Marathi Novel - अद्-भूत : Ch-30: भाडेकरु

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

पोलिसांची गाडी ट्रफिकमधून रस्ता काढीत सायरन वाजवित वेगात चालली होती. आणि त्या गाडीच्या मागे अजुन चारपाच गाड्यांचा ताफा चालला होता. सायरनच्या आवाजामुळे ट्रफिक आपोआपच विचलित होवून त्या गाड्यांना रस्ता देत होती. त्या आवाजामुळे आणि एवढामोठा पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पाहून आजुबाजुच्या वातावरणात एक वेगळीच भितीयुक्त उत्सुकता पसरलेली होती. ट्रफिकमधून रस्ता काढीत आणि रस्त्याने वेडीवाकडी वळने घेत घेत शेवटी त्या गाड्या जॉर्जच्या घराच्या आसपास येवून थांबल्या. गाड्यांतून पोलिसांची फलटनच्या फलटन घाईघाईने पण एका शिस्तीत बाहेर पडली.

'' चला लवकर ... पुर्ण एरीयाला घेरुन टाका.... क्वीक... खुनी कोणत्याही परिस्थीतीत सटकता कामा नये....'' सॅमने फलटनीला आदेश दिला.

पोलिसांची ती फलटन एक एक करीत बरोबर शिस्तीत विखरुन त्यांनी शेवटी पुर्ण एरीयाला घेरले. एवढ्या मोठ्या पोलिसांच्या समुदायाच्या बुटांच्या आवाजामुळे पुर्ण परिसरात वातावरण तंग झाले होते. शेजार पाजारचे लोक कुणी खिडकीतून तर कुणी पडद्याच्या मागून बाहेर काय चालले आहे ते कुतुहलयुक्त भितीने पाहात होते.

दोन तिन पोलिसांना घेवून सॅम एका घराजवळ गेला. ज्या माणसाने पुर्वी जॉर्जची सर्व हकिकत सांगितली होती तो तिथेच गोंधळलेल्या मन:स्थीतीत उभा होता.

'' जरा सांगाबर कोणकोणत्या घरातून जॉर्जच्या घरातल्या सगळ्या हालचाली दिसतात आणि ऐकू येतात'' सॅमने त्या माणसाला विचारले.

त्या माणसाने सॅमला दोनतीन घरांकडे बोट दाखवून सांगितले.

'' ते दोन ... आणि माझं एक तिसरं''

'' आम्हाला हा एरीया संपुर्णपणे सील करावा लागेल'' सॅम आपल्या टीमला त्या घरांकडे घेवून जात म्हणाला.

सॅमने त्या तिन घरांच्या व्यतिरीक्त अजून दोन-चार घरं आपल्या कार्यक्षेत्रात घेतली. एकानंतर एक असा तो प्रत्येक घराकडे आपल्या दोन-तिन लोकांना घेवून जात होता. घर बंद असेल तर घर ठोठावत होता. काही लोक घर उघडून जेव्हा बाहेर येत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भितीचे भाव असत. मध्येच सॅम आपल्या साथीदारांना वायरलेसवर दक्ष राहण्याचा इशारा देत होता. अशी एकेका घराची छानबिन करीत ते शेवटी एका घरा जवळ येवून पोहोचले. दरवाजा ठोठावला. बराच वेळ झाला तरी आतून काहीच प्रतिक्रिया दिसत नव्हती. सॅमच्या सोबतचे सगळेजण दक्ष झाले. आपापली पिस्तुल घेवून तयार झाले. पुन्हा त्याने दार ठोठावले, यावेळी जरा जोरानेच. तरीही काही प्रतिक्रिया नव्हती.

आतामात्र सॅमने आदेश दिला,

'' दार तोडा''

जेफ जो अशा कामात पटाईत होता, नेहमीच दार तोडण्याच्या कामात अग्रेसर राहात असे, त्याने आणि अजून दोघं तिघं मिळून धक्के देवून देवून दार तोडलं. दार तूटल्याबरोबर खबरदारी म्हणुन प्रथम सगळेजण मागे परत आले आणि मग हळू हळू सतर्कतेने ते घरात घुसले.

घरात कुणी असण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. किचन, हॉल रिकामेच होते. हळू हळू आता ते बेडरुमकडे वळले. बेडरुमचं दार सताड उघडं होतं. त्यांनी आत डोकावून बघितलं. आत कुणीच नव्हतं, फक्त एक टेबल बेडरुममध्ये एका कोपऱ्यात ठेवलेला होता.

जसे सॅम आणि त्याच्यासोबत एक दोन पोलीस बेडरुममध्ये गेले सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि सगळ्यांची तोंडं उघडी ती उघडीच राहाली. त्या टेबलवर मांसाचे तूकडे आणि रक्त पसरलेलं होतं.

सगळेजण एकमेकांकडे एका भितीदायक आश्चर्याने पाहू लागले. सगळ्यांच्या मनात हजारो प्रश्न एकाच वेळी डोकावून गेले. पण कुणाची एकमेकालासुध्दा विचारण्याची हिंम्मत होत नव्हती. सॅमने बेडरुमच्या खिडकीकडे पाहाले. ती खिडकी सताड उघडी होती.

'' इथे कोण राहातं?... ते माहीत करा '' सॅमने आदेश दिला.

पोलिसांपैकी एकजण बाहेर गेला. आणि थोड्या वेळात माहिती घेवून परत आला.

'' सर मी या घराच्या मालकाशी आत्ताच संपर्क केला होता... तो आता थोड्या वेळातच इथे पोहोचेल... पण लोकांच्या म्हणण्यानुसार त्याने कुण्या एका इवेन फोस्टरला हे घर भाड्यानं दिलं आहे म्हणे...'' बाहेरुन माहीती काढून आलेला ऑफिसर म्हणाला.

'' तो आल्याबरोबर त्याची प्रथम माझ्याशी गाठ घालून द्या... फोरेन्सीकच्या लोकांना बोलवा..आणि या अपार्टमेंटमध्ये जोपर्यंत सर्व पुरावे गोळा केल्या जात नाहीत तोपर्यंत अजून कुणीही येणार नाही याची काळजी घ्या..'' सॅमने निर्देश दिले.

थोड्या वेळात बाहेर लोकांच्या जमलेल्या गर्दीत घरमालक आला आणि ' घरमालक आला ... घरमालक आला' अशी कुजबुज सुरु झाली.

'' कोण आहे घरमालक?'' सॅमने त्या गर्दीकडे जात विचारले.

एक वयस्कर माणूस समोर येत दबक्या आवाजात भितभितच म्हणाला, '' मी आहे''

'' तर तुमच्याजवळ तुमच्या या गुणी भाडेकरुचा पत्ता वैगेरे सगळी माहिती उपलब्ध असेलच'' सॅमने त्याला विचारले.

'' हो आहे... '' घरमालक एक कागद सॅमकडे देत म्हणाला.

सॅमने तो कागद घेतला. त्यावर इवेन फोस्टरची पत्ता, फोन वैगेरे सगळी माहिती घरमालकाने लिहून दिली होती

'' पण हे सगळं पाहून ती माहिती खोटी असावी असं वाटतं'' घरमालक भितभीतच सॅमला म्हणाला.

'' म्हणजे... तुम्ही त्याची सगळी माहिती पडताळून पाहिली नव्हती?'' सॅमने विचारले.

'' नाही .. म्हणजे ... ते मी एवढ्यात करणारच होतो'' पुन्हा घरमालक भितभित म्हणाला.


क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. is this a translation of any English novel?

  ReplyDelete
 2. is this a translation of any English novel? - Anonymous asked

  Reply - No its my original work. The english screenplay 'Latched' is written by me and is registered with FWA Mumbai.

  ReplyDelete
 3. Hello, Your novel is very interested, but please post the episodes early and 2 episodes a day, we just curious to know what will be next. . . :)

  ReplyDelete
 4. nice flow...and jeff = Daya from CID LOL
  :)

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network