Marathi books - Black Hole CH-38 स्टेला कुठे निघाली?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Thoughts about happiness -

There is only one success: to be able to spend your life in your own way, and not to give others absurd maddening claims upon it.

---Christopher Darlington Morley (1890-1957)


सुझान ब्रॅटशी फोनवर बोलली आणि फोन ठेवताच ताबडतोब बाहेर जाण्यासाठी समोरच्या दाराकडे निघाली. डॅनियलही असंमजसपणे तिच्या मागे मागे जावू लागला.

'' चल लवकर ... आपल्याला ताबडतोब गेलं पाहिजे.'' सुझान डॅनियलला म्हणाली.

'' कुठे?'' इतक्या वेळपासून बोलण्याची संधी मिळताच डॅनियलने विचारले.

'' तिला शोधण्यासाठी'' सुझान घराच्या बाहेर पडत म्हणाली.

'' कुठे गेली आहे ती?'' डॅनियलने विचारले.

'' आता मला काय माहित?'' सुझान चिडून म्हणाली.

'' मग आपण कुठे जाणार आहोत?'' डॅनियलनेही चिडून विचारले.

'' तू फक्त माझ्यासोबत चल... आता सध्या वेळ नाही ... रस्त्याने मी सगळं सांगते'' सुझान जेवढं शक्य होईल तेवढं शांततेने त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

ते दोघंही घराच्या बाहेर पडले.

एक कार वेगाने रस्त्यावर धावत होती. कारच्या बाजुच्या खिडकीतून स्टेला कार चालवितांना दिसत होती. एका वळणावर तिने कारचे करकचून ब्रेक दाबले आणि ती उजवीकडे वळली. आता त्या कारच्या मागे एक पोलिसांची पॅट्रोल जिप त्या कारचा पाठलाग करतांना दिसू लागली. पण स्टेलाचं त्या जिपकडे एकतर लक्ष नव्हतं किंवा तिला त्या जिपशी काही घेणंदेणं नव्हतं.

स्टेलाची कार फुल स्पिडमध्ये धावू लागली. तेवढ्यात एक स्त्री रोड क्रॉस करता करता समोरुन वेगाने येणारी स्टेलाची कार पाहून, काही न सुचून, गोंधळून रस्त्याच्या अगदी मधोमध थांबली. स्टेलाला जोरात ब्रेक दाबण्यावाचून काही गत्यंतर नव्हते. कारच्या ब्रेकचा किंचाळल्यागत आवाज झाला. कार त्या बाईच्या अगदी समोर थांबली आणि इतक्यावेळपासून जणू थीजलेली ती बाई आता रोडच्या पलिकडे पळायला लागली. स्टेलाला तर घामच फुटला होता. पण ती बाई वाचलेली पाहून तिला हायसं वाटलं. तिने आपल्या कपाळावर आलेले घामाचे थेंब पूसले आणि पुन्हा तिची कार पुढे मार्गक्रमण करु लागली.

तिच्या मागेच ती पोलिसांची पॅट्रोल कार एक सुरक्षीत अंतर ठेवून तिचा पाठलाग करीत होती. कदाचित ते तिचा पाठलाग करीत आहेत हे तिच्या लक्षात येवू नये म्हणून ते एक सुरक्षीत अंतर राखून होते. किंवा त्यांना पोलीस ऑफीसर ब्रॅटचा तसा आदेश असावा.

ब्रॅटची जिपही आता भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होती. तो सतत वायरलेसवर स्टेलाचा पाठलाग करणाऱ्या पॅट्रोल जिपच्या संपर्कात होता. तेवढ्यात त्याच्या वायरलेसवर स्टेलाचा पाठलाग करणाऱ्या पोलिसाचा संदेश आला, '' सर आम्ही तिच्या अगदी मागेच आहोत''

'' गुड... तिला बिलकुल नजरेआड होवू देवू नका... थोड्याच वेळात मी तुम्हाला जॉईन करतोय'' ब्रॅट वायरलेसवर म्हणाला.

शहराच्या बाहेर येवून बरंच मार्गक्रमण केल्यानंतर स्टेलाची कार मुख्य रस्त्यावरुन डावीकडे वळून एका कच्च्या रस्त्यावर धावू लागली. धूळीचे लोटच्या लोट उठू लागले. स्टेलाच्या कारला डावीकडे वळलेलं पाहताच तिचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या जिपचा वेग कमी झाला. ते आता तिची कार बरंच पुढे जाण्याची वाट पाहू लागले की जेणेकरुन तिच्या काहीही लक्षात न येता त्यांना तिचा पाठलाग करता यावा.

इकडे सुझान आणि डॅनियलची कारही शहरात रस्त्यावर भरधाव धावायला लागली होती. डॅनियल कार ड्रायव्हींग करीत होता आणि सुझान कुठे वळायचे वैगेरे सगळे निर्देश डॅनियलला देत होती. सुझानने तिच्या मोबाईलवर ब्रॅटचा फोन डायल केला, '' आम्हीही आता थोड्याच वेळापुर्वी निघालो आहोत'' सुझान म्हणाली.

'' काही काळजी करु नका... आमची एक टीम अगदी तिच्या मागेच तिचा पाठलाग करीत आहे'' तिकडून ब्रॅटचा आवाज आला.

'' ती आता कुठे आहे?... आणि तुम्ही कुठे आहात?'' सुझानने विचारले.

'' मी थोड्याच वेळात माझ्या टीमला जॉईन होईन... मी आता सध्या ...'' ब्रॅटने जागेची खूण सांगण्यासाठी त्याच्या जिपच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघितले.

स्टेलाच्या गाडीमागे आता तिचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी आपली गाडी कच्च्या रस्त्यावर वळवली. गाडी कच्च्या रस्त्यावर धावू लागताच त्याने वायरलेसवर ब्रॅटला कळवले, '' सर असं वाटतं की ती जंगलाकडे जात आहे''

'' तिचा पाठलाग करीत राहा '' ब्रॅटने तिकडून बजावले.

'' यस सर..'' पाठलाग करणारा पोलिस म्हणाला.

डॅनियल कार चालवित होता आणि सुझानचे अजुनही मोबाईलवर संभाषण सुरु होते. तो आता पुढच्या निर्देशाची वाट पाहू लागला. सुझानने मोबाईलवरील संभाषण संपविले आणि डॅनियलला निर्देश दिला, '' पुढील सिग्नलवर गाडी डावीकडे वळव''


क्रमश:..


Thoughts about happiness -

There is only one success: to be able to spend your life in your own way, and not to give others absurd maddening claims upon it.

---Christopher Darlington Morley (1890-1957)


Marathi, Marathi blog, Marathi site, Marathi blog aggregator, Marathi aggregator, Marathi vahini, Marathi books, Marathi kadambari, Marathi creation, Marathi creativity, Marathi screenplay, Marathi patkatha

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment