Novels online - Black Hole CH-31 एकदम हूबेहूब

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

It is not enough to do your best; you must know what to do, and THEN do your best.

--- W. Edwards Deming


शेवटी एकदाची स्टेला कशीतरी शांत झाली. पण तरीही तिच्या मनातून जाकोबबद्दलची शंका जायला तयार नव्हती. वेळही बराच झाला होता. नंतर पुन्हा कधीतरी जाकोबशी या बाबतीत चर्चा करावी असा विचार करुन ती ब्लॅकहोलमधून परत जाण्यास तयार झाली. 'A' लेव्हलच्या 'एक्झीट विहिरीतून उडी टाकून ते दोघंही बाहेर पडले.

जेव्हा जाकोब आणि स्टेला बाहेर आले, ते वाड्याच्या समोर विहीरीच्या शेजारी जमीनीवर पडले होते. दोघंही उठून उभे राहाले. त्यांचे टॉर्चेस अजूनही बंद होते. ते आपापले टॉर्चेस सुरु करणार तेवढ्यात त्यांना समोरुन कशाचे तरी दोन चमकणारे फ्लॅशलाईटस विहिरीकडे येतांना दिसले. आणि सोबत टायर्सचा रेतीतून आणि खडकाळ जमीनीतून त्यांच्याकडे येण्याचा आवाज येत होता. ती एक कार होती जी त्यांचेकडेच येत होती. त्यांचेकडे येतांना त्या कारचे टायर्स जणू मार्गात येणारे रेती दगड धोंडे निष्ठूरपणे कुस्करत होते.

'' यावेळी कोण असावं?'' स्टेलाने घाबरुन विचारले.

'' ये ईकडे ये .. आपल्याला लवकर कुठेतरी लपायला पाहिजे'' जाकोब तिला एकीकडे नेत म्हणाला.

त्याने स्टेलाच्या हाताला धरुन तिला एका मोठ्या खडकाच्या ठिगाऱ्याच्या आडोशाला नेले. त्या ढिगाऱ्याच्या मागे लपून ते दोघंही गाडीतून कोण आले असावे हे पाहत होते.

कार थांबली आणि कारचा दरवाजा उघडला. समोरचं दृष्य स्टेला उत्सुकतेने पाहत होती, तिची उत्सुकता आता आश्चर्यात बदलली होती. तिचं आश्चर्याने उघडलेलं तोंड उघडं ते उघडंच राहालं. तिच स्थिती जाकोबचीही झाली होती.

'' हे असं कसं शक्य आहे?'' स्टेलाच्या उघड्या तोंडातून अनायास निघाले.

गाडीतून उतरलेले दूसरे तिसरे कुणी नसून ... ते दोघंच... स्टेला आणि जाकोब होते. तेच दोघं जण एकाच वेळी दोन जागी. एक खडकाच्या मागे लपून पाहणारे तर दुसरे गाडीतून उतरणारे.

'' माय गॉड... ते तर आपणच आहोत'' जाकोबच्या तोंडून निघाले.

हे असे कसे झाले?...

विचार करता करता जाकोबच्या काहीतरी लक्षात येवून त्याने त्याच्या मनगटावर बांधलेली घड्याळ बघितली. तो ती घड्याळ स्टेलाला दाखवित म्हणाला, '' बघ... आपण इथे बरोबर 8.00 वाजता आलो होतो... आणि आता बरोबर आठ वाजलेले आहेत''

त्यांच्या समोरचे दूसरे जाकोब आणि स्टेला आता गाडीतून उतरुन टॉर्च हातात घेवून विहिरीकडे निघाले होते.

'' एकदम हूबेहूब ... तेच आपण ... आणि दोन रुपात... तेही एकाच वेळी आणि एकाच जागी... सगळं कसं गुढ वाटतं नाही?'' स्टेला अजूनही तिच्या आश्चर्यचकीत स्थितीतून बाहेर आली नव्हती.

त्यांच्या समोरची दुसरी स्टेला आता विहिरीच्या काठावर जाकोब बरोबर उभी राहाली होती.

खडकाच्या ढिगाऱ्यामागून वाकून पाहता पाहता स्टेलाचा तोल गेला आणि तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात त्या ढिगाऱ्यावरुन एक खडक घरंगळत खाली आला. खडकाच्या घरंगळण्याचा आणि खाली पडण्याचा आवाज झाला आणि ती दूसरी स्टेला, जी विहिरीत उडी मारण्यास तयार होती, तिने मागे वळून बघितले.

खडकाच्या मागे लपलेल्या जाकोबने स्टेलाला पटकन पकडून पुन्हा ढिगाऱ्याच्या मागे लपविले.

'' हलू नकोस .. '' जाकोबने तिला हळू आवाजात बजावले.

विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या जाकोबनेही मागे स्टेला जिकडे पाहत होती तिकडे बघितले. त्यांना हवेच्या झोतामुळे झाडांची पाने हलतांना दिसली. मग पुन्हा विहिरीकडे वळून जाकोबने विहिरीत उडी मारण्यासाठी स्टेलाचा हात पकडला. स्टेलानेही झाडांच्या पानांचा आवाज असावा असं समजून खांदे उडवून जाकोबसोबत विहिरीत उडी मारली.

खडकाच्या ढिगाऱ्यामागे लपलेले जाकोब आणि स्टेला सुटकेचा निश्वास टाकीत ढिगाऱ्यामागून बाहेर आले आणि ज्या गाडीतून दुसरे स्टेला आणि जाकोब आले होते त्या आपल्या गाडीकडे निघाले.


क्रमश:...


It is not enough to do your best; you must know what to do, and THEN do your best.

--- W. Edwards Deming


Marathi literature, Marathi sahitya, Marathi writtings, Marathi kala, Marathi art, Marathi books, Marathi novels, Marathi kadambari, Marathi gosti, Marathi kathasangraha, marathi katha sangraha

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment