Marathi Novel book - अद्-भूत : Ch-27: बेडरुमची निगराणी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रोनॉल्डचे घर पुर्णपणे रात्रीच्या अंधाराने घेरले गेले होते. बाहेर आजुबाजुला रातकिड्यांचा किर्र असा आवाज आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या रडण्यासारखा आवाज येत होता. अचानक घराच्या बाजुच्या एका झाडावर विसावलेले पक्षी फडफड करीत उडू लागले.

दोन पोलिस टीमचे मेंबर्स रिचर्ड आणि इरीक टीव्हीच्या समोर बसून रोनॉल्डच्या घरातल्या सगळ्या हालचाली टीपत होते. रोनॉल्डच्या घराच्या शेजारीच एका गेस्टरुममध्ये त्यांना जागा देण्यात आली होती. रिचर्ड अंगाने चांगलाच जाड होता तर त्याच्या अगदी विरुध्द इरिक उंच आणि एकदम सडपातळ होता. त्यांच्या टीव्हीवर अस्वस्थतेने कड बदलणारा आणि झोपण्याचा प्रयत्न करणारा रोनॉल्ड दिसत होता.

'' यापेक्षा एखाद्या सेक्सी जोडप्याच्या बेडरुमची निगराणी करायला मला जास्त आवडलं असतं..'' इरीक गमतीने म्हणाला.

रिचर्डला इरीकच्या गमतीत बिलकुलच रस दिसत नव्हता.

'' नाही म्हणजे तु थोडा मोटा असला तरीही तुझ्या सारख्या लग्न झालेल्या जोडप्याच्या बेडरुमचीही निगराणी करायला मला चाललं असतं '' इरीक पुढे म्हणाला.

तरीही रिचर्डचा चेहरा मख्ख तो मख्खच होता.

तेवढ्यात अचानक एका मॉनीटरवर काहीतरी हालचाल दिसली. एक काळी मांजर खोलीतून ईकडून तिकडे धावत गेली होती.

'' ए बघ तिथे खोलीत एक मांजर आहे'' रिचर्ड म्हणाला.

'' इथे काय आपण कुत्र्यामांजराच्या हालचाली टिपण्यासाठी बसलो आहोत?.. माझ्या बापाला जर माहित असतं की एक दिवस असा मी कुत्र्या मांजरांच्या हालचाली बघत मॉनिटरसमोर बसणार आहे तर त्याने मला कधीच पोलिसात जावू दिलं नसतं'' इरीक उपरोधाने म्हणाला.

अचानक त्या मांजरीने कोपऱ्यात ठेवलेल्या एका चौकोनी डब्यावर उडी मारली ... आणि इकडे रिचर्ड आणि इरिकच्यासमोर ठेवलेले सगळे मॉनिटर्स ब्लॅंक झाले.

'' ए काय झाल?'' इरीक खुर्चीवरुन उठून उभं राहात म्हणाला.

रिचर्डही त्याच्या खुर्चीतून उठून उभा राहाला होता.

इरिकचा गमती करण्याचा मुड पुर्णपणे लोप पावला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता चिंता, काळजी आणि गोंधळ हे भाव पसरले होते.

'' चल लवकर .. काय गडबड झाली ते बघून येवू'' रिचर्ड लगबगीने खोलीतून बाहेर जात म्हणाला.

इरीकही त्याच्या मागे मागे जावू लागला.


एक बेडरुम. बेडरुममध्ये पुर्णपणे अंधार होता आणि बेडवर कुणीतरी झोपलेली फक्त पुसटशी आकृती दिसत होती. अचानक बेडच्या बाजुला ठेवलेला टेलिफोन सारखा वाजायला लाग़ला. त्या बेडवर झोपलेल्या आकृतीने झोपेतच आपला हात लांबवून टेलिफोन उचलला.

'' यस...'' डिटेक्टीव्ह सॅमचा आवाज आला.

पलिकडून इरीकचा आवाज आला, '' सर रोनॉल्डचाही तशाच प्रकारे खुन झाला आहे''

'' काय?'' सॅम उठूनच बसला.

त्याने बेडच्या बाजुचं बटण दाबून बेडरुममधला लाईट लावला. त्याची झोप पार पळाली होती.

'' काय म्हणाला?'' सॅमला आपण काय ऐकतो त्यावर विश्वास बसत नव्हता.

'' सर रोनॉल्डचाही खुन झाला आहे'' तिकडून इरिक म्हणाला.

'' एवढे कॅमेरे लावून मॉनिटर लावून तुम्ही सारखी निगराणी करीत असतांना?.... तुम्ही तिथे निगराणी करीत होता की माशा मारीत होता?'' चिडून सॅम म्हणाला.

'' सर ते काय झालं... एका मांजरीनं ट्रान्समिटरवर उडी मारली आणि मॉनिटरवर काहीच दिसेनासं झालं ... तरी आम्ही रिपेअर करायला तिथे गेलो होतो.. आणि तिथे गेल्यानंतर बघतो तर तोपर्यंत खुन झालेला होता.'' इरिक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होता.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network