Marathi Novel - अद्-भूत : Ch-25: जादूटोणा?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

पोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव्ह सॅमच्या रिकाम्या खुर्चीसमोर एक माणूस बसला होता. सॅम घाईघाईने आला आणि आपल्या खुर्चीवर बसला.

'' हं ... तर तुमच्याकडे या केसच्या संदर्भात माहिती आहे?...'' सॅमने विचारले.

'' होय साहेब ''

सॅमने एकदा त्या माणसाला नखशिखान्त न्याहाळले आणि तो काय सांगतो याची वाट पाहू लागले.

'' साहेब खरं म्हणजे... आमच्या शेजारी ती पोरगी नॅन्सी, जिचा खुन झाला म्हणतात, तिचा भाऊ राहातो...'' त्या माणसाने सुरवात केली आणि तो पुढे माहिती सांगु लागला ....


... एका चाळीत एक घर होतं. त्या घराला जिकडे तिकडे काचेच्या खिडक्याच खिडक्या होत्या. ऐवढ्याकी त्या घरात काय चाललं आहे हे शेजारच्याला कळावं. एका खिडकीतून हॉलमध्ये नॅन्सीचा भाऊ जॉर्ज बसलेला दिसत होता. आता आधीपेक्षा अजूनच तो विक्षीप्त आणि गबाळा दिसत होता. दाढी वाढलेली. केस विस्कटलेले. कपाळावर एक मोठा कशाचातरी टीळा लावलेला. तो फायरप्लेसच्या समोर हातात एक कापडाच बाहुलं घेवून बसला होता. कदाचित ते बाहुलं त्यानेच तयार केलं असावं. बाजुला ठेवलेल्या प्लेटमधून त्याने हातात काहीतरी उचलले आणि तो काहीतरी मंत्रासारखे शब्द उच्चारु लागला

'' ऍबस थी बा रास केतिन स्तता...''

त्याने ताटातून जे उचलेले होते ते समोरच्या ज्वालेत जोराने फेकल्यागत टाकले. मोठा भडका उडाला. पुन्हा तो तसाच काहीतरी विचित्र मंत्र उच्चारु लागला

'' कॅटसी... नतंदी.. वाशंर्पत... रेर्वरात स्तता...''

पुन्हा त्याने त्या ताटातले धान्यासारखे काहीतरी हातात मुठभर घेवून समोरच्या ज्वालेच्या स्वाधीन केले. यावेळी ज्वालेचा अजुनच मोठा भडका उडाला.

त्याने हातातलं बाहूलं बाजूला ठेवलं. ज्वालेच्या समोर वाकुन, जमिनीवर कपाळ घासलं.

एक माणूस शेजारुन जॉर्जच्या घरात कुतूहलाने डोकावून बघत होता.

कपाळ घासल्यानंतर जॉर्ज उठून उभा राहाला आणि त्याने एक विचित्र चित्कार केला. जो शेजारुन डोकावत होता तो सुध्दा दचकला. जॉर्जने वाकुन त्याच्या बाजूला ठेवलेलं ते बाहूलं उचललं आणि पुन्हा एक जोरात विचित्र चित्कार केला. सगळीकडे एक अदभूत शांतता पसरली.

'' आता तू मरायला तयार हो स्टीव्हन..'' जॉर्ज त्या बाहूल्याला म्हणाला.

'' नाही .. नाही मला मरायचं नाही इतक्यात... जॉर्ज मी तुझी माफी मागतो... मला माफ कर.. आय ऍम सॉरी... मी जे काही केलं ते चूकीचं केलं आहे... मला आता जाणीव झाली आहे... मी तुझ्यासाठी तु म्हणशील ते करीन... पण मला माफ कर'' जॉर्ज जणू ते बाहूलं त्याची माफी मागत आहे असे त्या बाहूल्याचे संवाद बोलत होता.

'' तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस? ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का?'' जॉर्जने आता त्याचे स्वत:चे संवाद बोलत विचारले.

'' नाही ... मी ते कसे काय करु शकेन?... ते माझ्या हातात असतं तर नक्कीच केलं असतं... ते सोडून काहीही माग... मी तुझ्यासाठी करेन...'' जॉर्ज बाहूल्याचे संवाद बोलू लागला.

''असं.... तर मग आता ... मरण्यासाठी तयार हो...'' जॉर्ज त्या बाहुल्याला म्हणाला.

तो शेजारचा माणूस अजूनही जॉर्जच्या खिडकीतून लपून डोकावत होता.

मध्यरात्र होवून गेली. बाहेर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते. जॉर्ज हळूच त्याच्या घराच्या बाहेर आला. चहुकडे एक नजर फिरवली. त्याच्या हातात एक थैली होती त्यात त्याने ते बाहुलं कोंबलं. आणि दाराला कुलूप लावून बाहेर पडला. कंपाऊंडच्या बाहेर येतांना पुन्हा त्याने त्याची चौकस नजर चहुवार फिरवली. समोर रस्त्यावर जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसत होता. आता तो रस्त्यावर पटापट आपले पावलं टाकीत चालायला लागला. त्या शेजारच्या माणसाने आपल्या खिडकीतून लपून जॉनला बाहेर जातांना बघितले. जसा जॉर्ज रस्त्यावर पुढे चालू लागला तो माणूस आपल्या घराच्या बाहेर आला. तो माणूस त्याला काही चाहूल लागू नये किंवा आपण त्याला दिसू नये याची काळजी घेत होता. जॉर्ज झपाझप आपले पावलं टाकीत पुढे जात होता. जॉर्ज बराच पुढे गेल्यावर तो माणूस त्याचा पाठलाग करीत त्याच्या मागे मागे जावू लागला.

तो माणूस जॉर्जचा पाठलाग करीत स्मशानाजवळ येवून पोहोचला. स्मशानाच्या आजुबाजुला दाट झाडी होती. कदाचित त्या झाडीत लपून घुबडं एखाद्या प्रेताची वाट पाहत बसत असावीत. दूर कुठेतरी कुत्र्यांचा विचित्र रडण्यासारखा आवाज येत होता. त्या माणसाला या सगळ्या वातावरणाची भिती वाटत होती. पण त्याला जॉर्ज इथे कशासाठी आला आहे हे पहायचे होते. जॉर्ज स्मशानात शिरला आणि तो माणूस बाहेरच कंपाऊंडच्या मागे लपून तो काय करीत आहे ते पाहू लागला. चंद्राच्या उजेडात त्या माणसाला जॉर्जची आकृती दिसत होती. जॉर्जने स्मशानात एक जागा निश्चित केली आणि तिथे तो खणू लागला. एक गड्डा खणल्यानंतर त्याने त्याच्या जवळच्या थैलीतून ते बाहुलं बाहेर काढलं. त्या बाहुल्याला त्याने जसे ते एखादे प्रेत असावे तसे त्या गड्ड्यात ठेवले आणि वरुन माती टाकु लागला. माती टाकतांनाही त्याचं आपलं मंत्रासारखं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. त्या बाहुल्यावर माती टाकुन तो गड्डा जेव्हा भरला तेव्हा जॉर्ज त्या मातीवर उभं राहून पायाने ती माती सारखी करीत दाबु लागला....


... तो माणूस सांगत असलेली सर्व हकिकत डिटेक्टीव सॅम लक्ष देवून एकत होता. तो माणूस पुढे म्हणाला-

'' दुसऱ्या दिवशी जेव्हा मला कळले की स्टीव्हनचा खुन झालेला आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता''

बराच वेळ कुणीही काही बोललं नाही. या प्रकरणाला आता हे नविनच वळण लागलं होतं.

सॅम विचार करु लागला.

'' तुला काय वाटतं जॉर्ज खुनी असावा?'' सॅमने आपल्या इन्व्हेस्टीगेशनच्या भूमीकेत शिरत विचारले.

'' नाही .. मला वाटते तो त्याची काळी जादू हे सगळे खुन करण्यासाठी वापरत असावा ... कारण ज्या दिवशी पॉलचा खुन झाला त्याच्या आधल्या रात्रीही जॉर्जने असेच एक बाहुले तयार करुन स्मशानात पुरले होते.'' तो माणूस म्हणाला.

'' तुझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे?'' सॅमने थोडे उपरोधकच विचारले.

'' नाही .. माझा विश्वास नाही ... पण जे धडधड डोळ्यांनी दिसत आहे त्या गोष्टींवर शेवटी विश्वास ठेवावाच लागतो'' तो माणूस म्हणाला.

डिटेक्टीव्ह सॅमचा पार्टनर जो इतका वेळ दूर बसून सगळी हकिकत ऐकत होता, चालत त्यांच्या जवळ येत म्हणाला-

'' मला आधीपासूनच खात्री होती की खुनी हा माणूस नसुन काहीतरी अमानुश शक्ती आहे''

सगळ्यामध्ये एक अनैसर्गीक शांतता पसरली.

'' आता त्याने अजुन एक नविन बाहुलं बनविलं आहे'' तो माणूस म्हणाला


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network