Maathi books - Black Hole CH-46 वेगळं विश्व

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Inspirational thoughts -

It's kind of fun to do the impossible.

---Walt Disney


सुझान, डॅनियल, ब्रॅट आणि इतर पोलिस कर्मचारी वाड्यातून बाहेर पडून स्फोट झालेल्या विहिरीभोवती जमलेले होते. त्यांच्या हालचाली आश्चर्यामुळे अगदी मंद झाल्या होत्या. हे काय झालं? आणि का झालं? सगळं त्यांच्या समजण्याच्या पलिकडे होतं. स्टेला आणि जाकोबला सुझान दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ते हळू हळू सुझानकडे जायला लागले. पण सुझानचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तिची शोधक नजर आजुबाजुच्या खडकांच्या ढिगाऱ्यावरुन इकडे तिकडे फिरत होती.

'' सुझान...'' जाकोबने तिला आवाज दिला.

त्याला आता तोच तिचा भाऊ गिब्सन आहे हे सांगण्याची घाई झाली होती.

पण ती त्याच्यावर विश्वास ठेविल काय?...

त्याच्या मनात शंकेने घर केले.

'' सुझान..'' जाकोबने पुन्हा आवाज दिला.

पण हे काय? सुझान काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. जणू तिला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. स्टॆलाने आणि जाकोबने एकमेकांकडे गोंधळून पाहाले.

'' सुझान ...'' आता स्टेलाने, थोडा मोठ्याने आवाज दिला.

तरीही सुझानवर काहीच परिणाम दिसत नव्हता.

ते आता तिच्या अजुन जवळ गेले. जाकोबने आपला हात तिच्या खाद्यावर ठेवला. पण काय आश्चर्य!. त्याचा हात तिच्या खांद्यावर न स्थिरावता खाली पडला. त्याचा हात जणू पोकळ असल्यासारखा किंवा तिचं शरीर पोकळ असल्यासारखा त्याचा हात तिच्या शरिरात जावून बाहेर पडला. एक मोठा आश्चर्याचा धक्का बसल्यागत स्टेला आणि जाकोब एकमेकांकडे पाहू लागले. स्टेलानेही आपल्या परीने सुझानचा हात पकडण्यासाठी प्रयत्न केला, पण तिच्या हातातही तिचा हात आला नाही.

पुन्हा दोघं एकमेकांकडे विस्मयाने आणि आश्चर्याने पहायला लागले.

स्टेला सुझानकडे वळली आणि तिला पुन्हा मोठ्या आवाजात हाक देवू लागली,

'' सुझान..''

''... तू मला ऐकते आहेस का?''

सुझान काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नव्हती.

सुझान, डॅनियल, ब्रॅट आणि इतर पोलिस कर्मचारी इकडे तिकडे आजुबाजुला आश्चर्याने पाह्त होते. ते जणू सर्वच्या सर्वजण स्टेला आणि जाकोबच्या तेथील उपस्थितीपासून पुर्णपणे अनभिज्ञ होते.

जाकोब आता डॅनियलकडे गेला आणि त्याच्या अगदी समोर जावून त्याचा रस्ता अडवित उभा राहाला.

'' डॅनियल..'' जाकोबने त्याला आवाज दिला.

'' तू मला ऐकतो आहेस ना''

पण डॅनियल जाकोबच्या तेथील उपस्थितीची जणू तमा न बाळगता समोर सरळ चालू लागला. आणि काय आश्चर्य त्याला चालतांना जाकोबचा काहीही अडथळा न होता तो जणू त्याच्या शरीरातून पलिकडे चालत गेला होता.पण जाकोब प्रयत्न सोडायला तयार नव्हता. तो ब्रॅटच्या समोर जावून उभा राहाला,

'' ऑफीसर... माझ्याकडे पहा'' जाकोब त्याच्यासमोर आपला हात हलवून त्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न करीत होता.

पण काही एक उपयोग होत नव्हता.

तेवढ्यात एवढ्या सगळ्या लोकांत एकजण आपल्याकडे पाहत आहे असं जाकोबच्या लक्षात आलं. तो एक म्हातारा होता. तो नुसता जाकोबकडे पाहतच नसून गालातल्या गालात हसत होता.

'' तुला कुणीही ऐकू शकणार नाही ... की बघू शकणार नाही'' तो म्हातारा जाकोबला म्हणाला.

स्टेलाने उत्सुकतेने त्या म्हाताऱ्याकडे पाहत विचारले, '' का?''

'' कारण आता तूम्ही एका वेगळ्या विश्वात आहात'' तो म्हातारा म्हणाला.

'' मग तूम्ही कसे आम्हाला बघू शकता आणि ऐकूही शकता'' स्टेलाने विचारले.

त्यावर तो म्हातारा जोराने हसला आणि म्हणाला,

'' कारण तूम्ही माझ्या विश्वात आहात... तू, तो आणि मी हे एका वेगळ्याच विश्वात आहोत... थोडक्यात आपण मेलेलो आहोत असं म्हटलं तरी चालेल... कारण आधीच्या विश्वासाठी आपण मेलेलोच आहोत... काहीजण आपल्या सारख्यांना आत्मे म्हणतो तर कुणी भूत म्हणतो... पण एवढं मात्र खरं आहे की आपण या लोकांना बघू शकतो पण ते लोक आपल्याला बघू शकत नाहीत''

जाकोबने आणि स्टेलाने असाहयतेने आजुबाजुच्या त्या लोकांकडे पाहाले. खरंच ते त्यांना पाहू, ऐकू शकत होते पण ते मात्र त्यांना पाहूही शकत नव्हते आणि ऐकूही शकत नव्हते.


क्रमश:...


Inspirational thoughts -

It's kind of fun to do the impossible.

---Walt Disney


Marathi books, Maharastra books, marathi publication, Marathi prakashak, Marathi prakashan, vartamanpatra, wartamanpatra, Marathi print, Marathi press, Marathi report, Marathi batmya

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. this is very nice story.. i m waiting for the next part, what happened with Stella and Jacob...

  ReplyDelete
 2. this is very nice story.. i m waiting for the next part, what happened with Stella and Jacob...plz send remaining story early.............

  ReplyDelete
 3. It's really nice story.kalpanashakti khup chan ahe. eagerly waiting for next chapter.

  yogeeta

  ReplyDelete
 4. this is great novel , it is including scientific concept . i think it would happen soon.

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network