Marathi literature Novel - अद्-भूत : Ch-26: तुरुंगात

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जॉर्जच्या घराच्या खिडकीतून आतलं सगळं दिसत होतं. आजही तो फायरप्लेसच्या समोर बसलेला होता. त्याने त्याच्या हातातलं बाहुलं बाजुला जमिनीवर ठेवलं आणि वाकुन त्या ज्वालेसमोर जमिनीवर आपलं डोकं घासायला लागला. हे सगळं करतांना त्याचं आपलं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. थोड्या वेळाने तो उभा राहाला आणि एक विचित्र आवाज करीत किंचाळला. एवढा अचानक आणि जोरदार किंचाळला की बाहेर खिडकीतुन बघत असलेले डिटेक्टीव सॅम, सॅमचा पार्टनर आणि त्यांना सोबत घेवून आलेला तो माणूस सगळेजण दचकले. त्या किंकाळीनंतर वातावरणात एक भयानक शांतता पसरली.

'' मिस्टर रोनॉल्ड पार्कर आता तुझी पाळी आहे '' जॉर्ज ते खाली ठेवलेलं बाहुलं आपल्या हातात घेत म्हणाला.

पण तेवढ्यात दाराची बेल वाजली. जॉर्जने वळून दाराकडे बघितलं. बाहुल्याला पुन्हा खाली जमिनीवर ठेवलं आणि तो उठून समोरचं दार उघडायला आला.

दार उघडलं. समोर डिटेक्टीव सॅम आणि त्याचा पार्टनर होते. तो तिसरा माणूस कदाचित तिथून आधीच सटकला होता.

'' मिस्टर जॉर्ज कोलीन्स आम्ही तुम्हाला स्टीव्हन स्मीथ आणि पॉल रोबर्टस यांच्या खुनाचे संशयीत म्हणून अरेस्ट करायला आलो आहोत...तुम्हाला चूप राहण्याचा पुर्णपणे अधिकार आहे... आणि काही बोलायच्या आधी तुम्ही तुमच्या वकीलाशी संपर्क करु शकता... आणि तुम्ही जेही बोलाल ते कोर्टात तुमच्या विरोधात वापरण्यात येईल '' डिटेक्टीव सॅमने दार उघडल्याबरोबर जाहिर केले.

जॉर्ज कोलीन्सच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव आले नव्हते. तो शांतपणे त्यांना सामोरा गेला.

त्याला अरेस्ट करण्यापूर्वी सॅमने काही प्रश्न विचारण्याचं ठरविलं.

'' इथे तुम्ही कोण कोण राहता?'' सॅमने पहिला प्रश्न विचारला.

'' मी एकटाच राहतो'' त्याने उत्तर दिलं.

'' आमच्या माहीती प्रमाणे तुमच्यासोबत तुमचे वडिलही राहत होते''

'' हो राहत होते... पण आता ते हयात नाहीत''

'' ओह ... सॉरी... ते कधी वारले?''

'' नॅन्सीबद्दलची वाईट बातमी कळाल्यानंतर ते काही दिवसातच वारले''

'' बरं तुम्ही स्टिव्हन आणि पॉलला ओळखत होता?''

'' हो त्या राक्षसांना मी चांगल्या तऱ्हेने ओळखतो''

स्टिव्हन आणि पॉलचं नाव काढल्याबरोबर सॅमने एक गोष्ट नोट केली की त्यांच्या बद्दलचा राग आणि द्वेश तो लपवू शकत नव्हता. किंवा त्याने तसा लपविण्याचा प्रयत्नही केलेला त्यांना जाणवला नाही.

आता सॅमने मुळ मुद्द्यालाच हात घालण्याचे ठरविले.

'' तु स्टिव्हन आणि पॉलचा खुन केला आहेस का?''

'' हो '' तो निर्विकारपणे म्हणाला.

सॅमला वाटलं तो आढेवेढे घेईल. पण त्याने आढेवेढे न घेता एकदम कबुलीच देवून टाकली होती.

'' कसा केला तु त्यांचा खुन?'' सॅमने पुढचा प्रश्न विचारला.

'' माझ्याजवळ असलेल्या काळ्या जादूने मी त्यांना मारले'' तो म्हणाला.

या त्याच्या उत्तरावरुन सॅमला तो माणूस विक्षीप्त तर दिसत होताच पण आता खात्री व्हायला लागली होती.

'' तुझ्या त्या काळ्या जादूने तु कुणालाही मारुन दाखवू शकतोस का?'' सॅमने उपरोधाने विचारले.

'' कुणालाही मी का म्हणून मारु?... ज्याचे माझ्याशी वैर आहे त्यालाच मी मारीन''

'' आता पुढे तु तुझ्या काळ्या जादूने कुणाला मारणार आहेस?''

'' आता रोनॉल्डचा नंबर आहे ''

'' आत्ता ईथे तु त्याला मारुन दाखवू शकतोस का?'' सॅमने त्याची काळी जादू आणि तो दोघांचेही खोटेपण उघडे पाडण्याच्या उद्देशाने विचारले.

'' आत्ता नाही ... त्याची वेळ आली म्हणजे मी त्याला मारेन'' तो म्हणाला.

त्याची ती उत्तरं ऐकून सॅमला आता एवढ्यात तरी त्याला अजुन प्रश्न विचारण्यात स्वारस्य वाटत नव्हते. ते दोघे जण जॉर्जला अरेस्ट करण्यासाठी हातकडी घेवून पुढे सरसावले. याही वेळी त्याने काहीही आढेवेढे न घेता त्यांचे पुर्णपणे सहकार्य केले.

सॅमला मनोमन वाटत होते की एकतर हा माणूस पागल असावा किंवा अती चालाक....

पण तो जे म्हणतो ते जर खरं असेल तर ?...

क्षणभर का होईना सॅमच्या डोक्यात विचार डोकावून गेला...

नाही ... असं कसं शक्य आहे?...

सॅमने आपल्या डोक्यात आलेला तो विचार झटकून टाकला.


डिटेक्टीव सॅमच्या पार्टनरने जॉर्जला तुरुंगात एका कोठडीमध्ये बंद केले आणि बाहेरुन कुलूप घातले. सॅम बाहेरच उभा होता. जसा सॅम आणि सॅमचा पार्टनर तिथून जावू लागले तसा जॉर्ज आवेशाने जोरात ओरडला-

'' तुम्ही लोक मुर्ख आहात... जरी तुम्ही मला तुरुंगात बंद केले तरीही माझी जादू इथूनही आपलं काम करेल''

सॅम आणि त्याचा पार्टनर थांबले आणि वळून जॉर्जकडे पाहू लागले.

सॅमला जॉर्जची आता किव येवू लागली होती.

बिचारा...

बहिणीचा असा वाईट तऱ्हेने खुन झाल्यामुळे त्याचं असं विक्षीप्तपणे वागणं साहजीक आहे...

सॅम विचार करीत करीत पुन्हा आपल्या साथीदारासमवेत पुढे चालू लागला. थोडं अंतर चालल्यानंतर पुन्हा त्याने वळून जॉर्जकडे बघितलं. तो आता खाली वाकुन जमिनीवर डोकं घासत होता आणि मंत्रासारखं काहीतरी बडबडत होता.

'' याच्यावर लक्ष ठेवा आणि याला कुणीही व्हिजीटरला भेटण्याची परवानगी देवू नका'' सॅमने निर्देश दिला.

'' यस सर'' सॅमचा पार्टनर आज्ञाधारकपणे म्हणाला.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network