला होतं हे जिवावर आलं होतं. सॅमनेही त्या पोलिस अधिकाऱ्याला शांत राहण्याबद्दल खुनावले. तो पोलिस अधिकारी रागाने उठून तेथून बाहेर निघून गेला. वातावरण तेवढ्यापुरतं निवळलं आणि सॅम पुन्हा आपली योजना सर्वाना विस्तृत स्वरुपात समजावून देवू लागला.

क्रिस्तोफर आणि रोनॉल्ड पोलिस आपलं संरक्षण करु शकतील की नाही या बाबतीत अजूनही शाशंक होते. पण त्यांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पुर्णत: पोलीसांच्या हाती सोपविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network