Marathi Novel - अद्-भूत : Ch-29: स्पेशल मिशन

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

सॅम पोलिस स्टेशनमध्ये एक एका मुद्यावर विचार करीत होता आणि त्याच्या पार्टनर सोबत मधे मधे चर्चा करीत होता.

'' एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का?'' सॅमने शुन्यात पाहत त्याच्या पार्टनरला विचारले.

'' कोणती?'' त्याच्या पार्टनरने विचारले.

'' आत्ता पर्यंत तिन खुन झाले...बरोबर''

'' हो... तर''

'' तिन्ही खुनाच्या आधी जॉर्जला हे माहित होते की पुढील खुन कुणाचा होणार आहे '' सॅम म्हणाला.

'' हो बरोबर आहे''

'' आणि तिसऱ्या खुनाच्यावेळी तर जॉर्ज कस्टडीमध्ये बंद होता'' सॅम म्हणाला.

'' हो बरोबर आहे'' पार्टनर म्हणाला.

'' याचा अर्थ काय?'' सॅमने जसा स्वत:लाच प्रश्न केला.

'' याचा एकच अर्थ होवू शकतो की त्याची काळी जादू जेलमधूनसुध्दा काम करु शकते '' पार्टनर जणू त्याला उत्तर सापडले अशा आनंदाने म्हणाला.

'' मुर्खासारखा काही बरळू नको...'' सॅम त्याच्यावर खेकसला.

'' तर्कसंगत बुध्दीला पटेल असं बोल...'' सॅम स्वत:चा राग काबूत करण्याचा प्रयत्न करीत त्याला पुढे म्हणाला. .

बिचाऱ्या सॅमच्या पार्टनरचा आंनदलेला चेहरा पुन्हा हिरमुसला होता.

बराच वेळ शांततेत गेला.

सॅम पुढे म्हणाला, '' हे बघ आपण जॉर्जच्या घरी गेलो होतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवली...''

''कोणती?''

'' की जॉर्जच्या घराला एवढ्या खिडक्या आहेत की त्याच्या शेजारी कुणीही राहात असेल तर त्याला त्याच्या घरात काय चालू आहे हे दिसू आणि ऐकू येवू शकते..'' सॅम म्हणाला.

'' हो बरोबर...'' त्याचा पार्टनर काही न समजून म्हणाला.

अचानक एक विचार सॅमच्या डोक्यात चमकला. तो एकदम उठून उभा राहाला. त्याच्या चेहऱ्यावर कोडं सुटल्याचा आनंद जणू ओसंडून वाहायला लागला.

त्याचा पार्टनरही काही न समजून त्याच्या सोबत उभा राहाला.

'' चल लवकर... '' सॅम घाई घाई दरवाजाकडे जात म्हणाला.

त्याचा पार्टनर गोंधळून नुसता त्याच्या मागे चालायला लागला.

एकदम ब्रेक लागल्यागत सॅम दरवाजात थांबला.

'' बरं तु एक काम कर ... आपल्या टीमला स्पेशल मिशनसाठी तयार रहाण्यासाठी सांग'' सॅमने त्याच्या पार्टनरला आदेश दिला.

त्याचा पार्टनर अगदी गोंधकळून गेला होता. आपल्या बॉसला अचानक काय झाले त्याला काही उमगत नव्हते.

स्पेशल मिशन...

म्हणजे खुनी सापडला की काय?...

पण त्यांनी जी आता चर्चा केली होती त्याचा आणि खुनी सापडण्याचा काहीएक संबंध दिसत नव्हता..

मग स्पशल मिशन कशासाठी...

सॅमचा पार्टनर विचार करु लागला. तो सॅमला काही विचारणार एवढ्यात सॅम दरवाजाच्या बाहेर जाता जाता पुन्हा थांबला आणि मागे वळून म्हणाला,

'' चल लवकर घाई कर...''

त्याचा पार्टनर ताबडतोब हालचाली करायला लागला.

जाऊदे आपल्याला काय करायचे...

स्पेशल मिशन तर स्पेशल मिशन..

सॅमच्या पार्टनरने प्रथम टेबलवरचा फोन उचलला आणि एक नंबर डायल करायला लागला.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network