Marathi online Novel - अद्-भूत : Ch-28: रोनॉल्ड

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

जसा इरिकचा फोन आला, ताबडतोब तयारी करुन डिटेक्टीव सॅम रोनॉल्डच्या घराकडे निघाला.

इतकी फुलप्रुफ व्यवस्था करुनही रोनॉल्डचा खुन होतो म्हणजे काय?...

आधीच पोलिसांची प्रतिमा जनमानसात डागळत चाललेली ...

आणि यावेळी आपल्याला पुर्ण विश्वास होता की खुनी आता या कॅमेराच्या तडाख्यातून सुटणं शक्य नव्हतं...

मग कुठे माशी शिंकली?...

कुणास ठाऊक?...

गाडी भरधाव चालविता चालविता सॅमचे विचारही भरधाव वेगाने धावत होते.

डिटेक्टीव सॅमने बेडरुममध्ये प्रवेश केला. बेडरुममध्ये रोनॉल्डची डेड बॉडी अस्तव्यस्त अवस्थेत बेडवर पडलेली होती. सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं दिसत होतं. सॅमने बॉडीची प्राथमीक पाहणी केली आणि मग खोलीत इकडे तिकडे बघितले. इरिक आणि रिचर्ड तिथे होतेच. अजुनही पोलिसांची इन्हेस्टीगेशन टीम तिथे येवून पोहोचली होती. इन्व्हेस्टीगेशन टीम आपल्या कामात मग्न होती.

'' मिळतं का काही?'' सॅमने त्यांना प्रश्न विचारला.

'' नाही सर .. अजून तरी काही नाही'' सॅमचा पार्टनर त्या टीमच्या वतीने बोलला.

सॅमने बेडरुममध्ये हळू हळू चालत आणि सर्व व्यवस्थीत काळजीपुर्वक न्याहाळत एक चक्कर मारली. चक्कर मारणं झाल्यावर सॅम पुन्हा बेडजवळ येवून उभा राहाला आणि त्याने बेडखाली वाकुन बघितलं.

बेडखालून दोन चमकणारे डोळे आपल्याकडे रोखुन पाहतांना सॅमला दिसले. एक क्षण का होईना सॅम दचकुन थोडा मागे सरला. ते चमकणारे डोळे मग हळू हळू त्याच्या दिशेने येवू लागले. आणि अचानक हल्ला करावा तसे ते डोळे त्याच्यावर झेपावले. तो चटकन बाजुला झाला. त्याला एक गळ्यात पट्टा बांधलेली काळी मांजर कॉटखालून बाहेर येवून दरवाजातून बेडरुमच्या बाहेर पळतांना दिसली. दरवाजातून बाहेर जाताच ती मांजर एकदम थांबली आणि तिने वळून मागे पाहाले. सगळ्या खोलीत एक अनाहूत शांतता पसरली होती. त्या मांजरीने एक दोन क्षण सॅमकडे बघितले आणि पुन्हा वळून ती तिथून पळून गेली. दोन तिन क्षण काहीही न बोलता निघून गेले.

'' हीच ती मांजर... सर'' रिचर्डने खोलीत पसरलेल्या शांततेचा भंग केला.

'' ट्रान्समिशन बॉक्स कुठ आहे?'' मांजरीवरुन सॅमला ट्रान्समीशन बॉक्सबद्दल आठवले.

'' सर इथे'' इरीकने एका जागी कोपऱ्यात निर्देश करीत म्हटले.

तो बॉक्स खाली जमिनीवर पडलेला होता. सॅम जवळ गेला आणि त्याने तो बॉक्स उचलला. तो तुटलेला होता. सॅमने तो बॉक्स उलट सुलट करुन न्याहाळला आणि परत जिथून उचलला होता तिथे ठेवून दिला. तेवढ्यात बेडरुमच्या दरवाजाकडे सॅमचं अनायसेच लक्ष गेलं. तो तिथे गेला. नेहमीप्रमाणे दार तोडलेलं होतं. पण यावेळी आतल्या कडीला चेन लावून कुलूप घातलेलं होतं.

''जेफ .. जरा इकडे ये'' सॅमने जेफला बोलावले.

जेफ त्याच्याजवळ गेला.

'' हे इकडे बघं ... आणि आता सांग तुझी थेअरी काय म्हणते ते... खुन केल्यानंतर दरवाजा बंद करुन आतुन चेन लावून त्याला कुलूप कसे घातले असेल?'' सॅमने त्या कडीला लावलेल्या चेन आणि कुलपाकडे निर्देश करुन म्हटले.

जेफने त्या चेन आणि कुलूप घातलेल्या कडीकडे लक्ष देवून बघत म्हटले, '' सर.. आता तर माझी पक्की खात्री होत चालली आहे ..''

'' कशाची?''

'' की खुनी हा कुणी माणूस नसून काहीतरी अमाणूश शक्ती असली पाहिजे'' जेफ वेड्यासारखा अधांतरी कुठेतरी शुन्यात पाहत म्हणाला.

सगळेजण गुढतेने एकमेकांकडे बघायला लागले.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

  1. khup bhiti nirman zaliy aata. nice........

    ReplyDelete
  2. wow... aata tar majja yenar aahe... solid aahe.. hi novel.. i really liked it...

    ReplyDelete
  3. vadhiv story ahe hi... mazi utkantha ata parmoccha bindu la pohochali ahe..

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network