Marathi Sahitya - Black Hole CH-35 सुझान आणि स्टेलाची भेट

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Precious thoughts -

Twenty years from now you will be more disappointed by the things you didn't do than by the ones you did. So throw off the bowlines, Sail away from the safe harbor. Catch the trade winds in your sails. Explore. Dream.

---- Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)


सुझानने स्टेलाच्या दाराची बेल दाबली. डॅनियल तिच्या बाजुलाच उभा होता. ते दोघं आता दार उघडण्याची वाट पाहत उभे राहाले. दार उघडेपर्यंत सुझानने मागे वळून एकदा आजुबाजुच्या बगीच्यावर नजर फिरवली.

'' बघ काही झाडं कशी मरताहेत'' सुझान काही सुकणाऱ्या लहान लहान रोपट्यांकडे डॅनियलचं लक्ष वेधत म्हणाली.

'' स्टेलाला लक्ष देण्यास वेळ मिळत नसावा ... तिचा जिवन वृक्षच असा उन्मळून पडला आसता ती बिचारी या छोट्या छोट्या रोपट्यांकडे काय लक्ष देणार?'' डॅनियल म्हणाला.

तेवढ्यात स्टेलाच्या घराचं दार उघडलं. दारात स्टेला उभी होती.

'' सुझान !... डॅनियल! ... कसे आहात... केव्हा आले तुम्ही परत?'' त्या दोघांना अचानक दारात उभे पाहून स्टेला आश्चर्याने म्हणाली.

आनंदाने सुझान आणि स्टेलाने एकमेकींना मिठी मारली.

स्टेला सुझानला आणि डॅनियलला घरात घेवून आली. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे आत येता येता हातात हात घालून त्यांचं बोलणं, हसणं सुरु होतं. आत हॉलमध्ये येताच सुझानने आपला हात स्टेलाच्या हातातून सोडवून घेतला. तिचा हसरा आनंदी चेहरा अचानक गंभीर झाला. आत हॉलमध्ये सोफ्यावर जाकोब बसलेला होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि कपडे चूरगळलेले दिसत होते. स्टेलाला काय बोलावे काही कळत नव्हते. स्टेला काही बोलण्याच्या आधीच तो आपल्या चेहऱ्यावरचे भाव व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत उठून उभा राहाला आणि सुझान आणि डॅनियलचे स्वागत करण्यास समोर गेला.

'' हॅलो सुझान '' जाकोब आपला हात समोर करीत म्हणाला.

सुझानने जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सुझानच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते की तिला जाकोबचे तिथे असणे आवडले नव्हते. नंतर जाकोबने डॅनियलशी हस्तांदोलन केले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवित म्हणाला, '' हाय डॅनियल... हनिमून कसा राहाला?''

'' एकदम झकास'' डॅनियल एक नजर सुझानकडे टाकत म्हणाला.

त्याला अपेक्षीत होतं की सुझान त्याच्या या कमेंटने लाजेल किंवा काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करेल. पण तसं काहीच झालं नाही. सुझानने डॅनियलच्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं. तिथे जाकोबला पाहून तिचा एकदम मुडच खराब झाला होता असं दिसत होतं. सुझान पाय आपटत सरळ आत घरात जायला लागली.

'' स्टेला आम्ही आत आहोत'' सुझान रुक्ष स्वरात म्हणाली आणि आत निघून गेली.

डॅनियलही स्टेला आणि जाकोबला तिथेच सोडून तिच्या मागे मागे आत गेला.


क्रमश:...


Precious thoughts -

Twenty years from now you will be more disappointed by the things you didn't do than by the ones you did. So throw off the bowlines, Sail away from the safe harbor. Catch the trade winds in your sails. Explore. Dream.

---- Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)


Marathi sahitya, Marathi literature, Marathi books, Marathi novels, Marathi textbooks, Marathi wangmay, Marathi vangmay, Marathi wangmaya, Marathi vangmaya, Marathi kadambari

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment